मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.
नंतर आम्ही वेगळे घर भाड्याने घेतले. एकमेकाकडे येणे जाणे होतेच. सगळे व्यवस्थित चालू होते. एकदा दिवाळीत सात वाजता मंदिरात जाण्याचा प्रोग्रॅम ठरला. आम्ही पावणे सात पासून दोन तीन वेळा फोन केला, त्यांनी उचलला नाही. आम्हला वाटले की बिझी असतील, आम्ही मंदिरात जाऊन आलो. त्यांनी नंतर कॉल बॅक केला. खूप चिडले की मिळून जायचे ठरले असताना तुम्ही एकटेच का गेलात. आम्ही देखील ओरडा खाऊन घेतला.
नंतर हे वारंवार होऊ लागले, आम्ही काही नवीन वस्तू घेतली त्याना न सांगता ते चिडू लागले.
परिणामी आम्ही छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांना इंफॉर्म करू लागलो. फिरायला चाललोय मेसेज टाक. Tv घेतोय मेसेज टाक वगैरे वगैरे.
नंतर आम्ही स्वतःचे घर घेतले ते देखील त्यांच्या पेक्षा मोठे. त्यांना न सांगता.
तेंव्हा ते म्हणू लागले इतके मोठे घर, मेन्टेन कसे करणार वगैरव वगैरे.
आणि मूद्धाम घराचा उल्लेख करु लागले की अरे मला ट्रेडमील घ्याची होती पण माझे घर तुज्याएवढे मोठे नाही ना. तुझे बरे आहे मोठे घर आहे वगैरे वगैरे.
आणखी इक त्रास म्हणजे यांना फोन करावा तर हे उचलत नाहीत, दोन तीन दिवसांनी कॉल बॅक करतात.
आम्ही फोन नाही उचलला तर चिडतात म्हणतात अरे असला कसला मित्र जो मदत हवी असताना फोन उचलत नाही.
काय करावे मायबोलीकर???
असे बरेच प्रकार अमेरिकेत
असे बरेच प्रकार अमेरिकेत घडलेले पाहिले आहेत. ते म्हणतात ना, आपण नातेवाईंकांची निवड करू शकत नाही पण मित्रांची निवड करू शकतो. म्हणून अशा मित्रांना सहन करण्याऐवजी किंवा टाळण्याऐवजी सरळ आमने सामने पण प्रेमाने समजाऊन पहा. त्या दोघांपैकी जो जास्त समजूतदार असेल त्याच्याशी बोला.
जास्त लोड घेऊ नका
बाय द वे, ख्रिस्मसला येताय का राले मधे?
ज्या मैत्रीने आनंद
ज्या मैत्रीने आनंद मिळण्यापेक्षा डोक्याला ताप होत असेल ती मैत्री तोडलेली बरी. किंवा अगदी बेतास बात संबंध ठेवावेत. समजूतदार जोडपं असल्यास आधी बोलून बघा हवंतर.
हे तुमचे मित्र "उगाच गळेपडू"
हे तुमचे मित्र "उगाच गळेपडू" आहेत का "खरोखर माया लावणारे आणि त्या अनुषंगाने जरा पझेसिव्ह झालेले" आहेत याचे उत्तर शोधा म्हणजे त्यांचाशी कसे डील करायचे हे ठरवता येईल!
परदेशात कायम रहायचे ठरवले की
परदेशात कायम रहायचे ठरवले की अशी वेगवेगळी लोक आयुष्यात चांगले आणि वाईट अनुभव देतात. आपण पण तिथे जवळचे कोणी नातेवाईक नसल्यामुळे थोडे जास्तच घरोब्याचे संबंध ठेवतो.
तुम्ही तुमचे फ्रेंडस् सर्कल वाढवा. वरील मित्राच्या परिवरसोबत एकदम बोलणे बंद केले तर गैरसमज वाढतील. त्या पेक्षा आता तिथे कायम राहणार असाल तर डोळसपणाने आणखी लोकांशी मैत्री संबंध वाढवा. हा मित्रपरिवार हळूहळू काय समजायचे ते समजून जाईल.
ते मित्रही इथे माबोकर असतीलच
ते मित्रही इथे माबोकर असतीलच ना?? तुमचे इथले सगळे आईडी त्यांना माहीत आहेत का?? माहीत नसले तरी 5 bhk वगैरे ते वाचल्यावर ते काय ते समजून जातीलच....लोड घेऊ नका.
त्यांच्या बाजुनेही विचार करुन
त्यांच्या बाजुनेही विचार करुन पहा. मनाने सरळ
दिसतात ते. तुमच्याविषयी त्यांना आपुलकी वाटत असावी म्हणुन ते स्पष्टपणे सांगुन टाकतात. गुस्सा अपनोंपेही लिया जाता है.
आपल्या गावात नवा माणूस आपल्या
आपल्या गावात नवा माणूस आपल्या मदतीने राहिला, सगळीकडे आपल्याला पुढे करून फिरला आणि नंतर हुशार झाल्यावर स्वतःचा स्वतः फिरू लागला की काही दिवस आपल्याला त्रास होतो. कोणेकाळी आपल्याशिवाय बाहेर न पडणारे कुटुंब मॉलमध्ये अवचित शॉपिंग करताना भेटले की त्यांच्यापेक्षा आपला चेहरा जास्त पाहण्यासारखा होतो. कुठेतरी आपल्याला एक सुपिरियर कॉम्प्लेक्स आलेला असतो, आपल्याला मिळणाऱ्या भावाचे थोडे छान वाटायला लागलेले असते, आपल्यावाचून यांचे चालत नाही असा समज झालेला असतो. त्यांचे आपल्यावाचून चालायला लागले की आपण खट्टू होतो. फोन आलेला दिसला तरी मुद्दाम घेत नाही. समोरचा परत परत फोन करतोय का हे पाहिले जाते, मग सावकाश फोन करून समोरच्यालाच गिल्ट द्यायचा प्रयत्न केला जातो. समोरचा त्याच्या प्लॅनमध्ये आपल्याला घेत असला तरी मुद्दाम टाळायचे आणि नंतर त्यालाच दोष द्यायचा. हे असे का होते माहीत नाही पण होते. माझे झाले होते.

हळूहळू आपण स्वीकारतो की आता आपली गरज संपली. मग आपण हे असे वागणे बंद करतो... वाईट इतकेच की ते पूर्वीचे रिलेशन आता राहात नाही.
तुमच्या मित्राला कळेल हळूहळू.
ह्या धाग्याची लिंक पाठवून
ह्या धाग्याची लिंक पाठवून द्या त्यांना. .. समजदार को इशारा काफी है...
५ बीएचके विकुन टाका त्यांना
५ बीएचके विकुन टाका त्यांना सांगा २ बीएचके घेतोय, त्यांना सोबत घेवुन जावुन १ बी एचके बघुन फायनल करा नी ७ बीएच के घ्या.
परदेशात रहात असताना आपले
परदेशात रहात असताना आपले नात्याचे कुणी नाही म्हणून बरेचदा मित्रच एक्सटेंडेड फॅमिलीसारखे होतात. मात्र कुटुंबात जसे अवाजवी हक्क गाजवला की नाते त्रासदायक होते तसेच यातही होते. त्यामुळे वेळीच सीमारेषा आखाव्यात.
पहिल्यांदा त्यांनी भांडण केले तेव्हाच तुम्ही ठामपणे सांगायला हवे होते की हे बघा कॉल केलेले, तुमच्याकडून उत्तर आले नाही, आम्ही हा वेळ एकत्र देवदर्शनासाठी जायचे म्हणून राखून ठेवला होता, तुम्ही फोन उचलला नाही त्यामुळे आम्हाला एकटेच जावे लागले. आमचाही थोडा विरस झालाच. तुम्ही दर वेळी नमते घेत गेलात त्यामुळे त्यांनी हक्क गाजवायचा, चिडायचे, तुम्ही त्यांची मर्जी संभाळायची असा पॅटर्न पडून गेला.
मैत्री झाली तरी कुठेतरी त्यांच्या मनात तुम्ही आणि ते अशी तुलनाही होत असणार. त्यांच्या पेक्षा मोठे घर, महागड्या वस्तू यामुळे असूया असेल तर ते बोलण्यात उमटणार. बारीक सारीक बाबतीत तुमच्यावर हक्क गाजवणे; तुम्ही फोन केला तर मुद्दाम दुर्लक्ष करायचे, सवडीने कॉल बॅक आणि तुम्ही मात्र प्रत्येक कॉलला उपलब्ध हवे, नसेल तर असला कसला मित्र म्हणून टोमणे हे बघता मला तुमचे मित्र पॅसिव अॅग्रेसिव वाटतात. असे वागणे थकवते. तुम्ही तुमचे मित्रमंडळ जरा मोठे करा. जमल्यास स्थानिकांच्यात मिसळा. या मित्राला थेट फोन ऐवजी आधी टेक्स्ट करुन कसे चाललयं? आज वेळ आहे का गप्पा मारायला असे विचारत जा, मात्र उत्तर येइल ही अपेक्षा ठेवू नका. त्यांचा फोन आला आणि तुम्हाला घ्यायला जमले नाही तर एक सॉरीचा टेक्स्ट टाका आणि विचारा सगळे ठीक ना? काही काम होते का? आत्ता फोन करु का? आणि शांत रहा. उत्तर देणे न देणे त्याची मर्जी. जेव्हा खरेच परीस्थिती गंभीर असते, मदतीची गरज असते तेव्हा व्यक्ती मित्रघरातील सगळ्या सदस्यांना फोन, वॉईसमेल, टेक्स्ट झालेच तर अगदी वॉट्सअॅप , फेसबुक मेसेंजर असे सगळे पर्याय वापरुन संपर्क करते. ते तुम्हाला जी गिल्ट राईड देतात तो पॅटर्न मोडा. त्यांचे वागणे तुमच्या हातात नाही पण त्यावर रिअॅक्ट कसे व्हावे ते तुमच्या हातात आहे.
कशाला पाहिजे असले मित्र...
कशाला पाहिजे असले मित्र... पुढच्या वेळी फोन आला सरळ इग्नोर करा... स्वाती यांनी मस्त उपाय सांगितला आहे... मी त्यात आणखी एक ऍड करेन... आरामात टेक्स्ट करायचा की बिझी होतो नंतर कॉल करतो... आणि करायचा च नाही कॉल... त्याला गरज असेल तर तो करेल कॉल...
चिडून केला त्याने कॉल म्हणायचे अरे मी करणार होतो पण अचानक काम आले वगैरे वगैरे आणि राहून गेले...
सर्वाचे आभार. आणखी काही
सर्वाचे आभार. आणखी काही गोष्टी.
त्या मित्राचे भारतात इमेर्जेन्सी असताना त्याला एकटे जावे लागले तेंव्हा त्याच्या घराची परिवाराची काळजी आम्हीच घेतली.त्यांना काय हवे नको ते बघणे, मुलाला शाळेत सोडणे वगैरे वगैरे.
मदतीचे धन्यवाद राहू देत,पण काही दिवसानंतर एका लहानशा गोष्टी वरून वाद झाला तर तो म्हणे की तेंव्हा मला मित्राची गरज होती की तू म्हणशील अरे इतका मोठा प्रसंग झालाय, चल थोडा बाहेर फिरायला जाऊ, गप्पा मारू, तुला बरे वाटेल.
मला समजेचना की इतके करून देखील हा मुद्दा कसा असू शकतो.
या गोष्टीचा राग बहुतेक त्यांना आहे की आम्हाला न सांगता घर घेतले.
पण आमचा नाईलाज होता,कारण जे घर आम्हाला आवडायचे त्यात ते काहीतरी खुसपट काढायचे.
आणि अमेरिकेत भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा विकतचे घर जास्त परवडते, जे पैसे रेंट देता त्या ऐवजी मोर्टगेज भरायचे. अमेरिकेत घर घेणे मोठी गोष्ट नाहीय, ३ टक्के इंटरेस्ट असतो. ( हे सांगतोय कारण जनतेला वाटेल की ५ bhk म्हणजे मी रईस वगैरे. असे बिल्कुल नाही)
आणखी एक ताजा किस्सा. त्याच्या
आणखी एक ताजा किस्सा. त्याच्या मुलाचा वाढदिवस होता आणि मेणबत्ती पेटत नव्हती.
मी म्हणालो काय मागच्या बड्डे ची आहे का. (अर्थात हा विनोद होता)
त्यावर तो प्रचंड चिडला आणि म्हणाला तुझ्या सारखा नाहीय मी. तुम्ही तर वाढदिवसाला फोन पण उचलत नाही. मी म्हणालो अरे मी जोक करत होतो आणि कधी फोन नाही उचलला. तो म्हणे तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला तुम्ही फोन नव्हता उचलला.
मला समजेचना की हा कसला प्रतिवाद. नंतर माझ्या डोक्यात भुंगा लागला की हे कधी झाले.
येताना मी आणि बायको विचार करू लागलो, कारण मागील दोन वर्षे बायकोचा वाढदिवस देखील एकत्रच सेलिब्रेट केला होता. नंतर बायकोला आठवले की ४ वर्षांपूर्वी आम्ही तिच्या वाढदिवसाला कोलोरॅडो( अमेरिकेतील एक हिल स्टेशन आहे) तिथे होतो तेंव्हा रात्री १२ वाजता या दोघांचे फोन आले होते. अर्थात आम्ही तेंव्हा उचलला नाही कारण दिवसभर पायपीट करून दमून झोपलो होतो आणि दुसऱ्या दिवशी परत फिरत होतो ,उशिरा कॉल रिटर्न केला.
आता आम्हाला दोघांनाही हा प्रकार बालिश वाटला की इतकी जुनी गोष्ट त्यांनी नोंद करून ठेवली आहे आणि वापरली देखील
नवीन मैत्र जमवा आणि ह्या
नवीन मैत्र जमवा आणि ह्या लोकांना हळूहळू सोडचिठ्ठी द्या. इतक्या पेटी लोकांच्या संगतीत रहाण्यात काही मजा नाही. ते कही ना काही खुसपटं काढतच रहाणार.
मी जेव्हा कधीही नविन लोकांना
मी जेव्हा कधीही नविन लोकांना भेटतो किंवा सहवासात येतो तेव्हा मी त्यांना असे फर्स्ट इंप्रेशन देतो की मी थोडासा विसरभोळा आहे... त्यामुळे समोरच्याची जबाबदारी वाढते आणि माझी कमी होते... त्यांची बांधिलकी वाढते, माझी कमी होते...हे अनुभवाने आणि सवयीने आता चांगलेच जमते...म्हणजे तसे भासवणे... सोईस्करपणे आपल्याला हवे ते आठवणीत ठेवता येते, विसरता येते....एकुणच डोक्याचा ताप कमी होतो...
Sayo -कशी द्यायची सोडचिट्ठी.
Sayo -कशी द्यायची सोडचिट्ठी. मला हेच करायचे आहे. म्हणजे माझे मन हेच म्हणत आहे की हे अती होतय.
कारण मुलांचे वाढदिवस, आपले
कारण मुलांचे वाढदिवस, आपले वाढदिवस काही ना काही असतेच.
हळूहळू संपर्क कमी करत आणा आणि
हळूहळू संपर्क कमी करत आणा आणि त्याकरता जरा सर्कल वाढवा. बाकी एक दोन लाईक माईंडेड फॅमिलीज मिळाल्या तर आपसूकच त्यांच्याबरोबर वेळ घालवणं वाढून ह्या फॅमिलीबरोबर कमी होईल.
मजेशीर किस्से आहेत. वाचून छान
मजेशीर किस्से आहेत. वाचून छान करमणूक झाली.
बोलणं कमी करा. फोन घेणे टाळा. मेसेजना लगेच रिप्लाय करू नका. पण जेव्हा बोलाल तेव्हा हसतमुखाने बोला. भेटणे पुर्ण टाळा. काहीही कारण द्या. गोड बोलून मनापासून माफी मागा. पण भेटणे शक्य तितके टाळाच. फोनवर बोलतानाही तो लगेच कट करा. काहीतरी अर्जंट काम आहे सांगून आपण जसे ईतर अनावश्यक फोन कट करतो तसे करा.
थोडक्यात त्यांना तुम्ही स्वत:च्या लाईफमध्ये प्रायोरीटी दिलेली हवी आहे. ती देऊ नका.
अन्यथा त्या नादात तुम्ही स्वत:च्या फॅमिलीला जी प्रायोरीटी देणे गरजेची आहे ती देऊ शकणार नाही. आपल्यावर आणि स्वत:च्या फॅमिलीवर अन्याय करू नका.
बाकी वर साधना, स्वाती यांच्या पोस्टशी सहमत. हे हुमायुन नेचर आहे. आढळते काही जणांमध्ये. लोकं वाईट नसतील. तशी ती कोणीच नसतात. पण नाहक त्रास सहन करण्यात अर्थ नाही.
5 bhk म्हणजे खूपच मोठं आहे घर
5 bhk म्हणजे खूपच मोठं आहे घर. प्रत्येक बेडरूममध्ये दीड दीड तास झोपत असाल.
हे नाते तुमच्यासाठी वर्कआऊट
हे नाते तुमच्यासाठी वर्कआऊट होत नाहीये तर नॅचरली मरू द्या. तसेही कोविडमूळे सोशल डिस्टन्सिंगची संधी मिळाली आहे. येणे जाणे टाळता येत नाही अशा प्रसंगी एकत्र असलात तरी सलगीने वावर, बोलणे टाळा. अधून मधून आमंत्रणे स्विकारु नका. मुख्य म्हणजे त्यांनी कितीही गिल्ट ट्रिप द्यायचा प्रयत्न केला तरी स्वतःला भुंगा लावून घेवू नका. तुम्हाला त्यांचा एकंदरीत पॅटर्न एव्हाना लक्षात आलाय तर काही वेळा अॅसर्टिव काही वेळा चक्क निगरगट्ट उत्तर द्यायला सुरवात करा. उदा. स्पेशल ऑकेजनला रात्री फोन केला, उचलला नाही म्हणून तक्रार - ' ड! आम्ही बिझी होतो, यू नो , व्हॉट आय मीन! ' अपेक्षे नुसार वागले नाही म्हणून तक्रार - 'मी मनकवडा नाही, प्रसंगी मित्रांनी माझ्याशी कसे वागावे याच्या माझ्या ज्या अपेक्षा आहेत तसे मी त्यांच्याशी वागतो. तुला काही वेगळे अपेक्षित असेल तर तू सांगत जा, मला शक्य असेल तर मी करेन. ' बोलताना स्वर कोरडा , मॅटर ऑफ फॅक्ट ठेवायचा आणि नंतर एनी वे असे म्हणून गाडी दुसर्या विषयावर न्यायची. आपण अंगाला लावून घेत नाही, अपेक्षित रिझल्ट मिळत नाही हे लक्षात आले की मंडळींचे वागणे बदलते किंवा ते दुसरा बकरा शोधतात.
सर्वांचे आभार. चांगले सल्ले
सर्वांचे आभार. चांगले सल्ले आहेत.
सध्याची अपडेट सांगतो. दोन आठवड्यापूर्वी डायरेकट घरी आले फोन वगैरे न करता, आणि बरोबर मुलांसाठी कपडे घेऊन आले की आम्हाला आवडले म्हणून घेतले की छान दिसतील. आम्ही पण खूष झालो.
मागच्या आठवड्यात त्यांची ११वी अनिवर्सरी होती अर्थात आम्हाला लक्षात नव्हती. बिलेटेड विश करू म्हणून फोन केला तर त्यांनी आमचे फोन न उचलणे सुरू केले आहे. तीन फोन केल्यानंतर मेसेज आला की खूप ओक्यूपाईड आहे शुक्रवारी भेटू. आम्ही गिल्ट मध्ये.
शुक्रवारी फोन केला तर उचलला नाही आणि नंतर कॉल बॅक केला की आज एक टीम मेट घरी येतोय, विकेंड कॅच अप करू. आता विकेंड संपला पण काही संपर्क नाही.
एवढं त्यांच्या आठवणीने खंतावत
एवढं त्यांच्या आठवणीने खंतावत असाल (उर्फ मिस करत असाल) तर ते जसे न फोन करता येतात तसे तुम्ही जा एकदा. फार काय होईल अगदी चहा नि मारी बिस्कीट देतील. वैनी/काकू नेहमीसारखा खाऊ करणार नाही किंवा घरी नसतील तर हेलपाटा पडेल. नसाल मिस करत तर जाऊ द्या. त्यांच्यामुळे विकेंडभर ताटकळायला झालं ते मान्य. पण एकदा माहिती आहे की हे प्रेमळ आहे पण भरवश्याचे तट्टू नाही मग कशाला वाईट वाटून घ्यायचं.
(आग्रह नाही, सहज फुकाचा सल्ला आहे. कुणाची मैत्री फालतूच तुटलेली बघवत नाही म्हणून..)
कटप्पा, तुम्ही त्यांना असं
कटप्पा, तुम्ही त्यांना असं काही फिलींग दिलेलं आहे का की तुम्हांला त्यांची फारच गरज आहे, तुम्हांला बाकी कोण मित्र नाहीत आणि त्यांच्यावरच अवलंबून आहात? तुम्हांला स्वतःत काही बदल करण्याची गरज आहे. तुमचा फोन त्यांनी उचलला नाही आणि वरुन तुम्हांला काही बोलले की जरा वरचढ आवाजात तुमच्या फोनवर मिस्ड कॉल्स बघायची सोय नाही का? किंवा आलेले फोन कळत नाहीत का टाईप विचारा आणि बघा काही फरक पडतोय का. ते काय करतायत हे तुम्हांला कळतंय तेव्हा थोडं अरे ला कारे करुन बघा.
कटप्पा, जास्त लिहिणार नाहि.
कटप्पा, जास्त लिहिणार नाहि.
#जस्ट डोंट बर्न योर ब्रिजेस
पुढे मनात परत शंका उत्पन्न झाली तर रिमेंबर द हॅश्टॅग अबॉव...
कटप्पा - परिस्थिती समजतो...
कटप्पा - परिस्थिती समजतो...
स्वाती२ यांचा प्रतिसाद आवडला पण राज म्हणतात तसे संबंध न तोडाताही यावर मार्ग निघतो का हे बघा.
कटप्पांचा शेवटचा प्रतिसाद
कटप्पांचा शेवटचा प्रतिसाद वाचून वाटतंय की त्यांच्या त्या मित्रानेच हा धागा आणि त्यावर आलेले सल्ले वाचलेत.
सीमंतिनी तुमचा सल्ला आवडला
सीमंतिनी तुमचा सल्ला आवडला आणि आज सध्याकाळी त्यांच्याकडे गेलो ( हे आम्ही ठरवलेच होते). जाताना फोन केला त्यांनी उचलला नाही पण थोड्या वेळाने कॉल बॅक केला. आम्ही सांगितले की परिसरात आहोत, स्टॉप बाय करू का. या म्हणाले.
घरी व्यवस्थित आदरातिथ्य केले, चहा आणि गुड डे दिला.थोड्या वेळाने विचारले ब्लॅक फ्रायडे काय घेतले.
आम्ही सांगितले टीव्ही घेतला. हे मॉडेल.
मग म्हणाले अरे आम्ही पण विचार करत होतो पण त्या टीव्ही मध्ये अमुक तमुक नाहीय, म्हणून कॅन्सल केला, तो फिचर फार महत्वाचा आहे.
तू बेस्ट बाय मध्ये जाऊन बघ किती फरक पडतो त्याने. साईड साईड ला लावलेत टीव्ही.माझा चेहरा पडला( हे बायकोने नंतर सांगितले)
नंतर विचारले अजून काय घेतले, आम्ही सांगितले की प्रोजेक्टर बदलला, तर म्हणाले अरे आमच्याकडे मीडिया रूम असती, मी ९.२ स्पीकर लावले असते, काय तुम्ही ५ स्पीकर वर बघता.
मी म्हणालो आम्ही तसेही कमी आवाजात चित्रपट बघतो कारण मुले झोपलेली असतात. ते म्हणे अरे माझ्याकडे अशी मीडिया रूम असती मी कायापालट केला असता.
नंतर घराचा विषय निघाला ( आमचे घर दोन मजली आहे) , स्वतः म्हणू लागले अरे घरात स्टेयर नको वाटतात, मुलांसाठी सेफ नाही. आमचा क्रायटेरिया फिक्स होता, घरात स्टेयर्स नको.
आम्हाला काय उत्तर द्यावे कळेचना.
नंतर बायको म्हणाली आपण सर्वांनी एकत्र चित्रपट बघू एखादा, तर म्हणे आम्ही आलो असतो पण तुम्ही कधीच बोलावले नाही.( हा माणूस घरी येतो त्याला कित्येकदा म्हणालो की मीडिया रूम मध्ये चल- आजपर्यंत एकदाही आला नाही)
माझी बायको कधी चिडचिड करत नाही( आय एम लकी) मात्र आज तिची प्रचंड चिडचिड झाली या प्रकारामुळे.
त्र आज तिची प्रचंड चिडचिड
त्र आज तिची प्रचंड चिडचिड झाली या प्रकारामुळे.>> नव्या घराची शांत करून घ्या. पूजेला बसा आणि नैवेद्य पण करा. नक्की फरक पडेल.
जाऊ द्या, गुड डे तर दिलं ना..
परत कधी बोलले "तुम्हीच बोलवलं नाही" तर लगेच कुंकवाचा करंडा मागा... "आमंत्रण द्यायलाच आलो होतो, आणा करंडा" ... थोडक्यात काय, चाय के लिए जैसे टोस्ट होता है.... हर एक फ्रेंड थोडा चक्रम होता है!! ज्यांचा चक्रमपणा आवडतो त्यांना मित्र म्हणावं. कुणाच्या येण्याने तर कुणाच्या जाण्याने मनुष्याला आनंद होतच असतो. येनकेन कारणाने आनंदात रहा ह्याच हॉलिडे सीझनच्या तुम्हाला शुभेच्छा!!
Pages