तर, अस्मादिकांचे लग्न ठरले आहे. एरव्ही इतर मुलींशी/ मैत्रिणींशी प्रो लेव्हलवर बोलू शकणारे अस्मादिक होणाऱ्या बायकोशी काय बोलावे हे कळत नसल्याने मोठ्याच पेचात सापडले आहेत. बऱ्याचदा कॉल करून पाच पाच मिनिट फक्त शांततेत जात आहेत. इथे अनेकांची लग्ने झाली आहेत/ असावीत. पुरुषांसाठी प्रश्न: तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोशी कोणत्या विषयावर बोलला होतात? कोणत्या विषयावर बोलायला हवे?
स्त्रियांसाठी प्रश्न: होणाऱ्या नवऱ्याने कोणत्या विषयांवर बोलायला हवे? अगदीच शांतता निर्माण होत असेल तर काय करावे जेणेकरून बॉण्डिंग निर्माण होईल?
त.टी.: १, करिअर आणि शिक्षण वगैरे बाबत बोलून झाले आहे. दोघांच्या फिल्ड्स पूर्णपणे भिन्न असल्याने त्यात अजून बोलण्यासारखं उरलेलं नाही.
२. इतिहास आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत तिला रस नाही.
३. कोरोनावर थोडं बोललोय, अजून बोलायची इच्छा नाही.
४. वैयक्तिक प्रेमविषयक इतिहासात दोघांनाही डोकावायचं नाहीये.
खूप अडचणीत आहे, नक्की मदत करा.
पुन्हा एकदा विचार करा हो.
पुन्हा एकदा विचार करा हो.
लग्नाआधीचे दिवस हे फोनची बॅटरी संपेपर्यंत, कोणा एकाचा फोन बॅलन्स संपेपर्यंत, पहाट होईपर्यंत, आई/बाबा येऊन झोप आवरत 'किती वाजलेत? कधी झोपणार?' असा दम देईपर्यंत बोलत राहण्याचे असतात.
आत्ताच तुम्ही लग्नाला 10-15 वर्षे झाल्यासारखे गप्प राहात असाल तर काय प्रॉब्लेम आहे ते शोधा.
तुमच्या ओळखीतल्या कोणी
तुमच्या ओळखीतल्या कोणी झपाटलेले घर विकत घेतले आहे का किंवा त्यांच्या घरात मुंग्या झाल्या आहेत का??
लग्नाआधीचे दिवस हे फोनची
लग्नाआधीचे दिवस हे फोनची बॅटरी संपेपर्यंत, कोणा एकाचा फोन बॅलन्स संपेपर्यंत, पहाट होईपर्यंत, आई/बाबा येऊन झोप आवरत 'किती वाजलेत? कधी झोपणार?' असा दम देईपर्यंत बोलत राहण्याचे असतात.>> अगदी अगदी.
Submitted by सनव on 22
Submitted by सनव on 22 October, 2020 - 00:42>> असं बोलतात याची कल्पना आहे मला. पण काय बोलतात हे कळत नाहीये. सध्या ती: "अजून मग?"
मी: "काही नाही, फिरतोय/ निवांत.. जेवण झालं का? काय जेवलीस" हेच रिपीट मोडवर सुरु आहे.
आणि, हे रिपीट बोलत असलो तरी
आणि, हे रिपीट बोलत असलो तरी अजून १० मिनिट अजून १० मिनिट करत रात्रीचे १ वाजत आहेत! त्यामुळे ओढ आहे हे नक्की, पण बोलावे काय हे दोघांनाही सुचत नाही.
सध्या ती: "अजून मग?" >> मी:
सध्या ती: "अजून मग?" >> मी: नको नको, डझन आहेत पुरे घरात...
काही लोकांचा कंफर्ट प्रत्यक्ष
काही लोकांचा कंफर्ट प्रत्यक्ष भेटून बोलण्यात असतो. काहींचा फक्त चॅट मध्ये. फोनवर बोलायला सुचत नाही.
'१ तास बोललेच पाहिजे' असा कोणी दम दिला नसेल तर पाच मिनीटात आज काय झालं वगैरे करुन फोन बंद करु शकता. आणि प्रत्यक्ष एखाद्या मस्त जागी भेटू शकता. सध्या गर्दी नाहीये हा फायदा.
काही लोकांचा कंफर्ट प्रत्यक्ष
काही लोकांचा कंफर्ट प्रत्यक्ष भेटून बोलण्यात असतो. काहींचा फक्त चॅट मध्ये. फोनवर बोलायला सुचत नाही.>>>>
सहमत...
इतिहास राजकारण सोडून आवडते पुस्तक, रंग, चित्रपट, नाटक यावर बोला..लहानपणीच्या सणवारांच्या, शाळा कॉलेजच्या आठवणी काढा (मित्रपरिवार सोडून
)
हल्ली नवरात्रीचे नवरंग सुरू आहेत, त्यानिमित्ताने बोला.. नाहीतर सरळ भेटतच जा कसे ते...
पण हा ब्लॉक लवकर मोडा... सुरवातीची थोडी अवघड परिस्थिती महिन्याभरात कमी होऊन एक जवळीक जाणवायला हवी, मग भलेही तासभर गप्पा न होवोत. असे होत नसेल तर थोडा प्रॉब्लेम आहे...
हो ना, तासतासभर गप्पा झाल्याच
हो ना, तासतासभर गप्पा झाल्याच पाहिजेत असं नाही. बोलावंसं वाटणं, बोलताना, बोलून झाल्यावर छान वाटणं महत्त्वाचं. बोलत रहा.
कुठल्या विषयांवर बोलायचं हे तुमचं तुम्हाला कळत जाईल दोघांनाही.
मुव्हीज बद्दल बोला. हॉबीज
मुव्हीज बद्दल बोला. हॉबीज बद्दल बोला. कुठे फिरायला गेलेले ठिकाण आवडले असेल त्याबद्दल बोला. मेन म्हणजे स्वत:ला ओपन अप करा आपण खरेखुरे कसे आहोत, सवयी चांगल्या वाईट etc etc.. आणि मला वाटतं हे असं ड्युटि लागल्या सारखे आता टाइम झाला मग बोललंच पाहिजे असा अॅटीट्युड ठेउ नका. मनापासून आठवण आली की आपोआप सुचतीलच नवीन विषय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुनी नवी गाणी, चित्रपट,
जुनी नवी गाणी, चित्रपट, वाचायची आवड असेल तर साहित्य, ट्रेक्स, फिरण्याचे प्लान्स या विषयी गप्पा मारू शकता. एकाच शहरात असाल तर लॉंग ड्राइवला जाणे वगैरे करू शकता. दिवाळीनिमित्त एकमेकांना काही छोटे गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला आवडलेला एखादा लेख, विनोद वॉट्सऍपवर शेअर करू शकता. तुमचा आणि वाग्दत्त वधूचा स्वभाव किंवा एकंदर दोन्ही घरांबद्दल फारशी माहिती नाही परंतु छानशी फुलं दिली तर जनरली मुलींना आवडतात.
एकदा कम्फर्ट लेव्हल आली की विषय आपोआप निघतील. मात्र तोवर एकमेकांबद्दल कुटुंबियांच्या अपेक्षा, भविष्यातील जबाबदार्या वगैरे सिरीअस बोलणं टाळावं.
<<< सध्या ती: "अजून मग?" >>
<<< सध्या ती: "अजून मग?" >> मी: नको नको, डझन आहेत पुरे घरात... >>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
<<< सध्या गर्दी नाहीये हा फायदा. >>> अनु![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी बबड्या नाव असुन ती लग्नाला तयार झाली हेच कमाल आहे, नाहीतर हल्ली मुलींनी बबड्याची धास्ती घेतलीय काय माहित खरच डबड्या निघाला तर...
आणि प्रत्यक्ष भेटीत थोडीफार
आणि प्रत्यक्ष भेटीत थोडीफार भांडणं, वाद झाले तर टेन्शन घेऊ नका
विसंवाद जितक्या लवकर कळतील तितके अलाईन व्हायला फायदा.
काय माहित, अरेंज मैरेज वाले
,
स्वतःच्या स्वभावाचे पैलू
स्वतःच्या स्वभावाचे पैलू (फक्त चांगले नाही) दिसतील, समोरच्याचे कळतील अश्या गोष्टी एकमेकांबरोबर नक्की करा. फक्त एका प्रकारचे छान, उदात्त व्यक्तीमत्व प्रोजेक्ट करु नये (ते आपोआप होते.विशेषतः बायकांकडून जास्त होते. नंतर त्या इमेज ला कायम चिकटून जपत रहावे लागते.)
एकमेकांना काय आवडतं काय नाही याची खरी मतं कळावी असा प्रयत्न करा (सी आय डी सारखं सांग, सांग म्हणून इंटरोगेट न करता बोलण्याच्या, वागण्याच्या ओघात.)
तुम्ही मुळात अबोल आहात का?
तुम्ही मुळात अबोल आहात का? कारण मी तसा होतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं असूनही फोन वर बोलायला कंटाळा यायचा
आमच्या संवादात 90 टक्के वेळ तीच बोलत असे
अजूनही साधारणपणे तेच प्रमाण आहे संसारात
त्यामुळे काळजी करू नका
सगळ्यात महत्वाचे तुमच्या घरच्यांबद्दल जितकी होईल तितकी कल्पना द्या, विचित्र तर्हेवाईक नातेवाईक असतील तर त्यांच्याबद्दल
म्हणजे त्यांना आल्यावर ऍडजस्ट व्हायला मदत होईल
मुल कधी आणि किती होऊ दयावीत तुमचा त्याबाबत काय विचार आहे हेही एकमेकांना कळू द्या
असे म्हणू नका इतकयात काही विचार केला नाही लग्न केल्यावर बघू
<<< आमच्या संवादात 90 टक्के
<<< आमच्या संवादात 90 टक्के वेळ तीच बोलत असे >>> हे आमच्याबाबतीत पण आहे. मी अशी बाहेर कुणाशी जास्त बोलत नाही, पण नवर्यासोबत खुप बडबडते, त्यामुळे कधी चुकून शांत असली की त्याला चुकल्यासारखे वाटते . तु बडबडीच बरे म्हणतो शांत बसलीस की टेंशन येते.
1.एकमेकांच्या छंदाविषयी
1.एकमेकांच्या छंदाविषयी
2.खाण्या पिण्याच्या आवडी निवडी
3.आवडती पुस्तकं, सिनेमा
4.आवडती ठिकाण हिल स्टेशन, समुद्र वगैरे जास्त सांगत नाही.
सध्या सणांचा सिझन सुरु आहे ते आपापल्या घरी कसे सेलिब्रेट करतात वगैरे
बहुतेक लोक लग्नापूर्वी आणि
बहुतेक लोक लग्नापूर्वी आणि लग्न झाल्याझाल्या खूप बोलतात फ़ोनवर, आणि मग बोलत नाहीत.
तुमचे उलट होणार असेल. आधी बोलत नाही आहात मग आयुष्यभार बोलाल. छान आहे हे.
माफ करा बबडुजी पण तुमची
माफ करा बबडुजी पण तुमची समस्या काल्पनिक वाटते आहे.
काल्पनिक काय
काल्पनिक काय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बबड्या आणि शूभ्रा बोलत नाहीत फोनवर
पाहिलंय या डोळ्यांनी समक्ष
तो बबड्या डबड्या आहे पण हा
तो बबड्या डबड्या आहे पण हा मात्र चांगलाच बनेल आणि नॉटी आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आयुष्यावर बोलू काही एका आणि
"आयुष्यावर बोलू काही" ऐका आणि एक एक कविता रसग्रहणाला घ्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटल हा माझ्या मुलाचाच आयडी आहे. पण तो मलाच अस्मादिक म्हणजे काय विचारेल.
पण त्याला हेच प्रश्न पडलेत.
बबडुजींची भाषाशैली पाहुन वाटत
बबडुजींची भाषाशैली पाहुन वाटत नाही त्यांना बोलायला काही अडचण असेल.
असं नसतं. सोमीवर गोंधळ
असं नसतं. सोमीवर गोंधळ घालणारे प्रत्यक्षात मितभाषी असु शकतात.
ऋन्मेषला प्रत्यक्ष भेटलेले लोक सांगतात की तो इतका कमी बोलतो की हाच तो ऋन्मेष हे त्यांना आधी खरेच वाटले नाही.
अस्मादिक शब्द जिद्दु यांच्या
अस्मादिक शब्द जिद्दु यांच्या कमेंटमधे दोन दिवसांपूर्वी वाचला. मलाही त्याचा अर्थ माहित नव्हता म्हणून बायकोला विचारला.
मला तर हा ऋन्मेशचाच दुसरा
मला तर हा ऋन्मेशचाच दुसरा अवतार वाटतोय.
अरे देवा म्हणजे आता परत गफ्रे
अरे देवा म्हणजे आता परत गफ्रे, रुमाल कुठला घेऊ, गिफ्ट काय घेऊ, वाढदिवस कसा साजरा करू चे धागे येणार का काय?
(No subject)
>>>>>बबडुजींची भाषाशैली पाहुन
>>>>>बबडुजींची भाषाशैली पाहुन वाटत नाही त्यांना बोलायला काही अडचण असेल.>>>> हाहाहा!!! परत लागणार तर माबोकर कामाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबोकरांनी
माबोकरांनी
लोकांना मदतीचा विडाच उचललाय....आली अडचण कर मदत आली अडचण कर मदत.
कोणी खरं विचारो कोणी खोटं पण झटुन मदत करणार म्हणजे करणारच....घरचं कार्य असल्यागत राबतात.
बाकीच्यांनी कंबर कसुन तयारी केलीय मदतीची तर...
काहींनी या मदतीसाठी कंबरेच सोडुन डोक्याला गुंडाळलय
सामो +१११
सामो +१११
<<काहींनी या मदतीसाठी कंबरेच
<<काहींनी या मदतीसाठी कंबरेच सोडुन डोक्याला गुंडाळलय
Submitted by जेम्स बॉन्ड on 22 October, 2020 - 18:26 >> या वाक्याचा निषेध.
कोणी खोडसाळपणे मदत मागत असेल तरी माबोकर आपलेपणाने मदत करतात. यातुन अनेक चांगल्या गोष्टी समोर येतात. कदाचित दुसऱ्या एखाद्याला फायदाही होऊ शकतो.
नशीबवान आहात... कमी बोलणारी
नशीबवान आहात... कमी बोलणारी बायको मिळतेय...
कोणी खरं विचारो कोणी खोटं पण
कोणी खरं विचारो कोणी खोटं पण झटुन मदत करणार म्हणजे करणारच....घरचं कार्य
>>> मदत कसली त्यात... बाकीच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचे ते मदतीच्या धाग्यावर पण देतात..पैसे पडत नाहीत.. टाईमपास समजून चाललेले असते सगळे...
कंबरेचे सोडून डोक्याला
कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळून कोणाला मदत होत असे तर करावी आशा अर्थाचे एक सुभाषित आहे म्हणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटी मानव जन्म म्हणजे काय आत्म्याने कंबरेला बांधलेले एक फडकेच
ते डोक्याला बांधा वा कंबरेला
कधीना कधी सोडून जायचंच आहे
मदत करा पण इतकीही चर्चा करू
मदत करा पण इतकीही चर्चा करू नका की बबड्या घाबरून लग्न मोडेल
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बबडू, हलकेच घ्या हो.
इथे वावर नाही म्हणजे फोनवर बबडीशी बोलत असाल बहुतेक.
बाकीच्या धाग्यावर प्रतिसाद
बाकीच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायचे ते मदतीच्या धाग्यावर पण देतात..पैसे पडत नाहीत.. टाईमपास समजून चाललेले असते सगळे...>>>>
अगदीच टाईमपास नाही पण लिहायची सुरसुरी असते ना..
मी डु आयडी आहे पण अभिषेक/
मी डु आयडी आहे पण अभिषेक/ अनिळजी यांपैकी कुणाचाही डु आयडी नाही.
माझ्या मूळ आयडीने कायम वावरतो, अगदी चोवीस तास! पण ह्या प्रश्नासाठी हा जुना डु वापरला आहे. प्रश्न खरोखर पडला आहे हे नक्की. बाकी लग्न झाल्यावर खऱ्या आयडीने ह्याच धाग्यावर कळवेन, फोटोसकट!
आता मूळ प्रश्न, इथले अनेक प्रतिसाद कामात आलेत. आशुदादांना विशेष धन्यवाद. एकदा वाटलं कि संवाद कमी पडतोय, संसार कसा होईल? पण गाडी रुळावर येतेय असं वाटतंय हळूहळू
मी डु आयडी आहे पण अभिषेक/
मी डु आयडी आहे पण अभिषेक/ अनिळजी यांपैकी कुणाचाही डु आयडी नाही.
माझ्या मूळ आयडीने कायम वावरतो, अगदी चोवीस तास! पण ह्या प्रश्नासाठी हा जुना डु वापरला आहे. प्रश्न खरोखर पडला आहे हे नक्की. बाकी लग्न झाल्यावर खऱ्या आयडीने ह्याच धाग्यावर कळवेन, फोटोसकट!
आता मूळ प्रश्न, इथले अनेक प्रतिसाद कामात आलेत. आशुदादांना विशेष धन्यवाद. एकदा वाटलं कि संवाद कमी पडतोय, संसार कसा होईल? पण गाडी रुळावर येतेय असं वाटतंय हळूहळू
चला हे बेस्ट झाले
चला हे बेस्ट झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाडी रुळावर येतीय हेही
आणि तुम्ही अभिषेक नाही हेही
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
धागाकर्ते सोलापूरचे वाटत आहेत
धागाकर्ते सोलापूरचे वाटत आहेत...
ऋन्मेषला प्रत्यक्ष भेटलेले
ऋन्मेषला प्रत्यक्ष भेटलेले लोक सांगतात की तो इतका कमी बोलतो की हाच तो ऋन्मेष हे त्यांना आधी खरेच वाटले नाही.
>>>>>
हो हे खरे आहे. पण मी मितभाषी नाही. मी ज्यांच्याशी माझी केमिस्ट्री जुळते त्यांच्याशी अफाट बोलतो. आणि घरी ती सगळ्यांशी जमत असल्याने रोज दहा वेळ माझे तोंड धरून आवरावे लागते. आणि त्यात माझ्या बायकोचा एक आवडीचा डायलॉग, ए बाबा तू जा तुझ्या त्या मायबोलीवर जाऊन लोकांना त्रास दे...
पण याच्या उलट स्प्लिट पर्सनॅलिटी वाटावे ईतके ईतरांसमोर शांत असतो. घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना मी ईतका शांत वाटतो की ते आपल्या बबड्याला बोलतात की शोनू जरा दादाला बोलायला शिकव तुझ्यासारखे
... आणि मग पाहुणे गेल्यावर घरचे माझ्यावर चढतात की तू घरच्यांसमोरच हुशारी मार पण बाहेर तोंड उघडू नकोस.. पण आता त्यांना कोण सांगणार की ही हुशारी नसते तर प्रेम असते, जुळलेली केमिस्ट्री असते, जिच्यामुळे ती कम्फर्ट लेव्हल आली असते, ज्यामुळे तासनतास नॉनस्टॉप बडबड करणेही बोअर वाटत नाही. माझ्यासाठी तरी एखाद्याशी आपले नाते किती जुळले आहे हे ओळखायचे हेच एक परीमाण आहे.
याचमुळे धागाकर्त्याची समस्या ऐकून माझ्या मनात पहिला विचार हाच आला की बोलण्यात कम्फर्ट लेव्हल नसेल तर नाते गंडलेले तर नाही.
मुळीच नाही.
कारण जे लॉजिक मला लागू होते ते ईतरांना होणार नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते.
आताच टीव्हीवर प्यार तो होना ही था पाहिला. तो ठोंब्या अजय देवगण शेवटपर्यंत तिच्याशी कम्फर्टेबल असल्यासारखे बोलतच नाही. आता या त्याच्या अभिनयाच्या मर्यादा ते सोडा. पण तरीही त्यांचे चित्रपटात दाखवलेले प्रेम आपल्याला पटते. कारण प्रेम म्हणजे नुसते एकमेकांशी न कंटाळता हवे तेव्हा हवे तितके विविध विषयांवर बोलणे ईतकेच नाही. प्रत्येकाची व्यक्त व्हायची पद्धत भिन्न असते ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार. जर हमम हम्मम आणि जेवलास का ईतकेच बोलण्यासाठीही फोन हातात तासभर धरायला कष्ट वाटत नसेल तर ती ओढ आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी प्रॉब्लेमचा विचार करू नका. कारण मुळात तो प्रॉब्लेमच नाहीये. नातं जसे बहरेल तसे ॲक्सेप्ट करा. जर तुमच्या दोघांपैकी कोणाला बोलायची आवड असेल तर आपसूक संवाद वाढेल. आणि आवड नसल्यास चिल मारा. उगाच तासभर गुलूगुलू बोललेच पाहिजे ही काही प्रथा नसते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष भेटा. महिलांसाठी ट्रेन सुरू झालीय बघा. सेवेचा लाभ घ्या...
अरे हो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि हा आयडी माझा नाहीये
काही सल्ले असतील तर द्या त्यांना. उद्या लग्न झाल्यावरही नवीन लग्नाचे नऊ वर्षे म्हणत असे काही धागे येऊ लागले त्यांचे तरी संशय न घेता मदत करत राहा. मायबोलीची हिच खरी ओळख आहे
लग्नाआधी बायकोशी काय बोलावे?
लग्नाआधी बायकोशी काय बोलावे?
स्वीट नथिंग बबड्या स्वीट नथिंग !!
ए बाबा तू जा तुझ्या त्या
ए बाबा तू जा तुझ्या त्या मायबोलीवर जाऊन लोकांना त्रास दे..... अरे बाबा वहिनी नी सांगितलेलं सर्व ऐकायलाच पाहिजे असे काही नाही...
तसंही लग्न ठरल्यावर तुम्हाला बोलायला सुचत नाही आणि लग्ना नंतर तर बोलायलाही मिळत नाही. काही खर नाही तुझं. आता वेळ आहे बोलुन घे नंतर फक्त ऐकांचय.
या वाक्याचा निषेध.
या वाक्याचा निषेध.
वीरूऊऊऊऊऊऊउ !!!!!!! (हे धर्मेंद्र स्वतःलाच कस बोलेले हे कल्पावे)
आयमाय स्वारी बरं का. शब्दरचना चुकली. जो मदत मागतोय त्याने कं च सो. डो. गुं. अस म्हण्याचं होत मला. लोकं काय्बी इचारत्यात. (आमच्या वेळेला असं नव्हतं)
वीरूऊऊऊऊऊऊउ !!!!!!! ... >>
वीरूऊऊऊऊऊऊउ !!!!!!! ... >>![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
जाओ ठाकुर, इस बार माफ करते है.
Chraps: असे काहुन वाटायल बे?
Chraps: असे काहुन वाटायल बे? (बे अनादर करण्यासाठी नव्हे तर सोलापुरी लहेजासाठी वापरला आहे)
वांडोबा, खरंच ईचारी ऱ्हाईनु.. मजाक लेवाले खोलेल नहीं धागा. तुमनं लगन होयेल हुई ते बोला नहीं ते राहू द्या.
वर लिखेल तुम्हले बोलानं साठे
वर लिखेल तुम्हले बोलानं साठे लिखेल नही. आथातथा देखश्यात ते लोकं कसावर भी, नी काय भी चावयी रायनात.
त्यास्न्या भावना समझी तुमी.
त्यास्न्या भावना समझी
घ्या तुमी. लगन करानी येळ वनी पन काय बोलवा तेच सुची नही रायनं, मंग मानुस काकोळीत करणार नही तर काय करी.
Pages