खेळावर आधारित चित्रपटात रोमांच पूर्ण, खेळातील चढ उतार, भावनिकदृष्ट्या पणाला लागलेली शक्ती आणि युक्ती, दोन खेळाडू मधील संघर्ष आणि खेळ प्रशिक्षण यावर असल्याने चित्रपट आपल्याला अतिशय भावतात आणि कथा जवळची वाटते. खेळावर आधारित चित्रपटात सांघिक भावना कशी निर्माण होते. एखादा खेळाडू महान बनण्यासाठी किती कष्ट करतो किंवा संघर्ष करतो असे दाखवतात. विविध खेळावर आज पर्यंत भरपूर चित्रपट आले आहेत. खेळावर आधारित माझे आवडते दोन चित्रपट ‘Mircle’ आणि ‘चक दे इंडिया’ आहेत. हे दोन्ही चित्रपट परत-परत जरी बघितले तरी प्रेरणा मिळते. पण आपल्याकडे तर “पढोगे लिखोगे बनोगे नवाब खेलोगे कूदोगे बनोगे खराब” हेच धोरण आधीपासून अवलंबले आहे. त्यातल्या त्यात क्रिकेट मध्ये पैसा असल्याने त्यामुळे क्रिकेट मध्ये जायला हरकत नाही अशी मानसिकता बनली आहे. इतर खेळात सुद्धा साईना नेहवाल, मेरी कोम सारखे स्टार खेळाडू आहेत. पण इतर खेळा बद्दल आज सुद्धा उदासीनता आहे. या मानसिकतेला तडा नाही पण ओरखडा ओढण्याचे काम हा चित्रपट करतो.
राजकुमार राव हा कसलेला अभिनेता आहे. राजकुमार राव आणि हंसल मेहता या जोडीने अतिशय उत्तम असे चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात राजकुमार ने “मोंटू” पात्र साकारून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. मी तर म्हणेन राजकुमार मुळेच चित्रपट बघणे सुसह्य होते. नुसरत भरूच्या ने “निलू” पात्र उत्तम रित्या साकारले आहे. कधी-कधी हरयाणवी उच्चारण कठीण वाटते. मोहम्मद झीशान यांनी “आकाश सिंग”, सतीश कौशिक, इला अरुण, सौरभ शुक्ला, जतीन सरना ऊर्फ ‘छत्रीवाला’ वाला डीम्पी, अशी दमदार स्टार कॉस्ट यात आहेत. “मोंटू”, “निलू”, “आकाश सिंग” यांचा प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठी खेळाची पार्श्वभूमी, विनोदी तडका चित्रपटाचा जीव आहे.
अलीकडेच हंसल मेहता यांनी “स्कॅम १९९२” वेब सिरीज ही जबरदस्त बनवली आहे. त्यामुळे या चित्रपटा कडून अपेक्षा वाढल्या होत्या. मध्यांतरा पूर्वी चित्रपट संथ आणि रटाळ आहे. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आणि विनोदीचा चुरचुरीत तडका, खेळासाठी लढाई अशी भट्टी जमून आली आहे. मध्यांतरा नंतर चित्रपटाची गती वाढते. चित्रपटात काही बिनकामाच्या गोष्टी घूसवल्या आहेत. पण कथेवर आणखी काम करायला हवे होते. कथा आणखी दर्जेदार हवी होती. संगीत सुद्धा सुरेल असे हवे होते. इतर बाबतीत चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले झाले आहे. पण ग्रामीण जीवनाशी सुसंगत पार्श्वभूमी असल्याने चित्रपट कंटाळवाणा होत नाही. मध्यांतरा नंतर काही भावनिक आणि निर्णायक क्षण छान जमून आले आहेत.
अतिशय उत्तम कास्टिंग, मुख्य पात्राचा अतिशय संयत आणि परिणामकारक अभिनय, सोबत इतर अभिनेत्याचा दर्जेदार अभिनय, हरयाणवी विनोदी तडका, दमदार सादरीकरण चित्रपटात आहे. चित्रपट संपल्या नंतर संगीत सुद्धा लक्षात राहत नाही. वैशिष्टपूर्ण अशी कथा नाही. पटकथेवर आणखी जोरदार काम करून उणीव कमी केल्या असत्या तर चित्रपट परिपूर्ण झाला असता. पण राजकुमार आणि इतर कास्टिंग साठी हा चित्रपट एकदा बघायला काहीच हरकत नाही. मुख्य पात्राचे दर्जेदार सादरीकरण, चांगले संपादन (Editing), उत्पादन मूल्य (Production value), सुंदर छायांकन (cinematography), चित्रीकरणासाठी निवडलेला साजेसा परिसर, उत्तम विनोदी तडका, खेळावर आधारित कथा यामुळे चित्रपटाला मी देतो २.५ स्टार.
लगा मिट्टी का तेल...
लगा मिट्टी का तेल...
लगा मिट्टी का तेल...
और ले छलांग....
ट्रेलर बघूनच फुल्ल स्टोरी
ट्रेलर बघूनच फुल्ल स्टोरी समजलेली. टिपिकल आहे हे देखील समजलेले. त्यामुळे अपेक्षाभंग शून्य झाला.
पण पिक्चर बघायचाच होता.
तो लागोपाठ दोन दिवस दोनदा पाहिला.
पहिल्यांदा तर आल्याआल्याच रात्रीच पाहिला.. अर्थात राजकुमार रावसाठी पाहिला..
आणि मग दुसरयांदा फॅमिलीसोबत टीव्हीवर राजकुमार राव साठीच पाहिला ..
तरी साईड बाय साईड हिरोईनवर एक डोळा होताच
छान वाटली ती यात...
यावर उतारा म्हणून म्ग काल रात्री पुन्हा एकदा फॅमिलीसोबत चक दे पाहिला...
आता मगाशी कोई मिल गया पाहिला.. मागे एकदा पोरीला दाखवायची चूक केली. त्यामुळे तो आता दर पंधरावीस दिवसांनी बघावा लागतो. पण त्यातली बास्केटबॉलची मॅच पाहून पुन्हा छलांग आठवला..
विचार करतोय याच मूडमध्ये ले पंगा उरकून टाकावे..
पण सध्या कंगणाला बघावेसे वाटत नाही आतून...
पण एका शाळेत 2 शिक्षक , एकाने
पण एका शाळेत 2 शिक्षक , एकाने पैज हारली तर राजीनामा हे पटले नाही
1 पोस्ट असले तर एकच भरतात
2 पोस्ट वर 2 भरले तर ते आपापली नोकरी करतात
च्रप्स, ऋन्मेऽऽष, BLACKCAT
च्रप्स, ऋन्मेऽऽष, BLACKCAT प्रतिसादा साठी धन्यवाद!!!
यावर उतारा म्हणून म्ग काल रात्री पुन्हा एकदा फॅमिलीसोबत चक दे पाहिला... >> +1
पण एका शाळेत 2 शिक्षक , एकाने पैज हारली तर राजीनामा हे पटले नाही >>+1 काही गोष्टी पटत नाहीत कथेत. हेरॉईन शाळेत high हिल्स मध्ये फिरत असते. आणखी बरेच आहे.
विषयांतर होतेय पण आजकाल
विषयांतर होतेय पण आजकाल सर्रास मुली/बायका हाय हिल्स मध्ये असतात... शिक्षिका असल्या तरी असा नियम नसावा.
शिक्षिका असल्या तरी असा नियम
शिक्षिका असल्या तरी असा नियम नसावा. >>सहमत आहे.
असा कुठेही नियम नाही. मला वाटले तो scene आणखी चांगला झाला असता.
टीचर्स व्यवस्थित हिल्स,
टीचर्स व्यवस्थित हिल्स, स्लीव्हलेस मध्ये असतात.
पॅरेंट टीचर मीटिंग च्या आदल्या दिवशी हेअर कलर, स्ट्रेटन सर्व परफेक्ट केलेलं असतं.आयब्रोज.पंजाबी ड्रेस चालत असेल तर ड्रेस पीस किमान 2000 चा आणि शिलाई डिझायनर 1000 रु असा सुंदर असतो.साडी कंपल्सरी असेल तर युनिक कॉटन साडी, साजेसा वेगळा नेकपीस असतो.हिल चप्पल तर आलेच.म्हणजे टीचर ला पाहून अर्धे मुद्दे विसरले जावे इतक्या सुंदर दिसत असतात (म्हणजे आम्ही येडेबागडे शनिवारी उशिरा उठून दिसेल ती जीन्स कुर्ता अंगात अडकवून केसांवर कंगवा हजार कामं करत करत कोणतीतरी सॅक पाठीला अडकवून 10 मिनिट गझनी सारखे त्यांच्या समोर जाऊन बसतो म्हणून जेलस असतो असं मानायचं नाही हां )
टीचर्स बाबत अनु यांना +७८६
टीचर्स बाबत अनु यांना +७८६
म्हणजे मला ईण्ग्लिश विंग्लिश येत नाही आणि त्या मॅडम त्याशिवाय दुसरे काही बोलत नाहीत, पण तरीही मी सकाळची झोपमोड करून तेवढ्यासाठी म्हणून त्यांच्यासमोर जाऊन बसतो. म्हणजे मी तर म्हणतो की आपण पोराला चिमटे घेत पोराची लाखभर फि हसत हसत भरतो त्यात स्कूल आपल्याला ज्या फॅसिलिटी पुरवते त्यात हि देखील एक असे मला वाटते
पण एका शाळेत 2 शिक्षक , एकाने
पण एका शाळेत 2 शिक्षक , एकाने पैज हारली तर राजीनामा हे पटले नाही >>+1 काही गोष्टी पटत नाहीत कथेत.
लगान बघा
या देशात खेडोपाड्यात (विशेषत:
या देशात खेडोपाड्यात (विशेषत: उत्तरेकडच्या राज्यात) बरेच गोष्टी होतात ज्या पुणे मुंबईमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य बघणारया लोकांना पटणार नाहीत. पण त्या होतात. त्यामुळे मला तरी त्यात विशेष धक्कादायक वाटले नाही.
किंबहुना पहिल्याच भेटीत दारू पिलायेगा क्या बोलणारया मुलीच्या तो कसा प्रेमात पडतो हे जास्त धक्कादायक वाटले
लगान बघा
लगान बघा
लगाण मध्ये राजेशाहीचा काळ होता, राजे महाराजे चक्रम अटी घालण्यात प्रसिद्ध होते
अट राजाने नाही पोलीस ऑफिसर
अट राजाने नाही पोलीस ऑफिसर ने घातली होती
मला आवडला छलांग..
मला आवडला छलांग..
राजकुमार राव आवडतो. ह्यातही आवडला.
तो जो दुसरा पी टी टीचर आहे तोही आवडला.
दिसायला आणि ऍक्टिंग मध्येही..
नुसरत भरुचा पण छान आहे.
स्पॉइयलर अलर्ट
शेवट जरी टीपीकल फिल्मी असला तरी
राजकुमार राव त्या दुसऱ्या पी टी टीचर ला म्हणतो की स्पर्धा जरी मी जिंकलो तरी तुम्ही माझ्या पेक्षा सरस आहात आणि तुमच्या सोबत काम करायला आवडेल.
ते खूप भावलं, पटलं.
अलर्ट संपला