आयुष्याला सये तुझ्या प्रेमाची बांधण,
कोऱ्या हृदयावर माझ्या तुझ्या ओठांचं गोंदण..
--------------
ती वेणी सोडवताना, मी शुद्ध होतच जातो,
देहाची होते समिधा, मी फक्त ओतत जातो..
----------------
तू यावेस सजणा माझ्या, अंगणी वळीव होऊन,
मी उधळून द्यावे स्वतःला मृद्गंध तुझा होऊन...
--------------------
तू मला, तुला मी पाहावे, एकाच आरशातून,
आत्म्यांचे मिलन व्हावे, त्या पहिल्या स्पर्शातुन...
--------------------------
( चारोळी लिहायची होती, पण कविता? झाली.)
कोण म्हणतं कठीण असतं तिला समजून घेणं,
देहाच्या नागमोडी वळणावरून हळूवार जाणं,
चाचपून अनुभवावं ते सुंदर रेखीव लेणं,
उधळून द्यावं तिच्यावर हे सगळंच जिणं!
श्वास तिचा थरथरेल,
जीव तुझा हुरहुरेल,
श्रांत होऊन मग कधी,
बाहुपाशही ढळेल..
तू फक्त ऐकून घे,
जे होईल ते टिपून घे,
कूस बदलून निजू नकोस,
डोळ्यांत तिला साठवून घे..
बोलण्याची गरज नाही,
ऐकण्याचे बंधन नाही,
थोडा सावध अस मात्र
कारण डोळ्यांना सुट्टी नाही.
तुझं जे म्हणणं असेल,
तिच्या पाठीवर बोटांनी सांग,
हळू हळू का होईना पण,
लागेल तुला तिचाही थांग,
थोडं तिच्या मनासारखं वागुन तर बघ,
आखलेल्या वाटांवरून चालून तर बघ,
प्रेम तुला दिसेल तिचंही नक्की,
समोर आलेली बट तिच्या कानामागे सारून तर बघ!
सोपी असते रे ती, आपल्यालाच कळत नाही.
ओढाळ आपलं मन कळलं तरी वळत नाही!
बाकीच्या सापडल्यावर टाकेन
बाकीच्या सापडल्यावर टाकेन
कसलं भारी!!!
कसलं भारी!!!
अयो! लय भारी अजिंक्य दादा
डिप्लोमा मधल्या कुणाची तरी उगाच आठवण आली
फार सुंदर!
फार सुंदर!
मस्त आहेत चारोळ्या...
मस्त आहेत चारोळ्या...
छान आहेत. चौथी जास्त आवडली.
छान आहेत. चौथी जास्त आवडली. बाकीच्याही टाका.
छान आहेत चारोळ्या.
छान आहेत चारोळ्या.
छान!
छान!
सुंदर आहेत, आवडल्या
सुंदर आहेत,
आवडल्या
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
पाटील छान
पाटील छान
मुक्याने बोलायचे हा मुक्याचा
मुक्याने बोलायचे हा मुक्याचा बहाणा
मुक्यानेच ऐकतो मी मुक्याचा दिवाणा
जीव ओवाळतो, एका स्पर्शावर तुझ्या,
काय सांगू आणि मी कशाकशाचा दिवाणा..
-राव पाटील
मला मी सापडलोच नाहीये पुन्हा,
मला मी सापडलोच नाहीये पुन्हा,
तुझ्यात हरवून कुठं गेलाय का बघ
शब्द सापडत नाहीये तुला वर्णायला,
तुझ्या ओठांवर तो राहिलाय का बघ
-राव पाटील
अरे ववा
अरे ववा
मस्तच...सगळ्या चारोळ्या...
मस्तच...सगळ्या चारोळ्या...
एक तुम्हे पाने के बाद,
एक तुम्हे पाने के बाद,
मैने कुछ पायाही नहीं,
शायद तुम आई थी जहम में,
फिर कुछ आयाही नहीं..
झूठ कहते है इष्क में,
कोई बरबाद होता है..
बरबाद तो वो है जिसने
दिल लगायाही नहीं..
जाने कब जख्म लगे,
जाने कब मैं मर गया..
तुम जब दूर थी मुझसे,
और किसीने सतायाही नहीं..
शब्दांचा साठा भारी आहे तुमचा
शब्दांचा साठा भारी आहे तुमचा
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
काय सांगू सुंदरे सखे, मी असा
काय सांगू सुंदरे सखे, मी असा का वागतो,
नजर माझी रेंगाळणारी तुझ्यावर ठेवतो
तुझ्या हाताशी आला असता डबा साखरेचा
टाच उंचवावीस म्हणून फडताळावर ठेवतो
खूप सुंदर आहेत.
खूप सुंदर आहेत.
लै लै भारी आहे
लै लै भारी आहे
आणि आता जी चारोळी टाकली आहे ती तर खलास आहे
काय भावना काय निरीक्षण
काय कल्पना
तुझ्या हाताशी आला असता डबा साखरेचा
टाच उंचवावीस म्हणून फडताळावर ठेवतो
ओठांवर सरते रात्र, तव कुशीत
ओठांवर सरते रात्र, तव कुशीत प्रभा उजळते
दिवसाही होती स्पर्श, कधी कळते कधी नकळते
तू असून सर्वदा जवळी, मन ओढाळ धुंद उधळते
मग घेऊन तुजला जवळी, पुन्हा तुझ्यात विरघळते
कधीकाळी तुझ्या ओठावरचं नाव
कधीकाळी तुझ्या ओठावरचं नाव होतो मी,
नंतर कळलं, वाटेवरलं गाव होतो मी
आज असशील राजासवे सुखी तू संसारी,
मनातला तुझ्या मात्र राव होतो मी
बाप रे शेवटची सुंदर आहे.
बाप रे शेवटची सुंदर आहे.जरा विचित्र आहे पण सुंदर आहे. मानसिक प्रतारणा दाखवत असल्याने बाप रे म्हटले.
inspired from: hafiz
inspired from: hafiz hoshiyarpuri
मोहब्बत करने वाले कम न होंगे
तिरी महफ़िल में लेकिन हम न होंगे
आधी गुंततील डोळे
.