यापूर्वीचे भागः
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-1
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-2
तिकडे निम्मी मीटिंग रूम मध्ये एका परदेशी माणसाशी बोलत होती
"मायकेल, आय गॉट टू लिव्ह नाऊ.देअर इज अनप्लॅनड फायर ड्रिल."
"ओह, कॅन फायर वेट?आय विल टेक 5-10 मिनिट्स मोअर देन आय हॅव टू टेक किड्स टू स्कुल."
हा मायकेल म्हणजे एक नंबर चा चेंगट माणूस आहे.परवा पूर आला म्हणून ऑफिस बंद होतं तेव्हा 'तुम्ही पाचव्या मजल्यावर, तुम्हाला कशाला हवी पुरासाठी सुट्टी' म्हणून वाद घालत बसला होता.'ऑफिस ला बोटीतून येऊ का' म्हटल्यावर गप्प बसला.तिकडे सिक्युरिटी वाली माणसं बाहेर हाका मारत होती.
"मायकेल आय रियली हॅव टू गो.यु कॅन मेल मी."
निम्मिने "जाती हूँ मै" चा राग परत आळवून फोन कट केला.
फायर ब्रिगेड ड्रिलवाले कंपनीत 60% लोकांना जिना कुठे आहे माहीत नाही हे बघून आश्चर्याने बेशुद्ध पडायला आले होते.त्यात मीटिंग रूम न सोडणारी, प्रोग्राम कंपाईल झाल्यावर निघतो म्हणून जागा न सोडणारी, जाता जाता कॉफी मशीन ची कॉफी घेऊन मग आगीसाठी खाली जाणारी, आगीच्या ऑकेजन साठी कंगवा आणि आयलायनर घेऊन पटकन वॉशरूम मध्ये जाणारी बिनडोक जनता पाहून 'खरी आग लागू दे' असं त्यातल्या बऱ्याच जणांना वाटायला लागलं.
मांजर आणि टीम मधला मुलगा बाहेर येऊन गर्दीत एका ओंडक्यावर बसले.मांजरीने डबा उघडला.आता आणि काही व्यत्यय यायच्या आत चार घास पोटात जाणं गरजेचं होतं.
"लो ना, ग्राउंडनट लड्डू लो."
"थॅंक्यु मॅडम.वैसे तो हमारे यहां नॉर्थ मे बिना खाये फास्ट करते है."
तितक्यात फायर ड्रिल चा माणूस आला.
"ओ तुम्हाला गंमत वाटते का सगळी?इथे फायर ड्रिल चालू आहे आणि तुम्ही इथे बसून लाडू पेढे खाताय? खरी आग लागल्यावर पळायला वाट तरी आठवेल का? माने, इथे या, हे बघा लोक सिरीयसनेस न दाखवता आरामात लाडू खात बसलेत."
"पण तुम्ही अजून तयारी करताय ना?तोपर्यंत खाऊन होईल.उपास आहे हो."
"मॅडम, कृपा करून उभं राहून खा.इथे असं बसलेलं पाहिलं तर लोक सिरीयसली घेणार नाहीत फायर ड्रिल.इमर्जन्सी मध्ये तुम्हा लोकांची जबाबदारी आमच्यावर असते."(माने नी 'इथे किल्ल्यावर दारू पिऊ नका, किल्ल्याचं पावित्र्य भंग होतं' सारख्या सुरात सुनावलं.)
आपण बसून 5 मिनिटात 5 चमचे भोपळा भाजी खाल्ल्याने फायर ड्रिल च्या गांभीर्यात अडथळा कसा येतो हे मांजरीला अजूनही कळेना.हे लोक दरवर्षी येतात, लोकांना तितक्याच गंभीरपणे भाषण देतात, मणभर पाणी वापरून काटक्याना लावलेली आग विझवून दाखवतात.आणि दर वर्षी लोक जिना कुठेय ते विसरतात.
आता चालत चालत भोपळा खाण्याशिवाय पर्याय नाही.टीम मधला मुलगा 'हमारे नॉर्थ मे' च्या गुजगोष्टी करायला एका फ्रेशर मुलीबरोबर सटकला.
4 नंबर कँटीन मध्ये इतर मांजरी कॅडबी चा चॉकलेट मिल्कशेक पित बसल्या होत्या.फायर ड्रिल संध्याकाळी झालं असतं तर ते झाल्यावर लगेच घरी जाता आलं असतं.आता फायर ड्रिल झाल्यावर परत जाऊन उशिरा पर्यंत काम करावं लागणार.अश्या तीव्र दुःखावर चॉकलेट हे एकमेव सोल्युशन असतं.हळूहळू आपल्याला ऑफर मिळाली नाही याचं दुःख मांजरीवर नव्याने पसरायला लागलं आणि तिने थिक डार्क चॉकलेट कॅडबी विकत घेतलं.पलीकडे लक्ष गेलं तर विश्वंभर भाटवडेकर मित्रांबरोबर आईस्क्रीम खात बसला होता.मनात 'ग्रीन टी, होय रे चोरा' म्हणून मांजरीने खुनशी हास्य केलं.
निम्मी आकाशाकडे बघत आईस्क्रीम वरचं चॉको सिरप खात होती.
"काय गं, काय झालं?"
"मायकेल वेडा आहे."
"त्याला असं नसतं हँडल करायचं.नेटवर्क मध्ये डिसरप्शन आहे असं सांगून हळूहळू हेडफोन वर घासून कागदाचा खरखर आवाज करत बाहेर सटकायचं."
तितक्यात मांजरीचा फुटका फोन वाजला.साहेबांनी सर्वाना व्हॉटसॅप ग्रुपवर फायर ड्रिल ला लवकर बाहेर न निघाल्याबद्दल झापलं होतं.
"काय गं फोन कसा फुटला?"
"कव्हर लावून चार्ज करत होते तर होत नव्हता.म्हणून कव्हर काढून पॉवर बँक लावली होती तर बागेत चालताना दगडावर उलटा पडला."
"बापरे!!"
"तो रिपेअर केला गं.पुढे ऐक.1500 देऊन रिपेअर केला तर नवऱ्याबरोबर बाईकवरून जाताना स्पीड ब्रेकर वर उपडा पडला आणि त्याच्यावरून सायकल गेली."
"पण मग कशाला वापरतेस?तो दुसरा चांगला फोन आहे ना?"
"चांगला फोन फोन कॉल्स ना.आणि फुटका फोन डिजिटल डीटॉक्स ला."
"उपासाला चालतं कॅडबी?"
"सासूबाईनी सांगितलं बाहेरचं मीठ खायचं नाही उपासाला.ते खरकटं असतं.अजून बाहेरची साखर किंवा बाहेरचं चॉकलेट याबद्दल कोणी काही सांगीतलं नाहीये."
सर्व मांजरी आपली दुःखं कॅडबीत बुडवून परत नव्याने काम करायला निघाल्या.पुढच्या वेळी 2-3 तासाचं फायर ड्रिल असावं असं मनात प्रत्येकाला वाटत राहिलं.
(समाप्त)
नेटवर्क मध्ये डिसरप्शन आहे
नेटवर्क मध्ये डिसरप्शन आहे असं सांगून हळूहळू हेडफोन वर घासून कागदाचा खरखर आवाज करत बाहेर सटकायचं >![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लवकर आटोपलं लिखाण
लवकर आटोपलं लिखाण
नेहमी एकच भाग लिहिते हो
नेहमी एकच भाग लिहिते हो हर्पेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामानाने बरेच लांबले.
आवडला हाही भाग... पुढील भाग
आवडला हाही भाग... पुढील भाग लवकर लिहा....
अगदी अगदी... मनाला भिडली फायर
अगदी अगदी... मनाला भिडली फायर ड्रील![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
फायर ड्रिल संध्याकाळी झालं
फायर ड्रिल संध्याकाळी झालं असतं तर ते झाल्यावर लगेच घरी जाता आलं असतं.आता फायर ड्रिल झाल्यावर परत जाऊन उशिरा पर्यंत काम करावं लागणार.>>>> अगदी खरे.
पुढील भाग नाहिये ओ
पुढील भाग नाहिये ओ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काही छान घडले की मग पुढची सिरिज लिहेन
तोवर तुमच्या डोळ्यांना विश्रांती.
मस्त! लहानपणी वाचलेला एक
मस्त! लहानपणी वाचलेला एक विनोद आठवला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एका सरकारी ऑफिसात न सांगता फायर ड्रिल घेतात. इमारतीतले सगळे कर्मचारी दहा मिनिटात बाहेर येतात याचं त्या सगळ्यांना कौतुक वाटतं, अभिनंदन वगैरे होतं. मग परत सगळे आपापल्या जागेवर जातात.
एक तासाने जेवणाची सुटी होते आणि परत सगळे बाहेर पडतात. यावेळी कुणीतरी वेळ मोजतं तेव्हा कळतं की यावेळी आठच मिनिटात सगळे बाहेर पडलेले असतात
हे लोक दरवर्षी येतात, लोकांना
हे लोक दरवर्षी येतात, लोकांना तितक्याच गंभीरपणे भाषण देतात, मणभर पाणी वापरून काटक्याना लावलेली आग विझवून दाखवतात. >>
आमच्या इथे तेच तेच विनोद असतात दर वेळी
उदा. Sir , if you don't have lap , where you will keep laptop किंवा fire वॉर्डन ने ती पिवळी टोपी घातल्यावर कशी दिसतेय पाहायला वॉश रूम मध्ये जाऊ नये वगैरे
bdw समाप्त![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मजा आली सगळे भाग वाचायला !!
मजा आली सगळे भाग वाचायला !!
हा भागही मस्तच होता!!
हा भागही मस्तच आहे.!!
मस्तं भाग. थांबू नका. अजून
मस्तं भाग. थांबू नका. अजून पुढे लिहा.
"उपासाला चालतं कॅडबी?" >>
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्या मैत्रिणीचे उत्तर - कोको फळ आहे. सगळी फळं आणि दूध उपासाला चालतं. त्यामुळे उपासाला चॉकलेटचे आणि आईस्क्रीमचे सगळे प्रकार चालतात.
Fire drill हे एक भारी प्रकरण
Fire drill हे एक भारी प्रकरण असतं, नेमका आमचा कॉल असायचा आणि firr drill आटपलं की पळावं लागायचं.. त्यावेळेला इतर जनता मस्त timepass करत असलेली बघून मत्सर वाटायचा आणि onsite च्या लोकांचा राग यायचा, याच वेळेला का कॉल ठेवतात म्हणून..
सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं तुम्ही लिहिलेलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख! अगदी ह ह पु वा!
सुरेख! अगदी ह ह पु वा!![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भारतात फायर ड्रिल एवढे भारी असते ह्याचा अंदाज न्हवता
छान भाग
छान भाग![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहिलयं.
मस्त लिहिलयं.
अनप्लॅनड फायर ड्रिल कधी होणार याची 'अंदरकी खबर' काढाणारे/ सांगणारे जासूस/ detectives चे वर्णन राहिलचं. आमच्या कडे प्रत्येक floor ला असे जासूस असतात. ते त्यांच्या जवळच्या/ त्यांना भाव देणार्या लोकांना ,आज किती वाजता अनप्लॅनड फायर ड्रिल होणार हे आधीच सांगतात. मग लोक आरामात जवळच्या मॉल मधे जाऊन shopping करून येणे, घर जवळ असल्यास घरी जाणे, lunch साठी बाहेर सटकणे अशी सगळी कामं करतात. ज्यांना योग्य वेळात अंदरकी खबर मिळत नाही ते बिचारे चडफडत त्या ड्रिल ला सामोरे जातात.
अगगगग! सगळं जसं च्या तसं
अगगगग! सगळं जसं च्या तसं डोळ्यासमोर आलं. ती कंपाईलला कोड लावलेली माणसं आम्ही.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आमची odc रेस्ट्रिकटेड हाती त्यामुळे सिक्युरिटी आत येऊ शकत नव्हता तर आम्ही या अशा ड्रिल च्या वेळेला खाली डेस्क खाली लपून बसायचो (I am not proud about myself while writing this ! Guilty as charged!!!)
किल्ली, सेम पिंच!!!
हा..हा
हा..हा
आमच्या office madhe pan same program every year..
Fire brigade persons will monitor the time taken to vacate the floor and people will slowly walk to the emergency gathering point talking on a cell phone. :):) Then the same lecture what Anu said..ओ तुम्हाला गंमत वाटते का सगळी?
छान लिहिले होते पण इतक्या
छान लिहिले होते पण इतक्या पटकन संपवलं.
भारी लिहलयस! एक सलग सगळ पोस्ट
भारी लिहलयस! एक सलग सगळ पोस्ट केल असतच तर अजुन मजा आलि असती.
धम्माल... पण समाप्त काय
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी
यावेळी 3 भाग केले ते म्हणजे एका स्क्रोल मध्ये वाचायला जास्त होईल म्हणून.
ही एक विनोदी कथा आहे पूर्ण
ही एक विनोदी कथा आहे पूर्ण कल्पना आहे.
पण प्रतिसादात फायरड्रिल बद्दल उदासीनता, नसती कटकट भाव वगैरे आढळल्याने इथे ही बातमी चिकटवत आहे.
आग केव्हा, कुठे, कशी लागेल, पळून जायला पुरेसा वेळ आणि अडथळा न झालेला मार्ग मिळेल की नाही याची खात्री नसते.
हृदय पिळवटून टाकणारी घटना; भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० बालकांचा होरपळून मृत्यू
@मी_अनु: ही पोस्ट इथे नको असल्यास सांगा, डिलीट करेन.
हो मानव
हो मानव
मीही वाचली बातमी.खूप बेकार वाटलं.अनेक वर्षांपूर्वी साऊथ मध्ये नर्सरी शाळेत अशीच घटना घडली होती.
सध्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अश्या घटना घडत आहेत.स्वस्त उपकरणं? की स्मोक सेन्सर चा खर्च वाचवणे की सर्व्हिसिंग मध्ये कुचराई ते कळत नाही.
फायर ड्रिल बद्दल दाखवला जाणारा कॅज्युअल पणा, एकंदर शिस्तीचा अभाव, जिने नेहमीच्या वापराला बंद करून फक्त लिफ्ट वापरात ठेवणे(बिल्डिंग ची रचना अशी की जिने वेगळ्या बाजूला लिफ्ट वेगळ्या बाजूला.जिने उघडे ठेवले तर एक ऍक्सेस टर्मिनल, एक सिक्युरिटी असा खर्च वाढतो.) यामुळे काही अडचण/दहशतवादी कारवाई झाल्यास वाचण्याचे चान्सेस खूप कमी होतात.
बिल्डिंग ची रचना अशी की जिने
बिल्डिंग ची रचना अशी की जिने वेगळ्या बाजूला लिफ्ट वेगळ्या बाजूला. >>> मला तरी ही रचना योग्य वाटते. लिफ्ट आणि जिने एकाच बाजूला असले आणि त्या बाजूला आग लागलीय लिफ्ट आणि जिनाही वापरता न येण्यासारखे होण्याची शक्यता भरपूर. इमारत किती मोठी, किती लोक असतात या नुसार एकापेक्षा अधिक जिने वेगवेगळ्या बाजूने हे उत्तम.
ते सगळं चांगलंच आहे
ते सगळं चांगलंच आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिने पब्लिक साठी एरवी कुलूप लावून बंद असणं हे चूक.
विनोदी कथा आहे म्हणून आधी
विनोदी कथा आहे म्हणून आधी हसून सोडून दिले. पण आता विषय निघालाच आहे तर... मी जिथे काम करत असे तिथे एक क्लिनीकही होते. त्यांच्याकडे एक नॅप रूम होती. कुणी लहान मुले, पेशंट, शिकाऊ डॉक्टर इ यांना झोपायचं असेल तर तिथे जाऊन नॅप घ्यायची. अगदी बीच चेयर्स, पांघरूण, संगीत इ सगळे होते. फायर ड्रील मध्ये काही डॉक्टर लोक बिल्डींग बाहेर यायचं सोडून नॅप रूम मध्ये जाऊन पाऊण तास झोपायचे. कानावर उशा लावून!! एकदा त्या फ्लोअर रेपच्या लक्षात आले. इतका झापला त्या लोकांना. सुशिक्षित लोकं इतकी अनास्था दाखवत असतील तर बाकीच्यांना काय बोल लावा. अनु इतकी विनोदबुद्धी नसल्याने अशा किश्श्यांनी वैतागायला होतं.
ह्या धाग्यावर serious चर्चा
ह्या धाग्यावर serious चर्चा करायची असेल तर हेही मुद्दे विचारात घ्यावेतः एखाद्या ऑफिस बिल्डिंगची माणसे सामावून घेण्याची क्षमता किती आहे? एकाच वेळी इतक्या सगळ्या लोकांना खाली उतरायला जिना पुरेसा रुंद आहे का? असे सगळे निकष जिथे पाळले जातात अश्या किती ऑफिस बिल्डिंग पुण्यात आहेत ?
मोठ्या कंपनीज आणि आयटी पार्क
मोठ्या कंपनीज आणि आयटी पार्क च्या मी पाहिलेल्या बऱ्याच आहेत.आयटी पार्क्स बनवताना हे सर्व ऑडिट होतं.तरीहि मोठ्या प्रमाणात गोंधळ पळापळ झाल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते.
सर्वात वाईट अवस्था फायर एस्केप च्या बाबत हॉटेल्स ची असते.अरुंद मागचे जिने, कधीकधी त्या जिन्यात जास्तीच्या वस्तू/सिलिंडर साठवून ठेवलेले.कधीकधी डेकोरेशन म्हणून काही वेगळंच आगीला वाढवेल असं मटेरियल.
मागे इमॅजिका मध्ये अपघात झाला होता तेव्हा त्यांच्याकडे ऍम्ब्युलन्स आणि डॉक्टर नव्हता.जेव्हा अडव्हेंचर पार्क परदेशाच्या तोडीचा असल्याचा दावा करतो, तिकीट बरेच घेतो तेव्हा हे सर्व असणे गृहीत आणि अपेक्षित असते.
Pages