काळ चालला पुढे
तम सारून सूर्य उगवला
प्रकाश पसरला चोहीकडे
का मानवा तू मनात कुढे?
काळ चालला पुढे पुढे
संकटांशी देत लढे, काळ चालला पुढे
पक्षी गाती फुले हसती
नाचती अवखळ ओढे
आनंदीआनंद उधळीत
काळ चालला पुढे पुढे
संकटांशी देत लढे, काळ चालला पुढे
ऊनपाऊस खेळ सर्वदा
निसर्गचक्र हे नित्य घडे
भलेबुरे स्वीकारीत सारे
काळ चालला पुढे पुढे
संकटांशी देत लढे, काळ चालला पुढे
श्रेष्ठ तू मानव जगती
भ्रांत तुजला का पडे?
झडू दे प्रगतीचे चौघडे
काळ चालला पुढे पुढे
संकटांशी देत लढे, काळ चालला पुढे
वर्तमानाच्या कुशीतुनी
भविष्याचा उदय घडे
भूतकाळाचे गाडून मढे
काळ चालला पुढे पुढे
संकटांशी देत लढे, पाऊल पडू दे पुढे
-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.22.09.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita
खूप सुंदर !
खूप सुंदर !
अरुण सर, तुमच्या कविता खूप अर्थपूर्ण असतात.
छान.
छान.
रुपाली ताई, मनःपूर्वक धन्यवाद
रुपाली ताई, मनःपूर्वक धन्यवाद!
छान कविता
छान कविता