Submitted by केअशु on 25 December, 2020 - 00:09
केवळ इंग्रजीतून सफाईदारपणे बोलता आणि व्याकरणशुद्ध लिहिता येतं इतकंच कौशल्य असेल आणि इतर काहीही कौशल्य नसेल तर चांगल्या(भरपूर पगाराच्या) कोणत्या नोकर्या मिळू शकतात?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रीसेप्शनिस्ट भाषांतर
रीसेप्शनिस्ट
भाषांतर
न्यूज रीडर.
न्यूज रीडर.
इतर काहीही कौशल्य नसेल तर
इतर काहीही कौशल्य नसेल तर चांगल्या(भरपूर पगाराच्या) कोणत्या नोकर्या मिळू शकतात?
>>>>>
चांगला पगार हवा असेल तर ईतर कौशल्य काहीतरी हवे असे मला वाटते.
अर्थात भाषांतर एके भाषांतरच हा जॉब असेल तर गोष्ट वेगळी, पण ईतर ठिकाणी संबंधित कामाचे ज्ञान आणि स्मार्टनेस जरूरी असतोच. रिसेप्शनिस्टला देखील ईंग्लिश व्यतिरीक्त ईतर काही कौशल्य नसेल तर जास्त पगार नाही मिळू शकत. ईथे सौंदर्य देखील एक कौशल्यच पकडले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी आपल्या देशात सफाईदार ईंग्रजी बोलणारी व्यक्ती स्मार्टच असते बाय डिफॉल्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सस्मित, मानव, ऋन्मेष धन्स!
सस्मित, मानव, ऋन्मेष धन्स!
मास्टरी इंग्रजीत बाकीच्यात जॅक असे धरले आहे.
किमान डिग्री तरी लागेलच
किमान डिग्री तरी लागेलच
इंटरनेशनल टुरिस्ट गाईड , मेडिकल टुरिझम , कॉल सेंटर
इंग्रजी कसे बोलायचे ह्याचे
इंग्रजी कसे बोलायचे ह्याचे वर्ग सुरू करता येतील. एकतर तुम्ही स्वतः करा किंवा जे असे क्लास चालवताहेत त्यांच्या क्लासात नोकरी धरा.
Blackcat , साधना धन्स
Blackcat , साधना धन्स
साधना इंग्लिश स्पिकींगचे क्लासेस सुरु करणे हा एक चांगला रोजगार आहे.भांडवलाच्या तुलनेत परतावा अधिक आहे.
क्लास चालू करणे सोपे नाही
क्लास चालू करणे सोपे नाही
रेसिडेंशल मध्ये करायची परमिशन नाही
कमर्शिल जागा महाग आहेत
मी हा प्रश्न का विचारला ते ही
मी हा प्रश्न का विचारला ते ही सांगतो.
बर्याचदा कॉर्पोरेट/MNC कंपन्यांमधे नोकरी हवी असेल किंवा आयटी कंपनीत नोकरी करायची असेल तर सफाईदार इंग्रजी ही प्रमुख अट असते.काही वेळा हे इतकं आग्रही बनतं कि एखाद्याचं इंग्रजी व्याकरणशुद्ध नसेल पण काय म्हणायचंय हे समोरच्याला समजेल , अंदाज येईल इतपत जरी असलं तरी चालवून घेतलं जात नाही. म्हणजे एखाद्याच्या इंग्रजीतल्या चुका काढण्याचं प्रमाण इतकं वाढतं की निव्वळ त्या बेताच्या इंग्रजीवरुन सदर व्यक्ती ही सर्वच क्षेत्रात बेताची असणार, ही व्यक्ती अभ्यासू नाही हा शिक्काही मारला जाऊ शकतो.म्हणून विचारलं की निव्वळ इंग्रजी चांगलं असेल आणि बाकी काही येत नसेल तर चांगला रोजगार देण्याची एकट्या इंग्रजीची ताकद किती आहे? अशी किती क्षेत्र केवळ दर्जेदार इंग्रजी बोलण्याने पादाक्रांत करणे शक्य आहे?
कॉल सेंटर जॉब... मजबूत पैसे
कॉल सेंटर जॉब... मजबूत पैसे आणि क्राऊड पण मस्त असतो...
आयटी कंपनीत नोकरी करायची असेल
आयटी कंपनीत नोकरी करायची असेल तर सफाईदार इंग्रजी ही प्रमुख अट असते>> आयटी मधे उत्कृष्ट इंग्रजी येणे गरजेचे नाही.. टेक्निकल स्किल्स स्ट्राॅंग असले की अगदी अमेरिकेतही नोकरी आरामात मिळते
धन्स म्हाळसा!
धन्स म्हाळसा!
>>>रीसेप्शनिस्ट
>>>रीसेप्शनिस्ट
भाषांतर>>>>
भाषांतर..........नाsssssssssssssssssssssssssssssssssssssssही
१० वर्षांचा स्वानुभव
नेमका प्रश्न आहे.
नेमका प्रश्न आहे.
भाषेवर प्रभुत्व आहे. बोलण्याचे आणि लेखनाचे. एखादी दुसरी भाषा उदा• जर्मन, फ्रेंच याचा दोन वर्षांचा कोर्स करून एक सर्टिफिकेट मिळवा. त्याचा उपयोग होईल.
मग ज्या एंजिनिअरिंग कंपन्या, कारमेकर्स वगैरे तुम्हाला दर्शक म्हणून घेतील. एक पर्याय सुचवला. हाच करा असं नाही. ( माझा वर्गमित्र ,इंग्रजी खूप सफाइदार, बडबड्या होता त्याचे उदाहरण. कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षांत जर्मन केलं. शेवटचा पेपर टाकला आणि पुण्यातल्या एका कंपनीच्या (जर्मन कलॉबरेशन) नोकरीत जॉइन झाला. जग पालथं घातलं. वेगवेगळ्या देशांत जाऊन प्रदर्शनं, वर्कशॉप सेमिनार. )
( नोकरीसाठी काही एक ट्रेड लागतोच. )