मायबोलीवर बर्याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, मायबोलीवर आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण दोन लेख पाहिले आणि वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते .. जे खाजगी होते/आहे पण इथे बहुधा नंतर सांगेन.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.
मग म्हटले मी करेन, तु सांगत जा.
त्यामुळे विडिओत, मी कृती करत जरी असले तरी आईची कृती व मार्गदर्शन आहे. पण गणपतीत तीनच विडिओ केले आणि बंद झाला कारभार.
पारंपारिक मोदक कृती अथपासून इतिपर्यंत : मोदकाचे पीठ कसे करावे, उकड कशी करावे, मोदक वळावे कसे वगैरे
१) पारंपारिक मोदक
पारंपारिक नेवरी
२) नेवरी
तळणीचे मोदक
३) मैदा न वापरता तळणीचे मोदक
रसायन
४) हि रेसीपी इथे मी युट्युबवर टाकली आहे.
पुन्हा नवीन वर्षाला सुरुवात करायची ठरले व तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे, पण परत तिचा नकार.
आणि आज सहजच मायबोलीवर आले तर पाहिले की, मायबोलीवर कदाचित प्रोत्साहन मिळु शकते. तिला आज परत आग्रह केला. बघुया काय म्हणतेय ती...
तोवर तिच्या कृतीचे , मी करून दाखवलेले विडिओ देत आहे.
आईने साथ दिली तर, विडिओ टाकायचे ठरलेय... पण बघुया कसा प्रवास पुन्हा सुरु होतोय....
तुम्हाला आवडले तर, नक्कीच तिला सांगून नवीन विडिओ टाकेन...
धन्यवाद.
गणपतीत, ह्या वर्षी, पीठी
गणपतीत, ह्या वर्षी, पीठी घरात बनवून मोदक करायचे असतील तर, वरची रेसीपी पहा.
आणि मला कळवा.
खुप खुप शुभेच्छा. देविका
खुप खुप शुभेच्छा. देविका आईंना प्रोत्साहन दे. मायबोलीने तर नेहमीच प्रोत्साहन देत आली आहे.
धन्यवाद जागू.
धन्यवाद जागू.
तुमचेही विडिओ बघतेच मी. आणि मायबोली नेहमीच मदत करते. तुम्हाला सुद्धा खुप शुभेच्छा. तुम्ही तर सुगरणच आहात.
वर्षभराने, परत सुरु करणार आहे. आईची तब्येत सांभाळून करायचेय. डोळ्याचा त्रास असल्याने , ती थकते मग होत नाही.
बघुया...
हे ह्या वर्षीचे,
हे ह्या वर्षीचे, हळदीच्या पानातले माझ्याच वरच्या युट्युबवरच्या रेसीपीने,
खाणारे आता health conscious
खाणारे आता health conscious झालेत. पदार्थ बनवताना त्याचे/सामग्रीचे आयुर्वेदिक महत्व सांगितले तर प्रतिसाद वाढतील असे वाटते. चवीबरोबर आरोग्य ही हवे.
उदा. गावाकडची वाट युट्यूब चॅनेल...मक्याची खिर रेसिपी
https://youtu.be/7cNgLqnUWp8
आपला video इतरांपेक्षा वेगळा कसा होईल हे पहा.
शुभेच्छा...
मस्त मोदक. काही व्हिडीओज
मस्त मोदक. काही व्हिडीओज बघायचे राहीलेत, बघेन निवांत.
ह्या वर्षी मोदक करायला , हि
ह्या वर्षी मोदक करायला , हि माझी रेसीपी बघा.
https://youtu.be/sp_EHVdjDPI
(No subject)
ह्या वर्षीचे हे मोदक
पान वर काढायला:
पान वर काढायला:
कोणाला घरी केलेया पीठापासूऩ उकडीचे मोदक करायचे असतील तर
ही कृती पहा,
https://youtu.be/sp_EHVdjDPI?si=mhVWu_V8heRojfbP
पान वर काढायला धागा.
पान वर काढायला धागा.
गणपती बाप्पा मोरया॥
Pages