Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुटेबल बॉय 2 एपी नंतर नाही
सुटेबल बॉय 2 एपी नंतर नाही बघितली. तो काळ अजिबात रंगवता आला नाहीये. अक्षरशः काहीही दाखवलं आहे. तब्बू खरेच आता एकदम साचेबद्ध काम करते, बोरिंग.
आज क्राऊन सिजन 4 आलाय. ह्यात थॅचर बाई असणार आहेत. होप हा सिजन 1 आणि 2 च्या तोडीस तोड असेल. 3 रा सिजन यथातथाच होता.
जिद्दु , मी बघत आहे परानॉर्मल दोन एपी पाहिले आहेत छान वाटत आहे .
लंपन , क्राऊनच्या तिसऱ्या
लंपन , क्राऊनच्या तिसऱ्या सीझनमध्ये एकदम नवीन कलाकार घेतले म्हणून थोडं बिचकल्यासारख झालेलं . पण 4 थया सीझनमध्ये सवय होईल ही अपेक्षा. क्राऊनच बलस्थान त्याच्या कास्टिंगमध्ये आहे. क्लेरी फोय नंतर ऑलिव्हिया राणीच्या भूमिकेत बघण अवघड गेलं खरं.
4 थ्या सीझनमध्ये डायनाचा रोल करणारी मुलगी हुबेहूब दिसतेय
क्राउन सीझन १ मधे दमदार होती.
क्राउन सीझन १ मधे दमदार होती. सीझन २ मधे जरा रेंगाळू लागली (हॅरॉल्ड मॅकमिलन चा काळ - इथे मला संथ वाटू लागली) त्यामुळे इण्टरेस्ट गेला आहे. पुढे पुन्हा पिक अप घेतलेला दिसतोय वरच्या प्रतिक्रिया वाचून.
पण ब्रिटिश साम्राज्यातील या काळाचे चित्रण इतके खिळवून ठेवणारे असू शकते, तर त्या आधी जेव्हा ते शिखरावर होते तो काळ, किंवा आधीचा विक्टोरियाचा काळ वगैरेमधले राजकारण आणि राजघराण्याचा एकूण पगडा किती असेल याचे कल्पना येते. यातील काळ सुरू होतो एलिझाबेथ राणी होण्याच्या थोड्या आधी. दुसरे महायुद्ध संपलेले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्य पूर्वीपेक्षा अगदी लहान झालेले, त्यांचा जागतिक प्रभाव कमी होत होता - अशा वेळी याची सुरूवात आहे. पुढे घटना अशा दाखवल्या आहेत की ब्रिटिशांचा एकूण प्रभाव कमीच होताना दिसतो/दिसेल. तरी सिरीज खिळवून ठेवते. १९२० च्या दशकामधे जगातील १/४ लोकसंख्या व जमीन त्यांच्या अमलाखाली असतानाचे राजकारण किती भारी असेल, त्यावेळचे चित्रीकरण जर असे कोणी केले तर बघायला जबरी असेल. खंडहर बघून इमारत किती भारी होती ते समजते, अशी काहीतरी म्हण आहे तसे.
आश्रमाचा तिसरा सीजन काढायचा
आश्रमाचा तिसरा सीजन काढायचा या विचारानेच दोन काढले असतील कारण अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. ईश्वर त्यांना भेटला की नाही ते काही कळलं नाही. पम्मी नक्कीच आवाज उठवणार कारण तिच्या भावाला मारून टाकलं. ती पळून जाते तेव्हा अक्की तिला काहीच सांगत नाही का कसे वागायचे ते. भावाला फोन करू नको हे सांगत नाही का. तसेच त्या तिघांना मारून तिला काय मिळाले. म्हणजे मला वाटले की ती बाबालाच काही तरी करेल. बबिता तिला सांगते की परिवार नही रहेगा तेव्हा तर पम्मी म्हणते कोणता परिवार, आता कोण राहिलंय. भाऊ आहे हे नंतर आठवते का आणि आई तर बिचारी खिजगणतीतच नाही.
त्या दोन मुख्यमंत्री भांडणात डोके थोडा वेळ भणाणून गेले. बॉबी देओलचा एक हात ढाई किलोचा असेल. अक्की तिथे एवढा बिनधास्त काम करतो यावर विश्वास नाही बसत. सनोबर मला सोनी राजदान सारखी वाटली. कबिता तर पूर्ण वेळ उदास असते. ती वॉर्डन बाई असते की पुरुष. सफलता की कुंजी वाला मरतो तेव्हा त्याच्या पायात कोणाची चेन असते जी बघून बॉबी म्हणतो की वो किसी को नही छोडेगी, मोहिनी का. उजागर म्हणजे उजाड ना, असे काय नाव. सुखी अगदी गोड.
(खूप स्पॉयलर्स होत आहेत.हे
(खूप स्पॉयलर्स होत आहेत.हे सर्व कुठेतरी स्पॉयलर्स आहेत असा इशारा देऊन हवे.)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पम्मी ने भावाला फोन केला किंवा नाही केला, त्याला तिकडे जाऊन या लोकांनी टॉर्चर केलेच असते.त्यांची ती मूळ स्ट्रॅटेजी आहे.कविता बाबत केले तसे.
पम्मी वहिनी समोरच परिवार नाही म्हणते ते मलाही खटकले.बहुधा बाप कोमात, कधी उठणार नाही, भाऊ शुद्धीकरण केल्याने बरबाद, आई कोणत्यातरी देवळात सेवेला गेलेली, आणि वहिनी स्वामीजींना पूर्ण अर्पण या अर्थाने म्हणाली असेल.
अक्की च्या डोळ्यात तिला मोबाईल देताना खूप शंका दिसते आहे.पण पम्मी चा एकंदर हट्टी स्वभाव त्याला माहित असल्याने काही म्हणाला नसेल.
अश्या लोकांशी संबंध आला आहे हे माहीत असताना खरं तर भावाला शांतपणे बाहेर काढता येऊन, जमलं तर वहिनीला पण बरोबर घेऊन निसटायचा डाव आखला पाहिजे होता.पण तितकं सोपं नाहीये.
सफलता की कुंजी च्या पायात मोहिनी चे पायल घातले आहेत जे तिच्या बहिणीकडे किंवा अक्की कडे असतील.
वॉर्डन ट्रान्स आहे.आश्रम मध्ये बरेच ख्रिश्चन पण आहेत.आश्रम सर्व धर्मियांना, सर्व जेंडर ना आश्रय देतो हे दाखवण्याचा प्रयत्न.
धन्यवाद अनु. ख्रिश्चनचा
धन्यवाद अनु. ख्रिश्चनचा संदर्भ आठवत नाही. हे शुद्धीकरण प्रकरण खरोखर घडलेल्या घटना आहेत की काल्पनिक. बाबाजी आपला तोल कधीही आणि कुणासमोरही ढळू देत नाहीत हे विशेष आवडले. त्याला बघून आसारामचीच आठवण होते. शबनम हॉटेल मध्ये काय चालायचे आणि कबिता तिथे काय करायची हेही नीट कळले नाही. रॅप सिंगरचे परिवर्तन विनोदी होते. आरक्षणावर छान भाष्य केले आहे उजागरच्या निमित्ताने, ओपन कॅटेगरीगचे न भरून येणारे दुःख आहे ते.
शुद्धीकरण वगैरे घटना डेरा
शुद्धीकरण वगैरे घटना डेरा सच्चा सौदा मध्ये खरोखरच घडल्या आहेत.400 जणांना निपटवले आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Gurmeet_Ram_Rahim_Singh
आश्रम ही अश्या सर्व बाबा अधिक तो एक ख्रिश्चन धर्मगुरू होता ज्याने बेटावर सामूहिक आत्महत्या करवल्या, त्याचे कोम्बो वाटते.
https://en.m.wikipedia.org/wiki/Peoples_Temple
ख्रिश्चन 2
आश्रम चा सिक्युरिटी इनचार्ज मायकल आणि पम्मी ने रूम मध्ये ज्याचा निकाल लावला तो जॉर्ज का काहीतरी
शबनम हॉटेल चा संदर्भ येईलच.
शबनम हॉटेल चा संदर्भ येईलच.
माझा अंदाज
जुन्या बाबाला अयोग्य प्रकारे निपटवून बाबा निराला बाबा झाला आहे.हे त्या मोहिनी ला कसेतरी कळले आणि ती ब्लॅकमेल करून श्रीमंत होणार होती.हे त्या नेपाळ मधल्या वारसाला पण माहीत आहे म्हणून तो सावध पणे अज्ञातवासात आहे.कविता ने मोहिनी ला पळताना पाहिले म्हणजे तीही महत्वाची साक्षीदार. तिला भावाच्या जीवाची भीती देऊन आश्रमात गप्प बसवले आहे.शिवाय कविताचे कुटुंब तिला घरी येऊ देणार नाही.बाबांच्या उपकाराखाली आहे.
परत धन्यवाद अनु. मायकलचे पटकन
परत धन्यवाद अनु. मायकलचे पटकन लक्षात आले नाही. सामूहिक आत्महत्या प्रकरण कधी ऐकले नाही, गुगलते आता. उजागरच्या पोलीस मित्राचे बदली मागायचे कारण कळल्यावर हसायलाच आले, कोणाचे काय तर कोणाचे काय.
क्राऊन सीझन ४ आवडतेय.
क्राऊन सीझन ४ आवडतेय.
डायना मात्र नाही आवडली मला विशेष.
नेटफ्लिक्सवर नवीन सिरीज -
नेटफ्लिक्सवर नवीन सिरीज - Mismatched आली आहे. काल सिझन 1 पाहून सम्पवला. मला आवडली. टिपिकल यंगस्टर्सची भाषा, त्यांच्या पार्टीज, फॅशन्स, त्यांची धमाल, त्या वयाचे प्रॉब्लेम्स हे सगळं बघायला मजा आली.
बॉबी देओल च्या आश्रम बद्दल
बॉबी देओल च्या आश्रम बद्दल एकदोन युट्युब मुलाखती पाहीलया.खूप शांत संयत बोलतो.आजूबाजूच्याना बोलू देतो.बॉबी देओल च्या नव्याने प्रेमात पडले.जपनाम.
काल छलांग हा बकवास सिनेमा
काल छलांग हा बकवास सिनेमा पाहून बोर झालं मग राजकुमार रावचाच ''शादी मी जरूर आना'' हा सिनेमा पुन्हा पाहिला. तिथेच "'बिच्छू का खेल'' ही नवीन सिरीज दिसली मग ती पाहून सम्पली आज. मिर्झापूरवाला दिव्येंदु आहे त्यात. ठीक आहे. आज सोनिलीव्हवर झिशान अय्युबची ''सिम्पल मर्डर'' सुरु करतोय. बाकी शादी मी जरूर आना मधले ''जोगी'' गाणे रिपीटमोड्वर आलेले आहेच. उद्यापासून हापिस सुरु
बिच्छू का खेल - काही नावीन्य
बिच्छू का खेल - काही नावीन्य आहे का? मला बघवीशी वाटतेय!
.बॉबी देओल च्या नव्याने
.बॉबी देओल च्या नव्याने प्रेमात पडले.जपनाम. >> सेम हिअर, पुढच्या सिझनची वाट पहाणे आले. तोपर्यंत जपनाम.
द क्राऊन बघायला सुरवात केलीय.
बिच्छू का खेल - काही नावीन्य
बिच्छू का खेल - काही नावीन्य आहे का? मला बघवीशी वाटतेय! >> बघून टाका
बिच्छू का खेल चांगली आहे.
बिच्छू का खेल चांगली आहे. मिर्झापुरची आठवण येत राहते पाहताना.
<<<<क्वीन्स गॅम्बिट बघितली
<<<<क्वीन्स गॅम्बिट बघितली आणि एकदम आवडली. स्टोरी छानच आहे बरोबर ६० वर्षांपूर्वीची अमेरिका/ रशिआ बघायला ही छान वाटतं.
शेवटचा एपिसोड आणि त्यातली शेवटची स्पर्धा, ते वातावरण खूपच मस्त चित्रित केलं आहे. विचार केला तर टिपिकल आहे पण बघताना हार्मनच्या प्रेमात पडून त्यात गुंतून जायला होतं.
चेस त्यातील टर्म्स, बारकावे इतके उत्तम घेतले आहेत की हे सत्य घटनेवर नाही तर प्युअर फिक्शनल कादंबरीवर आधारित आहे वाचुन धक्का बसला>>>>>
अगदी अगदी.
मी जरा मधूनच बघायला सुरुवात केली पण हार्मन मध्ये गुंतून गेल्याने पुढचे सगळे भाग पाहिले.
हार्मनचा कपडेपटही विशेष उल्लेखनीय , सगळेच सुरेख आहेत. ती प्रत्येक मॅच साठी चालत येऊन बसते आणि मधेच अपोनंट कडे डोळे वर करून बघते ते भारी आहे.
ही खरी गोष्टं नाही , कादंबरी वर आधारित आहे हे मलाही पटत नव्हतं .
घरातल्या नव-टिनला दाखवली नाही कारण वेबसिरीज मध्ये पुढे काय येणार याची गॅरंटी नाही ,उगा घाबरत घाबरत बघण्यापेक्षा तिच्या अपरोक्ष पाहिली.
हो आम्ही पण 4 एपिसोड संपवले.
हो आम्ही पण 4 एपिसोड संपवले. मस्त आहे. मला तर 60s चं वातावरण, clothes, home interiors हे पण खूप आवडलं. छोटी बेथ एकदम गोड.
Mismatched सुरू केली काल..
Mismatched सुरू केली काल.. ३/४ भाग बघितले आवडले... मस्त आहे...
ओह्ह बरी आहे का मिसमॅच्ड! मी
ओह्ह बरी आहे का मिसमॅच्ड! मी थोडा वेळ बघितली आणि कंटाळून टिपिकल घिसीपिटी होणार भितीने सोडून दिली.
टिपिकल घिसीपिटी होणार भितीने
टिपिकल घिसीपिटी होणार भितीने सोडून दिली << सोडून देण्याची घाईच फार..
..... थोडी बघून मग घिसीपिटी झाली की मी सोडेन म्हणतो.. 
सायमन बेकरच्या अभिनयामुळे
सायमन बेकरच्या अभिनयामुळे बघावंस वाटत. प्लस बाकीच्या नटांनी पण छान अभिनय केला. गुन्हेगारी विषयक असूनही चुरचुरीत संवाद , हाताळणी , अभिनय आणि मुख्य पात्राची थोडी वेगळी भूमिका यामुळे बघायला आवडते. ( आणि ऑफ कोर्स सायमन बेकरचा मॅजिक चार्म Wink ) >>> जाई + १०००००
मी आता दूसर्या सीझनवर पोचले
सायमन बेकर चे golden curls आवडत नाहीत , पण त्याचा वावर मस्त आहे .
चोअ सगळ्यात भारी आहे . पूर्ण वेळ पोकर फेस घेउन वावरतो
लिस्बन आणि जेन च tuning नंतर नंतर खूप छान होत जातं .
ग्रेस एक्दम सही आहे .
प्रत्येक पात्राची एक वेगळी background story आहे.
मस्तच आहे सिरिज .
हॉटस्टार वर गश्मीर महाजनी ची
हॉटस्टार वर गश्मीर महाजनी ची इमली सिरिज दिसली आज.
बघितलीस की लिही कशी आहे ते.
बघितलीस की लिही कशी आहे ते.
हो नक्की.
हो नक्की.
हॉटस्टार वर गश्मीर महाजनी ची
हॉटस्टार वर गश्मीर महाजनी ची इमली सिरिज दिसली आज. >>>>>> ती सिरिज नाही, सिरियल असावी. खुकखु ची मयुरी देशमुख सेकण्ड लीड झालीये यात.
खुकखु ची मयुरी देशमुख सेकण्ड
खुकखु ची मयुरी देशमुख सेकण्ड लीड झालीये यात. >>> जाऊदे मग बघायला नको. गश्मीरसाठी बघणार होते.
बिच्चू का खेळ बघितली.
बिच्चू का खेळ बघितली.
खूप रिपीटेटेव वाटली. म्हणजे ओढून ताणून पुढे खेळ चालू ठेवण्याचा प्रयत्न.
काही सिनची तर संगतीच लागत नाही. दिव्येन्दूची मुन्ना इमेज कॅश करण्याचा प्रयत्न वाटला.
आता कंटाळा आलाय, या नॉर्थ कडच्या वातावरणाचा!!!
पार्श्वसंगीत तर डोक्यात जातं
१५००
१५००
Pages