Submitted by Mamatta'S on 10 October, 2020 - 08:32
World Mental Health Day
कोणी म्हणे,
मन धागा धागा
अटळ गुंतागुंत त्यासी जगा||
कोणी म्हणे,
मन उधाण वारा
मग अशांत आसमंत सारा||
कोणी म्हणे,
मन उदास उदास
मग अस्थिरता येई त्यास||
कोणी म्हणे,
मन वढाय वढाय
शांतीचा होई मग लय||
परि मज वाटे,
नाही हा अवघड घाट
भावनाची ती सागर लाट ||
संस्कार शिदोरी,
गाठोडं डोकी, चाल वाट
भेटे मग आनंदी पहाट||
आपल्याच हाती,
आपलेच हात घट्ट धर
मग गाठशील पैलतीर||
.......Mamatta'S
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप छान
खूप छान
Thankyou ग, खूप छान वाटलं
Thankyou ग, खूप छान वाटलं
सुन्दर!
सुन्दर!
छान. शेवटचे कडवे जास्त आवडले.
छान. शेवटचे कडवे जास्त आवडले.
कवितेत मनाच्या भावना सुंदर
कवितेत मनाच्या भावना सुंदर शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
खरेतर, तुलना करणारा मी कोण?
खरेतर, तुलना करणारा मी कोण? पण, "देणाऱ्याने देत जावे..." ह्याची आठवण करून देतात तुमच्या काव्यातील अखेरच्या ओळी...
लिहिता लिहिता होतं असं कधी... तो क्षणच प्रतिभेने ओत-प्रोत भरलेला असतो, भारलेला असतो... त्या क्षणी प्रतिभा, तुमच्याकडून "लिहून घेत"
असते... त्यालाच आपण मग दैवी किंवा प्रासादिक लेखन असं म्हणतो... तशाच आहेत ह्या ओळी "आपल्याच हाती,आपलेच हात घट्ट धर मग गाठशील पैलतीर"... तुम्हाला अनेक धन्यवाद, माझ्यासाठी रुजल्या जातील हे शब्द कायमचे!
Thankyou,
Thankyou,
तुम्हा सर्वानीच, माझ्या कवितेचं परीक्षण केलेलं मला खूप
आवडलं, विंदा तर माझ्या पण आवडीचे कवी त्यांच्या
कवितेशी केलेली तुलना तर माझ्यासाठी अभिमानस्पद,
Thankyou very much