डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधानिशा तुमच्या लिखाणावरुन तुम्ही सायकियाट्रिस्ट चा सल्ला घ्याल अशी मला खात्री वाटते. कारण तोच एक वैज्ञानिक दृष्टीकोण आहे. तुम्ही जिनियस असल्यामुळे प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणारच. वर मी एका प्रतिसादात तुम्हाल तो प्रोजेक्ट सुचवला आहे.
https://www.healthymind.org/
आनंद नाडकर्णी यांच्या आयपीएच संस्थेशी संपर्क करा.

पण धाग्यात बंद करण्यासारखं सिरियस काय आहे..? >> कुठलेही डिस्क्लेमर्स, कुठलेही हेल्पलाईन फोन नंबर्स इ न देता असं मरणाविषयक मुक्तचिंतन सामाजिक व्यासपीठांवर योग्य नाही. वाचक कुठल्या मनस्थितीत असेल सांगता येत नाही. बहुतेक संकेतस्थळांनी सुशांतविषयी बातम्या देतानासुद्धा हे तारतम्य बाळगलं होतं. लेखिकेकडून अशा तारतम्याची अपेक्षा नाही पण अ‍ॅडमिनकडून आहे.

खरं आहे. मी या धाग्याच्या समर्थनात नाही. हा कोतबो म्हणून काढला असेल तर आता सपोर्ट मिळाल्यावर बंद करायला हरकत नाही.

धन्यवाद सर्वांनाच ...

रुपाली , शारीरिक दुरावस्थेत असलेली , अपंग माणसंही जिद्दीने जगत असतात हे मला माहीत आहे ... त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहेच ... पण हे जर जगू इच्छिताहेत तर तू जगायचं नाही म्हणणं हा उद्धटपणा किंवा आयुष्याप्रती अनग्रेटफुल असणं किंवा जे आरोग्य , चांगली परिस्थिती मिळाली आहे त्याचा अवमान करणं आहे का , असे प्रश्न माझे मलाच पडायचे पूर्वी .... पण नंतर त्यात काही अर्थ नाही असं जाणवलं .. असं खरंच नाहीये की मला लोक ज्या कठीण परिस्थितीत जगतात त्याची जाणीव नाहीये किंवा जे मिळालं आहे ते किती अमूल्य आहे याची जाणीव नाही .... मला आहे जाणीव खरंच . हे to be or not to be and why be , what makes people want to be .. असे विचार आहेत . जे वाईट शारीरिक अवस्थेतही प्रिय नातेवाईकांसाठी जगायची इच्छा ठेवतात ते खरंच ग्रेट आहेत ...

पण मी स्वार्थी आहे खूप . काही वर्षांपूर्वी या डिप्रेशनच्या उपचारांवेळी एक पर्सनॅलिटी की कॅरॅक्टर टेस्ट केली होती ... तिचे रिजल्ट्स आल्यावर डॉक्टर बोलता बोलता म्हणाले होते की थोडा सेल्फीशपणा आहे स्वभावात ... तेव्हा मला राग आला होता की काय वाट्टेल ते बोलताहेत ... पण नंतर ते दिसत गेलं स्वतःच्याच वागण्यात ... आताच पहा ना , आत्महत्या न करण्याचं कारण मागे राहिलेल्यांना वेदना होईल हे नाही , तर मला पुढे वाईट जन्म मिळेल ही भिती . तुम्ही या लेव्हलचा स्वार्थीपणा इमॅजिनही करू शकणार नाही इतक्या निःस्वार्थी आहात .... जबाबदाऱ्यांचं म्हणाल तर that's one thing I hate and dread most .. तुम्ही वडलांच्या सेवेचं सांगितलं आहे ... मला तर तीही भीतीदायक गोष्ट वाटते .. ही जबाबदारी पुढे कधीतरी अंगावर पडेल याची .... सिरीयसली सेवा करण्याचं bone माझ्या बॉडीत कुठे नाहीये ... असं नाही की माझं प्रेम नाही त्यांच्यावर I could give him both my kidneys if it saves his life .. पण सेवेची जबाबदारी नको , त्यापेक्षा टकमक टोकावरून ढकलून दिलं मला तरी चालेल .... जेमतेम पास होण्याची योग्यता असलेल्या मुलाला निव्वळ आईवडिलांच्या प्रेमापोटी JEE पास होणं जेवढं अशक्य असेल तेवढंच अशक्य प्रेमाने सेवा करणं हे माझ्यासाठी असेल ... त्यांना काही होऊ दे नको , जे काही व्हायचंय ते मला होऊ दे ही माझी नेहमी प्रार्थना असते , पण ती स्वार्थातूनच जन्माला आली आहे ... जसं रक्त बघणं काही जणांना चक्कर आणायला पुरेसं असतं तसं आजारी माणसाला पाहणंच मला ड्रेन करतं .... या रिस्पॉन्सिबीलिटी पेक्षा मला 3 वेगवेगळ्या प्रकारचे कँसर झाले तरी परवडले .. म्हणजे निदान कसलीही जबाबदारी अंगावर पडणार नाही ...

बघा , कर्तव्य पालनासाठी क्षमता मिळावी अशी इच्छा करण्या ऐवजी काहीतरी आजार व्हावा जेणेकरून जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा कोणीही करणार नाही अशी दळभद्री इच्छा करत आहे ... What a mess.. असलं स्वार्थी आणि बिनकामाचं माणूस असल्यापेक्षा नसलेलं बरं असंही वाटतं पण आपल्या हातात नाही ...

स्वाती२ यांनी अ‍ॅडमिनने संपादन करावे अशी सूचना केली आहे. ते सुद्धा चालेल. त्यालाही अनुमोदन. पण एक धागाकर्तीला मदत हवी म्हणून दहा इतरांना मदतीची गरज लागेल अशी परिस्थिती निर्माण करायची ह्याला काय अर्थ आहे!

तुम्ही समुपदेशन घेतलं आहे का?
सॉरी आधी कुठे लिहिलं असेल तर माझ्या लक्षात नाही. घेतलं नसेल तर प्लीज घ्या.
सीमंतिनी सहमत आहे.

बापरे अजून 40 वर्षे....असे वाटत असेल तर उलट विचार करा.... अरे वा अजून 40 वर्षे फक्त. मग रोज एक दिवस कमी झाला म्हणून आनंद वाटेल.... it works
थोडं विषयांतर करतेय.
https://youtu.be/PfmXm6ucyOM
https://youtu.be/6L1MbL_azrc
https://youtu.be/dGt1HON0iRk

मला ज्ञानेश्वर म्हणून शाहू मोडक का आठवत आहेत? त्यांचा ही सिनेमा होता काय??>>>>

मी दिलेल्या दुसऱ्या लिंकमध्ये, भिंत चालवायच्या प्रसंगात तेच आहेत.

राधानीशा यांचे एकूण लेखन पाहता त्या काही असा उलटसुलट निर्णय घेतील असे वाटत नाही पण धागा बंद करावा/न करावा यावर एक छान टेस्ट आहे -
आपल्या घरातील एक व्यक्ती समजा नैराश्यातून जात आहे आणि तिच्यावर यासाठी उपचार सुरु आहेत. अचानक तुम्हाला एके दिवशी ती वरील मजकूर लिहून पाठवते. ते वाचल्यावर तुम्ही छान लिहिले आहे म्हणून बाकीच्यांना फॉरवर्ड करणार की लगेच तिच्याबरोबर समोरासमोर बसून आवश्यक ती चर्चा करणार?

धागा बंद करणं बरोबर नाही, कारण लेखिकेने त्यांचे विचार मांडले आहेत ते मोकळे होणे ही फायदेशीर असू शकते. ते दार बंद होऊ नये म्हणून.
पण तो एडिट करुन हेल्पलाईनचे नंबर इ. ठळकपणे टाकणे, प्रतिसाद उडवणे (मला व्यक्तिशः प्रकाश घाटपांडेंचे प्रतिसाद रोमॅटसाईझ न वाटता चर्चात्मक वाटलेले) प्रतिसाद देणार्‍यांना काय तारतम्य बाळगावे याची सक्त ताकिद देणे इ. मात्र करावेच करावे.
अशा धाग्यांत प्रत्येक प्रतिसादाला शेपुट म्हणून हेल्पलाईन नंबर, डिस्केमर इ. जोडण्याची सॉफ्टवेअर मध्ये सोय करावी.

>>पण मी स्वार्थी आहे खूप . काही वर्षांपूर्वी या डिप्रेशनच्या उपचारांवेळी एक पर्सनॅलिटी की कॅरॅक्टर टेस्ट केली होती ... तिचे रिजल्ट्स आल्यावर डॉक्टर बोलता बोलता म्हणाले होते की थोडा सेल्फीशपणा आहे स्वभावात ...>.
खरे तर डॉक्टरांनी उपचाराच्या काळात असे तुम्हाला बोलून दाखवायला नको होते. स्वार्थी सगळेच असतात. तुम्हाला जे जबाबदारी नको वाटते ते स्वार्थापोटी नाही तर भीतीपोटी वाटते. जवळच्या माणसाची सेवा -सुश्रुषा करणे हे शरीरापेक्षाही मनाला थकवा आणणारे असते. तो थकवा आपल्याला सोसणार नाही असे तुम्हाला वाटते तर त्यात काही गैरही नाही. मात्र जे भविष्यात घडायची केवळ शक्यताच आहे त्याचा विचार करुन आत्ता आयुष्य नाकारणे हे आजारी असणे झाले. मन आजारी नसलेली व्यक्ती स्वतःला काही कारणाने जमणार नाही हे मान्य करुन रिसोर्सेस शोधेल, जसे की नर्सिंग ब्युरो, इतर सपोर्ट ग्रुप, आर्थिक बाबींचा आढावा घेवून खर्चाची तरतूद करणे.
तुम्ही आजारी आहात, तेव्हा स्वतःला स्वार्थी म्हणत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे थांबवा, उपचार घ्या. हे सगळे मागे पडून छान आनंदात जगणे नक्की जमेल.

अमितव + १.

अवांतर ( आता आठवले म्हणुन, येथील विषयाशी तुलना नाहीय):
दारू कशी प्यावी, वाईन क्लब वगैरे धाग्यांंवर आणि तशा प्रतिसदांवर मद्यसेवनाबाबतचा वैधानिक इशारा द्यायला हवा.
चित्रपट, दूरदर्शनवरही तसा वैधानिक इशारा असतो, भारतात दरवर्षी २.६ लाख लोक मद्यप्राशनाने मरतात.

राधानिशा, counseling घेत असाल तर ते घेत रहा. छान विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती दिली आहे देवाने तर आपण ती कशासाठी वापरू शकतो असा विचार करून बघ.
There are so many problems in the world. आपण imagine करायचं की कसं काय सोडवता येतील हे प्रश्न? आपल्याला पाहिजे तो प्रश्न घ्यायचा आणि ब्रेनस्टॉर्म करायचं. मी इथे दहा प्रश्न लिहीते.
1. तुला माहीती असलेल्या शहराचं पूर्णपणे नव्याने प्लॅनिंग करायचं असेल तर कसे करशील?
2. मुंबई लोकल मधली गर्दी कमी कशी करता येईल?
3. शहरातील घनकचरा व्यवस्थापन कसे सुधारता येईल?
4. तुझ्या मनातली आदर्श लायब्ररी कशी असेल?
5. घरगुती पोळ्या करण्यासाठी वीज न वापरता यंत्र तयार कसं करता येईल? यात एंड टू एंड प्रोसेससाठी एकापेक्षा अधिक यंत्र लागू शकतात.
6. एखाद्या रिकाम्या एक एकर प्लॉटवर शेती करायची असेल तर कोणती पिकं घेशील, कोणती झाडं लावशील?
7. स्वतःचे घर डिझाईन करायचे असेल तर त्यात काय काय आवडेल? त्याचा प्लॅन कसा बनवशील?
8. जर 100 all time favorite (माबो स्लँगमध्ये अॉटाफे) गाण्यांची, सिनेमांची यादी बनवायची असेल तर कोणकोणते निकष वापरून बनवशील? कोणती गाणी सिनेमे घेशील?
9. काश्मीर प्रश्न सामोपचाराने सोडवायचा असेल तर काय करावे लागेल?
10. कुठलही यंत्र/वस्तू घेऊन त्यात किमान दहा सुधारणा सुचव.
11. दहा ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स - कधी, कशी, कुठे काय पाहणार सगळं in detail.
यातलं काही खूप भारी वाटलं ना तर लिहून ठेवायचं!
मी सहसा झोपताना हा असलाच काहीतरी गुंता घेऊन विचार करत बसते! आपलं डोकं नेहमी कुठल्या तरी सकारात्मक विचारांत गुंतलेलं राहीलं ना की मग अधूनमधून उगवणारे निराशेचे विचार काबूत ठेवायला मदत होते. Hope this helps!

लेख अत्यंत भयप्रद वाटला मला ... अस्वस्थ वाटले प्रचंड!!
सध्याच्या आव्हानात्मक काळात हे उदात्तीकरण/ मरावे वाटण्याचे समर्थन प्रचंड धोकादायक आहे. यात योग्यसे संपादन करायला वाव आहे का नाही हेही नीट कळत नाही म्हणून बंद केलेला बरं असं वाटतयं.
हा कोतबो धागा नाही , ललित आहे. त्यामुळे अवाक होऊन गप्प बसले होते.
यावरून कुणीही प्रेरणा घेऊन जीवाचे बरं वाईट केले तर या विचाराने थरकाप उडालाय. धागाकर्तीला चर्चा हवी असेल तर वेगळा नैराश्यया विषयावरील धागा उघडावा ज्यात आत्महत्येचे समर्थन / किंवा मेलं तर किती छान असा संदेश जाणार नाही.
धागाकर्ती यांनी बरेच सकारात्मक प्रतिसाद देखील कसे पटत नाहीत हे स्पष्ट केलंय. त्यामुळे दरवेळेस हे विचार कसे "नैसर्गिक" ( म्हणून हे भयप्रद ) आहेत हे अधोरेखित होतयं त्यामुळे काही सल्ला देणार नाही.
धागाकर्तीला शुभेच्छा.
जिज्ञासा यांचे प्रतिसाद आवडले , प्रेरणादायी वाटले.

सॉलिड कन्सेप्ट्स आहेत जिज्ञासा.
यातल्या १,३,५,७,१० वर विचार आणि काम करायला विशेष आवडेल.

५ नंबर - आमच्या 'ह्यांना' विचारा. त्यांनी शोधलय Wink पण पहिलं खमकं होतं म्हणून अधिक आली नाहीत...

पहिलं खमकं होतं म्हणून अधिक आली नाहीत...>> Rofl Rofl Rofl

आधी मला कळलंच नव्हतं.. नंतर मी पुन्हा वर जाऊन ५ नंबरचा प्रश्न पाहिला.. पुन्हा वाचलं अन जो हास्याचा स्फोट झाला की काही विचारु नका Biggrin Biggrin Biggrin

>>>>५ नंबर - आमच्या 'ह्यांना' विचारा. त्यांनी शोधलय Wink पण पहिलं खमकं होतं म्हणून अधिक आली नाहीत...>>>>> आई ग्ग!!! =)) =)) सीमंतिनी टु गुड!!

मी पण प्रवासाचे स्वप्न बघते नेहमीच , कंटाळा आला की flight , hotel rates , अंतर, बघण्यासारखे काय आहे याची यादी करते. परवाच ऋषिकेश, ग्रीस आणि सँन डियेगो केले Happy सगळं पाठ आहे शिवाय कैलास मानसरोवर , हेमकुंड वगैरे पुन्हा पुन्हा वाचून पाठ केले आहे. जाणार कधी तरी .... स्वप्नं पहात रहा प्रेरणा सापडेल. मुलं हातावेगळी झाली की नर्मदेच्या जवळ कुठेतरी आदिवासी मुलांना बीजगणित शिकवायचयं , शाळा काढायची आहे . ते मी आणि माझ्या मैत्रिणी मिळून करणार आहोत. मरताना कृतार्थ वाटलं पाहिजे त्यासाठी जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
Happy

सीमंतिनी , ही युक्ती वापरण्यात आली तर खिचडी टाकतील आमच्याकडे Lol

To be or not to be that is the question.
गीता वाचली आहे का? वाचून पहा. पहिलाच अध्याय अर्जुनविषादयोग. अर्जुनाला जगावसं वाटत नाही. मला दुर्योधनाने मारलं आणि मी मेलो तरी मला चालेल असं तो म्हणतो.
दुसऱ्या अध्यायापासून कृष्ण त्याला यातून बाहेर काढतो. "भगवदगीता जशी आहे तशी" वाचत आहे त्यात सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. कृष्ण जगातला पहिला सायकॉलॉजिस्ट आणि अर्जुन आद्य पेशंट.
संसार करून सुखी झाला असा माणूस आढळत नाही. सुखी माणसाचा सदरा मिळत नाही. आयुष्यात स्ट्रगल असतातच. पण अकर्म (कर्म न करणे) हा उपाय नाही. जगायचं नाही हा पर्याय नाही.

सीमंतिनी यांचे सगळे प्रतिसाद+१.

जीवनात अर्थ नाही असे मलाही सतत वाटत असते. बरे ह्या जगण्याला अर्थ नसतानाही असेच जगणे जगावे लागणार अशी जनता (मुलं) आपण जन्माला घातली हे तर त्याहून मोठं पातक. पण म्हणून जीव द्यावा असे नाही. जिज्ञासा, अमितव म्हणतात तसे अजून बरेच आहे, बरेच आहे अशी टोलवाटोलवी बरी असते. म्हणून सीमंतिनी+१.

रिस्पॉन्सिबीलिटी पेक्षा मला 3 वेगवेगळ्या प्रकारचे कँसर झाले तरी परवडले .. म्हणजे निदान कसलीही जबाबदारी अंगावर पडणार नाही ........

एका तरी अशा पेशंटचे काय हाल होतात पाहिले आहेस का?
Seeking attention ahe he.arthat he मुद्दामहून करता नाहीस.पण यासाठी psychiatrist kde jane गरजेचे आहे.
वर जिज्ञासा,सीमंतिनी,स्वाती यांनी छान सल्ले दिले आहेत.

सी, लोल!
सनव, +1 गीतेतून नक्कीच प्रेरणा मिळते.
आचार्य विनोबा भावे यांची गीतेवरची प्रवचने खूप छान आहेत. साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
ज्यांना सोपा अभ्यास अवघड करून वाचायला आवडतो त्यांनी विनोबांचे ईशावास्य वृत्ति हे पुस्तक नक्की वाचावे. फारच उच्च आहे __/\__
ही आणि विनोबा भावे यांची इतर अनेक पुस्तके आता खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या लिंकसाठी मंजूताईंचे विशेष आभार!
लिंक - http://vinoba.in/#/landingPage

राधा निशा तुम्ही या आधी पण डिप्रेशन वर धागा काढला होता ना. आई व्हायचं की नाही हा पण तुमचाच धागा. तुम्ही नक्की मदत मागत आहात की उगीच त्याचत्याच विषयांवर चर्चा घडविण्यासाठी नवीन धागे काढता?

पाहिले आहेत देवकी ताई .. असह्य शारीरिक वेदना सहन करण्याची तयारी आहे पण वाईट - नालायक अपत्य असण्याचं गिल्ट नको आहे .. जी एक गोष्ट करायची अजिबात क्षमता नाही तीच कर्तव्य म्हणून वाट्याला आली आणि जमली नाही तर भयंकर गिल्ट वाटणार आहे .. लोक वाईट म्हणतील ते निराळंच की काय ही वडलांची सेवा करत नाही .. जर मीच आजारी पडले तर मग कोणी काही अपेक्षा ठेवण्याचा प्रश्न उरणार नाही ... दर्द से डर नहीं लगता , लोगों के expectations और जजमेंट से डर लगता हैं ...

Pages