अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - १
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - २
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ३
अमेरीकेतील हायस्कूल प्रवास - ४
अमेरीकेत कॉलेज प्रवेश प्रक्रिया १२वीच्या सुरुवातीलाच सुरु होते. त्याही आधी सुरु होतो तो योग्य कॉलेजचा शोध. शाळेत काउंसिलर ९वी पासून दरवर्षी मुलांशी बोलून, अॅप्टीट्युड टेस्ट्सचा वापर करुन मुलांना पुढे काय करायचे ते ठरवायला मदत करत असतात. त्याच्या जोडीला पार्ट टाइम्/समर जॉब, मित्र-मैत्रीणींचे, नातेवाईकांचे अनुभव, वेगवेगळ्या विषयांचे शिक्षक, जॉब शॅडोइंग सारखे उपक्रम या सगळ्याच गोष्टींचा कमी अधिक प्रभाव मुलांवर पडत असतो. पालकांनीही वेळोवेळी मुलांशी बोलून मुलांचा कल, त्यांचे साधारण करीयर प्लॅन्स काय आहेत ते समजून घ्यावे. हे प्लॅन्स दर वेळी बदलत असले तरी काळजी करु नये. It's part of growing up. आजकाल युनिवर्सिटीजमधे देखील undecided students साठी सर्व शक्यता अजमावून निर्णय घ्यायचा पर्याय असतो. निर्णय घेण्यासाठी बरेचदा मिड सोफोमोर पर्यंत अवधी दिला जातो.
साधारण १०वी च्या दुसर्या सेमिस्टरमधे पालकांनी आपल्या मुलांशी कॉलेज निवडीबद्दल बोलायला सुरुवात करावी. आपल्या शैक्षणीक खर्चाचे बजेट काय असणर आहे त्याचाही प्रामाणिक आढावा घ्यावा.
बर्याचदा पालकांचा प्रश्न असतो - कुठली युनिवर्सिटी चांगली? याचे उत्तर देणे सोपे ही आहे आणि कठीणही. तुमच्या पाल्याला जी युनिवर्सिटी योग्य वाटते आणि जिथला खर्च तुमच्या आवाक्यातला आहे ती तुमच्यासाठी चांगली युनिवर्सिटी.
युनिवर्सिटीची निवड
योग्य युनिवर्सिटी निवडताना विद्यार्थ्याने आणि पालकांनी खालील गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.
१. घराजवळ, होम स्टेट मधे, फार तर शेजारच्या राज्यात की दूर अगदी दुसर्या टोकाला
२. मोठे शहर, सबर्ब की रुरल सेटिंग
३. मोठी युनिवर्सिटी की सगळे एकमेकांना ओळखतात टाईप लहान युनिवर्सिटी
४. करीअर चॉइस बद्दल पक्का निर्णय झालाय की अजून नक्की काही ठरत नाहिये
५. इंटर्नशिप प्रोग्रॅम, को-ऑप, स्ट्डी अॅब्रॉड प्रोग्रॅम
६. इतर क्लासरुममधे तसेच कँपसवर तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या गोष्टी. उदा. रिसर्चची संधी, क्लास साईझ/ स्टुडंट टिचर रेशो, अॅकेडेमिक सपोर्ट, रेशिअल डायवर्सिटी, सिंगल जेंडर कॉलेज, कँपस सेफटी, फेथ/धार्मिक कल, कम्युनिटी सर्विसच्या संधी वगैरे
या जोडीला आपला GPA आणि SAT/ACT score देखील विचारात घ्यावा.
कॉलेज शोध मोहिमेत आम्हाला खूप उपयोग झाला तो कॉलेज बोर्ड बिग फ्युचर आणि कॉलेज कॉन्फिडेन्शिअल या दोन संकेत स्थळांचा. या साईट्सवरची टुल्स वापरुन तुम्हाला योग्य युनिवर्सिटीज तुम्ही शॉर्ट लिस्ट करु शकता. त्याशिवाय शाळेमधे दरवर्षी कॉलेज फेअर असते. वेगवेगळ्या युनिवर्सिटीच्या अॅडमिशन ऑफिसतर्फे बुथ्स असतात. बर्याच युनिवर्सिटीज चांगले विद्यार्थी मिळावेत म्हणून अमेरीकेच्या वेगवेगळ्या भागात इवेंट्स ठेवतात. युनिवर्सिटीजच्या साइटवर जाऊन तसेच वर्च्युअल टुर घेऊनही अधिक माहिती मिळवता येते. तुमची शॉर्ट लिस्ट तयार झाली की या युनिवर्सिटीजना औपचारिक भेट देण्याचे ठरवावे. इथे शाळा देखील खास कॉलेज विजीट्ससाठी अनुपस्थीती म्ह्णून वेगळी सवलत देतात. त्यासाठी वेगळा फॉर्मही भरुन घेतात. युनिवर्सिटीजचे अॅडमिशन ऑफिस देखील इच्छूक विद्यार्थी आणि पालकांसाठी कॉलेज विझीट्सचा वेगळा उपक्रम वर्षभर राबवतात. युनिवर्सिटीजच्या संकेतस्थळांवर भावी अंडरग्रॅड स्टुडंट्सनी कॉलेज विझिट कशी प्लॅन करावी याबद्दल माहिती असते. दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम असतो. यात युनिवर्सिटीबद्दल छान पद्धतीने माहिती दिली जाते. आपल्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे मिळतात. हायस्कूल नंतर पुढील ४-६ वर्षे या ठिकाणी घालवायची आहेत हे विचारात घेऊन विद्यार्थी आणि पालक दोघांनीही विझिट्स साठी जाताना काय प्रश्न विचारायचे त्याची नीट यादी करावी. तिथल्या डायनिंग हॉलमधेच जेवावे. डॉर्म्स पहाव्यात. शक्य झाल्यास गाईड बरोबर टुर झाल्यावर स्वतंत्रपणे फिरुन कॅम्पस बघावा. ज्या विषयात मेजर करायचे त्या डिपार्टमेंटमधील प्रोफेसर्सना शक्य असेल तर भेटावे. युनिवर्सिटीने दिलेल्या माहितीपत्रकांच्या जोडीला आपणही नोंद करावी. काही वेळा युनिवर्सिटीजचे वेगळे इनविटिशन ओन्ली इवेंट्स असतात. यात विद्यार्थ्यांना पूर्ण दिवस वेगवेगळ्या लेक्चरना बसता येते, लॅब मधे नेतात. काही वेळा एक रात्र डॉर्म मधे रहाता येते. अशा इवेंटला जाण्याची संधी मिळाल्यास जरूर जावे. मुलांच्या ओळखीची सिनियर मित्र मंडळी मदत करणार असल्यास इन्फॉर्मल विझिट्ही घेता येतील. कॉलेज विझिट्स घेऊन कुठे अप्लाय करायचे त्याची शॉर्ट लिस्ट शक्यतो १२वीचे वर्ष सुरु होण्याआधी तयार असावी.
शैक्षणिक खर्चाचा अंदाज
आपल्या पाल्याला योग्य वाटणार्या युनिवर्सिटीचा शोध घेताना एकीकडे शैक्षणीक खर्चाचा अंदाज घ्यावा.
शैक्षणिक खर्चाला Cost of attending university असे म्हणतात. यात फी, राहण्याचा-जेवणाचा खर्च, इतर फीज, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य, आणि वैयक्तीक खर्च याचा समावेश होतो. प्रत्येक युनिवर्सिटीच्या संकेतस्थळावर याबद्दल माहिती असते. या खर्चापैकी फी सोडल्यास इतर खर्च जवळ जवळ सारखाच असतो.
विद्यार्थ्याच्या शैक्षणीक खर्चासाठी किती मदत मिळेल हे ठरवण्यासाठी कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाचा आणि मिळकतीचा विचार करुन विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी किती खर्च कुटुंबाने करणे अपेक्षित आहे ते निश्चित केले जाते. या रकमेला EFC (Expected Family Contribution) असे म्हणतात. EFC मोजण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात - FAFSA, CSS Profile ,568 Consensus . यापैकी FAFSA हे फेडरल एड साठी वापरले जाते तसेच बर्याचदा कॉलेजेस प्रायवेट ग्रांट साठी देखील FAFSA विचारात घेतात. काही वेळा त्या जोडीला स्टेटचा वेगळा फॉर्म देखील भरावा लागतो. FAFSA हा फॉर्म भरण्यासंबंधी सर्व माहिती शाळा देते तसेच http://studentaid.ed.gov/fafsa या ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध आहे. याशिवाय जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त प्रायवेट युनिवर्सिटीज CSS Profile वापरतात. अनेक स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स देखील CSS Profile वापरतात. याबाबतची माहिती http://student.collegeboard.org/css-financial-aid-profile या ठिकाणी मिळेल. या व्यतिरिक्त सिलेक्टेड २५ कॉलेजेस Consensus पद्धत वापरतात. यात FAFSA आणि CSS Profile हे दोन्ही फॉर्म्स वापरले जातात मात्र अॅसेट वेगळ्या प्रकारे मोजले जातात. प्रत्येक पद्धत वेगवेगळे नियम वापरते याचे एक उदा. ५२९ प्लॅन मधले पैसे विचारात घेताना FAFSA ५.६% विचारात घेते, CSS Profile २०% आणि Consensus ५% . त्यामुळे तुमचे इनकम आणि अॅसेट काय आहेत आणि ते कुठल्या पद्धतीने मोजले जाणार आहेत यावर तुमचे Expected Family Contribution वेगवेगळे येऊ शकते. शैक्षणिक खर्चाचा साधारण अंदाज येण्यासाठी विद्यार्थी ११वी(ज्युनिअर) ला असताना EFC Calculator वापरून बघावा.
त्याच बरोबर विशिष्ठ कॉलेज मधे शिकण्याची नेट प्राईस काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी त्या युनिवर्सिटीचा कॅलक्युलेटर वापरावा. कारण एखाद्या कॉलेजचा खर्च (स्टीकर प्राईस) जास्त असला तरी EFC साठी वापरलेली पद्धत, उपलब्ध असलेल्या ग्रांट्स वगैरे विचारात घेतल्यावर येणारी नेट प्राईस तुमच्या आवाक्यातील आहे की नाही याचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय घेता येतात.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट युनिवर्सिटी इन स्टेट आणि आउट ऑफ स्टेट अशी वेगवेगळी फी आकारते. काही वेळा पब्लीक युनिवर्सिटीच्या out of state tuition मधे सवलत मिळू शकते, मात्र अशी सवलत मिळ्ण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही कुठल्या स्टेट मधे रहाता, कुठल्या स्टेटच्या युनिवर्सिटीत जाऊ इच्छिता , कुठल्या विषयात्/कुठल्या प्रकारची डिग्री हवी आहे त्यानुसार तुम्हाला सवलत मिळणार की नाही ते ठरते. काही वेळा प्रायवेट युनिवर्सिटी देखील out of state tuition reduction program मधे सहभागी होते. अशावेळी प्रायवेट युनिवर्सिटीसाठी असलेल्या नियमानुसार सवलत मिळते. याबद्दलच्या अधिक माहिती साठी खाली दुवे देत आहे.
http://www.nebhe.org/programs-overview/rsp-tuition-break/overview/
http://www.sreb.org/page/1304/academic_common_market.html
http://wiche.edu/wue
http://msep.mhec.org/MidwestStudentExchangeProgram
कॉलेज अॅडमिशन
विद्यार्थ्याचा करीअर पाथ, इतर वैयक्तिक आवडनिवड , शैक्षणिक खर्चाचे बजेट वगैरे बाबी लक्षात घेऊन १२वी चे वर्ष सुरु होताना युनिवर्सिटीज शॉर्ट लिस्ट केल्या की सुरुवात होते ती प्रवेश प्रक्रियेची. तुम्ही निवड केलेल्या कॉलेजच्या संकेत स्थळावर कॉलेज अॅडमिशनची सर्व माहिती दिलेली असते. युनिवर्सिटी कॉलेज कॉमन अॅप्लीकेशन वापरणार की युनिवर्सल कॉलेज अप्लिकेशन वापरणार की स्वतंत्र अॅप्लीकेशन वापरणार त्या प्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया थोडीशी बदलते. कॉमन किंवा युनिवर्सल अॅप मधे तुम्ही एक कॉमन फॉर्म भरता आणि जोडीला विशिष्ठ कॉलेजसाठी वेगळे सप्लीमेंट अॅप्लीकेशन करता तर स्वतंत्र अॅप्लीकेशन असेल तर तुम्ही त्या विशिष्ठ युनिवर्सिटीचा प्रवेश अर्ज भरता. पब्लीक युनिवर्सिटीला प्रवेश घेणार असाल तर त्यांच्या मेरीट स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जावे म्हणून प्रवेशाचे अर्ज लवकर (साधारणतः १५ नोवेंबर डेडलाईन) पाठवणे आवश्यक असते. प्रायवेट युनिवर्सिटीजच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ली डिसीजन, अर्ली अॅक्शन , सिंगल चॉइस अर्ली अॅक्शन, रेग्युलर असे वेगवेगळे प्रकार असतात. युनिवर्सिटीजच्या साईटवर त्या संबंधीचे नियम लिहिलेले असतात. प्रवेश प्रक्रियेसाठी कुठला पर्याय योग्य याचे उत्तर प्रत्येक केस मधे वेगवेगळे असू शकते. याबाबत अधिक मदत लागल्यास शाळेच्या काउंसेलरशी बोलावे. माझ्या मुलाने तीन पब्लीक युनिवर्सिटीजना मेरीट स्कॉलरशिप मिळावी म्हणून लवकर अर्ज केले होते. त्यातील एक युनिवर्सिटी त्याच्या लिस्टमधे दुसरा चॉइस होती. त्याचा पहिला चॉइस असलेल्या प्रायवेट युनिवर्सिटीला त्याने अर्ली अॅक्शन पर्याय घेतला तर अजून एका प्रायवेट युनिवर्सिटीला अर्ली डिसीजन ऐवजी रेग्युलर अॅडमिशनसाठी अर्ज केला. असे केल्याने त्याला काही युनिवर्सिटीजचे होकार ख्रिसमस आधीच कळले होते शिवाय अॅडमिशन मिळाल्यावर युनिवर्सिटीजनी देऊ केलेल्या स्कोलरशिप्स्/एड पॅकेजेसची तुलना करुन निर्णय घेण्यासाठी नॉर्मल डेडलाईन पर्यंत थांबता आले.
कॉलेज प्रवेश प्रक्रिये मधे निबंध लेखन, रेकमेंडेशन्स, टिचर आणि काउंसेलर इवॅल्युएशन फॉर्म्स, ट्रान्सक्रिप्ट्स वगैरे वेगवेगळ्या गोष्टींची पूर्तता करावी लागते. वेगवेगळ्या डेडलाईन्स सांभाळाव्या लागतात. साधारण १ ऑगस्टला अॅप्लीकेशन फॉर्म्स ऑनलाईन असतात. ते डोळ्याखालून घालावेत. किती निबंध लिहावे लागतील, त्यांचे विषय काय आहेत ते पहावे. निबंधाचे विषय विचारपूर्वक ठरवावेत. निबंधलेखनासाठी पुरेसा वेळ द्यावा. इंग्लीशच्या शिक्षकांना आधी विनंती केल्यास ते ड्राफ्ट फायनल करण्यापूर्वी वाचून आवश्यक असल्यास सुधारणा सुचवतात. रेकमेंडेशन्ससाठी ज्या व्यक्तींना विनंती करणार आहात त्यांना शक्य तितक्या लवकर भेटावे. बर्याच युनिवर्सिटीजना टिचर्सची रेकमेंडेशन्स लागतात. अशावेळी शक्यतो ११वी संपताना याबद्दल तुमच्या शिक्षकांशी बोलून ठेवावे. स्कॉलरशिप्ससाठी देखील रेकमेंडेशन्स लागतील. त्याबद्दलही बोलून ठेवावे. शिक्षकांना बरीच रेकमेंडेशन्स लिहावी लागतात. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यावर लवकरात लवकर रेकमेंडेशन साठी विनंती पाठवावी म्हणजे घाई गडबड न होता योग्य मुदतीत काम पूर्ण होईल. अनावधानाने होणार्या चुका टाळण्यासाठी प्रत्येक युनिवर्सिटीसाठी वेगळे फोल्डर करावे. त्यात आवश्यक गोष्टी आणि डेड्लाईन्सची नोंद करावी. जसजशी पूर्तता होत जाइल तसे चेक मार्क करावे. १२वी चा अभ्यास, एक्स्ट्रा करीक्युलर्स वगैरे सांभाळून ही सगळी कामे करायची असल्याने विकेंड्सना यासाठी आधीच वेळ राखून ठेवावा.
शैक्षणीक खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पालकांनी शिक्षणासाठी बाजूला ठेवलेले पैसे, मुलांनी केलेले सेविंग याच्या बरोबर स्कॉलरशिप्स, फेडरल आणि स्टेट कडून मदत मिळण्याची शक्यता, शैक्षणीक आणि इतर लोनची तयारी या गोष्टींचा विचार केला जातो. .
स्कॉलरशिप्स
युनिवर्सिटी मेरीट स्कॉलरशिप्स - पब्लिक युनिवर्सिटीज मेरीट स्कॉलरशिप्स देतात. तसेच प्रायवेट युनिवर्सिटीज देखील मेरीट स्कॉलरशिप्स देतात. काही युनिवर्सिटीज नॅशनल मेरीट स्कॉलरशिप मिळाल्यास ती रक्कम मॅच करतात. नीड ब्लाईंड युनिवर्सिटीज प्रवेश दिल्यावर EFC नुसार एड पॅकेज देत असल्याने वेगळ्या मेरीट स्कॉलरशिप्स देत नाहीत.
त्याशिवाय इतर अनेक स्कॉलरशिप्स लोकल, स्टेट आणि नॅशनल लेवलवर उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या हॉबीजपासून ते वेगवेगळ्या कॉलेज मेजर्स पर्यंत अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध असतात. पालकांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील काही स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत का याची देखील चौकशी करावी. फक्त हायस्कूल सिनियर्ससाठी स्कॉलरशिप्स असतात असा एक समज असतो. पण अंडरक्लाससाठी देखील स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत.
स्कॉलरशिप्स शोधण्यासाठी उपयोगी साईट्सची यादी खाली देत आहे. Every little bit helps so happy searching.
www.fastweb.com
www.finaid.org
www.scholarships.com
www.scholarshipexperts.com
http://www.petersons.com/college-search/scholarship-search.aspx
www.freschinfo.com
www.salliemaefund.org
www.naas.org
http://www.scholarshippoints.com/about.php
www.schoolsoup.com
स्कॉलरशिप्स मिळवायला मदत करतो असे सांगुन कुणी फी चार्ज करत असेल तर तो स्कॅम समजावा.
फेडरल आणि स्टेट एड
युनिवर्सिटीत शिक्षण घेण्यासाठी उत्पन्नाच्या नियमानुसार Federal Pell Grant , Federal Supplemental Educational Opportunity Grant (FSEOG) , तसेच स्टेट एड मिळू शकते. या मदतीसाठी आर्थिक परीस्थिती हा निकष असतो. FAFSA फॉर्म भरावा लागतो.
लोन
शिक्षणासाठी लोनचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
1. Federal Student Loan
2. Private Student Loan
Federal Student Loan
1. Federal Perkins Loan - हे कर्ज अंडरग्रॅड आणि ग्रॅड स्टुडंटसाठी असते. कॉलेज कडे असलेले फंड्स आणि विद्यार्थ्याची आर्थिक परीस्थिती या निकषावर हे कर्ज दिले जाते. हे कर्ज कॉलेज देते आणि यावरील व्याज हे विद्यार्थी जोपर्यंत कमीत कमी अर्धवेळ शिकत आहे तोपर्यंत डिफर होते.
2. Direct Subsidized Loan - हे कर्ज देखील आर्थिक निकषावर आधारीत असून अंडरग्रॅड साठी मिळते. हे कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. व्याज विद्यार्थी कमीत कमी अर्धवेळ शिकत असेल तोपर्यंत डिफर होते.
3. Direct Unsubsidized Loan - या कर्जासाठी आर्थीक निकष नाही. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.
4. Direct PLUS Loan - हे कर्ज अंडरग्रॅड स्टुडंटचे पालक किंवा ग्रॅड/ प्रोफेशनल स्टुडंट यासाठी असून आर्थीक निकष लागत नाही. क्रेडीट हिस्ट्री वाईट नसावी. कर्ज डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन देते. कर्ज घेतल्या काळापासून व्याज लागू होते.
Private Student Loan हे कर्ज खाजगी बँका किंवा पतपेढ्या देतात. क्रेडीट हिस्टरी चेक करतात. व्याज दर जास्त असतो. प्रायवेट लोन हा प्रकार शक्यतो टाळावा.
Federal Work Study Program :
या प्रकारात कॉलेज खर्चासाठी पार्ट टाईम जॉब करणे अपेक्षित असते. आर्थिक निकष आणि इतर काही अटींची पूर्तता करावी लागते. आर्थिक निकष अपेक्षित खर्चानुसार बदलतो. उदा. 'अ' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्ट्डी प्रोग्रॅम लागू होणार नाही पण 'ब' युनिवर्सिटीच्या अपेक्षित खर्चानुसार तुम्हाला वर्क स्टडी प्रोग्रॅम लागू होईल. कॉलेजकडे पुरेसे फंडिंग नसेल तर वेटिंग लिस्टवर ठेवतात. आठवड्याला किती तास काम करता येइल यावर लिमिट असते. क्लास स्केड्युलही विचारात घेतले जाते. वर्क स्ट्डी जॉब्ज ऑन कॅम्पस तसेच ऑफ कॅपस उपलब्ध असतात.
कॉलेज खर्चासाठी या वर्क स्ट्डी प्रोग्रॅम व्यतिरिक्त ऑन कॅम्पस अणि ऑफ कॅम्पस इतरही जॉब उपलब्ध असतात. आर्थिक निकष लावला जात नाही. बरीच मुले खर्चाची मिळवणी करण्यासाठी तसेच नेटवर्किंगसाठी असे जॉब करतात. यात ऑन कॅम्पस जॉब बर्याचदा जास्त सोइचे पडतात.
बर्याचदा वर्क स्टडी प्रोग्रॅम मधले जॉब्ज तसेच इतर ऑन कॅम्पस जॉब्ज कॉलेज सुरु होण्याआधीच लिस्ट केले जातात. तेव्हा जॉब सर्च करायला कॉलेज सुरु होईपर्यंत थांबू नये.
खाली मी माझ्या मुलाच्या हायस्कूल प्रवासाची टाइमलाइन देत आहे.
अमेरीकेतील हायस्कूल प्रवासासाठी ज्यु. मायबोलीकरांना आणि त्यांच्या पालकांना खूप खूप शुभेच्छा!
टीप - अनुभवी मायबोलीकरांनी यात जरूर भर घालावी. अॅथलेटिक स्कॉलरशिपवर कॉलेजला जाणार्यांचा प्रवास थोडा वेगळा असतो. इथे कुणाला अनुभव असेल तर त्यांनीही आपले अनुभव शेअर करावेत. माझ्या मुलाच्या काही मित्रांनी ROTC चा पर्याय निवडला. तुमच्या पाल्याला आवडणार असेल तर जरूर विचार करावा.
धन्यवाद असामी, पुढचे वर्ष
धन्यवाद असामी, पुढचे वर्ष अजून अवघड म्हणून जीव घाबरतोयं... College मनात आहे पण तिथे मिळाले नाही तर म्हणून तुम्ही म्हणता तसे दोन्ही दगडीवर पाय ठेवून उभे आहोत. आधी college ची यादी करून त्या कलाकलाने पहावे लागेल बहुतेक , एक फोल्डर पिकप केलंय. त्यात बघायचंय व ठरवायचयं .... तीन AP घ्यायचा विचार आहे पण त्याला English AP पण हवयं आणि चार होत आहेत. तोच ठरवणार पण तरीही मी उगाच पर्याय बघतेयं.
प्रिय अजय
प्रिय अजय
आपल्या मुलीने कॉलेजसाठी लागणारा वेळ आणि फी (थोडी) कमी करण्याचा एक अगदी वेगळा मार्ग माझ्या मुलीने शोधून काढला आणि यशस्वी पार पाडला.
https://www.maayboli.com/node/44641#comment-4605804
तिने मराठी भाषा येत आहे असे कळवले. अमेरिकेत काही विद्यापीठात (उदा. Penn State) विद्यापीठ पातळीवर मराठी शिकवली जाते. तिथल्या प्राध्यापकांनी दुरुन तिची मराठीची परिक्षा घेतली आणि त्यात ती अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला सगळा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर ३.५ वर्षात पार पाडता आला आणि त्यामुळे फी देखील ४ वर्षांची भरण्याऐवजी ३.५ वर्षांचीच भरावी लागली.
>>
हे कसे केले कोणती वेब साईट वा कॉन्टॅक्ट मिळाला तर उपकृत होउ. याबाबतीत आपले मार्गदर्शन त्या धाग्यावर खुपच उपयोगी होइल.
अजुन कोणाला वेबसाईट्ची अशी माहिती असेल जिथे मराठी चे ड्युएल क्रेडिट्स मिळु शकतिल तर आम्ही उप़़ऋत होउ.
प्रिय अजय
प्रिय अजय
आपल्या मुलीने कॉलेजसाठी लागणारा वेळ आणि फी (थोडी) कमी करण्याचा एक अगदी वेगळा मार्ग माझ्या मुलीने शोधून काढला आणि यशस्वी पार पाडला.
https://www.maayboli.com/node/44641#comment-4605804
तिने मराठी भाषा येत आहे असे कळवले. अमेरिकेत काही विद्यापीठात (उदा. Penn State) विद्यापीठ पातळीवर मराठी शिकवली जाते. तिथल्या प्राध्यापकांनी दुरुन तिची मराठीची परिक्षा घेतली आणि त्यात ती अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यामुळे तिला सगळा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर ३.५ वर्षात पार पाडता आला आणि त्यामुळे फी देखील ४ वर्षांची भरण्याऐवजी ३.५ वर्षांचीच भरावी लागली.
>>
हे कसे केले कोणती वेब साईट वा कॉन्टॅक्ट मिळाला तर उपकृत होउ. याबाबतीत आपले मार्गदर्शन त्या धाग्यावर खुपच उपयोगी होइल.
अजुन कोणाला वेबसाईट्ची अशी माहिती असेल जिथे मराठी चे ड्युएल क्रेडिट्स मिळु शकतिल तर आम्ही उप़़ऋत होउ.
अस्मिता,
अस्मिता,
एपी कोर्सेस हे सगळीकडे स्टँडर्ड असतात. अॅडमिशनसाठी युनिवर्सिटी सगळ्यात वरच्या दर्जाचे काय किती कोर्सवर्क केले आहे हे बघते तेव्हा एपी कोर्सेस दिसतात. हायस्कूल्चे एपी टिचर्स कोण हे माहित असल्याने एकंदरीत गुणवत्ता, पाल्याला काय आधार मिळेल वगैरे सरप्राईझ नसते. एपीची ग्रेड उत्तम असेल तर काही प्रमाणात कॉलेज क्रेडीट्स मिळू शकतात मात्र गॅरंटी नाही. माझ्या मुलाने biology आणि environmental science वगळता उपलब्ध होते ते सगळे आवडीचे एपी कोर्सेस घेतले होते. पुढे कॉलेज अॅडमिशन झाल्यावर मुलाने जे विषय इंजिनिअरिंग ट्रॅकशी संबधीत नाहीत पण डिग्री पूर्ण करायला पहिल्या वर्षी घेणे भाग आहे अशांचे क्रेडीट एपी कोर्सेसमधून मिळवले. अजून एक म्हणजे सॅट सबजेक्ट टेस्ट देणार असाल तर एपीचा अभ्यास तिथे उपयोगी पडतो.
ड्युएल क्रेडीट ही कॉलेज क्रेडीट्स आणि हायस्कूल क्रेडीट अशी डबल कमाई असते. मात्र कोर्स कोण शिकवणार, कुठे शिकवणार यावर बरेच काही बदलते. बरेचदा लोकल कम्युनिटी कॉलेजची मंडळी त्या कँपसवर किंवा हायस्कुलात येवून हे कोर्सेस शिकवतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांसारखे 'माझी मुलं' अशा नजरेने बघणे, काळजी वहाणे सहसा केले जात नाही. त्या वर्षी तो कोर्स शिकवणारी व्यक्ती आणि तुमची मुले यांचे जमले तर ठीक , नाही तर त्यांना काही फरक पडत नाही. कॉलेज क्रेडीट्स मिळत असली तरी ती कुठे कुठे स्विकारली जातील हे माहित करुन घेणे आवश्यक. तुम्ही ज्या युनिवर्सिटीजचा विचार करत आहात तिथे ही क्रेडीटस घेतली जाणार असतील/ तुमच्या डिग्री प्लॅनशी सुसंगत असल्याने अप्लीकेबल असतील तर कमी किमतीत कॉलेज क्रेडीट आणि जोडीला वेळही वाचला असे होते. लेकाला एका कोर्सला एपी नव्हतेच ड्युएल क्रेडीट होते त्यामुळे सगळ्यांनी तसेच घेतले. तो अनुभव वाईट होता. द्युएल कोर्स घेतला होता तर ते ही ट्रान्सक्रिप्ट द्या असे युनिवर्सिटीचे म्हणणे म्हणून ते क्रेडीट अप्लाय होत नव्हते तरी त्या ड्युएल क्रेडीट वाल्यांकडून ट्रान्सक्रिप्ट युनिवर्सिटीला द्यावे लागले. ती प्रोसेस तशी कटकटीची झाली. सगळ्या मुलांना फोन फोन खेळावे लागले.
मुलाचे इंजिनिअरिंग केल्यास मेक हे पक्के होते त्यामुळे त्याने फक्त कॅलक्युलस घेतले होते. काही मुलांनी कंप्युटर सायन्सकडे कल म्हणून रेग्युलर कोर्सेस मधे कॅल घेतले आणि इलेक्टिव्ज निवडताना मॅथ डिपार्टमेंटची घेतली आणि त्यात स्टॅट वगैरे घेतले.
कोर्सेस निवडताना शक्यतो तुमच्या आवडी निवडी, करीयर ट्रॅक, एक्स्ट्रा करीक्युलर्स हे सगळे लक्षात घेवून निवडावे. माझ्या मुलाने जरी करीयर ट्रॅक म्हणून इंजिनिअरिंग निवडले तरी त्याचे कोर्स वर्क हे केमिस्ट्री, फिजिक्स, कॅलचे एपी वगळता त्याच्या एक्स्ट्रा करीक्युलर्सशी आणि आवड-छंदांशी मिळते जुळते होते. उदा. त्याची शाळेबाहेरची अॅक्टिव्हिटी जर्नालिझम होती आणि त्याने शाळेत न्युजपेपर, टिव्ही स्टुडीओ , इंग्रजी भाषा आणि साहित्याचे एपी कोर्सेस, फ्रेंच एपी कोर्स, जोडीला बिझनेस इलेक्टिव्ज असे कोर्सेस निवडले. शाळेची अॅक्टिव्हीटी एक टिव्ही क्वीझ शो आणि जोडीला क्वीझ लीग (सोशल स्टडीज) होती आणि कोर्स वर्क सोशल स्टडीजचे सर्व उपलब्ध एपी कोर्सेस होते.
त्यामुळे वेळेची सांगड घालणे तसे सोपे झाले आणि जो काही अभ्यास केला तो श्रम न वाटता आनंदाचा झाला. त्याशिवाय प्रवेश प्रक्रियेत उमेदवार म्हणून त्याचे स्वतःचे असे खरेखुरे चित्र आपोआप तयार झाले.
मनःपूर्वक आभार स्वातीताई
मनःपूर्वक आभार स्वातीताई पुन्हा पुन्हा वाचणार आहे हे.
त्याशिवाय प्रवेश प्रक्रियेत उमेदवार म्हणून त्याचे स्वतःचे असे खरेखुरे चित्र आपोआप तयार झाले.>>>> हे फारच आवडले.
@निलिमा , ज्युनिअर इयरला
@निलिमा , ज्युनिअर इयरला घेतलेल्या PSAT च्या स्कोअरवर NMSF ठरते. तुमच्या मुलीला psat released practice tests घेऊ देत. तसेच, माझ्या लेकाला SAT Prep चा फायदा झाला. NMSF चा cutoff प्रत्येक स्टेटसाठी वेगळा असतो, माझ्या लेकाचा scoring index बराच वर होता, २२५+. त्याला NMF स्कॉलरशिप तर मिळालीच, पण Honors Undergrad लाही सहज अॅडमिशन मिळाली. Being a NMF, It's quite an achievement ! तुमच्या मुलीला All the best !!!
स्वाती आभारी आहे!
स्वाती, राधिका आभारी आहे!
आज पुन्हा वाचला धागा. खूप छान
आज पुन्हा वाचला धागा. खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे. ८ वी ते हायस्कूल सिनीयर रेंज मधे मुले असलेल्या प्रत्येकाने वाचावा असा धागा/मालिका आहे.
स्वाती तुम्ही नेहमिच सगळ
स्वाती तुम्ही नेहमिच सगळ सविस्तर आणी सोप्या भाषेत सान्गता.
अस्मिता! माझ्या मुलिने ४ एपी घेतलेत त्यात एपी बायो,एपी युएस हिस्ट्री,एपी सेमिनार, एपी इन्ग्लिश आहेत पण सध्या कोव्हिड मुळे आमच्याकडे ३ सब्जेक्ट पर क्वार्टर असा पॅटर्न आहे, ज्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, ३च सब्जेक्ट असले तरी अभ्यास आणि असाइनमेन्ट भर्पुर असतात.
त्यात अवान्तर मधे ती स्कुल डान्स टिम मधे आहे, रिसर्च आहे, ट्युटरिन्ग चालु आहे. या सगळ्यात
एकावेळेस ४ एपी खुप स्ट्रेसफुल होतायत अस तिच मत आहे यन्दा सॅट सब्जेक्ट टेस्ट द्यायची म्हणून बायो घेतले पण कोव्हिड मुळे ते सगळच बारगळल, आतापर्यतच्या सगळ्याच टेस्ट कॅन्सलच झाल्यात त्यामुळे पुढच्या वर्शी बायो घेतले असते तरी चालले असते अस आता वाटतय तरी ओन फिल्ड सगळ्या व्हॉलेटियरिन्ग अॅक्टिव्हिटी सध्या बन्द आहेत.
त्यामूले तुमच्या मुलाचे एकूण स्केज्युअल आणि कल बघुन मग ठरवा.
अपकमिन्ग हायस्कुल पॅरेन्ट साठि !काही स्कुल डिस्ट्रिक्ट मुलाच्या ग्रेड बघुनच एपी घेवु देतात किवा कन्टिन्यु करु देतात त्याच्या द्रुश्टीने त्याच्या स्कुलच रेटिन्ग महत्वाच असत (फॉर फन्डिन्ग वैगरे) तस प्रेशर पण मुलावर असत. नेबरिन्ग स्कुल डिस्ट्रिक्ट मधे काहि मुलाना ग्रेड लो झाल्यावर एपी ड्रॉप करायला लावल्याच्या सुद्धा केसेस आहेत. शक्यतो स्कुल चॉइस असेल तर तसे काही क्रायटेरिया नाहित हे बघुन घ्या.
धन्यवाद प्राजक्ता. तो चांगले
धन्यवाद प्राजक्ता. तो चांगले करतोय पण तरीही मला relax वाटत नाही. शाळा उत्तम आहे. पण सगळेच हुशार AP + athlete + 200 volunteer hours+ jobs हे बघून overwhelming वाटतं. या वर्षी तर तेही volunteer अवर गेले. ROTC करतोय आणि आवडतंय . NHS मध्ये ही आहे पण नेमके काय बघतील काय माहिती असं होतं.
Affordable Online tutoring कुणीतरी सुचवा प्लीज. अडलं तर मला शिकवता येत नाहीये आता.
तो चांगले करतोय पण तरीही मला
तो चांगले करतोय पण तरीही मला relax वाटत नाही>> ते तर असणारच, पॅरेन्ट्स जास्त स्ट्रेस असतात मुलापेक्षा, सॉफमोअर इयरला आहे का?
हो ना
हो ना चार AP मलाही नको वाटतात. बघू.
त्यात अवान्तर मधे ती स्कुल डान्स टिम मधे आहे, रिसर्च आहे, ट्युटरिन्ग चालु आहे....>>> छान आहे हे
अस्मिता, ताण नको घेवू.
अस्मिता, ताण नको घेवू. युनिवर्सिटीचे अॅडमिशन ऑफिस प्राप्त परीस्थितीत तुम्ही तुमच्या बाजून १००% देण्याचा प्रयत्न केलाय का एवढेच बघते, होलिस्टिक अॅप्रोच असतो. सगळे विद्यार्थी सगळ्यात प्राविण्य मिळवलेले अशी अवास्तव अपेक्षा नसते. सध्या कोविडमुळे जी परीस्थिती आहे त्याचा विचार अॅडमिशन देताना केला जाईलच. एरवीही काही विचित्र परिस्थीती, फॅमिली हार्डशिप वगैरे असेल तर ते सांगायची संधी अॅडमिशन फॉर्ममधे असते. ROTC करतोय, NHS मध्ये ही आहे हे छानच की. माझा मुलगा अॅथलेट नव्हता, इंजिनिअरिंग साठी अप्लाय करणार होता तरी त्याने कधी रोबोटिक्स , सायन्स फेअर, सायन्स क्विझ लिग असे काहीही सायन्स संबंधीत केले नव्हते. जॉबही फक्त समरमधे कँप काउंसिलर म्हणून आणि शाळेच्या ट्रॅकमिट सिझनला हेल्पर म्हणून करायचा. मात्र त्याच्या एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टिविटीजमधे धरसोड नव्हती, सातत्याने दरवर्षी वाढीव जबाबदारी / लिडरशिप स्किल आणि त्या अॅक्टिविटीज मधली पॅशन याची अॅडमिशन ऑफिसने नोंद घेतली.
@निलिमा
@निलिमा
याबद्दल एकत्रित माहिती कुठे नाही कारण या बाबतीत प्रत्येक विद्यापीठाचे नियम वेगळे आहेत.
१. जिथे तुमच्या पाल्याला प्रवेश मिळाला आहे, किंवा घ्यायची इच्छा आहे त्या ठिकाणी कुठली तरी परकी भाषा (ईंग्रजी सोडून ) शिकणे कंपलसरी (For credit) आहे का ते विचारा.
२. तिथे शिकवल्या जाण्यार्याच भाषा घ्याव्या लागतात का त्या पेक्षा बाहेरच्या भाषा घेता येतात का ते विचारा.
३. बाहेरची भाषा घेता येत येत असेल तर त्यात उत्तीर्ण होण्याची (credit मिळवण्याची) पात्रता , कुठल्या पातळीची परीक्षा द्यावी लागते हे विचारा. सहसा पदवी पातळीच्या अभासक्रमाची लागते.
४. मराठी ही बाहेरची भाषा म्हणून घेता येते का ते विचारा. मराठी ही काही अमेरिकन विद्यापीठात शिकवली जाते आणि तिथले प्राध्यापक ती परिक्षा विद्यापीठाचे नियम पाळून घेतात हे ही सांगा.
या टप्प्यातून गेल्यावर "सहसा" ते विद्यापीठ तुम्हाला मराठी भाषा, पदवी पातळीच्या अभ्यासक्रमासाठी घेता येईल अशी परवानगी देते .
यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परकी भाषा For credit म्हणून शिकण्याची अट अभ्यासक्रमात हवी. ती तशी नसेल तर तुम्हाला ते credit मिळवण्याचे पैसे वाचवता येणार नाहीत.
केवळ ही सुविधा आहे म्हणून अमूक विद्यापीठात प्रवेश घ्या असे मी मुळीच सुचवणार नाही. तुमच्या पाल्याच्या आवडीच्याच विद्यापीठात प्रवेश घ्या आणि नंतर पैसे वाचवात येतात का ते पहा.
Tufts University मधे हे सगळे टप्पे माझ्या मुलीला पूर्ण करता आले.
आपण भारतात नाही आहोत, तेव्हा
आपण भारतात नाही आहोत, तेव्हा पालकानी फारसे निर्णय घ्यायचे नसतात.
कित्येक मुलं पहिल्या वर्षाला ज्या विषयाकडे आकर्षित होऊन कॉलेजला जातात, तो विषय सोडुन दुसरेच काहीतरी शिकतात.
कॉलेजने दिलेली शिष्यवृर्त्ती पहिल्या वर्षानंतर बर्याच लोकांची जाते (गे. पॉ. अॅ. कमी झाल्यामुळे).
आवडीचे कॉलेज हे देखील पालकांचे खूळ आहे, आणि बहुतेकवेळा ते शायनिंग मारायला वापरले जाते.
उंची कॉलेज म्हणजे पुढच्या आयुष्याची गॅरेंटी नाही...
९०% भारतीयांची मुलं आई/बाबा सांगतात (धमक्या देतात) म्हणुन ठराविक विषय घेतात.
बरीच कॉलेज ए. पी. वगैरे चे मार्क ग्राह्य धरत नाहीत (त्याना पण पैसा कमवायचा असतो).
हे सगळे ज्ञान कॉलेज संपल्यावर येते, पण तोवर उशीर झालेला असतो..
१ विषयाच्या ऑनर्स साठी
१ विषयाच्या ऑनर्स साठी दिवसाला ४५ मिनीटे जास्त अभ्यास, आणि १ विषयाच्या ए. पी. साठी दिवसाकाठी दिड तास जास्त अभ्यास अशी शिक्षकांची अपेक्षा असते.
झोप, जगण्यासाठी लागणारा वेळ, साधा अभ्यास, शाळा, खेळ, इतर क्लास आणि ऑनर्स / ए. पी. यांचे तास जोडून ते २४ पेक्षा जास्त होत असतील, तर गणित चुकतेय हे समजावे...
...
यावर एक चांगला उपाय.. जिने कॉलेज पूर्ण केलेले आहे, अश्या एकाद्या चुणचुणीत मुलीला ( तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत ) आपल्या मनात येणार्या शंका विचाराव्यात (मुलगे कुठल्याच प्रश्नाना नीट उत्तर देत नाहीत असे बर्याच पालकांचे म्हणणे आहे)....
परदेसाई यांच्याशी १००% सहमत.
परदेसाई यांच्याशी १००% सहमत. मला तर ५ भागांचा हा इतका रिसर्च आणि इतकं ते प्लॅनिंग वाचता वाचताच धाप लागायची पाळी आली.
अंडरग्रॅड साठी इनस्टेट कॉलेजात जाणे बरे, स्वस्त आणि मस्त. जी.पी.ए. आणि SAT/ACT चांगला असला की इतर फाफटपसार्याची गरज पडत नाही. पुढे मास्टर्स केले, मेडिकल, लॉ वगैरे केले तर अंडरग्रॅडच्या कॉलेजने काही फार फरक पडत नाही, फक्त चांगला मार्केटिंग ब्रँड मिळतो आणि ब्रॅगिंग राईटस. युनिवर्सिटीजच्या टुर, कँपस बघून कुणी कॉलेज ठरवत असेल तर तो म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. युनिवर्सिटीज करतात ते मार्केटिंग ऐकून यायचे की झाले. कॉलेज/युनिवर्सिटीज हे नोकर तयार करण्याचे कारखाने आहेत. खरे ज्ञान/स्किल्स ऑन द जॉबच मिळते.
परदेसाई यांच्याशी १००% सहमत.
परदेसाई यांच्याशी १००% सहमत. मला पण सलीम फेकूचे बहुत बडी प्लानिन्ग लगरी हे वाक्यच डोक्यात आले होते. पण करतायत सिन्सिअर लोक्स तर आपण का टेन्शन घ्या. शिकु दे पोरास्नी.
इतके प्लॅनिंग ? असा प्रश्न
इतके प्लॅनिंग ? असा प्रश्न पडला आहे त्यांच्यासाठी -
इथे पूर्व प्राथमिक पासुन शिक्षण घेणारी पहिली पिढी. गाव लहान, एकेकाळी ड्रॉप आउट नेशन म्हणून टाईम मासिकाने स्टोरी केली होती त्यात झळकलेले. थोडक्यात शिक्षणाबाबत बदनाम होते (आज परीस्थिती वेगळी आहे). आम्हाला आमच्या देशी मित्रांनी गाव बदला, मुलासाठी हा जॉबच बदला, इथे कुमॉन नाही त्याचे कसे होणार वगैरे ऐकवले होते. मात्र आम्हाला संथ जीवनशैली, आपले गाव म्हणून रुजणे, आपुलकी, स्थैर्य वगैरे हवे होते. इथे सामावले जाणे हवे होते. लेकाचे शिक्षण एका खोलीच्या प्रीस्कूलमधे सुरु झाले तेव्हा प्रवास असा असेल याची कल्पनाही केली नव्हती. त्याचे शिकणे हे ओझे नसावे, आनंदाचे असावे एवढाच आमचा आग्रह होता.त्या त्या वेळी त्याची जी गरज होती ती भागवायचा आम्ही प्रयत्न केला. लेकाचा कल-आवड विचारात घेवून त्याचे म्हणणे ऐकून घेतले. शाळेच्या काउंसेलरनी, शिक्षकांनी दिलेले सल्ले ऐकून , जे काही उपलब्ध पर्याय होते त्यातून त्यातल्या त्यात एप्रोप्रिएट असे लेक निवड करत गेला. लेकासह आमचा प्रवास हा प्लॅन्ड नव्हता. शाळा, मुलाच्या मित्र-मैत्रीणांचे अनुभवी पालक , इथले स्थानिक मित्र-कोवर्कर्स असे सगळे सल्ले देत. बरेचदा पुढच्यास ठेच या न्यायाने हे सल्ले असत. यात 'समर कोर्सला लवकर फॉर्म भरा, मोठीच्या वेळी आम्ही उशीरा जागे झालो' इथपासून ' हायस्कूल पास झालो नी गर्लफ्रेंड प्रेग्नंट , मग लागलो फॅक्टरीत कामाला, 'ते ' तेवढे मात्र जप' असे लेकाला सांगणारा नवर्याच्या हाताखालचा कामगार अशी भली मोठी रेंज होती. काही ठेचा लेकालाही बसल्या. आम्ही जे धडपडत शिकलो त्याचा कुणाला फायदा झाला तर उत्तमच या उद्देशाने ही लेखमाला लिहिली.
लेकाला ऑफर्स आल्यावर आम्ही आमचे मत लादले नाही. नॉत्रॅडॅम आणि कॉर्नेल चे पॅकेज एवढे , इलिनॉयचे एवढे, जॉर्जिया टेकचा खर्च एवढा, पर्ड्यू सगळी फी भरायला तयार आहे, मात्र शेवटी तू त्या ठिकाणी थ्राईव होणे महत्वाचे , तुझे मन खरोखर कुठे रमेल तेच निवड असा सल्ला आम्ही दिला. त्याची कॉलेज निवड हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न कधीच नव्हता. काही कॉलेजेस , ऑफर फायनल करण्याआधी प्रोस्पेक्टिव इनकमिंग क्लाससाठी आमंत्रण - एक संध्याकाळ आणि दुसरा आख्खा दिवस असे करतात, जेणेकरुन आपल्याला निर्णय प्रक्रियेला मदत व्हावी आणि त्यांनाही त्यांची बाजू चांगल्या प्रकारे मांडता यावी हा उद्देश. लेकाने ते इवेंटही केले आणि शेवटी पर्ड्यू निवडले. ट्र्स्टी स्कॉलरशिपवर ४ वर्षांचे शिक्षण झाले. तिथे फॉर्म्युला कार, बाहा कार , मेक इंजिनिअर अँबॅसॅडर वगैरे अॅक्टिविटीज, लिडरशिप पोझिशन्स वगैरे केले. पहिले दोन समर रोल्स रॉईस मधे इंटर्न म्हणून काम केले, तिसर्या वर्षी फोर्डला समर इंटर्न म्हणून काम केले. ही इंटर्नशिप संपवून सिनियर इअर सुरु करताना त्याच्या हातात फोर्ड कॉलेज ग्रॅजुएट रोटेशन प्रोग्रॅमची ऑफर होती. सध्या लेक फोर्डमधे पूर्णवेळ कार्यरत असून अर्धवेळ मास्टर्स मेक . इंजिनिअरिंग करत आहे. जोडीला फॉर्म्युला एसएई मिशिगन साठी वॉलेंटियर आणि फोर्ड साठी पर्ड्यू कँपस रिक्रुटर म्हणून वॉलेंटियर असे काम करतो.
लेखमालेत त्याच्या मिडलस्कूल पासुनच्या प्रवासाबद्दल लिहिले आहेच, इथे थोडी त्या आधीची पार्श्वभूमी -
४ वर्ष वय प्रीस्कूल ते पहिली तो चर्चच्या शाळेत जात असे. वयाच्या मानाने खूप उत्तम fine motor skills आणि अतिशय दुबळी gross motor skills अशी परीस्थिती होती. अभ्यासाचे ओझे नव्हते पण शिस्त काही झेपेना म्हणून लेकानेच हट्टाने दुसरीत पब्लीक स्कूलला ट्रान्सफर घेतली. तिथे पहिल्यांदा टेस्टिंग झाले आणि तो ९९% मधे आहे असे कळले. त्यावेळी तो ६वीच्या लेवलचे वाचन करत होता. त्याची वर्गशिक्षिका अर्ली चाईल्डहूड एज्युकेशनमधे मास्टर्स केलेली ६० वर्षाची आजीबाई होती. तिने आणि स्कूल काउंसेलरने स्पष्ट्च सांगितले - तो अॅकॅडमीकली गिफ्टेड आहे, हे बलस्थानही असेल आणि दुबळेपणही . सोबत शारीरिक पातळीवरचे थोडे दुबळेपणही आहेच. या सगळ्याचा तोल सांभाळत नॉर्मल जगात यशस्वी होण्यासाठी त्याला जी मदत लागेल ती आपण द्यायची. त्यांच्याच सल्ल्याने त्याला गावात ताय क्वान डो ला घातले. ८व्या डिग्रीचे ब्लॅक बेल्ट असलेले , एकेकाळी फार्मसिस्ट असलेले कोरीअन आजोबा हे सेंटर चालवत. खरोखर या कलेत प्राविण्य मिळवणे या हेतूने येणारे विद्यार्थी होते तसेच जनरल फिटनेस साठी येणारेही होते. अँगर मॅनेजमेंट , एडीएचडी, motor skills मधे मागे अशी समस्या असलेली मुलेही होती. ५ वर्षाच्या मुलांपासून ६० वर्षाच्या होममेकर पर्यंत सर्व प्रकारचे विद्यार्थी होते. लेक तिथे रमला. हळू हळू सुधारणा होत गेली. पाचवीत असताना टेंपररी ज्यु, ब्लॅकबेल्ट पर्यंत मजल मारली. एकीकडे त्याचे लेखन, वाचन, पेपर क्राफ्ट, चित्रे काढणे सुरु होते. कब स्काऊटही सुरु होते. ३री पासून शाळेने त्याला त्यांच्या एनरिचमेंट प्रोग्रॅममधे दाखल केले. यात बरेच फ्रिडम होते. बरेचसे शिकणे हे ग्रुपमधे असे, प्रोजेक्ट्स असत मात्र कुठलाही प्रोजेक्ट कशा प्रकारे करायचा त्याला ६-८ पर्याय असत. ३ री संपता संपता एक गंभीर हेल्थ प्रॉब्लेम उद्भवला जो पुढे ३ वर्षे चालला. ते आजारपण सांभाळत त्याचे बाकी आयुष्य सुरु होते. ओरीगामी, पेपर स्क्लप्टिंग, कागद-कार्डपेपरची एअरक्राफ्ट मॉडेल्स , बेकिंग हे छंद सोबत होतेच. गणितातही त्याची प्रगती भाषेइतकी नाही तरी सातत्याने एक वर्ष पुढे अशीच होती.
मिडलस्कूलला ६वीत गेला तेव्हा त्याचे लेखन, वाचन ११वीच्या मुलांच्या वयाचे आणि गणित ७ वी च्या वयाचे होते. त्याशिवाय इतिहास, गवरमेंट यात विशेष रुची उत्पन्न झाली होती. . त्याच्या लेखनाला वाव मिळावा म्हणून त्याला वाय प्रेस या युथ जर्नालिझमवाल्या संस्थेत दाखल केले. पुढे ६ वर्ष तो या संस्थेशी संलग्न होता. इथे तो अक्षरशः बहरला असेच म्हणेन. तिथे रुजलेली समतेची, स्वातंत्र्याची मूल्ये, तिथे त्याची झालेली एकंदरीत जडणघडण हे सगळे आजही त्याला साथ देत आहे.
फार सुरेख पोस्ट, @स्वाती२!
फार सुरेख पोस्ट, @स्वाती२!
TAG मुलांच्या पालकांना बऱ्याच वेळेला हे ऐकून घ्यावे लागते याबाबतीत १००% सहमत... अगदी सर्व संधींचा योग्य विचार करून (आपण फक्त Pros & cons सांगायचे.) अंतिम निर्णय मुलेंच घेत असतील तरी पालकांचा दबाव ... हे सर्व ऐकून घ्यावेच लागते. अर्थात हे सर्व बोलणें कानाडोळा करण्याचे अनुभवानें शिकता येते. तुमच्या मुलाच्या सर्वच Achievements खूपच उल्लेखनीय आहेत, आणि सर्वात महत्चाचे म्हणजे हे सर्व त्याने एन्जॉय करत केले, हे फार महत्वाचे आहे, असे मला वाटते. मला स्वतःला तुमच्या ह्या लेखमालेचा फारच उपयोग झाला. आणि त्याबद्दल मी आधीच तुम्हांला धन्यवाद दिले आहेत.
शेवटी, प्रत्येक जण स्वानुभवानुसार घडत जातो आणि व्यक्त होत राहतो. Clearly, you can't please everyone, But just believe in yourself and do what you think is right for you.
अस्मिता,
अस्मिता,
Texas A and M University ने कोव्हिड काळामध्ये अतिशय उत्तम ट्युटरिंग प्रोग्रॅम सुरु केलेला आहे. हे ट्युटरिंग जे लोक तिथे टिचिंगचा कोर्स करत आहे त्यांना अनुभव मिळावा आणि त्याचबरोबर कोव्हिड काळात स्टुडंटना फायदा व्हावा यासाठी केले आहे. तुम्ही केव्हाही सेशन बुक करु शकता. तुम्हाला जर रेग्युलर सेशन हवे असतील त्यासाठी वाजवी किंमत देवून तेही बुक करता येते. माझ्या मुलीला ट्युटरिंगची सध्या गरज नाही परंतु तिच्या हायस्कुल मधल्या मुलांनी याचा भरपुर उपयोग करुन घेतला आहे. नॉन टेक्सन रेसिडेंट्स ना पण बहुदा चालु शकेल ही सुविधा पण मला खात्री नाही.
https://today.tamu.edu/2020/09/15/aggie-homework-helpline-to-connect-chi...
इथे वॉलंटीअरैंग विषयी लिहिलय
इथे वॉलंटीअरैंग विषयी लिहिलय त्यावर लिहावस वाटत कि उगाच करायच म्हणुन ते करु देवू नका तर खरोखरच मुलांना आवडेल , ज्याच्यात गती आहे ते करण जास्त इफेक्टीव्ह होत रेझ्युमे वर.
अनुभव लेख होईल यावर एक मोठा.
धन्यवाद सीमा , एक ताई मिळाली
धन्यवाद सीमा , एक ताई मिळाली आहे केमिस्ट्रीला अडल्यावर विचारायला ,हे ही बघते. लिहा ना सीमा , त्याचाही उपयोग होईल.
मनःपूर्वक आभार .
स्वातीताई तुमच्या सगळ्या लेखांचा व प्रतिसादांचा मला उपयोग झाला आहे. गोंधळ कमी झाला आहे व मुलाशी नीट संवाद साधता येतोयं. मनःपूर्वक आभार.
तुमच्या मुलाच्या सर्वच Achievements खूपच उल्लेखनीय आहेत, आणि सर्वात महत्चाचे म्हणजे हे सर्व त्याने एन्जॉय करत केले, हे फार महत्वाचे आहे, असे मला वाटते. >>> सहमत.
Have you checked North South
Have you checked North South Foundation? The volunteers are high school students and some times ex professors from IIT ( moved to the states) and all of the dollars go to India for needy students. Please do check for your benefits if you need and like.
Good luck
अस्मिता,
अस्मिता,
Texas मध्ये top 6% ला auto admission आहे. शाळेत चौकशी करा. तसे झाले तर तुमच्या मुलाला UT Austin, Texas A&M, UTD किंवा UH मध्ये आरामात ऍडमिशन मिळेल आणि इन-स्टेट ट्युशन द्यावी लागेल. ( हवा तो मेजर मिळण्यासाठी चांगले GPA आणि SAT/ACT इतकेच लागेल.).पण जर तुम्ही Rice, SMU साठी प्रयत्न करत असाल तर वरील लेखमाला उपयोगी पडेल. (जमल्यास मुलाला गोल्फचे पण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तर Rice साठी उपयोग होईल).
All my questions have been
All my questions have been answered and I am doing good now , thanks all !
उबो , Top 6% बद्दल माहिती होती . Golf information is new , thank you
इथे कुणाच्या पाल्याला
इथे कुणाच्या पाल्याला बागकामाची आवड असेल तर वॉलेंटियर करण्यासाठी तुमच्या काउंटीच्या मास्टर गार्डनर्सशी संपर्क करु शकता. बाहेर मोकळ्या हवेत काम असते, मास्क वापरुन , सोशल डिस्टन्स वापरुन करता येते. जानेवारीत जुन्या प्रोजेक्टस्चा आढावा, नवे प्रोजेक्ट्स ठरतात. पार्क आणि रिक्रिएशन सोबत एकत्र प्रोजेक्ट्सही असतात. आमच्या इथे अगदी ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत मदतीसाठी मुले येत होती. लँड ग्रॅंट युनिवर्सिटी आणि एक्सटेंशनचे सगळे रुल्स आणि सेफ्टी प्रोटिकॉल पाळून काम चालते.
>>जमल्यास मुलाला गोल्फचे पण
>>जमल्यास मुलाला गोल्फचे पण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली तर Rice साठी उपयोग होईल>>खूप उशीर झालाय. गोल्फ लेसन्स सुरु करायचे वय ५वी -६वी . मिडलस्कूलमधे सिलेक्ट झालात तर चाळणी लागून हायस्कूलसाठी खेळायची संधी मिळते. युनिवर्सिटीचे रिक्रुटर त्यातून शोधतात.
<< Golf information is new ,
<< Golf information is new , thank you >>
Don't worry. It was tongue-in-cheek comment.
अस्मिता बिचारी खरच एवढी
अस्मिता बिचारी खरच एवढी टेन्स झालिये की तिला झेपली नाही उबोची कॉमेन्ट, एवढी टेन्स नको होवुस ग, करतात मुल सगळ ठिक.
Pages