पिया तोरा कैसा अभिमान आणि आत्मविश्वास वगैरे
पिया तोरा कैसा SS अभिमान म्हणताना शुभाजी दुसऱ्या 'कैसा' ला अशी सुरेल , गंभीर तान घेतात की तो अभिमान आणि त्याचं वैयर्थ सुद्धा समान क्षणात शून्य होतात. खरंच एक चित्र स्वतःला सहस्र शब्दात व्यक्त करत असेल तर एक गाणं सहस्र भावनांना मुक्त करत असेल, वाट करून देत असेल असं म्हणायला हरकत नसावी. संगीत अशी निर्मिती आहे ती दुसऱ्या अशा निर्मितीला वाट करते , जिचे अस्तित्व आत आहे हे माहितीही नसतं. ओह असही वाटू शकते का मला , कुठले प्रतल आहे हे..... असं काहीसं.
काय ते मन , ज्याला कुठलेही भौतिक अस्तित्व नाही , ते आपल्याला किती भौतिक, अभौतिक, आध्यात्मिक स्तरावर लीलया नेऊ शकते. कधी हसतखेळत, कधी नाचतनाचत, कधी अचानक सुटलेल्या वाऱ्यासारखे बेभान, कधी अभ्रासम तरल इतकंइतकं तरल की कळणार नाही मी कधी आले या भावनेप्रत .. म्हणालं तर सूक्ष्म म्हणालं तर जडजंजाळ !!
श्यामच्या आईने श्यामला सांगितले, "मनाला घाण लागू नये म्हणून जपं"! पण माझे डोके उलटे चालत असल्याने माझ्या मनात येतं का जपायचं? थोडंका छळलयं याने मला मगं मी का जपू याला !! कोणती घाण? निर्मळ मनाला का फरक पडावा , अनिर्मळ मनाला तरी का आणि !!
माझ्या ह्रदयाला आणि माझ्यावर अवलंबून असलेल्या जिवंत अस्तित्वांना मी तर हेच सांगते
"घाण होऊदे मन, होऊदे बेभान, दुःखाचे घाव सोस, मोहात पड -बाहेर ये, सुखाचे क्षण त्या क्षणात असताना चिरंतन समज , कठीण निर्णय घे , चुका कर , त्या दुरूस्त कर , परिणामांना सामोरं जा....झोकून दे स्वतःला या अस्तित्वात , सगळ्या जाणिवांना स्पर्शून जा , चांगल्या-वाईट ......
There are no षड्रिपूज् my dear, if you know how to come out of it. To hell with them and the guilt associated...
You are much, much more than them. You always were, you always will be !!! Since you are already here , why don't you make the most of it.
भूतकाळ आता नाही , कुठेच नाही, कधी नव्हताच तो, त्याला तर सोडच. भवितव्याच्या अनिश्चिततेला घाबरू नकोस, भवितव्य नेहमी भविष्यातच रहातं रे ! तू वर्तमानातल्या जाणिवांना सूक्ष्म स्तरांवर ने... तिथेच वस.
मनाच्या लक्ष पाकळ्यांचे कमळ उमलू दे. प्रत्येक पाकळी तुला अलगद उघडायची आहे. चांगली-वाईट , काय त्याची पर्वा. मी माझ्या संपूर्ण अस्तित्वासह इथे प्रकट होणार बस्स. निर्माणाशी निष्ठावान रहा. काही ओझे बाळगू नकोस कशाचे , हे जे डोंगर पाठीवर घेऊन हिंडतो ना आपण ती चढून जायची असतात केवळं.
अपने नयनसें नीर बहायें, अपनी जमुना खुद आप बनावें ...... पुन्हा स्नान कर त्यात बुडून जाऊ नकोस, ते काय पापपुण्य जर खरंच असेल किंवा त्याच्याशी संलग्न व्याख्यांचे पिंजरे त्यातून मुक्त-मोकळं झालं की आपलेच गोळा केलेले अनावश्यक थर वेगळे होतील. निरामय हो !
मानवी मनाचे metamorphosis हेच असेल का, कोष आपणच कमावलेला काहीतरी गमवून काहीतरी मिळवण्यासाठी. त्यातून विलग होणे प्राण जाण्याइतके तापदायक का वाटत असेल. मी म्हणजे माझ्या मनाचा कोष आहे का , हे ह्यापेक्षा भिन्न काही तरी ओजस्वी आहे माझ्यात. 'त्या'ने वारंवार उचल खाल्ली तर मला का भिती वाटावी? माझे कोषावर प्रेम आहे का स्वतःवर. भ्रमाची अनेक भयं किंवा निर्भय आत्मविश्वास हा पर्याय असताना भ्रमछायेतील भीती का निवडायची. मी म्हणजे तो कोषच वाटून पुनःपुन्हा त्या भ्रमाच्या आसपासच्या जाणिवात स्वस्थता शोधते. ही भयं आणि त्यांचे manipulation म्हणजे माझं आयुष्य. . .......Are you for real.? एवढेच आपण माझा नाही बसत विश्वास..... काय करू!
या सगळ्याला पुरून उरणारे नुसते जिवंत नाही तर संपूर्ण तेजाने तळपणारे गर्भगृह आहे माझ्यात. सुक्ष्म-जड वेगवेगळ्या प्रतलात फिरणारी नंदादीपाची ज्योत आहे मी , ती तेवतच रहाणार. भ्रमाची , दुःखाची, अपयशाची, वियोगाची, पश्चातापाची, न्युनगंडाची काजळी मला कधीही, कधीही झाकोळून टाकणार नाही. मी म्हणजे काजळी नाही , त्याला पुरून उरणारे तेजाचे तत्व आहे. कोसळला रे तुझा भूलभुलैया कधीच , तुझ्या परीक्षांनी मी समृद्धच होत आहे कळत नाही का तुला ?!!!
©अस्मिता
° The universe uses it's fiercest weapons against the strongest of the souls.
~Unknown
° You are not a drop in the ocean. You are the entire ocean in a drop.
~Rumi
° I was in the darkness until I discovered the light that I am.
~Unknown
° पिया तोरा कैसा अभिमान (रेनकोट)
https://youtu.be/9hKY3igto4c
गुलजार, शुभा मुद्गल , ऋतुपर्णो घोष
https://youtu.be/j0fveULrB_o
ही हरिहरन यांची आवृत्ती.
धन्यवाद .
छान लिहीलं आहे.
छान लिहीलं आहे.
https://youtu.be/j0fveULrB_o ही हरिहरन यांची आवृत्ती. ह्यात विरह जास्त व्याकुळ आहे...
धन्यवाद सीमंतिनी , ही माहिती
धन्यवाद सीमंतिनी , ही माहिती होती पण द्यायचे लक्षात आले नाही. शिवाय गुलजार यांचे जे निवेदन येते ना मध्ये ते ह्रदयाचा ठाव घेते म्हणून तीच दिली. मला हरिहरन यांचीही आवडते. गाणंच एवढं छान आहे की बस्स.
संपादित केले.
खूप छान लिहिलय..
खूप छान लिहिलय..
पटा नाही. जगात हा जो
.
काय ते मन , ज्याला कुठलेही
काय ते मन , ज्याला कुठलेही भौतिक अस्तित्व नाही , ते आपल्याला किती भौतिक, अभौतिक, आध्यात्मिक स्तरावर लीलया नेऊ शकते. कधी हसतखेळत, कधी नाचतनाचत, कधी अचानक सुटलेल्या वाऱ्यासारखे बेभान, कधी अभ्रासम तरल इतकंइतकं तरल की कळणार नाही मी कधी आले या भावनेप्रत .. म्हणालं तर सूक्ष्म म्हणालं तर जडजंजाळ !!>>> किती सुंदर शब्दांत मांडलयं तु अस्मिता...
सुंदर लेख...
आवडले.
आवडले.
छान लिहिलय..
छान लिहिलय..
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
Metamorphosis पासुन पुढे कलटी
Metamorphosis पासुन पुढे कलटी मारण्यात आली आहे.
आवडलं.
आवडलं.
छान लिहिलंय! पिया तोरा ची मला
छान लिहिलंय! पिया तोरा ची मला शुभा मुद्गल आवृत्ती जास्त आवडते.
खूप सुंदर लिहिलं आहे.
खूप सुंदर लिहिलं आहे.
सुक्ष्म-जड वेगवेगळ्या प्रतलात फिरणारी नंदादीपाची ज्योत आहे मी , ती तेवतच रहाणार. भ्रमाची , दुःखाची, अपयशाची, वियोगाची, पश्चातापाची, न्युनगंडाची काजळी मला कधीही, कधीही झाकोळून टाकणार नाही. मी म्हणजे काजळी नाही , त्याला पुरून उरणारे तेजाचे तत्व आहे. कोसळला रे तुझा भूलभुलैया कधीच , तुझ्या परीक्षांनी मी समृद्धच होत आहे कळत नाही का तुला ?!!!>>> हे जास्त आवडले☺️
छान लिहिलंय अस्मिता.. एकदम
छान लिहिलंय अस्मिता.. एकदम तरल भावना.. मला शुभा मुद्गुल च्या आवाजातले जास्त आवडते..
मस्त लिहीले आहे. परत एकदा
मस्त लिहीले आहे. परत एकदा वाचले. आय कुड देन अॅप्रिशिएट. पहील्यांदा पटले नव्हते. पण आता परत वाचून सुंदरता कळते आहे.
धन्यवाद
धन्यवाद
Mrunali, हीरा , सामो , स्वाती२, कुमारसर, रूपाली, केशव तुलसी , मंजुताई, हरचंद पालव, काश्वी, श्रवु...
मनापासून आभार.
सामो
सामो
मलाही काही वर्षांपूर्वी पटलं नसतं. आपण बदलत रहातो. कदाचित दहा वर्षानी अजून वेगळा दृष्टिकोन असेल. लेख काय आपले मत काय क्षणिक भावना पण असते कधी कधी.
तू पुन्हा वाचून माझ्या विचारांना एक संधी दिलीस त्याबद्दल आभार.
आपल्यातल्या काही जणांना स्वतःच्या गुणावगुणांची सुप्त जाण असतेच कुठेतरी , पण त्यामुळे स्वतःला मर्यादित मानू नये असं वाटतं मला. Acceptance इतका वाढवायचा की प्रामाणिकपणाशिवाय व सामर्थ्याशिवाय काहीच उरणार नाही. असा साधारण आशय आहे. Rather than acknowledging/fixing the flaws , taking them with you , moving forward on your spiritual , physical, emotional journey with full on integrity. हे सोपे व powerful वाटते मला.
शक्य तितके दोषांना कमी करणे हे या मार्गातले छोटे स्टेशन असू शकते पण ते गंतव्य वाटत नाही मला म्हणून त्या स्टेशनवर रेंगाळून ती ऊर्जा मला उगीच अशी वाया घालवावी वाटतं नाही. आपल्या विचारानेच/खंतावण्याने त्यांचे पोषण होते असंही वाटते कुठेतरी. शिवाय मी आधी निर्दोष होईल मगं मी spiritually evolve होईल असा विचार केला तर हजार वर्ष/जन्म पण पुरणार नाहीत , नाही का ? हे असे विचार म्हणजे मानवी मनाचे metamorphosis.... जेव्हा कोषाच्या अस्तित्वाचे सत्य कळते. मगं कोष आहे नाही काही फरक पडत नाही जेव्हा लक्षात येते की तो कोष आणि आपण वेगळे आहोत. कोषाला दुरूस्त करण्यापेक्षा निष्ठा प्रखर करणे हे सोपे वाटते मला आणि उपयुक्तही. मनुष्यत्व व दिव्यत्व दोन्हीचे लाभ आहेत यात. Such a win win.
>>>शिवाय मी आधी निर्दोष होईल
>>>शिवाय मी आधी निर्दोष होईल मगं मी spiritually evolve होईल असा विचार केला तर हजार वर्ष/जन्म पण पुरणार नाहीत , नाही का ? >>> त्रिवार सत्य
>>>जेव्हा लक्षात येते की तो कोष आणि आपण वेगळे आहोत.>>>
मनो बुद्धि अहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे |
न च व्योम भूमि न तेजो न वायु:
चिदानंद रूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥1॥
अगदी खरे बोललीस. पण मग हे जे टोकाचे पापी कीडे असतात, ते देखील काजळीची पुटं चढलेले आरसेच असतात. त्यांना कशी क्षमा करायची?
त्यांना कशी क्षमा करायची? >>
त्यांना कशी क्षमा करायची? >> त्यांना पाप करायचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून सोडून द्यायच
आपण थोडे चित्रगुप्त आहे.... अबाव्ह माय पे ग्रेड!!!!
हाहाहा
हाहाहा
सीमंतिनी तुम्ही नेहमी हसता-हसवता. आय रियली लाईक युअर अॅटिट्युड!!! याच सकारात्मक वृत्तीमुळे, खूप उत्तम, चिरतरुण आयुष्य लाभणार तुम्हाला.
त्यांना कशी क्षमा करायची? ती
त्यांना कशी क्षमा करायची? ती आपली जबाबदारी नाही तरीही Forgive but don't forget जमलं तर करायचं...आपलं तर होऊ दे धड
जर माझ्यावर खूप प्रेम असणारे माणसाचे गाव माझे गंतव्य आहे. पण मला त्याला काही भेटी द्यायच्या होत्या , ज्या मी संसाराच्या रामरगाड्यात घेतल्या पण मला सुरेख वाटत नाहीत आणि मी हळहळतेयं. मगं वाटेत दोषमुक्त स्टेशन लागलं पण मी तिथे त्या प्रिय व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी शिवाय माझी अपराधीपणाची भावना कमी करण्यासाठी भेटी घेण्यात इतकी रमले की माझी ट्रेनच मिस् झाली. तर ती व्यक्ती काय म्हणेल जशी आहेस तशीच आली असतीस तरी चाललं असतं गं ..... किंवा थोडी मजा करून निघायचं असतसं.... हो ना.
चित्रगुप्त order order on
चित्रगुप्त order order on another level
, मला मिश्कील मुली मैत्रिणी वाटतात बरं , सांभाळून ....
सीमंतिनी
क्षमा ही गुंतागुंतीची
मैत्री ही क्षमेसारखीच गुंतागुंतीची संकल्पना आहे
मस्त उदाहरण आहे अस्मिता.
मस्त उदाहरण आहे अस्मिता.
मला तर येतच नाही क्षमा करता..
मला तर येतच नाही क्षमा करता... प्रयत्न चालू आहेत.
, स्वतःशी सत्य वागायचं , दुसऱ्यांशी खरं वागायचं , परमसत्याला align व्हायचं. गुणदोषात गुंतायचं नाही.
राग ही फार होता /अजूनही आहे... निर्दोष होणे अशक्य आहे. पण निष्ठावान आणि समर्पित होणे त्यामानाने सोपे आहे. मी सोपा मार्ग निवडला आहे त्याचे byproduct म्हणून दोष कमी होतील अशी आशा आहे. निदान तीव्रतेची धार बोथट होईल.
जसं आहे तसं आहे , स्वतःशी काय नाटकं करणार आता. बघं बाबा म्हणायचं परमतत्वाला
सी , फारच गुंता व स्वातंत्र्य
प्रकाटाआ.
भन्नाट आहे. लिहून काढलेत बरे
भन्नाट आहे. लिहून काढलेत बरे केलेत. हीच महत्वाची पायरी असते. लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्याला दोन्ही घटकांसाठी.
नाहीतर आम्हा वाचकांत खालील वाक्यांमुळे झालेले "in" "formation" घडले असते का?
>> एक गाणं सहस्र भावनांना मुक्त करत असेल, वाट करून देत असेल
>> शक्य तितके दोषांना कमी करणे हे या मार्गातले छोटे स्टेशन असू शकते पण ते गंतव्य वाटत नाही मला म्हणून त्या स्टेशनवर रेंगाळून ती ऊर्जा मला उगीच अशी वाया घालवावी वाटतं नाही. आपल्या विचारानेच/खंतावण्याने त्यांचे पोषण होते असंही वाटते कुठेतरी. शिवाय मी आधी निर्दोष होईल मगं मी spiritually evolve होईल असा विचार केला तर हजार वर्ष/जन्म पण पुरणार नाहीत
>> मलाही काही वर्षांपूर्वी पटलं नसतं. आपण बदलत रहातो. कदाचित दहा वर्षानी अजून वेगळा दृष्टिकोन असेल.
आणि लेखातले शेवटचे तीन Quotes!!!
त्यामुळे, या सर्वांची मन:पूर्वक नोंद घेतली.
सगळे घडत असते. बरेच काही. आपण आपले पुढे पुढे जात राहावे. थांबू नये. चिकटू नये. चिकटवू नये. गाणं खूप मदत करतं पुढे जाण्यात.
If you going through hell keep going, and if you going through heaven then also keep going. हो, हेच तर!
बाकी ते सोने-झळाळी, कोष-फुलपाखरू, राख-फिनिक्स वगैरे वगैरे किंवा अजून काही असेल तर ते निसर्गनियमानुसार व्हायचे असेल ते होईलच.
प्रतिसाद अतिशय आवडला अतुल !!
प्रतिसाद अतिशय आवडला अतुल !!
लिहीले की वाटले तितके जमले नाही की काय पण तरीही लिहीले व टाकले... त्यामुळे मनःपूर्वक आभार.
If you going through hell keep going, and if you going through heaven then also keep going. हो, हेच तर!..>> अनुगच्छन्तु प्रवाहम् !
गाण्याबद्दल(आणि काही स्तोत्रांबद्दल) बोलायचं म्हटलं तर बारकावे काही कळत नाहीत पण मूडवर जबरदस्त परिणाम करतात हा अनुभव आहे. ते ऐकत लिहीते बरेचदा. It brings out the best /worst in me मगं तो क्षण/मूड पकडून लिहायचं.
धन्यवाद.
खूप खूप आवडले. तुमची आणि अतुल
खूप खूप आवडले. तुमची आणि अतुल यांची प्रतिक्रिया सुद्धा सुंदर.
सामोच्या शंकेचे किती छान उदाहरण देऊन निरसन केलेस.
एकदम शांत शांत वाटले हे वाचून.
किती सुंदर लिखाण आहे.
किती सुंदर लिखाण आहे.
एखाद्याने गाणं कसं ऐकावं हे शिकवणारं. शुभाजींचं हे गाणं ! एक एक शब्द कसा पोहोचवलाय. मधून मधून येणा-या कवितेच्या ओळी मोहक आहेत. पण त्या ब्रेक लागल्यासारख्या वाटतात. असं वाटतंय गाणं चालत रहावं.
वाद्ये अजून कमी हवी होती. मला तर फक्त तानपुरा आणि शुभाजींची गायकी इतकंच पुरे झालं असतं.
हरीहरन यांची जी आवृत्ती आहे ती शुद्ध गाणं आहे. प्लेबॅक आणि यातला फरक आहे. ते ही आवडते गायक आहेत.
पण तू भावना अचूक वेचल्या आहेस. ते खूपच सुंदर आहे.
छानच लिहीलयस अस्मे
छानच लिहीलयस अस्मे
सगळ्यांचे प्रतिसादही आवडले.
Pages