भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार ना
>>
हा तुमच्या फंडा त्याच्या डिएनए ला माहिती आहे का?

तुम्हाला मराठीत लिहीता येत नसेल तर थोड्या वेळाने प्रयत्न करणार का लिहयचा, हे जे
लिहताय ते वाचायाला बोर होतंय
मु्ददे असतील तुमचे पण मराठीत लिहलं तर बरे होईल
>>
हिंदीत लिहिले तर तुम्ही एवढे मजे मजेत घेता हसत हसत स्वागत करता, मला वाटले तुम्हाला चालते अमराठी भाषा मधेच घुसडलेली.

मूळ धागा काय आहे गंमती जमती. हा वितंड वाद किंवा वादासाठी वाद चाललाय. आशुचॅंप मी वर म्हटल आहे की आपल्याला भीतीचे मानसशास्त्र नीट समजावून घ्यावे लागेल. तिथे बुद्धीवादी तर्कशास्त्र कामाला येत नाही

एखादी पोस्ट ठिके, तुमच्या सारख्याच यायला लागल्यात म्हणून म्हणलं,
पहिल्याच पोस्ट ला नाही काही बोललो
Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 21:16
>>
सहमत. चांगला मुद्दा.एक सोडून बाकी ठिकाणी बदल केला आहे.

असं पण असतं का ??? त्यासाठी काय करावं लागेल डीएनए मध्ये ?
>>
म्हणजेच तुम्ही ही खात्री देऊ शकत नाहीत, असच याचा अर्थ होतो ना?
मग त्या बाईंची भिती याच तर बेभरवशाच्य वागण्यावर आधारीत होती ना? मग काय चुकले त्यांचे?

तुमच्यावर कुत्र्याने हल्ला केला म्हणजे जगातली यच्चयावत कुत्री ही हल्ला करणारी, चावरी, हिंस्त्र असतात हे तुमच्या डीएनए मध्ये जे फिट झालं आहे त्याचं काय करावं ?
Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 21:19
>>
WHO समकक्ष, जीवशास्त्राचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ व प्राण्यांचे डॉ़क्टर यांची एक समिती बनवुन, यांनी मल लिखित स्वरुपात द्यावे, की आशुचँप नावाचा मनुष्य जे म्हणतोय, की मला चावलेला एक कुत्रा सोडुन पृथ्वीवरचे ईतर सगळे कुत्रे अजिबातच कधीच कोणत्याही परिस्थीतीत अ‍ॅटॅक करत नाही व चावत नाही तसेच ते १००% प्रेडिक्टेबल आहेत.

ज्या पिल्लाला आपण इवला गोळा असल्यापासून संभाळलं आहे, त्याचे साधारण इन्स्टिक्ट काय आहेत, तो कुठल्या परिस्थितीत कसा वागतो, वागू शकतो याचे एक साधारण ठोकताळे आपण बांधलेले असतात. तो शांत कधी असतो, लाडात कधी येतो, गुरगुरतो कधी, त्याच्या कुइकुई आवाजातून तो काय सांगतो, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे हे जेव्हा तुम्ही दिवसाचे १६-१७ तास अनुभवत असता त्यावेळी त्याची डीएने मध्ये काय आहे हे बघण्याची गरज नसावी.
>>
माझा मघासचा प्रश्न परत लिहितो:
कुत्रे माणसाळल्यापासुनच्या ५००००-१००००० (जे काही असेल ते ) वर्षांच्या ईतीहासात, कधीच असे लाडोबा, इवले गोळे वगैरेनी कोणावरही जीवघेणा हल्ला केलेला नाही का?

जाऊद्या मग आशु, बाईंचं सुनेशी/नवऱ्याशी भांडण झालं असेल आणि उगीच इरिटेशन ओडिन वर काढलं असेल.
(कुत्र्याच्या विषयावरून हा किस्सा सांगून मला आजोबांना कुत्रं वगैरे म्हणायचं नाहीये, इरिटेशन वरून हा किस्सा आठवला इतकंच)
मी लहान मुलीला(वय 4) हाताशी घेऊन चालले होते,फुटपाथवर होते, तो रिकामा होता आणि मुलीला कोणताही धोका नव्हता.आणि फंक्शन ला जायची घाई असल्याने ओला वाल्याला सविस्तर पिकअप पत्ता सांगून गोंधळ निस्तरत होते.तर आमच्याच सोसायटीतले एक हँडसम आबा तरातरा चालत आले आणि रागाने मला म्हणाले 'बच्चा क्या कह रहा है सून तो लो पहले.क्या हाथमे मोबाईल मोबाईल.' म्हणून 'काय या हल्लीच्या बायका' वगैरे रागाने पुटपुटत निघून गेले.आता ओला वाल्याला फोन वर पत्ता न सांगता तो शहरात नवा ड्रायव्हर मला कसा भेटणार होंता?बच्चा अखंड बडबड करतच होता, ते ऐकायला टॅक्सीतला वेळ पडला होताच Happy पण आबा जाम वैतागून निघून गेले.

अभिनव हा प्रश्न माणसाने माणसांवर केलेल्या हल्ल्याबाबतहि विचारता येतो. माणूस असो वा कुत्रा त्यांचे अनप्रेडिक्टेबल बिहेव्हियर असू शकते. त्यामुळे हा वाद थांबवा. शक्यते च्या प्रांतात गेल्यावर असंख्य वाटा फुटतात.

तुमची गल्ली चुकली आहे
हे सगळे गोंधळ मायबोली वर या श्वान पालकांचा काय करायचं या धाग्यावर जाऊन घाला

नम्रपणे विनंती करत आहे
हे सगळे प्रतिसाद कॉपी करून तिकडे टाका, तिकडे तुम्हाला समविचारी भेटतील
इथे आम्ही आमच्या बाळांचे अनुभव लिहितोय सो येऊन उगाच मिठाचा खडा टाकू नका
तुमचं सगळं म्हणणं मान्य केलं, माझं चुकलं, मी त्या बाईंना असे बोलायला नको।होते, परत भेटल्या तर आवर्जून माफी मागेन
बास खुश?
आता उरलेल्या पोस्टीं तिकडे टाका काय प्लिज

अभिनव हा प्रश्न माणसाने माणसांवर केलेल्या हल्ल्याबाबतहि विचारता येतो
नवीन Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 November, 2020 - 21:33
>>
नक्कीच. पण हा धागा माणसांकडुन झालेल्या हल्याबाबत आहे का?
आमचा लाडोबा इवला गोळा लहान असताना कसा होता ते आम्हाला माहिती आहे म्हणुन तो मोठा माणुस होईन कुणालाच साधा चिमटाही काढणार नाही असे डिफेंड करणारे पालक इथे आहेत का?
तेव्हा त्यासाठी तुम्ही वेगळा धागा काढा मग तिथे बोलू.

तुमचं म्हणणं काय आहे
कुत्रा पाळायचा नाही का पाळला तर त्याला 24 तास बांधून ठेवा हे एकदा स्पष्ट करा
नवीन Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 21:33
>>
सरसकट सगळ्या कुत्र्यांना २४ तास बांधुन ठेवा असे मी कुठे म्हटले ती ओळ/पॅर नंबर द्या. मग उत्तर देतो.

हे सगळे गोंधळ मायबोली वर या श्वान पालकांचा काय करायचं या धाग्यावर जाऊन घाला
सगळे प्रतिसाद कॉपी करून तिकडे टाका, तिकडे तुम्हाला समविचारी भेटतील
>>
तुम्हीही, माणसाचा स्वतःच्या सुरक्षेबद्दल असलेला हक्क डावलुन, ती सुरक्षा जपण्याच्या उद्देशाने बोलणारे / करणारे यांना या धाग्यावर बोल लावू नका. माणसाची सुरक्षीतता पहिले महतवची मग तुमचा धागा.

इथे आम्ही आमच्या बाळांचे अनुभव लिहितोय सो येऊन उगाच मिठाचा खडा टाकू नका
>>
अहो मग तेवढेच लिहायचेत ना. दुस-या बाजुचे मत असणा-यांना व अनुभव असणा-यांना बोल लावणारे कशाला लिहिता इथे? तुम्हीच तो खडा टाकुन सुरुवात केलीत.

तुम्ही थांबलात तर मी थांबतो.
सुरुवात तुम्ही केलीत.

ओके थांबलो, माझी सपशेल चूक झाली
मी असे लिहायला नको होते, तुमच्या मुद्दयावर वाद पण घालायला नको होता, तुमचे सगळे मुद्दे एकदम बरोबर आहेत, योग्य आहेत
साष्टांग दंडवत घालून माफी मागतो तुमची
बास? का अजून काही हवं आहे?

नाही अजुन काही नको, तुम्ही माणसाच्या सुरक्षीततेला कमी मह्त्व देऊन त्या बाईंची सुरक्षीततेची गरज नाकारलीत व त्यानंतर आता माफी मागत आहात, तर तेवढे पुरेसे आहे. परत असे कुणाच्या स्वसंरक्षणाच्या भितीबद्दल त्यांना बोलु नका . माणसाची सुरक्षीतता आधी महत्वाची.
धन्यवाद.

येणार तर, तुमचा एवढा चांगाला लाडोबा ईवलासा गोळा छान आहे की, त्याच्या व ईतर न चावणा-या प्राण्यांच्या गमती वाचायला येणार. नक्कीच.
पब्लिक फोरम आहे. हा धागा तुमची खाजगी मालमत्ता थोडीच आहे?

एकदा याच मग घरी
>>
Biggrin Uhoh

तो लहान मुलांसोबत कसा खेळतो आणि ती ओड्या ओड्या करत त्याला कसे माया करतात हे बघायला तर नक्कीच या
लांबून बघा वाटल्यास
नवीन Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 21:49
>>
तुम्ही ईथे लिहित आहातच की. त्यातुन कळते. युट्युब चॅनल कराल तेव्हा तिथेही बघु. तेवढे पुरेसे आहे की.

मी म्हणूनच विनंती केली आहे
ती सुद्धा पब्लिक फोरम वर करू शकत नाही का आपण?
नवीन Submitted by आशुचँप on 28 November, 2020 - 21:51
>>
नक्कीच करा. मी ही मान्यच केली आहे की.

https://youtu.be/PTIaBLtp4R8

HA mast व्हिडिओ कायप्पावर आला होता.It's just a fun.
>>>> सॉरी नाही आवडला. तेच तेच 'कुत्र्यां'वरून आणि त्यांच्या 'मालकां'वरून केलेले विनोद. प्रयत्न करूनही विनोदानं बघता आलं नाही.

जाऊ दे द्या तो विषय सोडून

आम्ही माऊई पासून प्रेरणा घेत घंटी टांगली आहे पण त्याला शिकवताना गडबड झाली
त्याला असं वाटतंय की घंटी वाजवली की ट्रीट मिळते
त्यामुळे जाऊन घंटी वाजवतो आणि ट्रीट मिळेल या आशेने शेपटू हलवत थांबतो
त्याला आता ही घंटा बाहेर जायची असेल तर वाजवायची हे शिकवायला वेगळी मेहनत घ्यावी लागणारे

आमच्या बाळाचे 21 जीबी भरतील एवढे फोटो आणि व्हीडिओ आहेत
साधारण 1500 फोटो आणि 250 व्हीडिओ
त्यात पार अगदि पहिल्यांदा त्याला पाहिले आणि त्याने त्याची कातील स्माईल देऊन आमचे मन जिंकून घेतलं तिथपासून ते घरी एका बकेट मधून कसा आला आणि आल्यावर सगळीकडे इवल्या पावलांनी दुडू दुडू धावत आता हेच आपलं घर असं जाहीर करून टाकलं
ते आता अलिबाग ला पाण्यात डुंबण्यापर्यंत
तेही अजून एक वर्ष होतंय
आंघोळीचे, पोराचा टॉवेल पळवत नेण्याचा, त्याची चड्डी धरून ओढण्याचा लै व्हीडिओ आहेत
पाण्यात उडी मारताना चा व्हीडिओ तर क्लास आहे

Pages