अर्णव गोस्वामी व्हाट्सप डीकोडेड : सत्य की थोतांड ?

Submitted by BLACKCAT on 16 January, 2021 - 10:35

नरसोबाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडून आतडी काढावी तशा थाटात अर्णव गोस्वामीचे व्हॅटसप मुंबई पोलिसांनी फाडून काढले आहे , त्यात अनेक गोष्टी उघड होत आहेत

SAVE_20210116_205356.jpeg

मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे दिवाळे वाजवले ह्याचा कबुली जबाब अर्णव गोस्वामीने 2019 ला दिला होता त्याच्या व्हॅटसप मध्ये.

इतरही काही स्क्रीन शॉट सर्वत्र फिरत आहेत
उदा.

1. बाळाकोट बद्दल अर्णव कम्पणीला 3 दिवस आधी बातमी होती
2. अर्थव्यवस्था कुजली आहे
3. टी आर पी घोटाळा
4. भक्त प्रिय कंगना पिसाट असल्याबद्दलपण लिखाण आहे म्हणे

5. What's up messages are end to end encrypted , असेही त्याने एक ठिकाणी लिहिले आहे , तर तेही डिकोड झाले आहे म्हणे Proud

Group content visibility: 
Use group defaults

पुलवामा हल्ला आपण जिंकलो असं लिहिलंय ह्याने, ज्यात चाळीस जवान मारले गेले. बरं हा खरोखर देशद्रोही आहे हे ह्या वाक्यातून स्पष्ट झालंच.. तसंही अनेक माथेफिरू भारताच्या पराभवात आनंद मानणारे आहेत, पण ह्या देशद्रोह्याला पुढे होऊ घातलेल्या "सिक्रेट मिशन" बद्दल देखील पूर्ण माहिती होती असं त्या चॅट मधून दिसतंय.

बरं फालतूच्या TRP साठी हे हेकणं एवढ्या लांड्यालबाड्या करतंय, TRP तुन मिळतो पैसा.. मग हा हरामखोर देशाची गोपनीय माहिती विकणार नाही कश्यावरुन? आणि ह्या सगळ्यांहून सर्वात महत्वाचा प्रश्न, ह्याला हि माहिती मिळालीच कशी? NM आणि AS कोण?

Screen shots , प्रत्यक्ष बातम्या , व्हिडीओ वगैरेही शेअर केलेत तर सत्य समोर येईल

सुशांत सिंग राजपूतच्या आडून संघाशी संबंधित नसलेल्या फ्ल्मी कलाकारांना दुकाने बंद करा असा मेसेज दिला होता. त्यासाठी त्यांचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट लॉक केले गेले. ते पण कधी ?
सीबीआय, ईडी, न्यायालयीन चौकशी चालू असताना.
हे कुणी केले ?
त्या वेळी जर ते बरोबर असेल तर आता कसे चूक ?

लोकशाहीच्या दृष्टीने दोन्ही घातक पायंडे पडत आहेत.

अजुन खूप काही समजायचे आहे.

पुलवामा हल्ला घडवण्यात आला होता... ३०० किलोचे स्फोटके देशाच्या आत येतात आणि स्फोट घडविला जातो.... ४४ जवान त्या हल्ल्यात आपले अनमोल प्राण गमावतात ...

कुठेही चौकशी होत नाही... नवदेशभक्त चौकशीची मागणी पण करत नाहीत कारण बालाकोट मधे हल्ला करुन ३०० अतिरेक्यांना ठार मारले आहे असा त्यांचा समज आहे. सर्व आनंद आहे.

होय पण या हल्ल्याचा आणि ४४ जवानांच्या बलिदानाचा फायदा निवडणूका जिंकण्यासाठी आणि सत्ता टिकविण्यासाठी झाला.

हे खरे तर my lai massacre च्या तोडीचे स्कँडल आहे पण मेडिया सामसूम आहे.

अरुण जेटली मृत्यूशय्येवर होते, तेव्हा ते फारच ताणताहेत बुवा, असं अर्णव म्हणाला. सो क्यूट

ते गेल्यावर नविका कुमार म्हणाली होती, मी रोज सकाळी त्यांना फोन करायचे (आणि आजचा मेन्यु ठरवायचे?)

सर्व चाट जेव्हा सोशल मीडिया वर व्हायरल होईल तेव्हा अर्णव आणि मोदी ह्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
आता पर्यंत पोलिस नी थोडाच भाग व्हायरल केला आहे.

Delete केली पोस्ट.
पण कंगना च्या वायफळ बडबडी चा आणि बेफाम चुकीच्या आरोपांचा bjp समर्थक मंडळी नी कधी च निषेध केला नाही.
असे असून सुद्धा माझ्या पोस्ट च निषेध bjp चे समर्थक नसलेल्या लोकांनी केला.
ह्यालाच म्हणतात निःपक्ष भूमिका.
भक्तगण हा गुण घ्या.

अरणवचे पिता मनोरंजन गोस्वामी 30 वर्षे आर्मीत होते , नंतर ते संघ की भाजपात गेले , एकदा निवडणूकही लढले होते

आता अशा खानदानी पोराचे हे प्रताप

नीच कमेंट. हलकट मनोवृत्ती >>>>>>
+१११११
म्हणूनच चर्चेचा स्तर पाहता इथे भक्त जण येण्याचे टाळणार च !!!

लोक कुजबुजत होते. धूर होता म्हणजे आग तर नक्की होतीच. ती फक्त सिद्ध करण्याचेच काय ते बाकी होते.
बाकी हि एनसीपी ची पवारफुल्ल खेळी आहे असे म्हणतात.
एकमेकांची अंडीपिल्ली आधीच माहिती असतात. वेळ आली कि बाहेर निघतात.
धनंजय मुंडेना त्यांनी हात लावला मग त्याचा बदला म्हणून पवारफुल्ल खेळीने हळूच थोडे अर्णब चाट खुले करून त्यांची गळपट पकडली आहे असे म्हणायला हरकत नाही.

कुठेही चौकशी होत नाही... >>>>

गोपीनाथ मुंडे "अपघात" सुद्धा असाच संशयास्पद आहे. तिथे सुद्धा त्या कार मधल्या बाकीच्यांचे पुढे काय झाले कळले नाही. आरुषी प्रकरणाची कित्येक वर्षे चौकशी करणारे सीबीआय, केंद्रीय मंत्र्यांच्या अपघाताची चौकशी मात्र महिन्याभरात करून मोकळे झाले.
काढणारे वेळ येताच एकेक गोष्टी बाहेर काढतात.

कंगना 7 पुरुष ठेवते, तिला भाजपने पदमश्री दिली , ती व अर्णव ओरडत होते , करण जोहर नशेबाज आहे तर त्या करणं जोहरलाही त्याच बीजेपीने त्याच वर्षी पदमश्री दिली

मुंडेंनी 2 बायका ठेवल्या तर काय होते ?

<< कंगना 7 पुरुष ठेवते, तिला भाजपने पदमश्री दिली , ती व अर्णव ओरडत होते , करण जोहर नशेबाज आहे तर त्या करणं जोहरलाही त्याच बीजेपीने त्याच वर्षी पदमश्री दिली >>

------- पवारांना पद्मविभूषण दिले होते... आणि तो मास्टर स्ट्रोक होता. Happy

पाक नागरिक असतांना, मुंबईत अनेक फ्लॅट घेणारा गायक, अदनान सामीजी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

<< जो चॅट उघड झाला आहे तो खरा असेल तर भक्तांचे थोबाड फुटलेले आहे.
त्यामुळे उखाळ्या पाखाळ्या आणि वादग्रस्त वक्तव्ये यापासून दूर रहा.
या चॅटवर ते काय बोलतात ते बघू.
आजवर पुलवामा प्रकरणाबाबत शंका होत्याच की. लोक काही एव्हढे दूधखुळे राहीलेले नाहीत. पण मीडीयाचा भोंपू घेऊन शंका घेणा-यांना देशद्रोही ठरवले जात होते. विरोधी आवाज उमटू दिला जात नव्हता. सतत मीडिया मॅनेजमेंट मुळे शंका घेणा-यांना स्टेज आणि अटेन्शन मिळत नव्हते.

आता हे संपूर्ण षडयंत्र उघड झाले आहे. >>

--------- सहमत. निवडणूका जिंकण्यासाठी काय वाट्टेल ते.

पुलवामा स्फोट तर घडविलेला होता. सर्व स्क्रिप्ट आधी तयारच होते.... मग गोध्रा पण असेच पोलराझेशन साठी घडविण्यात आले होते का? ते प्रकरणही पुलवामा / बालाकोट नंतर संशायास्पद वाटायला लावणारे आहे.

तुम्हाला माझा "गोध्राकांड आणि पुलवामाकट यांतील साम्यस्थळे" हा प्रबंध वाचायला दिला असता पण आता अर्नबड्यामुळे मला पुन्हा अपडेट करावा लागणार तो Wink

हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. काही लोकांचा अर्णब लाडका असला आहे. राष्ट्रीय सुरक्षची गुपिते त्याला माहिती असतात , त्यावर तो टीआरपीची गणिते मांडतो हे चिंताजनक आहे. अरुण जेटलीसारख्या केंद्रीय नेत्याच्या मरणावर टिप्पणी करतो हे अतिशय खेदजनक. काही महिन्यांपूर्वी इथेच काही सदस्यांनी अर्णब समर्थनात गळा काढला होता . या सगळ्या विषयांवर त्यांचे काय मत आहे ?

Pages