आता पर्यंत सैराटची बरीच परीक्षणे येऊन गेलीत, मी वेगळे काय लिहिणार..
पण ज्यांनी अजून पाहिला नाही त्यांच्यासाठी सैराट का बघावा याची १० कारणे देऊ शकतो.
१) गेले काही दिवस जिकडे तिकडे सैराटचीच चर्चा वाचून मी या चित्रपटाला गेलो होतो. या चर्चांनी अगोदरच वाढलेल्या अपेक्षा देखील सैराट पुर्ण करतो.
२) ‘सैराट-एक लव्हस्टोरी’ शाहरूख, चोप्रा आणि करण जोहार मंडळींच्या तोंडात मारावी अशी जमलीय. प्रेम म्हणजे काही तरी लार्जर दॅन लाईफ भावना आहे अश्या आविर्भावात बनवलेल्या बॉलीवूडी चित्रपटांनी आपले गंडवलेले कन्सेप्ट क्लीअर करत ईतक्या सहजसुंदर आणि नैसर्गिकपणे यात सारे काही घडते की चित्रपटाच्या पहिल्या भागात असंख्य गुदगुल्या मनाला सतत होतच राहतात. या अवस्थेतून मध्यंतरापर्यंत तरी आपण बाहेर पडत नाही.
३) डोळ्यांची पारणे फिटावीत अशी द्रुश्ये एका मराठी चित्रपटात बघायला मिळतात आणि ती देखील आपल्याच मातीतील, गावखेड्यांतील, शेतातील दिसतात. मराठी चित्रपट गेल्या काही काळात तांत्रिकदृष्ट्या झेप घेऊ लागलेत असे म्हटले, तर ही भरारी आहे. हिंदीच्या तोडीस तोडच नाही तर त्याच्याही एक पाऊल पुढे आहे. ते देखील मराठी चित्रपटाच्या बजेटमध्ये हे विशेष. हिंदी ब्लॉकबस्टरचे बजेट दिले तर हा माणूस पडद्याला आग लावेल.
३) तांत्रिक बाबींतले एक प्रेक्षक म्हणून जेवढे कळायला हवे तेवढेच मला समजते. पण ते पक्ष्यांचे थवे, शेतातील वाटा, खोल विहीरीतल्या पाण्यात ढुबुक आवाज होत पडणार्या उड्या, आकाशातून मनाचा ठाव घेत फिरणारा कॅमेरा, स्लो मोशनमध्ये केलेले गाण्यांचे अप्रतिम चित्रीकरण आणि अश्या कैक द्रुश्यांत हा चित्रपट थिएटरलाच बघायला आल्याचा निर्णय सार्थ वाटतो.
४) चित्रपटातील झिंगाट गाणी नाचायला लावतात तर पार्श्वसंगीत डोलायला लावते. येड लागलं गाणे तर अक्षरशा याड लावते. सैराटची गाणी चांगली आहेत यात प्रश्नच नाही. पण चित्रपट बघितल्यावर त्यातील भावना आणखी आत आत उतरत जातात. आता पुढचे काही दिवस तरी सतत रीपीट मोडवर लागणार्या येड लागलंची झिंग उतरणे कठीणच.
५) कुठेही मोठाले फिल्मी डायलॉग नाहीत. कुठल्या आणाभाका नाही. आपलेच प्रेम अमरप्रेम आहे असे दाखवायचा अट्टाहास नाही. बस्स आपण शाळा कॉलेजात असताना जसे प्रेम करतो, त्या प्रेमात जे घडते, तेच अतिशय सुंदर पद्धतीने दाखवले आहे. चिठ्ठीतून प्रेम व्यक्त करायचा प्रकार धमाल जमला आहे. मला सर्वात जास्त आवडलेला आणि स्वताशीच हसायला लावणारा प्रसंग म्हणजे जेव्हा आर्ची वर्गात बसल्याबसल्या परश्याकडे एकटक बघतच राहते आणि त्याची जी काही अवस्था होते..... बस्स आपले दिवस आठवतात!
६) दोघांनी अभिनय छान केला आहे. किंवा त्यांच्याकडून करवून घेतला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संवाद फार सहज आलेले आहेत. पण त्यातही आर्ची किंचित जास्त भाव खाऊन जाते. तिचा रांगडा स्वभाव तिच्या प्रेमातही उतरला आहे.
एका हॉटेलातील प्रसंगात पलीकडच्या टेबलावर बसलेला एक फुटकळ रोमिओ जेव्हा आर्चीकडे अधाश्यासारखा टक लावून बघत असतो, तेव्हा तिने त्याला जी प्रतिक्रिया दिली आहे ते बघून खुदकन हसायला येते. हे असले काही आर्चीच करू शकते असे आपल्याला वाटावे ईतके तिची व्यक्तीरेखा आपल्या डोक्यात भिनते.
७) दोघांची चित्रपटातील वये आणि त्यांचे त्या वयाचेच दिसणे हा या पिक्चरचा प्लस पॉईंट आहे. प्रेम करायची अक्कल नेमकी कोणत्या वयात येते याची कल्पना नाही पण ‘प्रेमासाठी कायपण’ ही भावना अठरा-एकोणीस वर्षाच्या मुलांमध्ये जितकी प्रबळ असते तशी ती मोठ्यांना झेपत नाही.
८) जातीयवाद प्रत्येकालाच कळतो. कोणाला एडमिशन फॉर्मवर कळतो, कोणाला नोकरीच्या अर्जावर कळतो. कोणाला प्रेमात पडल्यावर कळतो, कोणाला लग्नाच्या बाजारात उतरल्यावर कळतो. तर काहींना योग्य वेळ येता घरातूनच बाळकडू दिले जातात. हा जातीयवाद दैनंदिन जीवनाचा भाग असलेले कित्येक जीव आपल्या आसपास वावरत आहेत हे देखील आपल्याला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून का होईना माहीत आहेच. त्यामुळे निव्वळ तो जाणून घेण्यास म्हणून सैराट बघायला जाऊ नका. बस्स मनाची पाटी कोरी करा आणि सैराट बघायला जा.
९) कारण हा चित्रपट आपल्याला स्वप्नासारखा दचकवतो. जसे स्वप्नात जे काही दिसते ते सारे खरेच आहे असे वाटते, तसेच या चित्रपटातील ओळखीच्या वाटणार्या भावविश्वात आपण रमतो. आणि मग स्वप्नातल्या सारखाच एक धक्का बसतो. तो देखील खरा खुरा वाटतो. स्वप्नातून जागे झाल्यावर ‘अरे हे स्वप्नच होते’ असे आपण म्हणतो तसेच लाईट लागल्यावर हायसे वाटते. हा पिक्चरच होता हे आपल्यालाच समजावतो. हे आपल्याशी घडणार नाही, आपल्या आसपास असले काही घडत नाही.. हा विचार तेवढा रेंगाळत राहतो.
१०) हा पिक्चर हसवतो, खिदळवतो, गुदगुल्या करतो, पार्श्वसंगीताच्या तालावर डोलायला लावतो, आता पुढे काय ची उत्कंठा ताणून धरतो.. पण कुठेही टेंशन देत नाही, कुठेही रडवत नाही... शेवटाला एक धक्का तेवढा देतो. पण रडवत नाही. बस्स घरी आपल्या सोबत न्यायला एक किडा डोक्यात देतो. त्याच्यासाठी तरी नक्कीच ‘सैराट’ बघा.
- समाप्त
कोणाला ११) वे कारण भेटले तर प्रतिसादात जोडा.
किंवा तो बॉलीवूड मध्ये मराठी
किंवा तो बॉलीवूड मध्ये मराठी अक्सेंट मध्ये बोलणारा आणि स्वतःच्या चुकीमुळे पहिल्या १ तासात गुंडांकडून मारला जाणारा हिरोचा मित्र/हिरॉईनचा भाऊ म्हणून टाइप कास्ट होईल
आता सुधारतेय भाषा.. हल्लीच एक
आता सुधारतेय भाषा.. हल्लीच एक मुलाखत बघितली, चांगले बोलला, बोलायची ढब बरीच बदललीय. याला चांगले रोल्स मिळायला हवेत. चांगले पोटेनशीयल आहे.
ती भीती आहेच. पण डिजिटल
ती भीती आहेच. पण डिजिटल मीडियाकडून आशा आहे.
त्यावरून आठवले. विविधभारतीवर हल्ली जुन्या मुलाखती ऐकवतात. कोण्या अभिनेत्याची मुलाखत सुरू होती. मी मध्येच ऐकली त्यामुळे कोण हे कळले नाही. त्याला 'तू टीव्हीवर काम करणार का' हा प्रश्न विचारला गेला. त्याने 'मी मूर्ख आहे का, माणसाने नेहमी छोट्या गोष्टीवरून मोठ्या गोष्टीकडे जायला हवे, मी मोठ्या पडद्यावर काम करतो, छोट्या पडद्यावर जाईनच कसा' असे उत्तर दिले. 30 वर्षांपूर्वी असले प्रश्न व त्याला हीच उत्तरे हमखास मिळत. आजच्या जमान्यात दोन्हीचे हसू येते. किती बदल झाला 30 वर्षात.
भाषेत तो मार खातो असे
भाषेत तो मार खातो असे आपल्याला वाटते.. मराठी लोकांना..
माझ्या नॉर्थ इंडियन मित्र मंडळींना त्याचे बोलणे खटकत नाही.. उलट तो अकसेंट त्यांना छान वाटतो.. थोडा निराळा..
मराठलेलं हिंदी त्यांना ओळखू येत नाही...
दाक्षिणात्य अभिनेते असो वा
दाक्षिणात्य अभिनेते असो वा पंजाबी वा सिंधी... हे सारे बॉलीवूडमध्ये हिंदी बोलताना त्यांचा ॲक्सेंट घेऊन येतात. मग साईड कलाकार असो वा लीड रोल.
पण तेच कोणी मराठी ॲक्सेंटवाली हिंदी बोलत असेल तर आपल्याला ती खटकते.. असे का?
आपणच आपल्या भाषेला डाऊनमार्केट केले आहे. बोलावे खुशाल आपल्या मराठमोळ्या ॲक्सेंटमध्येच हिंदी वा ईंग्लिशही.. ईथे आमच्याकडे बंबैय्या हिंदीमध्ये तेरे को मेरे को आयला गयेला बिनधास्त कोणाची लाज न बाळगता अशुद्ध हिंदी बोलतात. त्यामुळे त्यालाही डिमांड येतो.
शाहरुख चे डोळे बघितले तरी
शाहरुख चे डोळे बघितले तरी दारूचे दुष्परिणाम दिसतील
कसला व्यसनी दिसतो तो
Submitted by आशुचँप on 22 October, 2020 - 15:21
>>>>>
आशूचॅम्प,
बोअर झाले हे प्रत्येक धाग्यावर शाहरूख !!..
.
असं लोकं लाख म्हणतील.
पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. खोटं असते ते. कारण यूह क्नो दॅट.. यूह कॅन लव्ह शाहरूख, यू कॅन हेट शाहरूख बट यू कॅन्नॉट इग्नोर शाहरूख.. तो कधीच बोअर होत नाही
युह का यु एक काय ते बोला
युह का यु
एक काय ते बोला
युह तो आप यू भी बोल सकते हो,
युह तो आप यू भी बोल सकते हो, याह तो यू कॅन से युह आल्सो, बीकॉज ईंग्लिश ईज ए व्हेरी फन्नी लँगवेज
फन्नी का फनी?
फन्नी का फनी?
फनी म्हणजे कंगवा हो
फनी म्हणजे कंगवा हो
फनी का फणी?
फनी का फणी?
फणी म्हणजे नागीन जे डोके वर
फणी म्हणजे नागीन जे डोके वर करते त्याला बोलतात.
नागीन का नागीण?
नागीन का नागीण?
नागीणीच्या डोक्यात उवा झाल्या
नागिणीच्या डोक्यात उवा झाल्या की ती फणी काढते.
नागीन का नागीण?
नागीन का नागीण?
>>>
मी लिहिलेय ना वर नागीन..
मग पुन्हा का विचारत आहात मलाच
चुकीचे वाटत असेल तर थर्ड अंपायर घेऊया.
मला मराठी शुद्धलेखन चुकले तर जराही कमीपणा वाटत नाही
कारण माझा आवडता विषय गनित आहे
नागिणीच्या डोक्यात उवा झाल्या
नागिणीच्या डोक्यात उवा झाल्या की ती फणी काढते.
>>>
मग सगळ्या ऊवा हाऊ फणी म्हणत हसत हसत बाहेर येत असतील ना...
नागीण फणी ला म्हणते.. 'ना गिन
नागीण फणी ला म्हणते.. 'ना गिन' मार दे सबको...
व्वा च्रप्स अजून एक फोड अशी
व्वा च्रप्स अजून एक फोड अशी होईल
नागीन = नाग ईन
कृपया चावट अर्थ घेऊ नयेत
गणित
गणित
Pages