हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..
40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..
आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...
आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..
70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...
हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..
लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...
आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....
लेख आवडला.
लेख आवडला.
माझ्याही मनात असे विचार,अशी इच्छा बर्याचदा असते.
स्वत:ला चांगल्या गोष्टीत व्यस्त ठेवणं आणि असे विचार आले तरी त्यात वाहून न जाणे एवढंच जमायला लागलयं .
प्रचंड रिलेट झालं. मला तर
प्रचंड रिलेट झालं. मला तर मोजून 19 वर्षांचं आयुष्य हवं आहे म्हणजे तोपर्यंत मुलगा पायावर उभा राहील.
एक जीव आपण जन्माला घातलाय तर त्याला त्याच्या नशिबावर सोडून पळून जाण्यात अर्थ नाही पण कोणी मला त्याला छान सांभाळायची हमी देत असेल तर आत्ता या क्षणी मला जगणं 'बास' करायला आवडेल.
बाकी ते जीवन सुंदर आहे वगैरे सगळं झूठ आहे. असो!
थेअरपी घेताय ? असाल तर बरं आहे नसाल तर घ्यायचा विचार करा ते ही नको असेल तर सतत लिहीत रहा कारण देवाने जेवढे श्वास देऊन पाठवलं असतं तेवढे मोजून भरेपर्यंत जगावं तर लागतंच. मग आता option नाहीये तर तेवढ्यातल्या तेवढ्यात बरं जगावं म्हणजे आपल्या मागे उरलेल्याना किमान हे समाधान तरी वाटत की छान जगली.
लिहित रहा.लोकांना काय वाटेल
लिहित रहा.लोकांना काय वाटेल याचा विचार करु नका
हे असे विचार वाचले की मला फार
हे असे विचार वाचले की मला फार नवल वाटतं. हे मी चांगल्या वाईट अशा अर्थाने म्हणत नाहीये. दृष्टीकोनातला फरक अशा अर्थाने म्हणत्येय.
कदाचित माझी जीवनेच्छा फार प्रखर आहे! मी कितीही वाईट मूडमध्ये किंवा भयानक परिस्थितीमधे असले तरी मला त्या वेळी बोअर, निराश वाटतं पण ते तात्पुरते. आयुष्याबद्दल मी नेहमीच आशावादी आहे! हे इतकं सुंदर आयुष्य संपवण्याचा विचार मी करूच शकत नाही. मी काही सदैव आनंदी व्यक्ती नाही. उलट बरेचदा जगाचे प्रश्न (पक्षी:वैतागवाडी) आपल्या डोक्यात घेऊन हिंडत असते पण कदाचित तीच गोष्ट मला प्रेरणा देते. किती काय काय करण्यासारखं, पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं, खाण्यासारखं असताना आयुष्य संपावं असं वाटत नाही. उदा. वडापावचा धागा वाचल्यापासून माझ्या डोक्यात एक मोठी यादी तयार होऊ लागली आहे नवीन वडापावच्या ठिकाणांची! अशा याद्या डोक्यात चालू असतात काय करता येईल याच्या!
भरपूर जगावं, हिंडावं, निसर्ग आणि माणसं अनुभवावीत आणि एका दीर्घ आयुष्याच्या शेवटी तृप्त होऊन जगाचा निरोप घ्यावा असे माझे स्वप्न आहे. अर्थात या साऱ्यात उत्तम शारिरीक आरोग्य मिळेल असे गृहीत धरले आहे. तसे नसेल तर कदाचित वेगळे वाटेल.
विचार करताना जाणवले की मी कधीच "आज" वर जगण्याची प्रेरणा अवलंबून ठेवत नाही. Today can be the shittiest day of my life but I still have tomorrow which is a brand new day! And I don't know what tomorrow will bring. I love life for its endless possibilities and my ability to dream. Bring it on!
मस्त प्रतिसाद जिज्ञासा!
मस्त प्रतिसाद जिज्ञासा!
उत्तम प्रतिसाद जिज्ञासा. पण
उत्तम प्रतिसाद जिज्ञासा. पण डिप्रेशनग्रस्त व्यक्तीला सकारात्मक राहण्यासाठी उपचारांची गरज असते. सामान्य लोकांना जे विचार सहज झटकून टाकता येतात, ते विचार मनातून काढणे, अशा व्यक्तींंना खूप संघर्षपूर्ण वाटतं. कळतंय पण वळत नाही, अशी गत होते.
जि +१००० दृष्टीकोनाचा फरक आहे
जि +१००० दृष्टीकोनाचा फरक आहे!!
मरण इतकं सुंदर वाटत असेल तर असा दृष्टीकोन असणे ती एक "गिफ्ट" आहे. मग ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... असं करत ती गिफ्ट वाया घालवून मी नाही दिवस काढू शकणार. ग्रीफ कौन्सेलर/चॅपलेन इ होऊन जी मुले कॅन्सर इ मुळे अकाली मरणाच्या दारात आहेत त्यांना इथून निरोप घ्यायला मदत करेन. मी कशाही अवस्थेत असले तरी इतरांना त्याचा उपयोग व्हावा हे बघण्याकडे माझा कल असतो.
कशाही अवस्थेत असले तरी
कशाही अवस्थेत असले तरी इतरांना त्याचा उपयोग व्हावा हे बघण्याकडे माझा कल असतो+1
छान प्रतिसाद जिज्ञासा आणि
छान प्रतिसाद जिज्ञासा आणि सीमंतिनी
ज्यांच्या मनात असे विचार
ज्यांच्या मनात असे विचार येतात त्यांना अपराधी वाटेल असे कृपा करून लिहिणे टाळा. कोणी मुद्दाम असे विचार करत नाही आणि आलेले विचार कोणी थोपवू शकत नाही. तुमच्या मनात नेहेमी सकारात्मक विचार येतात आणि तुम्हाला खूप भरभरून जगण्याची ईच्छा आहे हे छानच आहे. ज्यांचे बालपण, टीनएज आणि तरुणपण त्रासाचे, मानसिक कष्टाचे किंवा दडपणाखाली जाते ते लवकर थकतात, पहिले मनाने आणि मग म्हणून शरीराने. त्रास म्हणजे नेहेमी हलाखीची परिस्थिती, वेगळे झालेले आई वडील किंवा दारू पिणारे वडीलच असतील असे नाही. मी तर म्हणेन की हे असे दृष्टीला दिसणारे त्रास एकवेळ दुसऱ्यांना सांगता तरी येतात पण काही गोष्टी अशा असतात ज्या कुणाला सांगता येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती असते आणि आतल्या आत कुढत राहिल्यामुळे सतत विचार करायची सवय लागते आणि बाकी काही करावेसे वाटत नाही, सकारात्मक वाटत नाही. जगात किती प्रकारची माणसे आहेत आणि ती कशाकशातून गेली आहेत याचा आपण अंदाज लावू शकत नाही, म्हणून कुणालाही पटकन जज करणे टाळावे.
प्रचंड रिलेट झालं. मला तर
प्रचंड रिलेट झालं. मला तर मोजून 19 वर्षांचं आयुष्य हवं आहे म्हणजे तोपर्यंत मुलगा पायावर उभा राहील.
एक जीव आपण जन्माला घातलाय तर त्याला त्याच्या नशिबावर सोडून पळून जाण्यात अर्थ नाही पण कोणी मला त्याला छान सांभाळायची हमी देत असेल तर आत्ता या क्षणी मला जगणं 'बास' करायला आवडेल.
बाकी ते जीवन सुंदर आहे वगैरे सगळं झूठ आहे. असो! +११११११ अगदी हेच आले होते मनात.
खूप जगून झालं म्हटलं तर
खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...>>
डिप्रेशन ही व्याधी असेल तर प्लीज काउंसेलिंग आणि गरज असेल त्यानुसार औषधोपचार घेत रहा. औदासिन्याच्या आजार हा औषध घेतले आणि बरे झाले असा नाही. दीर्घकाळ उपचारांचा आधार लागतो. काही काळ ठीक वाटले आणि पुन्हा उदास वाटू लागले असे होणे बरेचदा होते.
अगदी सगळे सुरळीत सुरु असतानाही अचानक औदासिन्यामुळे सगळे झाकोळून जाते. जीवन सुंदर आहे असे म्हटले तरी प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ उतार असतात. मन आजारी असेल तर हे चढ उतार सोसणे अजूनच कठीण होते. छोटीशी घटनाही उदासीसाठी ट्रिगर ठरते. त्यामुळे उपचारात खंड पडू देवू नका, सपोर्ट ग्रूप असेल तर ऑनलाईन नियमित संपर्कात रहा. मी हे एक लाँग टर्म केअरगिव्हर म्हणून सांगतेय. योग्य उपचारांनी या व्याधीसह अतिशय फुलफिलिंग जगणे शक्य होते. उपचारांकडे नकारात्मक नजरेने बघायचे नाही तर मदतीचा हात म्हणून बघायचे. रिपीटेटिव अॅक्शन असलेले उदा. क्रोशे , कलरिंग पेजेस असे काही करुन बघा. मनाला शांत वाटायला मदत होते.
चंपा, पब्लिक फोरम आहे. लाखो
पब्लिक फोरम आहे. लाखो लोक्स वाचतात. वाचणारा प्रत्येकजण "आत्महत्या करण्याची हिंमत नाही" गटात नसणार, विशेषतः सध्याच्या काळात. इतरांचा विचार न करता मरण रोमँटसाईज करणारे विचार कुणी लिहीत असेल तर त्याबद्दल सहानुभूती आहे. पण तिथे आयुष्याचा दुसरा दृष्टीकोन देणार्याला मी तरी थँक्यूच म्हणेन. मग कुणाला त्यामुळे अपराधी वाटले तरी हरकत नाही. असो... (अॅडमिनने काढला नाही धागा हे नशीब आहे!)
इट्स ऑल अबाऊट एन्झाईम्स
इट्स ऑल अबाऊट एन्झाईम्स.
एकदा डॉ. ना भेटा.
एकदा डॉ. ना भेटा.
आणि खालील गृहितकांवर विचार करा.
१. जीवनावर (जे दिसतंत) त्यावर विश्वास नाही पण पुनर्जन्मावर विश्वास आहे असं का वाटतं?
२. नॅचरल मरण आलं तर वाईट * ठिकाणी पाठवणार नाहीत याची खात्री कशाच्या जोरावर वाटते?
३. कर्मफलावर विश्वास आहे असं वाटलं. तर (चांगली) कर्म करत राहिलं तर पुढच्या जन्मी फायदा असं आहे ना? मग तुम्ही कर्म करायचं सोडून काय मिळणार आहे?
* वाईट म्हणजे सध्यापेक्षा थोडंसच वाईट का असेल? मरायची इच्छा आहे म्हणून पुढचा जन्म सिरियात आला तर?
मलाही मरण रोमँटेसाईझ करणार्या वरच्या प्रतिसादांपेक्षा जिज्ञासाचा प्रतिसाद आवडला. जे केलेलं नाही, मग न वाचलेली आणि वाचाविशी वाटणारी पुस्तकं, नेटफ्लिक्स इ. वरचे शोज, चित्रपट, जिकडे जावं वाटतं अशी ठिकाणं, काही दिवस रहावं वाटतं अशी ठिकाणं, काही किडुक मिडुक शिकावं वाटतं अशा गोष्टी... अशा न संपणार्या गोष्टींची यादी बर्याचदा अंगावर येते. आणि आपण दिवस अक्षरश: फुकट दवडतोय असं फिलिंग येतं. लवकर गचकलो तर? अशा भितीने रात्र रात्र जागून गेम ऑफ थ्रोन्स गेल्यावर्षी उडवलेलं ते आठवलं. इतरांना उपयोग होईल न होईल माझी स्वतःला उपयोगी ठरतील अशांची लिस्टच सरता सरत नाही.
वरचा स्वाती२ चा प्रतिसाद ही आवडला. मदतीची गरज असेल तर ती घेत रहा आणि जे आवडतं ते करत रहा. जवळपास कोणी लहान असेल तर त्याला/ तिला हॅरी पॉटर वाचुन दाखवा बरं! (तुमचे धागे आठवताहेत) काही महिने मजेत जातील आणि नव्या ओळखी होतील.
Wink इतरांना उपयोग होईल न
Wink इतरांना उपयोग होईल न होईल माझी स्वतःला उपयोगी ठरतील अशांची लिस्टच सरता सरत नाही. Happy >> झिरी इक्शॉस त्राशस....
? संत्र सोला.
?
संत्र सोला.Ohh डोथराकी हो हो!पुढचे २०-४० वर्ष आयुष्य असेल
पुढचे २०-४० वर्ष आयुष्य असेल असे वाटते म्हणजे फारच आशावादी आहात.
महामारी, अपघात, आजारपण अजून बऱ्याच कारणांनी रोज कितीतरी जीव जातात. कधीही काहीही होऊ शकते.
(रमेशच्या शाळेत चक्कर मारून या. ... अवांतराबद्दल क्षमस्व)
त्यामुळे आला दिवस बोनस समजा. चांगले कर्म करून पुण्य कमवा.
धाग्यातलीच वाक्ये. फक्त क्रम
धाग्यातलीच वाक्ये. फक्त क्रम बदलला आहे...
>> डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ...
>> घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ...
>> हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो
>> आतापर्यंत 25 वर्षं झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं
>> नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ...
>> हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही
मनाच्या अवस्था असतात. त्यातल्या एक अवस्थेतून जात आहात असे एकंदर वाटते. होत असते असे.
मी कॉलेजात असताना एक मित्र होता. त्याच्या बोलण्यात नेहमी " कशासाठी प्रयत्न करायचे? काय उपयोग? काय फायदा?" अशी वाक्ये असायची. म्हणजे आयुष्यात काहीही प्रयत्न केले तर काही फायदा वा उपयोग नाही असे वाटणे. आम्ही त्याला खूप झापायचो.
पण आज त्या गोष्टीला दशके लोटली. दोनतीन वर्षापूर्वी गेटटूगेदर झाले तेंव्हा भेटला होता. महाशय खूप समरस होऊन जगत आहेत. हाच तो आहे असे वाटत सुद्धा नाही. मग जाणवले कि ती त्याची तेंव्हाची मानसिक स्थिती होती, बस्स यापलीकडे काही नाही.
तशीच तुमची हि एक मानसिक स्थिती आहे. त्याच्यासारखी आहे असे म्हणत नाही. पण जी काय आहे ती एक स्थिती आहे इतकेच म्हणेन. ती चांगली आहे किंवा वाईट आहे असे वर्गीकरण करणार नाही. तुम्हीही ते करू नका. जे काय विचार येतात त्यांना येऊ द्या जाऊ द्या. पुढे पुढे जात रहा.
तसेही आपण सगळे तीन मितीत जगणारे जीव. चौथ्या (काळाच्या) मितीत काय घडणार आहे त्याचे ज्ञान आपल्याला येऊ शकत नाही. तितके आपण उत्क्रांत नाही झालो अजून. त्यामुळे "किती दिवस राहिले असावेत" हा प्रश्न संपूर्ण जगालाच लागू पडतो. You are not alone त्यामुळे, तुम्हाला नॉनएक्सिस्टेन्सचे कितीही आकर्षण वगैरे असले तरी तो कधी येणार आहे यावर विचार करणे अर्थहीन आहे. नॉनएक्सिस्टेन्स साऱ्या जगाच्याच नशिबात नसेल कशावरून? असेल तर यायचा तेंव्हा येईलच. नसेल तर कधीच येणार नाही. आवडो वा नावडो. लोड घेण्यात अर्थ नाही. ती मिती आपल्या हातात नाही.
त्यामुळे, तिकडे फार लक्ष न देता तुम्ही बस्स पुढे पुढे जात रहा(लच)
शुभेच्छा!
प्रचंड रिलेट झालं......
प्रचंड रिलेट झालं......
सगळ्यांचेच प्रतिसाद आवडले...
प्रचंड रिलेट झालं...... >> ही
प्रचंड रिलेट झालं...... >> + 1 ही फेज अधूनमधून येते. कधी बराच काळ रहाते, कधी महिन्याभरात जाते.
औषधे , समुपदेशक यांचा हातभार लागतो पण माझा अनुभव असा आहे की ताप आला गोळी घेतली ताप गेला असं याच नसतं, निरुत्साही , उदास वाटतय ,डिप्रेशन आलं वाटतय गोळी घेतली , झालं उत्साही , गेला उदासपणा असं होतं नाही. स्वतःलाच बाहेर पडावं लागतं प्रयत्न करकरून.
अगदी वेळ मजेत घालवायचा म्हणून पुस्तक, मुव्ही, काम करणे ह्याचाही कधी कधी कंटाळा येतो, हे नाही केलं तरी काय फरक पडणार आहे. याचा दुसऱ्याला सोडा आपल्याला तरी किती फायदा आहे असही मनात येतं. काळ गेला की थोडा फरक पडतो. एका गोष्टीचा मला उपयोग झाला . जनरली आपण आठवतो त्यातल्या बऱ्याचशा आठवणी निगेटिव्ह असतात. व्यक्तींसंदर्भात तरी . तर प्रेरणा बरणी लिहायची 21 दिवस. काय लिहायचं तर कोणाकडून आणि काय प्रेरणा मिळाली. छोट्या गोष्टी असतात पण या ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आहेत, येऊन गेल्यात . त्या व्यक्ती घ्यायच्या, समाजातील आदर्श व्यक्ती नाही.
अर्धा पाऊण तास घाम येईपर्यंत व्यायाम करायचा . प्रचंड कंटाळा येतो पण करायचाच.
इतरांचा विचार न करता मरण
इतरांचा विचार न करता मरण रोमँटसाईज करणारे विचार कुणी लिहीत असेल तर त्याबद्दल सहानुभूती आहे. पण तिथे आयुष्याचा दुसरा दृष्टीकोन देणार्याला मी तरी थँक्यूच म्हणेन. मग कुणाला त्यामुळे अपराधी वाटले तरी हरकत नाही. >> करेक्ट! एरवी अशा स्वरूपाच्या धाग्यावर सहानुभूती दर्शवून मदत घ्यावी असे सुचवले असते. पण यावेळी मला असे वाटले की दुसरी बाजू मांडावी. कदाचित तो एक चांगल्या दिशेने जाण्यासाठीचा धक्का ठरेल कोणासाठी तरी. यात judgement चा भाग नाही.
Depression is real.
Depression is real.
You must meet a counsellor.
तुमच्या पुनर्जन्म संकल्पनेमुळे "कधी मरायचं" हा choice तुमच्याकडे नाही .
मग भरपूर आयुष्य असेल , तर पुढे दोन पर्याय राहतात : 1. सतत मरणाची वाट बघत कंटाळवाणा जगणं 2. दुसरा पर्याय म्हणजे योग्य मदत घेऊन शांततेत आनंदात जगण्.
depressed माणसाला कदाचित हा दुसरा पर्याय हे मजेशीर वाटणार नाही. पण logic जरी पटले तर ताबडतोब मदत घ्यायला जा.
बऱ्याच दा हे हार्मोन्स मुळे होते, त्याचा आपल्या परिस्थिती शी संबंध नसतो.
त्यामुळे आपण काही म्हणून परिस्थिती लगेच बदलणार नसते.पण हेच बाहेरची मदत मिळाली, तर फरक पडायला मदत होऊ शकते.
ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी
ज्ञानेश्वरांनी 16 व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली व 21 व्या वर्षी आपले विहित कार्य समाप्त झाले आहे असे समजून समाधी घेतली. मग ज्ञानेश्वरांना डिप्रेशन आले होते असे म्हणता येईल का? तसे म्हटलेले अनेकांना आवडणार नाही. पण मानसशास्त्राच्या अभ्यासकाने यावर लिहिले पाहिजे.
प्रकाश देशपांडे, सिरिअसली!
प्रकाश देशपांडे, सिरिअसली! ज्ञानेश्वरांशी तुलना करायची आपल्या आयुष्याची? No thank you! अत्यंत असामान्य आयुष्य होतं त्यांचं त्यामुळे मृत्यू ही तसाच असामान्य. आपण फार सामान्य माणसं आहोत (निदान मी तरी). तेव्हा त्यांनी जे केलं ते त्यांना शोभून दिसलं. आपल्याला ते जमणारही नाही आणि शोभणारही नाही. त्यामुळे हा मुद्दा फार अस्थानी आहे.
मग ज्ञानेश्वरांना डिप्रेशन
मग ज्ञानेश्वरांना डिप्रेशन आले होते असे म्हणता येईल का?>> हा खरेच पी.एच.डी. चा विषय ठरु शकतो..! खूप पोटेंशियल दडले आहे यात. जातभाईंकडुन झालेली प्रचंड अवहेलना, जन-निंदेला घाबरुन आई-वडीलांनी केलेली आत्महत्या, वीज पडुन आकस्माक गेलेली लाडकी बहीण अन ज्ञानेश्वरी (भगवद्गितेचे भाषांतर) लिहिल्यामुळे खर्च झालेली प्रचंड ऊर्जा यामुळे आता जीवनात करण्यासारखे काहीच उरले नसल्याची भावना झाल्यामुळे जीवन संपवावे असे वाटु शकते.
मग ज्ञानेश्वरांना डिप्रेशन
मग ज्ञानेश्वरांना डिप्रेशन आले होते असे म्हणता येईल का? >> रेडा will beg to differ... बिचार्याला भर चौकात नरड्याला शोष पडेपर्यंत वेद म्हणवले तेव्हा नव्हंत बरं ते डिप्रेशन...
उलट घोर डिप्रेशन आल्यावर भिंत
उलट घोर डिप्रेशन आल्यावर भिंत चालल्या सारखे वाटणे किंवा रेड्याच्या रेकण्यात वेद ऐकु येणे अशी लक्षणे दिसु शकत असतील.
राधानिशा, यातून योग्य काळजी
राधानिशा, यातून योग्य काळजी घेऊन आणि उपाय करुन बाहेर पडाल. तोवर हँग इन देअर.जगावंसं वाटावं असे छान दिवस नक्कीच आहेत पुढे आयुष्यात.
डिजे, interesting! असा विचार
डिजे, interesting! असा विचार केला नव्हता. किती पुरावे मिळतील माहिती नाही. पण ज्ञानेश्वरांच्या ओव्या अभंगांमध्ये suicide ideation दिसून येते का ते बघता येईल. पण कोणताही निष्कर्ष परिपूर्ण असणार नाही कारण हे सगळे retrospective analysis with available evidence या स्वरूपाचे संशोधन असेल. Such studies suffer many inherent limitations.
Pages