हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..
40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..
आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...
आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..
70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...
हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..
लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...
आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....
केशव तुलसी --- तुम्ही मानसिक
केशव तुलसी --- तुम्ही मानसिक अनारोग्य आणि मेडीटेशनचे परिणाम --- यावर काही लिहा ना. म्हणजे एक कृती / संस्कार म्हणून ते करणार्या आम्हाला त्याचा शास्त्रीय भाग कळेल.
>>>>
कारवीजी,मी वैद्यकीय तज्ञ नाही.तरीही मला जमेल तसे योग्य शास्त्रिय माहीतीचे संकलन चालू आहे.पुर्ण झाल्यावर इथे देणार आहे. लेख लिहून.
मला स्वतःला आयुष्यात विरक्ती आली आहे .जो की मेंदूच्या अवस्थेचा परिपाक आहे हे माहीत आहे.माझे कौटुंबिक आयुष्य मला न आवडणारे व सतत मनाला क्लेष देणारे आहे.यापासून दूर जायचे आहे .भटके ,विरक्त ,समाजाशी/कुटुंबाशी फक्त नावपुरता सबंध राहिल असे बघायचे आहे. प पक पकाक मधे भुत्या रहात असतो तसे.
राधानिशाने धागा काढला ,तो वाचताना प्रत्येक वाक्याला "अरे ,हे तर आपणच आहोत!" असे वाटत होते.इतके छान एक्स्प्रेस करता येते तिला .
मला भटके ,समाजापासून दूर एकांतात जगायचे आहे.संसारात राहिले की मानसिक त्रास हा असतोच् असतो.जबाबदारीचा कंटाळा आला आहे.असे आयुष्य जगण्याचे कोणते मार्ग आहेत.?
महत्वाचा विषय आहे.
महत्वाचा विषय आहे. मायबोलीकरांचे प्रतिसाद/ अनुभवही छान आहेत, कारवी यांचे प्रतिसाद छान आहेत.
केशव तुलसी तुम्ही नवा विषय
केशव तुलसी तुम्ही नवा विषय ओपन करत आहात. या निमित्त विरक्ती,तटस्थता, औदासिन्य, निष्क्रियता, अल्पसंतुष्टत्व अशा छटांवर चर्चा व्हावी
अनुभव, चांगले किंवा वाईट, हे
अनुभव, चांगले किंवा वाईट, हे सर्वोच्च आहेत, असे अस्मादिकांचे मत. वाईट अनुभव सुद्धा घेणे शक्य असेल तर घेतच राहावेत. नॉन एक्सिस्टन्स इस अननोन अँड इनएविटेबल, तेव्हा मिळतात ते चांगले वाईट अनुभव हि आपल्या अस्तित्वाची एकमेव फलश्रुती आहे, तीत खंड स्वतःहून पाडू नये असे वाटते. (स्वतःसाठी.)
डिप्रेशन म्हणजे नक्की याचे अँटी असते अशी समजूत आहे, कोणत्याही प्रकारच्या अनुभवांमधून रस उडणे. चांगल्या व वाईट सर्व अनुभवांना थांबवण्याची इच्छा होणे.
तेव्हा मिळतात ते चांगले वाईट
तेव्हा मिळतात ते चांगले वाईट अनुभव हि आपल्या अस्तित्वाची एकमेव फलश्रुती आहे, तीत खंड स्वतःहून पाडू नये असे वाटते. (स्वतःसाठी.)>> हे खूप छान वाक्य आहे. मी प्रत्येक अनुभवाला किंवा व्यक्तीला कल्पनेला नव्यानेच सामोरी जाते. जोपरेन्त जोडे बसत नाहीत तोपरेन्त प्रत्येक व्यक्ती आपली मित्र, प्रत्येक अनुभव आपला युनिक. चांगला असेल तर खुषी. नाही तर लर्निन्ग एक्स्पीरीअन्स. प्रत्येक कल्पना प्रत्य क्षात आणून बघायची जमलंतर बेस्ट नाहीतर .. व्यक्तींच्या संदर्भात आपल्या अस्तित्वाचा व भावनांचा इतरांवर बोजा पडू नये इतके डिटॅच केले आहे आता स्पेस शिप घेउन कृष्ण विवरात उडी घ्यायचे बाकी आहे. ते पण मजेत करणार. ( इंटर्स्टेलर लास्ट सीन) पण जगताना डॉकिंग सीन अनुसार जीवनात इट इज नेसेसरी म्हणत इतक्या अवघड बाबी केल्या त्या जमल्या हेच आता नवल वाट्ते. आलेला डाव खेळायचाच.
शिवाय असे वाट्ते की इतकी गोड मुले व्यक्ती घरचे आधार स्तंभ अकाली जातात. सैनीक मरून जातात. तर आपल्या हातात असलेल्या क्षणांचा आपण आदर केला पाहिजे . लाइफ इज इंडीड प्रेशस अँड फ्रॅजाइल.
उद्या इलॉन मस्क ला मंगळावर एखादी बुरशी सापडली तर ती मीच असेन दूर वाहावत गेलेली. ही ही. सितारोंसे आगे जहां और भी है. यावर माझा विश्वास आहे.
व्यक्तींच्या संदर्भात आपल्या
व्यक्तींच्या संदर्भात आपल्या अस्तित्वाचा व भावनांचा इतरांवर बोजा पडू नये इतके डिटॅच केले आहे आता स्पेस शिप घेउन कृष्ण विवरात उडी घ्यायचे बाकी आहे. ते पण मजेत करणार.
>>>> तुमच्याशी फार रिलेट करते मी अमा..... सुखदु:खहीन वैराग्य वाटते हे. स्वभाव म्हणा , वैराग्य म्हणा , किंवा अशा स्वभावामुळे आलेल्या अनुभवाचे केलेले त्यातल्यात्यात logical विश्लेषण म्हणा... मी आनंदच शोधते कशातही... बऱ्याच जणांना अध्यात्म उदासीन वाटते. पण ते खरंतर विरुद्ध आहे याच्या , आहे त्यात संतुष्ट रहाणे पण प्रयत्न न सोडणे हेच खरे अध्यात्म/वैराग्य वाटते मला.
१. व्यक्त होणे किंवा होण्याची
१. व्यक्त होणे किंवा होण्याची संधी मिळणे आणि
२. त्या व्यक्त होण्याला प्रतिसाद मिळणे आणि योग्य तो प्रतिसाद मिळणे
ह्या दोन गोष्टी उपचार म्हणून मला स्वत:ला फार महत्वाच्या वाटतात. हिच फार नाजूक प्रक्रिया आहे. संधी मिळालीच नाही किंवा मिळाली पण अयोग्य किंवा भलताच किंवा भलत्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला कि "काय म्हणून व्यक्त झालो/झाले" असे त्या व्यक्तीला वाटते. पुन्हा ती व्यक्त होण्याचे धाडस करणार नाही. असे नको व्हायला. ती व्यक्ती ज्यातून जात आहे त्याच मानसिक अवस्थेतून जाणे आणि साधेच पण सकारात्मक बोलणे (सल्ले किंवा तत्त्वज्ञान नव्हे). बस्स! इतका छोटासा डोस सुद्धा पुरेसा असतो अनेकदा. पण समस्या अशी आहे कि तोच मिळत नाही आजकाल
अमा , आलेला डाव खेळून टाकावा
अमा , आलेला डाव खेळून टाकावा हा विचार आणि attitude विचार करण्यासारखा आहे. एकदम आवडला.
अमा ,
अमा ,
तुमच्या प्रतिसादातल्या एक एक शब्दाशी सहमत ! तेवढे ते नानकटाई आणि सिझलर्स सोडून
केशव तुलसी आणि धागालेखिका यांचे प्रश्न त्यांच्या वयासंदर्भाने भिन्न आहेत. चू भू द्या घ्या .
सांसारिक विवंचना कोणाला चुकल्या आहेत ? त्याने गांजून जाणे , नातलगांकडून किंवा इतरांकडून अपेक्षाभंगाचे, उपेक्षेचे अनुभव येणे हे ही स्वाभाविकच. व्यक्ती तितक्या प्रकृती! पण तरीही सामोरा आलेला प्रतिकूल डाव कुरकुर न करता पूर्ण शक्तीनिशी समरसून खेळण्यातसुद्धा एक मजा आहे , झिंग आहे. यश किंवा अपयश हे बायप्रॉडक्ट; अशा दृष्टीकोनातून पाहावे हे मा वै म.
अस्मिता यांचाही प्रतिसाद आवडला. अध्यात्म हा थोडा गहन विषय आहे. सोपे करून सांगायचे तर आपले प्रयत्न करावेत आणि देवावर भार टाकून निश्चिन्त राहावे. देवावर विश्वास नसेल तर आपले मन खंबीर ठेवावे आणि प्रत्येक अनुकूल/ प्रतिकूल परिस्थिती तर्काच्या कसोटीवर तपासून पाहावी. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटतील ते उपाय करावेत आणि परिणाम स्वीकारावेत. पुढे जावे.
आपल्या हातात असलेल्या
आपल्या हातात असलेल्या क्षणांचा आपण आदर केला पाहिजे . लाइफ इज इंडीड प्रेशस अँड फ्रॅजाइल. +१
मनाचा थांग जेव्हा लागेल
मनाचा थांग जेव्हा लागेल म्हणजे मेंदू मन निर्माण करतो की मन मेंदू व शरिराला नियंत्रित करते हे जेव्हा कळेल तेव्हा बरेच प्रश्न सुटतील.सध्यातरी मेंदू=मन असा ॲप्रोच बरोबर आहे.
<< जोपरेन्त जोडे बसत नाहीत
<< जोपरेन्त जोडे बसत नाहीत तोपरेन्त प्रत्येक व्यक्ती आपली मित्र, प्रत्येक अनुभव आपला युनिक. चांगला असेल तर खुषी. नाही तर लर्निन्ग एक्स्पीरीअन्स. >>
----- अमा छान विचार आणि सकारात्मक दृष्टीकोन.
"ती व्यक्ती ज्यातून जात आहे
"ती व्यक्ती ज्यातून जात आहे त्याच मानसिक अवस्थेतून जाणे आणि साधेच पण सकारात्मक बोलणे (सल्ले किंवा तत्त्वज्ञान नव्हे). बस्स! इतका छोटासा डोस सुद्धा पुरेसा असतो अनेकदा. पण समस्या अशी आहे कि तोच मिळत नाही आजकाल "
हज्जार वेळा सहमत.
ह्यालाच सह अनुभूति म्हणतात. सहकंप आणि सहसंवेदनासुद्धा.
"मनाचा थांग जेव्हा लागेल
"मनाचा थांग जेव्हा लागेल म्हणजे मेंदू मन निर्माण करतो की मन मेंदू व शरिराला नियंत्रित करते हे जेव्हा कळेल तेव्हा बरेच प्रश्न सुटतील.सध्यातरी मेंदू=मन असा ॲप्रोच बरोबर आहे."
मन भरकटते. इकडे तिकडे धावते. त्यावर आपला म्हणजेच आपल्या मन/मेंदू बुद्धीचा ताबा raahaat नाही. ह्या विचारांच्या लहरी जर चॅनलाईझ करता आल्या, लेझर बीम सारखा एक शक्तिशाली झोत निर्माण करता आला तर ही मनाची हृदयाची कवाडे म्हणतात ती भेदता येतात. आत लपलेला माझा मी मला सापडतो. म्हणजे "मी कोण " हे कळते. आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक कुवत, पात्रता, क्षमता हे सारे दिसते. को s हं चा उलगडा होतो.
आणि मनाला असे चॅनलाईझ करण्यासाठी, स्थिर आणि शक्तिशाली करण्यासाठी, अहंभाव लोपवण्यासाठी (कारण सोs हम हे कळलेले असते.) विज्ञानात आणि अध्यात्मात दोन्ही ठिकाणी उपाय / मार्ग आहेत.
आणि मेंदूमध्ये काही केंद्रे
आणि मेंदूमध्ये काही केंद्रे सवयीने, बाय डिफॉल्ट वेगवेगळे, मुख्यत : नकारात्मक विचार करीत असतात हे अगदी सिद्ध झालेले आहे.
अमा, खूप छान पोस्ट.
अमा, खूप छान पोस्ट.
मन भरकटते. इकडे तिकडे धावते.
मन भरकटते. इकडे तिकडे धावते. त्यावर आपला म्हणजेच आपल्या मन/मेंदू बुद्धीचा ताबा raahaat नाही. ह्या विचारांच्या लहरी जर चॅनलाईझ करता आल्या, लेझर बीम सारखा एक शक्तिशाली झोत निर्माण करता आला तर ही मनाची हृदयाची कवाडे म्हणतात ती भेदता येतात. आत लपलेला माझा मी मला सापडतो. म्हणजे "मी कोण " हे कळते. आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक कुवत, पात्रता, क्षमता हे सारे दिसते. को s हं चा उलगडा होतो.>>>>मला हा कोहम चा शोध अनंत वाटतो. तसच हे सार ’कुठून’ येत मधील कुठून चा शोध ही तसाच वाटतो. निसर्गातील विविधता व सुसुत्रतता पाहिली की हा कुठून चा शोध घ्यावासा वाटतो. ये कौन चित्रकार है।
कारवी लिहायचे राहून गेले ,
कारवी लिहायचे राहून गेले , सगळे प्रतिसाद परत परत वाचण्यासारखे आहेत.
अमा, अतुल प्रतिसाद आवडले.
आलेला डाव खेळायचाच. लर्निंग एक्सपरिअन्स नाहीतर खुषी. फार आवडलं.
रडलं की नंतर माझं डोकं दुखतं
रडलं की नंतर माझं डोकं दुखतं खूप किमान 5 - 6 तास ..... काल रडले सकाळी एकदा पाऊण तास साधारण .. ते थांबल्यावर मग फोन घेऊन युट्यूब उघडलं .. . फ्रॅंक जेम्स हा एक युट्यूबर सापडला आहे 4 - 6 दिवसांपूर्वीच .... त्याचा इन्ट्रोव्हर्ट स्ट्रगलचा एक व्हिडिओ लावला आणि हसत सुटले .. पोटात दुखून डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले ... दुपारी छान हसतखेळत जेवण झालं .. संध्याकाळी मैत्रिणीला सांगितलं , म्हटलं कदाचित पिरियड 2 - 4 दिवसावर आले असतील ( मी नोंद ठेवत नाही तारखेची ) ... ती म्हणाली रडून झाल्यावर बरं वाटतं ... प्रत्येकाचं रडू वेगळं असूच शकतं ... कोणाला ते हलकं करेल तर कोणाला हल्लक ..
तिला पिरियड चालू असताना क्रॅम्प्स आणि बॅकपेनचा त्रास होतो , त्याने हालत नकोशी होते .... मी म्हटलं - जर स्वॅप करता आलं असतं तर मी तुझं दुखणं कधीही घेतलं असतं पण स्वॅप करून मी एक्सपेरीएन्स करते ती पेन तर मी शत्रूलाही देणार नाही , मग तुला तर नाहीच नाही ... I wouldn't wish this on my worst enemy ( I don't have any enemy )
संध्याकाळी पुन्हा एकदा रडू ... जास्त नाही 10 मिनिटं असेल.. डोकं अगदी किंचित दुखत होतं .. म्हटलं आजची डोकेदुखी टळली असावी हसण्याने काउंटर डोस होऊन .. रात्री पर्यंत खूप वाढलं पण ... मग ऍसिडिटीची गोळी घेतली .. आता त्याने काय होणार , ऍसिडिटी मुळातच झाली नव्हती .. पण प्लासीबो इफेक्ट की काहीतरी - गोळी घेतली आता थांबणारच .. सकाळपर्यंत 90 % थांबलं .. मग अगदी जरा जरा दिवसभर .. फक्त तासाभराच्या रडण्याने इतका वेळ त्रास ...
असो ... पुढच्यावेळी रडू आलं की सुरुवातीलाच स्टॉप करण्याचा प्रयत्न करणार आहे ... ते कधी येणार हे माहीत नसतं त्यामुळे त्यासाठी प्रिपेअर्ड राहता येत नाही ... तरी आता यापुढे प्रयत्न करणार आहे ...
सगळं छान चालू असताना येणारं हे रडू हा शुद्ध डिप्रेशन विकाराचा परिणाम आहे .. जसा ताप येणं न येणं किंवा अचानक डोकं दुखू लागणं आपली इच्छा असूनही थांबवता येत नाही , तसा हा इमोशनचा अतिरेक होऊन उमाळा आवरत नाही .. अत्यंत फडतूस कारण रडायला पुरे होतं .. ते सुद्धा फक्त निमित्त हवं म्हणून नाहीतर ती गोष्ट निरर्थक आहे हे लॉजिकल मेंदूला पटवून देण्याचा प्रयत्न करूनही रडू थांबत नाही ... कुठले तरी वेदनेच्या हार्मोनचे नळ फिरवले गेलेले असतात आत आणि टाकी रिकामी होईपर्यंत वाहू देण्याशिवाय काही करता येत नाही ... ती झाल्यानंतर या कारणावरून आपण रडलो याबद्दल हताश ( exasperated ) वाटतं अक्षरशः ... मी ओके आहे .. मी खूप differentiate करू शकते , कुठली भावना खरी / नॉर्मल आणि कुठली टेम्पररी , डिप्रेशनने निर्माण केलेली ... पण ज्यांचं हे रोज किंवा वारंवार होतं ते लोक फार वाईट परिस्थितीतून जात असतात ... ते हा फरक करू शकत नाहीत ..
मी आता छान आहे ... रोज थोडी एक्सरसाईझ सुरू केली आहे , एक आठवडा झाला ... डाएट थोडं चेंज केलं आहे.. its not perfect yet , but getting there .... डार्कचा शेवटचा सिजन हळूहळू मंदगतीने बघत आहे ... आज मिर्झापूरच्या पहिल्या सिजनचे 2 एपिसोड पाहिले ... वाचन थोडं थोडं चालू आहे ...
"मी आता छान आहे" !
"मी आता छान आहे" !
किती आश्वासक आणि सकारात्मक वाटलं!
वाटचाल अशीच चालू राहो. धीमेपणाने पण सातत्याने...
छान वाटलं तुझी सकारात्मक
छान वाटलं तुझी सकारात्मक पोस्ट पाहून!
म्हटलं कदाचित पिरियड 2 - 4 दिवसावर आले असतील ( मी नोंद ठेवत नाही तारखेची) >> नोंद ठेवत नसशील तर ठेवायला सुरुवात कर असं म्हणेन. उपयोगी पडणारी चांगली सवय आहे ही एक. खूप सोपं पण आहे. बरीच वेगवेगळी ॲप्स उपलब्ध आहेत. तुला जे सोयीचं वाटेल ते वापरू शकतेस. लिंक - https://www.womenshealthmag.com/health/g26787041/best-period-tracking-apps/
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-presidential-elections/i...
जेव्हा मला डाऊन वाटते तेव्हा मी यांचे 'ही श्री ची इच्छा' पुस्तक वाचते.
अनेक अडचणींवर मात करुन, रिस्क टेकिंग वृत्ती ठेवून पुढे आलेला माणूस.
डिप्रेशन चे माहिती नाही पण एरवी एक प्रेरणा म्हणून हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचावे.
Submitted by radhanisha on 4
Submitted by radhanisha on 4 November, 2020 - 23:15 >>>>
खूप काळाने प्रतिसाद पाहून छान वाटले, राधानिशा. चांगली वाटचाल
आता आदत से मजबूर २ शब्द --
** रडल्यावर डोके चढत असेल तर रडताना पूर्णवेळ हलका शॉवर ( सीझनप्रमाणे थंड / कोमट ) घेउन बघा केसावरून. रडताना निर्माण होणारा डोक्यातला ताण / उष्णता निघून जायला मदत होईल. मात्र सर्दी / खोकला / सायनस याचा त्रास चटकन होत असेल तर शॉवरऐवजी रडून झाल्यावर थंड पाण्याचे भरपूर हबके मारून चेहरा, मान, कानशिले धुउन घ्या. स्नायू आणि शिरातील ताण कमी होईल. हलके टिपून पुसून घ्या. गूळ-पाणी खा थोडे.
** ऍसिडिटीची गोळी, पेनकिलर, अगदी क्रोसीनसुद्धा --- लि म ले ट नव्हेत. प्लासीबो इफेक्ट पेक्षा साईड इफेक्ट चा विचार करा म्हणेन. २५ वर्षाच्या आहात म्हणताय. खूप वर्षे जायचीत. या गोळ्यांच्या अतिसेवनाने किडनी लिवर यासारख्या महत्त्वाच्या अवयवांची हानी होते. कधीतरी... भरून न येण्यासारखी. आणि आहेत ते त्रास (हार्मोन रिलेटेड) वाढू शकतात. ऍसिडिटी असेलच तर प्लेन कुरमुरे (कांदा-लिंबू-टोमॅटो न घालता) किंवा लाह्या, वेलची केळे खा. थंड दूध घ्या रोझ /खस / थंडाई सिरप घालून किवा ताजे गोड ताक.
** differentiate करू शकताय तर, आलेलं रडू सुरुवातीलाच स्टॉप करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तेव्हा नेमके काय विचार / आठवणी / भावना मनात उमटतात ते पहा. तारीखवार नोंदीत लिहून ठेवा. पॅटर्न कळेल. तुम्हाला नाही तर डॉला तरी कळेलच. उमाळा दाबल्याने नवीन त्रासाला बोलावणे द्याल.
** कधी वेळ मिळेल तेव्हा -- शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत -- हे नऊ रस आणि त्यांचा परिणाम याबद्दल वाचा. करमणुकीचे पर्याय निवडताना कदाचित कामाला येईल. मला चूक-बरोबर अशी लेबल नाही लावायचीत. कोणासाठी योग्य-अयोग्य काय व्यक्तिसापेक्षच असते. पण वाटते ते एकदा बोलून बघायचा माझा स्वभाव आहे.
श्रेयस/ प्रेयस अशा २ तर्हेच्या गोष्टी असतात. श्रेयस म्हणजे जे आपल्यासाठी योग्य, आपल्या हिताचे असते (जनरली हे नावडते असते) आणि प्रेयस म्हणजे आपल्याला जे करायला / खायला / अनुभवायला आवडते ( चटकही असते क्वचित) पण आपल्या हिताचे असतेच असे नाही.
शेवटी, विधाने आज्ञार्थी असली तरी हे सर्व सुचवणे आहे.
पुन्हा एकदा कावळ्यासारखे मधलेमधले मुद्दे उचलून फिलॉसॉफी झाडलीय, त्यासाठी माफ करा.
मला फुल्ली-गोळा मॅटर चटकन नजरेत भरते. पण यामुळे offend होऊन व्यक्त व्हायचे थांबू नका.
आपल्याकडे खूप चांगले सदस्य आहेत, ज्यांच्या दृष्टीकोनाचा लाभ तुमच्या निमीत्ताने सर्वांनाचा मिळत राहील. मलाही.
प्रचंड रिलेट झालं. मला तर
प्रचंड रिलेट झालं. मला तर मोजून 19 वर्षांचं आयुष्य हवं आहे म्हणजे तोपर्यंत मुलगा पायावर उभा राहील.
एक जीव आपण जन्माला घातलाय तर त्याला त्याच्या नशिबावर सोडून पळून जाण्यात अर्थ नाही पण कोणी मला त्याला छान सांभाळायची हमी देत असेल तर आत्ता या क्षणी मला जगणं 'बास' करायला आवडेल+१
अगदी. आता फक्त हा एकच पाश राहिलाय. माझी मुलगी.
बापरे... नोकरीला बाहेर
बापरे... नोकरीला बाहेर पडल्यावर बराच काळ वेगवेगळ्या मानसिक संभ्रमावस्थेत गेला, त्या अनुभवातून सांगतो... लवकरात लवकर ह्या अवस्थेतून बाहेर पडा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वेगवेगळ्या विषयात रस घेऊन बघा, काही तरी नक्की आवडेल. न चुकता व्यायाम करा. जीवनात आलेले वाईट अनुभवांना क्षुद्र लेखा कारण ते सगळ्यांना कमी अधिक येताच असतात. चांगल्या अनुभवांना जास्तीत जास्त जवळ करा त्यासाठी सतत कष्ट करा कारण ते सहज मिळणारे नसतात. माझे स्वतःचे वाईट अनुभव कमी नाहीत पण त्यांचं महत्व माझ्या लेखी मी जाणीवपूर्वक कमी केले आहे. जगात कित्येक आनंद असे आहेत कि त्यातल्या एक एक अनुभवासाठी एक एक जीवन अपुरे आहे, "हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले" ह्याचा अनुभव नक्की घेऊन बघा... आणखीन एक म्हणजे तुमच्याशी सद्यस्थितीत रिलेट करणाऱ्यांना फाट्यावर मारा.
मला तर अजून दीडशे दोनशे वर्षे
मला तर अजून दीडशे दोनशे वर्षे जगायचं आहे. तेव्हढा जगणार नाही तरीपण एक ईच्छा.
मुलींनो , का ग असा विचार करता
मुलींनो , का ग असा विचार करता? इतर कोणासाठी नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी आणि आनंदाने जगा...
येथे येणे, येथून जाणे , नाही अपुल्या हाती...
जोवर आहोत आपण येथे, तोवर फुलवू नाती....
स्वतःचे स्वतःशीच नाते इतके घट्ट बनवा की आनंदासाठी दुसर्या कोणाची गरजच नाही.
पुस्तकी ज्ञान नाही हे ... स्वानुभव आहे. .
कुठे वाचलेल्या आठवत नाहीत पण
कुठे वाचलेल्या आठवत नाहीत पण आवडलेल्या ओळी, इथे लिहाव्या वाटल्या..
छु ले आसमान जमीन की
तलाश ना कर,
जी ले जिंदगी खुशी की तलाश
ना कर,
तकदीर बदल जाएगी खुद ही
मेरे दोस्त,
मुस्कुराना सीख ले वजह की
तलाश ना कर !
जन्म आणि मृत्यु या दोन
जन्म आणि मृत्यु या दोन टोकांमध्ये पकडून नियतीने चालवलेली आपणा सर्वांची फसवणुक, एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला, आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची हसवणुक करण्यापलिकडे आपल्या हाती काय उरते! - पुलं
खुप रिलेट झालं. Please blood
खुप रिलेट झालं. Please blood work करुन Iron पातळी बघा. माझी सुध्हा ही पातळी कमी होती. आतिशय नैराश्य होते.
नशिबाने एक dr ने Iron infusion करायाला सान्गितले. पुनर्जम्न झाला. Minerals imbalance definitely cause depression
मला मराठी नीट लिहिता येत नाही. पण कळ्कळीने सान्गाते, हा उपाय नक्की करा.
Pages