Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संबंध एकदाच आणि आधीच आलेला
संबंध एकदाच आणि आधीच आलेला असतो, खुनाच्या दिवशी pregnancy कन्फर्म होते. आणि पोटातील बाळ विक्रमचं असूच शकत नाही कारण तो नैसर्गिक कधीच नव्हता.
ok..... मला वाटलं त्या दिवशीच
तांडव वघायला घेतलीये. ३ भाग
तांडव वघायला घेतलीये. ३ भाग झाले.
उत्कंठावर्धक आहे. सैफ अलीला मोठी संधी मिळाली आहे.
पोलिटिकल ड्रामा
त्याला करंट अफेअर्सची जोड दिलीय.
Sir (NetFlix) बघितला. संथा
Sir (NetFlix) बघितला. संथा आहे, पण पहायला हरकत नाही.
तांडवचे सर्व नऊ भाग पाहीले.
तांडवचे सर्व नऊ भाग पाहीले. माझा प्रयत्न शक्यतो आवडून घेण्याचा असतो. उगीच नुक्स काढत बसत नाही. त्यामुळे मनोरंजन होते.
पण नऊ भाग पाहील्यानंतर एकदम कंटाळा येत असेल तर नक्कीच गडबड आहे. सततची कारस्थानं इतकंच आहे.
भाजप सत्तेत आल्यापासूनच्या घडामोडी या विस्कळीत स्वरूपात येतात. त्यात दिग्दर्शक सतत भाष्य करत राहतो. ते कंटाळवाणं वाटतं.
आणि एव्हढं करून अर्धवट वाटते. आता पुढच्या सीझनची वाट बघणे आलेच.
नंतर नंतर जो कंटाळा दाटत राहतो त्यामुळं सैफ अली, डिंपल यांच्या अभिनयाकडे दुर्लक्ष झालं.
या आठवड्यापासून मोठ्या सीरिज
या आठवड्यापासून मोठ्या सीरिज सुरु झाल्यात
मार्वलचे दोन सुपर हिरो स्कार्लेट विच आणि व्हिजन यांची स्वतःची मिनीसिरीज WandaVision आलीय हॉटस्टारवर
https://www.imdb.com/title/tt9140560/
अमेरिकन गॉडचा तिसरा सीजन सुरु झालाय जो प्राईमवर आहे.
https://www.imdb.com/title/tt1898069/
जिमी शेरगिलवाली युअर ऑनर जी आपल्याकडे आली होती, आता तिच्या इंग्लिश व्हर्जनमध्ये ब्रेकिंगब्याडचा केमिस्ट्री मास्तर आहे. मूळ सिरीज इस्रायलची आहे बहुदा. अर्थात इंग्लिश व्हर्जन उजवी आहे पण ही भारतात दिसत नसल्याने टॉरेन्टवर मिळेल.
https://www.imdb.com/title/tt7440726/
"तांडव"चे बिंज वॉचिंग केले
"तांडव"चे बिंज वॉचिंग केले दोन दिवसात.... ९ एपिसोडस बघून पण फार काही वेगळे, धक्कादायक, सरप्रायझिंग वगैरे काही वाटले नाही..... अभिनय चांगला आहे सगळ्यांचा पण प्रोमो बघून जितक्या अपेक्षा उंचावलेल्या त्या काही फार पूर्ण झाल्या नाहीत!
लास्ट किंगडम - नेटफ्लिक्स वर
लास्ट किंगडम - नेटफ्लिक्स वर सध्या पहायला सुरुवात केली आहे.
नवव्या शतकातल्या इंग्लंड मधली लहान मोठी ख्रिस्चन राज्यं आणि त्या राज्यांना बळकावून तिथे सेटल होण्याच्या इराद्याने डेन्स टोळ्यांकडून ( डेन्मार्क हून आलेले, पेगन्स ) होणारी सतत ची आक्रमणं या पार्श्वभूमीवर काही ऐतिहासिक कथानकं, पात्रं आणि काही फिक्शनल कॅरेक्टर्स घेऊन बेतलेली गोष्ट. मुख्य पात्र उट्रेड रॅग्नरसन हे फिक्शनल कॅरेक्टर आहे. जन्माने एका इंग्लिश राज्याचा राजपुत्र, पण लहानपणीच डेन्स नी पळवून नेल्याने त्यांच्यातच लहानाचा मोठा झालेला. शूर, मनस्वी स्वभावाचा, त्यात नास्तिक त्यामुळे कुणाचीच भीडभाड न बाळगणारा, अन त्यामुळेच पावलो पावलीशत्रू निर्माण करणारा. इंग्लिश आणि डेन्स दोन्ही बाजू त्याचा विरुद्ध पार्टीची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने फायदा/मदत घेऊ पहातात पण त्याच्या निष्ठा नक्की कुठे आहेत हे न कळून पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ही ठेवू शकत नाहीत. उट्रेड चा मात्र एकच ध्यास असतो तो म्हणजे आपले जन्मसिद्ध हक्क असलेले बेबनबर्ग चे राज्य परत मिळवणे.
४ सीझन्स आहेत , मी १ पाहिला आतापर्यन्त, इंटरेस्टिंग आहे. गेम ऑफ थ्रोन्स चे फॅन असाल तर ते किल्ले , लढाया, कॉस्च्युम्स पाहून त्याची थोडी आठवण आल्याशिवाय रहात नाही. तितके कॉम्प्लेक्स कथानक नसले तरी गुंतवून ठेवणारे नकीच आहे. व्हायलन्स आणि न्यूडिटी आहे पण गेम ऑफ थ्रोन्स च्या मानाने बरीच कमी
मी १ पाहिला आतापर्यन्त,
मी १ पाहिला आतापर्यन्त, इंटरेस्टिंग आहे.
>>>> माझे ३ पाहून झालेत न ४ था या विकेंडला पाहीन.
मलापण खुप खुप आवडली ही सिरिज, पण गेम ऑफ थ्रोन्स ची भव्यता यात अजिबातच नाही.
एक सुचवू का , तुम्हाला कदाचीत वायकिंग सिरिज पण आवडेल.
आउटलॅण्डर कशी आहे?
आउटलॅण्डर कशी आहे?
तांडव चे २-३ भाग पाहिले. मिर्झापूर, पाताल लोक व एकूणच "बाबारे! राजकारण काय असते हे तू पहिचानलं नाहीस (*)" अशा टोन मधे आपल्याशी बोलणार्या सिरीज च्या पेक्षा वेगळा काही स्पार्क अजून दिसला नाही यात. राम गोपाल वर्माच्या पिक्चर मधे जर लोक "अपने धंदे मे" चे कॉमन नॉलेज अधूनमधून एकमेकांना सांगू लागले तर कसे वाटेल तसे यात "राजनीती मे" ऐकताना वाटते.
सर्व पात्रे सदोदित अशी पकलेल्या अवस्थेत का असतात त्याचा खुलासा होपफुली पुढे कोठेतरी असेल.
* क्रेडिट पुलं
कोरियन सिरिज चे ही कोणी फॅन
कोरियन सिरिज चे ही कोणी फॅन आहेत का? की त्याचा वेगळा धागा आहे?
तांडवबद्दल सहमत.
तांडवबद्दल सहमत.
आउटलॅण्डर कशी आहे?
आउटलॅण्डर कशी आहे?
>>>>>> पहिले २ सिजन मस्त आहेत. ३ रा पण बर्यापैकी आहे. बाकीचे ३ नाही पाहीलेत अजुन.
पण आता पर्यंतच्या सिरिजमधील मला सर्वात जास्त आवडलेला नायक या सिरिजचा आहे - जेमी फ्रेजर.
न्युड सीन्स पण आहेत, त्यामानाने हिंसा नाही जास्त.
मला क्रिमिनल जस्टीस मधे एक
मला क्रिमिनल जस्टीस मधे एक क्वेरी आहे....
तो विक्रम चंद्रा मरताना, आय मीन...दवाखान्यात नेत असताना... "मोक्ष.." असे का सांगतो इन्स्पेक्टर ला?
आउटलॅण्डर कशी आहे?
आउटलॅण्डर कशी आहे?
>>>>>> मस्त आहे. मला नायिका आवडली - क्लेअर ; )
पहिले २ सिजन मस्त आहेत-> +१
३ आणि ४ जरा ताणलेले वाटतात.
मला क्रिमिनल जस्टीस मधे एक
मला क्रिमिनल जस्टीस मधे एक क्वेरी आहे....
तो विक्रम चंद्रा मरताना, आय मीन...दवाखान्यात नेत असताना... "मोक्ष.." असे का सांगतो इन्स्पेक्टर ला?
मला असं वाटतय.. त्याला बहुतेक मोक्ष आणि अनूचं अफेयर असल्याची शंका आली असावी.. तसाही तो तिच्यावर सतत वॉच ठेवत असतो.
खुनाच्या रात्री, तो कन्फ्र्म करतो की शेवटचा कॉल अनूने मोक्ष ला केला होता.. म्हणून मग तो इन्स्पेक्टर ला सांगतो बहुतेक..
३ आणि ४ जरा ताणलेले वाटतात.
३ आणि ४ जरा ताणलेले वाटतात.
>>> पुढचे पाहीलेत का ??
५-६
आसा, बब्बन - धन्यवाद.
आसा, बब्बन - धन्यवाद.
आउटलॅण्डर ६ अजुन यायचा आहे.
आउटलॅण्डर ६ अजुन यायचा आहे.
तांडव वीकेंडला बिंज करत होतो.
तांडव वीकेंडला बिंज करत होतो. ४-५ एपिसोड बघितले मग कंटाळा आला. कथेत फार दम नाही. रादर 'ते' एक रहस्य हीच फक्त कथा झाली आहे. उगाच तेच तेच वळसे वळसे घेतल्याने भयंकर स्लो आणि एकसुरी वाटुन सोडुन दिली.
कोरियन सिरिज चे ही कोणी फॅन
कोरियन सिरिज चे ही कोणी फॅन आहेत का? की त्याचा वेगळा धागा आहे? >>>>>> मी आहे. हो पण कोरियन सिरिजचा वेगळा धागा निघायला हवा.
रादर 'ते' एक रहस्य हीच फक्त
रादर 'ते' एक रहस्य हीच फक्त कथा झाली आहे. >>> अनुमोदन .
खरतर एक चांगला थ्रिलर बनवता आला असता , ईतके गेम्स सैफचं कॅरेक्टर खेळते .
पण ईतका वेळ बघून काहीच हाती लागत नाही .
काही काही गोष्टी अनावश्यक आहेत . उदा . नार्को टेस्ट . हितेन तेजवानी . सना ची बहिण , तो करप्ट ईन्स्पेक्टर .
मला त्यातल्या साड्या आवडल्या . मैथिली , आदिती , आयेशा - तिघींच्या साड्या फार मस्त आहेत .
क्राउन चे चारही सिझन अत्ताच
क्राउन चे चारही सिझन अत्ताच संपवले...
अप्रतिम बनवली आहे सीरीज. सोनेरी मुकुटाच्या आड किती टोचणारे काटे असु शकतात याची कल्पनाच करु शकत नाही.
सिझन १ आणि २ मधली राणी झालेली अभिनेत्री फार गोड आहे. ही सिरीज पाहाताना त्या त्या व्यक्तीरेखा किंवा प्रसांगाचे विकी पेजेस बघायचा मोह टाळता येत नाही अजिबात .
राजा-राणी , राजकन्या , राजपुत्र याचं आपल्या सगळ्यांनाच सुप्त आकर्षण असतं निदान मला तरी खुप होतं. आणि इंग्लंडच्या राणी बद्दल जास्तच होत. या सिरीज मधे राणीच्या आयुष्यातले निवडक महत्वाचे प्रसंग घेतले आहेत. भव्य महालाच्या आडचा पोकळ पणा अंगावर येतो काही ठीकाणी.
विकी नुसार राणी आता ९४ वर्षांची आहे आणि चार्ल्स ७२ चा.
चार्ल्स राजा कधी होइल ते होवो पण तो चांगला राजा होइल की नाही शंका आहे.
तसतर एलिझाबेथ २ सुद्धा चांगली राणी होती की नाही हे मत व्यक्तीसापेक्ष बदलु शकतं.
राजघरण्यातली फालतु रुढी परंपरां नसत्या तर कदाचित अजुन चांगली राणी होउ शकली असती.
डायना आणि प्रिन्स चार्ल्स ची कहाणी पाहुन वाईट वाटलं खुप. सध्या कॅमिला त्याची बायको आहे. हेच जर आधी केलं असत तर ? असो.
पुढचा सिझन येणार आहे का ? कोणाला माहिती असल्यास नक्की सांगा.
सिझन १ आणि २ मधली राणी झालेली
सिझन १ आणि २ मधली राणी झालेली अभिनेत्री फार गोड आहे. ही सिरीज पाहाताना त्या त्या व्यक्तीरेखा किंवा प्रसांगाचे विकी पेजेस बघायचा मोह टाळता येत नाही अजिबात .>>>+१
'द फॉस्टर्स' बघतोय. एकदम फील
'द फॉस्टर्स' बघतोय. एकदम फील गुड ड्रामा आहे.
समलिंगी दोन आया एक पुलिस आणि दुसरी शाळेची मुख्याध्यापक आणि त्यांचं तसंच अनयुजवल कुटुंब. एक पहिल्या लग्नातला मुलगा, जुळी भाऊ बहिण जी आधी यांच्याकडे फॉस्टर्स म्हणुन रहायची आणि आता दत्तक घेतली. आणि अचानक आणखी दोन फॉस्टर्स रहायला येतात. असा प्लॉट आहे.
खूप दिवसांनी (म्हणजे किम्स कन्विनिअन्स नंतर) मस्त हलकाफुलका ड्रामा बघायला छान वाटतंय. त्यात परत सनी सॅन डीएगो दिसतंय, त्यामुळे अजुनच गार वाटतंय
Young & Hungry बघतोय.. वेळ
Young & Hungry बघतोय.. वेळ घालवायला हलके फुलके छान.. (Netflix)
पुढचा सिझन येणार आहे का ?
पुढचा सिझन येणार आहे का ? कोणाला माहिती असल्यास नक्की सांगा.>> 2022
तांडव आणि बिच्छू का खेल
तांडव आणि बिच्छू का खेल पाहिली.
तांडव: अभिनय सर्वांचा परफेक्ट. मोठ्या कॅनव्हास वर काढलेलं मिनिएचर पेंटिंग. प्लॉट मोठा होता पण लेखनावर तेवढी मेहनत घेतली नाही असं वाटलं. शिवाय अध्येमध्ये फास्ट फॉरवर्ड करत बघावी लागली इतकं ताणलय काही प्रसंगांना. म्हणजे एक व्यक्ती चालतेय तर ती निघाली आणि पोचली इतकं दाखवणं समजू शकतो, यांनी पूर्ण चालण्याचा शॉट घेतलाय. (गौहर खान आहे म्हणून का?
) ओव्हरऑल चांगली होती, पण लांबली फार.
बिच्छू का खेल: अखिल शर्मा आणि इन्स्पेक्टर तिवारी! अखिलचा अतरंगी बाप! मजा आली पाहायला.. तिवारीचे घरगुती सीन्स तर कमाल आहेत. नक्की बघण्यासारखी आहे
Servant पाहता का कोणी? दुसरा
Servant पाहता का कोणी? दुसरा सिजन चालू आहे. पहिला छान होता. म night Shyamlan टच.
अवांतर: crown मध्ये...कितीदा
अवांतर: crown मध्ये...कितीदा तरी Diana
कमोड मध्ये उलटी करताना दाखविली आहे...yuck अगदी...इतकं त्या कमोड मध्ये डोकं घालून काय उलटी करायची?
आणि तिथेच टॉयलेट मध्ये जमिनीवर कितीदा तरी बसून विचार करताना पण दाखविली....
हे असं करतात का यू के मध्ये?
Pages