शब्द

Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:40

*"शब्द"*

मी लिहिलेले काव्य, मी वाचतो आहे
माझे सुखाचे गणित शोधतो आहे
तुम्ही वाचा किंवा नका वाचू
पण या काव्यात लिहिलेले
प्रत्येक शब्द माझे आहे

वादळात सापडलेली न्हाव माझी
सहारा शोधत किनाऱ्यापर्यन्त पोहचेल का?
कलमातील शाहीने लिहलेले शब्द
असेच सागरात बुडेल का?
बुडत्यालाही काडीचा आधार असतो
मनातील या शब्दलाही फक्त
काव्याचा आधार भासतो

काव्यात प्रत्येक शब्द हसत आहे
मला न समजणाऱ्या जगात
मी एकटाच आहे
म्हणून मी माझ्या काव्यात
माझे सुखाचे गणित शोधतो आहे

कितीही आले वादळ अन
कितीही आल्या लाटा तरी
न्हाव माझी खमगी आहे
कारण या काव्यात लिहिलेल्या
प्रत्येक शब्द माझाच आहे

तुमचा विरोध हीच माझी दाद आहे
कारण या काव्यात शब्दांची साथ आहे

कवी:- विनोद इखनकर
(शब्दप्रेम)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users