मायबोलीवर बर्याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, मायबोलीवर आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण दोन लेख पाहिले आणि वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते .. जे खाजगी होते/आहे पण इथे बहुधा नंतर सांगेन.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.
मग म्हटले मी करेन, तु सांगत जा.
त्यामुळे विडिओत, मी कृती करत जरी असले तरी आईची कृती व मार्गदर्शन आहे. पण गणपतीत तीनच विडिओ केले आणि बंद झाला कारभार.
पारंपारिक मोदक कृती अथपासून इतिपर्यंत : मोदकाचे पीठ कसे करावे, उकड कशी करावे, मोदक वळावे कसे वगैरे
१) पारंपारिक मोदक
पारंपारिक नेवरी
२) नेवरी
तळणीचे मोदक
३) मैदा न वापरता तळणीचे मोदक
रसायन
४) हि रेसीपी इथे मी युट्युबवर टाकली आहे.
पुन्हा नवीन वर्षाला सुरुवात करायची ठरले व तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे, पण परत तिचा नकार.
आणि आज सहजच मायबोलीवर आले तर पाहिले की, मायबोलीवर कदाचित प्रोत्साहन मिळु शकते. तिला आज परत आग्रह केला. बघुया काय म्हणतेय ती...
तोवर तिच्या कृतीचे , मी करून दाखवलेले विडिओ देत आहे.
आईने साथ दिली तर, विडिओ टाकायचे ठरलेय... पण बघुया कसा प्रवास पुन्हा सुरु होतोय....
तुम्हाला आवडले तर, नक्कीच तिला सांगून नवीन विडिओ टाकेन...
धन्यवाद.
काही कल्पना असतील तर सुचवा.
काही कल्पना असतील तर सुचवा. धन्यवाद.
खूप शुभेच्छा. .. आईचे
खूप शुभेच्छा. .. आईचे पाककौशल्य नक्की पुढे आणा.
छान
छान
आईंना शुभेच्छा
नव्या पब्लिक ला जमतील अश्या कमी श्रमाच्या सोप्या रेसिपी पण आणा हळूहळू.
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे>> ही कल्पना खूप छान आहे .. Banglar rannaghor नावाचं फेसबूकवर चॅनल आहे, त्यावर एक वयस्कर काकू जेवण बनवताना दिसतात..म्हणजे त्यांचे फक्त हातंच दिसतात पण मला तेच बघायला फार मज्जा येते..तुमचेही विडिओज् छान आहेत पण आईचे हात दिसले तर अजून पारंपारिक टच येईल
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. >> हे पूर्णपणे रिलेट करू शकते.. ३ महिन्यांपूर्वी माझे बाबा गेले आणि आता आई ६ महिने तरी माझ्या जवळच रहाणार आहे.. तीला गुंतवण्यासाठी दोन-तीन उपक्रम सुरू ठेवलेत पण गेल्यावर्षी बंद केलेला केटरिंग बिझनेसही सुरू करतेय.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
कमेंट बॉक्सच्यावरती डोळ्याच्या चिन्हाशेजारी लिंकचे बटण आहे. तिथून लिंक्स देत येतात.
छान उपक्रम ... तुमच्या
छान उपक्रम ... तुमच्या आईंच्या रेसिपी बघायला आवडतील.
खूप खूप शुभेच्छा !
भरपूर शुभेच्छा!
भरपूर शुभेच्छा!
स्तुत्य उपक्रम!
स्तुत्य उपक्रम!
मन रमवायला चांगले साधन आहे.
छान आहे उपक्रम. खूप शुभेच्छा
छान आहे उपक्रम. खूप शुभेच्छा !
नक्कीच बघत जाईन.
मी व्हिमिओ वर खाते उघडलेय. प्रोफाईलला लिंक दिलेली पण सोवळे ओवळे पाहून तिथूनही हटवली.
तुम्हाला आणि आईंना खूप
तुम्हाला आणि आईंना खूप शुभेच्छा!!
@देवकी तुमच्या आईच्या हातच्या
@देवकी तुमच्या आईच्या हातच्या पाक कृती पाहायला आवडतील. वाळवण आणि प्रत्येक सणाचा साग्रसंगीत स्वयंपाक प्रत्येकीला जमतोच असे नाही.
पण सगळे व्याप सांभाळून थोडफार घरगुती रेसिपी,लहान मुलांसाठी पौष्टिक घरगुती पदार्थ, घरात कोणी आजारी असतिल किंवा सध्या कोरोनामुळे बाहेरचे खात नसल्यामुळे 1दिवस प्रवासात टिकणारे पदार्थ अशा बर्याच रेसिपी आईना माहित असतिल.
एकदा बनवणे सुरू केले की येणार्या कमेंट मधून नवीन सुचत राहिल.
@म्हाळसा मला माहित नव्हते की तुमच्या वडिलांचे निधन झाले. तुम्ही भारतात येऊन गेलात एवढेच माहित होते. आईची काळजी घ्या.
अगदी छान आहे उपक्रम ..नक्कीच
अगदी छान आहे उपक्रम ..नक्कीच शिकायला आवडतील पारंपरिक पदार्थ ..
तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे>>खूप छान कल्पना ..
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
म्हाळसा, तुम्हाला एक घट्ट मिठी.
ह्याच धक्यातून आम्ही सुद्धा सावरतोयच आहे. आईला थोडी आणखी तयार करायची आहे,
बघुया कसं जमतय ते. त्या सर्व लोकांना सॅल्युट जे रोजच्या कामाबरोबरच युट्युब सुद्धा करतात. मला अजून हे गणित जमावायचे आहे. रात्री एडिटींग करा, अपलोड करा, इतर कामं घरची, ऑफ्फीसची...
पण तुम्हा सर्वांच्या सजेशन्ससाठी धन्यवाद परत.
देविका अभिनंदन आणि शुभेच्छा.
देविका अभिनंदन आणि शुभेच्छा.
उकडीच्या मोदकांचा बघितला व्हिडीओ. सही आहे पण अबोल आहे. मला सोबत ऐकायला आवडेल. पारी कसली सुरेख केलीय. मस्त झालेत मोदक.
बाकीचे पण बघेन निवांत.
म्हाळसा बाबांचे ऐकून वाईट वाटलं. मला आता बाबा बरे झाले असतील, असं वाटलं होतं.
म्हाळसा, देविका तुम्हा दोघींना घट्ट मिठी. दोघींच्या आई लवकर सावरू देत.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
म्हाळसा व तुम्हाला एक घट्ट मिठी, तुम्ही खूप गोड मुली आहात.
धन्यवाद अस्मिता आणि अंजू.
धन्यवाद अस्मिता आणि अंजू.
प्रयत्न चालू आहे आवाज देण्याचा. मी अजून शिकतेच आहे युट्युब विडिओ कसे करायचे.. तेव्हा करेनच लवकर.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
छान उपक्रम देविका. शुभेच्छा.
म्हाळसा व तुम्हाला एक घट्ट मिठी, तुम्ही खूप गोड मुली आहात.>>>> हो गं अगदी असंच माझ्या मनात आलं.
आज शेवटी वेळ मिळाला,
आज शेवटी वेळ मिळाला,
मी इथे पारंपारीक रेसीपी युट्युबर टाकली आहे.
https://youtu.be/KM93R5LRWG8
हे माघी जयंतीला केलेले,
हे माघी जयंतीला केलेले,
देविका मोदक खुप सुंदर झालेत.
देविका मोदक खुप सुंदर झालेत.
मोदक खूपच सुंदर. व्हिडीओ
मोदक खूपच सुंदर. व्हिडीओ सुद्धा प्रोफेशनल पद्धतीने बनवलाय.
खूप मेहनत घेतली आहे. रेसिपी + तांत्रिक
धन्यवाद अमुपुरी, रानभुली.
धन्यवाद अमुपुरी, रानभुली.
तुमचे विडियो पाहिले. दर
तुमचे विडियो पाहिले. दर आठवड्याला एक तरी टाका म्हणजे सबस्क्राईबर वाढतील आणि आई पण बिझी होतील.
धन्यवाद सियोना.
धन्यवाद सियोना.
आईच्या तब्येतीला जरा जपतेय. आणि माझेही गणित जरा गंडलेय इतर कामांमुळे. कितीतरी विडिओ तयार आहेत पण अपलोड करून एडिट करायला वेळ नाहिये.
करेन लवकरच.
आज पहिल्यांदाच, तुमच्या
आज पहिल्यांदाच, तुमच्या पद्धतीने तांदूळ पीठी घरी करून मोदक केले अंगारकीचे.
मोदक मला यायचे पण मी बाहेरची पीठी वापरायची. छान झाली पीठी.
अजून उरलेल्या पीठाचे काय करता येइल ह्या विचारात आहे....
चांगला उपक्रम. सुंदर मोदक.
चांगला उपक्रम. सुंदर मोदक.
उकडीच्या मोदकांचा व्हिडियो पाहिला. मानवी आवाज हवा होता असं वाटलं.
करंजीला मुरड घालणे, मोदक वळणे हे भाग स्लोमोशन मध्ये ठेवता येतील का?
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
नेवरी/करंजी इथे वर लिन्क आहे, त्यात २:३९ ला मुरड क्शी घालावी दिलीय.
मोदकासांठी छोटासा भाग परत करावा लागेल. प्रयत्न करेन.
चिबुड रसायनची रेसिपी पाहिली ,
चिबुड रसायनची रेसिपी पाहिली , पहिल्यान्दाच एकल नाव
मोदक सुरेख दिसतायत.
देवीका, उकडीच्या मोदकांसोबत
देवीका, उकडीच्या मोदकांसोबत तुम्ही एक करंजी /नेवरीही केली आहे. त्याबद्दल म्हटलं. व्हिडियो तेवढ्या भागापुरता स्लो मो मध्ये चालेल हे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे का? बघणार्याला स्लो मो मध्ये पाहता येईल हे माहीत आहे.
भरत,
भरत,
धन्यवाद सुचनेबद्दल. मला तुमचा मुद्दा कळला. पण मोदकाचा विडिओ ऑलरेडी पबलिश केल्यावर, परत एडिट करणे शक्य नाही माझ्या माहितीनुसार.
म्हणून, नेवरीचा जो सेपरेट विडिओ आहे, त्याची लिंक दिली ज्यात बर्याप्रकारे, दाखवायचा प्रयत्न केलाय.
Pages