वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीप आणि अरेस्टेड डेव्हलपमेंट ह्या मालिका आलटून पालटून बघणे चालू आहे. फक्त विनोदी मालिका पहायचे ठरवल्याने डोक्याला वात येत नाहीये.
फ्रेंड्स, ऑफिस, पार्क्स ॲंड रेक, बिग बॅंग थियरी, ब्रुकलिन नाईन नाईन, द गुड प्लेस, कम्युनिटी, टू ॲंड हाफ मेन, यंग शेल्डन, एव्हरीवन लव्ह्ज रेमंड, साइनफेल्ड पाहून झाल्या.

या सिरीजवरून हर्षद मेहताची जी रंगसफेदि करायचा प्रयत्न केलाय तो रुचलेला नाही.
>>>
(मी ही मालिका पाहिलेली नाही.) पण, गणेश मतकरींनी त्यांच्या ब्लॉगवर याच आशयाची मोठी पोस्ट लिहिली आहे. ती वाचली होती.

अरे पण कुणी सांगा ना.. तोच शेवटचा भाग आहे का? जिथे इन्कम टंक्स वाल्यांना काही सापडत नाही.. की अजुन पुढे काही आहे.?

अरे पण कुणी सांगा ना.. तोच शेवटचा भाग आहे का? जिथे इन्कम टंक्स वाल्यांना काही सापडत नाही.. की अजुन पुढे काही आहे.?
>>>
नाही, हा माझ्यामते चौथा भाग आहे.
संपूर्ण सिरीज १० भागांची आहे.

हर्शद मेहताचा मृत्यु ठाणे जेल मध्ये २००१ साली झाला , तो शेवट आहे मालिकेचा ... सीबीआय इन्क्वायरी नन्तर १११ दिवसानी हर्शद जेलमधुन सुटला तो नन्तर लो प्रोफाइल राहिला बराच काळ कारण सेबी ने मार्केट मध्ये येण्यास बन्दी घातली होती . १९९६ साली भाजपा सत्तेवर आल्यावर तो कॉन्ग्रेस समजायची तसा सरकारचा शत्रू राहिल्या नसल्याने बर्याच प्रकरणात ढिलाई दाखवण्यात आली, तरीही त्याने दमयन्ती नावाने कम्पनी काढून पुन्हा तेच उद्योग सुरु केले ... पण त्याऐवजी दुसर्‍याच एका प्रकरणात तो भूषण भट फुटीर झाल्याने अडकला व पुन्हा जेलमध्ये गेला आणि त्यात्तच हार्ट अटॅक ने गेला असे दाखवले आहे . पुढचे भाग सन्थ आहेत

Downtown Abbey बघून संपवली. काही काळ एकदम पोकळी निर्माण झाली. काय बघू कळेना . मिर्झापूर बघायचा विफल प्रयत्न केला. आता Mentalist बघायला सुरू केलं.

Yess जाई Happy
The Simon Baker !!!!

माझे मेंटलिस्टचे सातव्या आणि शेवटच्या सीझनचे फक्त काही भाग राहिलेत. पण मला ते बघवत नाहीयेत. नाही नाही दुःखद एन्ड नाहहीये. हे सगळं संपणार आहे ते भाग बघितल्यावर हे मला माहितेय आणि सातव्या सीझनपर्यत सायमन बेकरशी झालेलं बॉंडिंग सोडवत नाहीये. Happy

आश्रम वर स्वतंत्र धागा निघावा
बॉबी देओल आणि त्याचा सहकारी भोपा यांनी सिरीज खाल्ली आहे.
डायलॉग पण चटपटीत आहेत.अजून एक 'सफलता की सिढी' वाचणारा स्वामीजींचा मारेकरी पण भारी आहे.
मला 'आपल्याच धर्माचं असं सिरीज का' वगैरे प्रश्न अजून तरी पडत नाहीत.लोकप्रियता मिळवायला जे करायला हवं ते त्यांनी केलंय आणि अत्यंत प्रभावी प्रकारे केलंय.

इतकी भारी आहे का मेंटॅलिस्ट? मी बघू बघू करत पुढे ढकलली आहे अजून पर्यंत. त्यातला सायमन बेकर मार्जिन कॉल मधे पाहिला आहे.

सध्या डेसिग्नेटेड सर्व्हायवर बघतोय. वेस्ट विंग ची मजा नाही पण तरी इण्टरेस्टिंग आहे.

इतकी भारी आहे का मेंटॅलिस्ट? मी बघू बघू करत पुढे ढकलली आहे अजून पर्यंत. त्यातला सायमन बेकर मार्जिन कॉल मधे पाहिला >>>> मी २-३ एपिसोड्स बघितले , भारी वगैरे नाही वाटली सिरिज . बघणेबल आहे . पण सायमन बेकरआवडला . त्याला या अगोदर "devil wears prada" मध्ये बघितलयं .

भारी वगैरे नाहीये फारएण्ड. गुन्हेगारीविषयक आहे. पोलीस विरुद्ध गुन्हेगार. पण सायमन बेकरच्या अभिनयामुळे बघावंस वाटत. प्लस बाकीच्या नटांनी पण छान अभिनय केला. गुन्हेगारी विषयक असूनही चुरचुरीत संवाद , हाताळणी , अभिनय आणि मुख्य पात्राची थोडी वेगळी भूमिका यामुळे बघायला आवडते. ( आणि ऑफ कोर्स सायमन बेकरचा मॅजिक चार्म Wink )
इंफॅक्ट मी पहिल्यांदा पाहिला एपिसोड अर्धवट सोडून दिलेला . पण मग मध्यंतरी काही खास बघायला नव्हतं तेव्हा परत चालू केली बघायला. तेव्हा मात्र आवडली. जस जसे बघत जातो तसे तसे आवडायला लागते सिरीज

इतकी भारी आहे का मेंटॅलिस्ट? >>> जरा वेगळ्या ट्रीटमेंटमुळे बघायला मजा येते.
टीव्ही चॅनलवर २-३ वर्षांपूर्वी सुरू होती तेव्हा थोडी बघितली होती. वेळ जुळायची नाही म्हणून सोडून दिली होती.

आश्रम सीझन २ बघायला सुरूवात केली आहे. दुसर्‍या सीझनला स्टोरी संपेल अशी आशा आहे. नाहीतर पुढे बघायला कंटाळा येईल.

मला आश्रम सिझन 1 आणि 2 दोन्ही आवडला.स्टोरी स्लो असली तरी बघत रहावेसे वाटते.सर्व कलाकारांचे काम सॉलिड.छोट्या रोल मधला सफलता की कुंजी(का पुंजी) वाचणारा गुंड पण.सीझन 2 च्या शेवटी कसलीच उत्तरे मिळालेली नाहीयेत.आणि खूप वाईट घटना आहेत.
त्यामुळे 3 नक्कीच बघणार.बॉबी देओल ज्या प्रकारे अतिशय प्रेमळ चेहऱ्याने सर्व कुकर्मे करतो ते पाहणे जास्त भीतीदायक आहे.त्याचा वासना भरा कटाक्ष नक्कीच बराच प्रॅक्टिस्ड असावा(अशी आशा आहे.)भोपा स्वामी चा दरारा कायम आहे.कविता आणि सनोबर च्या चेहऱ्यावर एकाच प्रकारचे भाव असतात.अर्थात तरीहि बघण्या सारखे आहे.सिझन 2 चे स्टार्स बॉबी देओल आणि अदिती पोहणकर आणि त्रिधा चौधरी.
बाबांवर सर्व सापळा कसा क्लोज होतो हे सिझन 3 मध्ये बघण्या सारखे आहे.
ही कथा डेरा सच्चा सौदा किंवा आसाराम आश्रम मध्ये घडणाऱ्या घटनांना बरीच समांतर असेल हे जास्त डिस्टरबिंग आहे.सिझन 3 ला फंडिंग मिळू दे आणि लवकर येऊदे.

क्वीन्स गॅम्बिट बघितली आणि एकदम आवडली. स्टोरी छानच आहे बरोबर ६० वर्षांपूर्वीची अमेरिका/ रशिआ बघायला ही छान वाटतं.
शेवटचा एपिसोड आणि त्यातली शेवटची स्पर्धा, ते वातावरण खूपच मस्त चित्रित केलं आहे. विचार केला तर टिपिकल आहे पण बघताना हार्मनच्या प्रेमात पडून त्यात गुंतून जायला होतं.
सबस्टंस अ‍ॅडिक्शन आणि काही टीन्स रिलेटेड काँटेंट मुळे घरातल्या चेस प्लेअरला सध्यातरी दाखवणार नाही. टीन्स असतील तर त्यांना नक्की आवडेल. चेस त्यातील टर्म्स, बारकावे इतके उत्तम घेतले आहेत की हे सत्य घटनेवर नाही तर प्युअर फिक्शनल कादंबरीवर आधारित आहे वाचुन धक्का बसला. Happy

क्वीन्स गॅम्बिटमध्ये adult scenes खूप आहेत का?

आमच्याकडे हल्ली ज्ये ना टीव्ही बघायला उत्साहाने बसतात त्यामुळे कुठली सिरीज बघायची तर आधी विचारच करायला लागतो. इतके दिवस निवडणुक म्हणून सीएनएन सुरू असायचं. अर्णब परतोनी आल्यामुळे रिपब्लिक बघितलं. नाहीतर मग केबीसी किंवा फूड फूड वगैरे.
कमी सेक्स सीन असलेल्या 1992 सारख्या सिरीज सुचवा प्लीज! (शिव्या चालतील एकवेळ, आपण ऐकलंच नाही असं दाखवता येतं.)

हो! ज्येना सेफ आहे. Biggrin
मुलाला म्हटलं कारण addiction and mensuration आणि कर्स वर्ड बद्दल इतक्यात बोलायचं नाहीये.

सिझन 3 ला फंडिंग मिळू दे आणि लवकर येऊदे मलाही हाच प्रश्न पडला . आश्रम सीरिज ची प्रॉडक्शन कॉस्ट नक्कीच खूप मोठी आहे . जर एम एक्स प्लेयर फ्री आहे तर एवढं फन्डिन्ग उभं कुठून करतात हे लोक ?

रच्याकने मला आश्रम १ & २ अतिशय आवडली ....न्जबरदस्त आहे सीरिज

विक्रम सेठच्या 'सुटेबल बॉय' ची त्याच नावाची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. वाचून अनेको वर्ष झाली आहेत आणि कादंबरी फारशी आठवत नाही. पण तेव्हा लहान वयात फारशी अपील झाली होती असं वाटत नाही. आता वेबसिरीज पहातानाचं वय वेगळं असल्याने आता नक्की काय ते मत बनवता येईल असं वाटलं. पण याही वेळेस विस्कळीत कन्फ्युजिंग आणि टिपिकल वाटली.

कास्टिंग परफेक्ट. सगळे नेहमीचे आणि मोठे कलाकार असल्याने अभिनय जबरदस्त. पण कथा मात्र पोकळ. काही घटना प्रसंग किंवा कपडेपट थोडा काळानुसार नाही असं वाटत राहिलं. कदाचित दाखवलेली कुटुंब वेगळ्या सामाजिक स्तरातली असल्याने आपण त्यांना हे कन्सेशन देऊयात. पण तरीही 1947 च्या आजूबाजूचा काळ असेल तर कॉलेज विद्यार्थ्यांनी नदीवर फिरायला जाणं, बाजूला लोक असताना किस करणं अशक्य वाटतं. ते ही मुंबई किंवा दिल्ली नाही तर मध्यप्रदेश मध्ये कोणतं ब्रह्मपूर गाव.
मध्यवर्ती भुमिकेतील हिरोईन तान्या माणिकताला क्युट दिसते. आवडली मला. बाकी ईशान खट्टर, नमित दास, राम कपूर, रसिका दुगल आपापल्या भूमिकांमध्ये बेस्ट. तब्बू कोणतीही भूमिका असु दे एकच टोन आणि एकच हावभाव. मला कधीच अजिबात आवडली नाही.

नेटफ्लिक्सच्या प्रथेप्रमाणे कपडे उतरवणे, बेडसीन आवश्यक. पण जुना काळ दाखवल्यामुळे, तुलनेने असे सीन्स फारचच कमी आहेत.

एकूण कथेचा स्पीड पहाता मला दुसरा सिझन असेल असं वाटलं होतं, पण शेवटचा एपिसोड सुपर फास्ट आहे. भस्सकन सिरीज / कथा सम्पून जाते.

पहायची तर पाहून घ्या. बेस्ट सेलर कादंबरीवर आधारित आणि मीरा नायर दिग्दर्शीत सिरीज पाहिली नाही अशी रुखरुख नको.

नेफीवर "पॅरानॉर्मल'' ही इजिप्शिअन हॉरर सिरीज पाहिली दोन दिवसांत. भारी आहे
https://www.imdb.com/title/tt12411074/
आज प्राईमवर ट्रुथ सिकर्स ही हॉरर कॉमेडी सिरीज सुरु करतोय.
https://www.imdb.com/title/tt7907922/
लुडो पण पहायचाय

आश्रम पाहिली. प्रेडिक्टेबल असली तरी जबरदस्त आहे..!
सर्वच कलाकारांचं काम खुपच छान.. आणि पम्मी तर बेस्ट.!
दुसरा भाग अर्धवट सोडला आहे, पुन्हा तिसरा भाग येईल असं वाटतं.. पण असंही वाटतयं की ही सिरीज इथेच संपली आहे..कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता.!

संपायला नकोय
अंधाराचं अनियंत्रित साम्राज्य जेव्हा दाखवलं जातं तेव्हा उजेड दाखवणं, तो उजेड आणणाऱ्या लोकांच्या प्रयत्नाला थोडं तरी यश मिळालं असं दाखवणं प्रत्येक कलाकृतीचं कर्तव्य आहे.There should always be hope.

Pages