केस गळणे सामान्य आहे का?

Submitted by बिथोवन on 17 September, 2020 - 04:20

केस गळणे सामान्य आहे का?

इंटरमिटंट फास्टिंग हा लेख नुकताच वाचण्यात आला. लेखाच्या पहिल्याच वाक्यात दहा किलो वजन कमी झाल्याचं म्हंटले आहे. अभिनंदन. वजन कमी करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हा लेख एक गाईडलाईन प्रमाणे आहे यात शंका नाही.

अशीच काहीशी गाईड लाईन खालील गोष्टी साठी मिळेल का याचा तपास करतो आहे.

माझ्या मित्राची मोठी बहीण. कॉलेजात होती तेंव्हा दाट केस होते. अगदी घनदाट म्हणावे तसे. यथावकाश तिचे लग्न झाले आणि त्या नंतर हळू हळू तिचे केस गळू लागले. तिचे माहेर आणि सासर एकाच गांवात आहे. म्हणजे हवा पाण्यात काहीच बदल झालेला नाही. प्रेग्नंट असताना केस गळायचे प्रमाण वाढले आणि डिलिवरी झाल्यावर केस इतके गळायला लागले की अगदी स्काल्प दिसण्या इतपत स्थिती झाली. मग 'रिचफिल ' यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. पैसा बरबाद झाला पण रिझल्ट लवकर येईना. बाळाला घेऊन जाणे आणि सिटिंग करणे यात वैताग आला. नंतर मिनॉक्सीदील हे औषध घेतले पण काही फरक नाही. केशरंजन गोळ्या घेऊन पहिल्या, होमियोपथी, आयुर्वेद सगळं केलं पण केस गळण्याचे प्रमाण तसेच राहिले. अगदी सेल्फ कॉंशस झाली बिचारी. कंटाळून सगळे बंद केले आणि आश्चर्य, केस गळण्याचे प्रमाण कमी आले. हे कसे काय झाले असावे आश्चर्यच आहे.

माझ्या एका मित्राची आई. बँकेत उच्च पदावर कार्यरत होती. तिचेही असेच काहीसे झाले आणि अल्मोस्ट बाल्ड झाली. तिनेही अशीच औषधे घेतली आणि नंतर बंद करून टाकली पण केस हळू हळू गळतच राहिले, टक्कल पडे पर्यंत.

वरच्या दोन्ही बाबतीत हेरेडीटरी असे काहीच नाही. त्या दोघींना डायबेटिस नाही किंवा थायरॉइड वगैरे नाही किंवा इतर गोळ्यांचे साईड इफेक्ट वगैरे काही नाही.

केस गळणे सामान्य आहे असे म्हणतात पण इतक्या प्रचंड प्रमाणावर केस गळत असतील तर ही चिंताजनक बाब आहे, खास करून स्त्रियांच्या बाबतीत. दाट केशसंभार कुणाला नको आहे? शेवटी ती एक क्राऊनिंग ग्लोरी आहे.

अशा केसेस कुणी पाहिल्या असतील आणि कुणाला चांगला अनुभव आला असेल तर ते जाणून घ्यायला आवडेल.
......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

श्रवु, विनिता.झक्कास अभिनंदन, मी हातावर शाम्पू घेऊन पाणी टाकून त्याचा फेस झाला कि मग लावते

साधना खूप लकी आहात, दर १५ दिवसातून कलर करणे खूप वैताग आहे, natural मेहेंदी अगदी ब्राउन करते केस मी माहुरी वापरते एखादा चांगला टिकणारा natural कलर माहित असेल तर सांगा प्लीज. आधी २-३ पांढरे केस होते गोदरेज कलर्स नाटुरल्स वापरले आणि केमिकल मुळे बरेच केस पांढरे झाले, आता पस्तावून काही फायदा नाही, प्लीज तो कलर वापरू नका केस खूप खराब होतात

धनुडी केसाला तेल असतंच रोज. केस पूर्वीसारखे शाईन होईपर्यत नो फॅशन .. मी कधीच कलर केले नाहीत..मी ड्रायर पण कधी वापरत नाही.. केस कापून झाल्यावर पण ड्रायर ने सेट करायला देत नाही..मी सांगते राहू दे माझे मी विंचरून विंचरून सेट करेन..

Pages