तर, अस्मादिकांचे लग्न ठरले आहे. एरव्ही इतर मुलींशी/ मैत्रिणींशी प्रो लेव्हलवर बोलू शकणारे अस्मादिक होणाऱ्या बायकोशी काय बोलावे हे कळत नसल्याने मोठ्याच पेचात सापडले आहेत. बऱ्याचदा कॉल करून पाच पाच मिनिट फक्त शांततेत जात आहेत. इथे अनेकांची लग्ने झाली आहेत/ असावीत. पुरुषांसाठी प्रश्न: तुम्ही तुमच्या होणाऱ्या बायकोशी कोणत्या विषयावर बोलला होतात? कोणत्या विषयावर बोलायला हवे?
स्त्रियांसाठी प्रश्न: होणाऱ्या नवऱ्याने कोणत्या विषयांवर बोलायला हवे? अगदीच शांतता निर्माण होत असेल तर काय करावे जेणेकरून बॉण्डिंग निर्माण होईल?
त.टी.: १, करिअर आणि शिक्षण वगैरे बाबत बोलून झाले आहे. दोघांच्या फिल्ड्स पूर्णपणे भिन्न असल्याने त्यात अजून बोलण्यासारखं उरलेलं नाही.
२. इतिहास आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत तिला रस नाही.
३. कोरोनावर थोडं बोललोय, अजून बोलायची इच्छा नाही.
४. वैयक्तिक प्रेमविषयक इतिहासात दोघांनाही डोकावायचं नाहीये.
खूप अडचणीत आहे, नक्की मदत करा.
असं कोठे र्हास कां. लगीन ठयरी
असं कोठे र्हास कां. लगीन ठयरी रायनं नी म्हणे बोलानं सुची नही रायनं.
वावर ना बारामां चावया, कांदा ना भाव कथाकथाच जाई रायना, बठ्ठा भाजीपाला गैरा म्हांगा हुई राय्ना.
काय काय नवं रांधता येस हई इचारो कितला ईशय पडेल शेतस एकसावा बोलाले तं सुरुवात करा पुढलं देखाय जाईन म्हना.
शॉपिंग करायची का विचार..
शॉपिंग करायची का विचार.. किंवा माझे क्रेडिट कार्ड देऊ का तुला शॉपिंग करायला विचारा..
किंवा माझे क्रेडिट कार्ड देऊ
किंवा माझे क्रेडिट कार्ड देऊ का तुला शॉपिंग करायला विचारा.. >>
बबडु तुम्ही खांदेशात शिकायला
बबडु तुम्ही खांदेशात शिकायला होते का?
.
.
सर, मग काय ठरले शेवटी ?
सर, मग काय ठरले शेवटी ?
भयकथा वाचुन ऐकवत जा...
भयकथा वाचुन ऐकवत जा... तुम्हाला बोलण्याचं समाधान तर राहिलंच शिवाय एकटे राहताना भीतीही राहील. म्हणजे पुढे जाऊन दोघे एकमेकांशिवाय राहायला नकोत...
किंवा माझे क्रेडिट कार्ड देऊ
किंवा माझे क्रेडिट कार्ड देऊ का तुला शॉपिंग करायला विचारा.. >>
बबड्याचा पुढील प्रवास कसा
बबड्याचा पुढील प्रवास कसा झाला हे जाणण्याची उत्सुकता आहे..
बबडुजींनी धागा काढुन टीप्स
बबडुजींनी धागा काढुन टीप्स मागितल्या. भोळ्याभाबड्या माबोकरांनी वेळातवेळ काढुन मदतही केली. पण बबडु यांनी शादीचे लाडु कसे होते ते काही सांगितले नाही.
सर सध्या क्वारंटाईन मधे आहेत.
सर सध्या क्वारंटाईन मधे आहेत. नंतर सांगतील.
वाईच दम धरावा ही विनंती.
सर सध्या क्वारंटाईन मधे आहेत.
सर सध्या क्वारंटाईन मधे आहेत. नंतर सांगतील.>>
इथेपण सर!?
अरे देवा... सगळीकडे सरच
अरे देवा... सगळीकडे सरच असतिल तर कठिणे...
कोतबो काढावा का?
या सरांनी त्या सरांना दाद
या सरांनी त्या सरांना दाद द्यावी
न-सरांना यातुनी नैराश्य यावे
कोणत्या आयडी अशा येती नळाला
गोंधळ्यांनी बोलणे विसरून जावे
या सरांनी त्या सरांना दाद द्यावी
आणि त्यांच्या वाटणीला प्रश्न यावे
सांडता तर्कटे बोटे गंडताना
अनर्थांचे अर्थ शोधुनी निर्लज्ज व्हावे
गुंतलेले सत्य या गोंधळात एक
फाटकी ही आयडी काळीज माझे
मी असा संतापुनी बेहोष होता
सरभक्तीत तू मला वाहून घ्यावे
सगळं सुरळीत सुरू आहे, लग्नाला
सगळं सुरळीत सुरू आहे, लग्नाला ३ वर्षे होत आलीत. प्रश्न विचारला तो पहिला दुसरा आठवडा होता.. सर्वांनी इतक्या मायेने उत्तरे दिलीत पण मी कर्म दरिद्री नेमका या acount पासवर्ड विसरलो होतो.
बोलण्याबद्दल, 3रया आठवड्यात आम्ही खुप खुललो.. आता नेमकं आठवत नाही पण बोलायला वेळ पुरत नव्हता इतकं.. इथलं वाचून आवडीनिवडी, चित्रविचित्र नातेवाईक, जुन्या शाळेच्या वगैरे गोष्टी, कुठं कुठं फिरलो, सगळं सगळं बोलायचो..
स्वप्नांचे इमले बांधत बांधत तासन्तास बडबडायचो.. पूर्वप्रकरणे आणि व्यससन सोडून इतर सारे काही share केलं. (प्रकरणे यासाठी नाही की मला तिच्यावर जिवापाड प्रेम करायचे होते, मुद्दलात आयुष्यात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलून आपला वेळ आणि भविष्य का खराब करायचं? व्यसन यासाठी सांगितले नाही की मला ते पूर्ण सोडायचे होते आणि लग्न ठरल्यावर फक्त एकदा प्यायलो.. झाल्यापासून एकदाही नाही..
एकंदर मस्त चाललंय आमचं!
Pages