मोह
``साहेब, माझं स्वयंपाक-पाणी आटपलंय. बाईसाहेब त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्यात न? आता दोन-तीन तास तरी परत यायच्या नाहीत. तुमचं आणखीन काही काम असलं तर सांगा. अगदी कोणतंही!``
पुष्पाचं बोलणं थोडंसं उशीराच माझ्या मेंदूत शिरलं. मी माझी कादंबरी अगदी संपवतच आणली होती. शेवटची आणि अतिशय महत्वाची दोन प्रकरणं तेव्हढी राहिली होती. मग लगेच ती एका दिवाळी अंकाच्या संपादकाकडे पाठवायची होती.
याच विचारात असलेल्या मला, पुष्पा काय बोलतेय ते थोडंसं उशीराच लक्षात आलं. मी पुष्पाला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
आधी मी कोण ते थोडक्यात तुम्हाला सांगतो.
मी एक प्रसिद्ध लेखक आहे. पूर्ण वेळ लेखक. मी तसा पूर्ण वेळ लेखक होऊ शकलो कारण दैवकृपेने वडलोपार्जित मोठ्या संपत्तीचा मी मालक झालो होतो. त्यामुळे उत्पन्नासाठी काही करायची गरज नव्हती. माझ्या लेखणीतून उतरलेलं लोकांना कमालीचं आवडतही होतं. आणि त्यामुळे लेखक म्हणून चांगली प्रसिद्धीही मला मिळाली होती. या प्रसिद्धीबरोबरच माझ्या लेखणीनं सीमासारखं रत्नही मला पत्नी म्हणून मिळवून दिलं होतं. सीमा स्वत: एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होती. तिला वाचनाची खूप आवड. त्यातच माझं लेखन आवडून ती प्रथम माझ्या लेखनाची चाहती झाली. नंतर मी तरुण असल्याचं आणि बऱ्यापैकी पैसेवालाही असल्याचं तिला जसं कळलं तसं ती एकदा मला प्रत्यक्ष भेटली आणि तिनं मला लग्नाची offerच दिली. या तीनही गोष्टी पाहून तिनं माझ्याशी लग्न करण्याचं ठरवल्याचंही तिनं मला स्पष्ट सांगितलं. मला तिचा हा प्रामाणिकपणा आवडला. तिच्यातही नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही लग्न केलं.
आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा सीमाचा स्वभाव होता. माझाही तसाच होता. अर्थात त्याचे मार्ग आमचे वेगवेगळे होते. मला लेखनातून कमालीचा आनंद मिळत होता, तर सीमाला मौजमजा करण्यातून. तशी आम्ही दोघं मौज करत होतोच, भटकंती करत होतोच, परंतु सीमाचा चार मैत्रिणींचा खास groupही होता. मी तर त्यांना `चांडाळ चौकडी`च म्हणत असे. वर्षातून दोन-तीनदा तरी या चौघी पर्यटनास जात होत्या. मलाही त्या वेळी पुरेपूर एकांत मिळत असल्यानं मीही त्यावेळी माझ्या लेखनास पूर्ण न्याय देऊ शकत असे. त्यामुळे हा काळ तर मला विशेष आवडत असे. माझ्या लाडक्या लेखणीस या काळात मला पूर्ण वेळ देता येत असे.
आजही असाच काहीतरी भटकंतीचा plan ठरवण्यासाठी ही चांडाळ चौकडी कुणाच्या तरी एकीच्या घरी भेटणार होती आणि इकडे मी निवांत लेखन करत असताना पुष्पानं भलतीच offer दिली होती.
मी पुष्पाकडे या नजरेने कधी पाहिलंच नव्हतं. खरं तर मला लेखन करत असताना बाकी जगाचं, बाकी गरजांचं फारसं भान कधी राहत नसेच. पण आज, पुष्पानं असा direct सवाल केल्यावर माझ्यातील पुरुष जागा झाला.
``ठीक आहे. चल माझ्याबरोबर.`` मी पुष्पाला म्हणालो.
मी तिला घेऊन माझ्या बंगल्यातील तळघरातील माझ्या खास अभ्यासिकेत घेऊन गेलो. आमच्या बंगल्याचा वरचा भाग चांगला सुशोभित असला तरी ही तळघरातील प्रशस्त खोली मात्र मी अगदी साधी ठेवली होती. एक लोखंडी खाट, टेबल-खुर्ची आणि दोन-तीन कपाटे.
आम्ही खाली पोहोचताच पुष्पा सरळ त्या खाटेवर जाऊन बसली. मी तिच्या जवळ गेलो. तिच्या चेहऱ्याजवळ माझा चेहरा नेण्यासाठी वाकलो आणि माझ्या खिशाला लावलेली माझी लेखणी खाली पडली. ती घरंगळत थोडीशी त्या खाटेखाली गेली. मी खाली बसून वाकून ती उचलली आणि वर, पुष्पाकडे पहात उभा राहिलो.
``पुष्पा, या खोलीत तू पहिल्यांदाच येत आहेस ना? आता एक काम कर. खाली, या खाटेखाली तीन-चार ट्रंक आहेत. त्या बाहेर काढ. त्यात खूप जुनी, दुर्मिळ पुस्तकं आहेत. ती बाहेर काढ. ती फडक्यानं थोडीशी स्वच्छ करून त्या कपाटात लावून टाक. खूप दिवसापासून तुला हे काम सांगायचं होतं. आज तू स्वत:च काही काम मागितलंस आणि लक्षात आलं. तासाभरात होईल हे काम पूर्ण. आणि हे घे, या कामाचे वेगळे पाचशे रुपये. काम झालं की सरळ गेलीस तरी चालेल. मला आज ती कादंबरी संपवणे भाग आहे. त्यामुळे मला आता त्रास देऊ नकोस.``
मी त्या खाटेच्या एका कोपऱ्यात पाचशेची नोट ठेवली आणि पुष्पाच्या पडलेल्या चेहऱ्याकडे न पाहता वरच्या दिशेने चालू लागलो.
मी थेट, आतील जिन्यानं माझ्या दुसऱ्या मजल्यावरच्या अभ्यासिकेत पोहोचलो. तेथील खिडकी किंचित बाजूला करून मी आमच्या बंगल्याच्या खाली पाहिलं. सीमा आणि तिच्या मैत्रिणी दबक्या पावलानं गेटच्या बाहेर पडत होत्या. प्रत्येकीच्या हातात मोबाईल होते. त्यातील कोणत्या तरी एका मोबाईलवर तळघरातील साऱ्या घटनांचे live प्रक्षेपण होत होते, याबाबत माझ्या मनात काडीचीही शंका नव्हती. मी पुष्पाच्या अंगाला हात जरी लावला असता, तरी ही चांडाळ चौकडी latch उघडून तळघरात धावत सुटली असती.
मी अनेक पोलिसीकथा लिहिल्या होत्या. त्या लिहिताना मला माझ्या पोलीसमित्राने वेळोवेळी सांगितलेल्या अनेक घटना आणि किश्श्यांचा उपयोग होत होता. एकदा असंच त्याला भेटायला गेलो असताना तिथे एक गुप्तहेर बसला होता. त्यांच्यात छुप्या कॅमेराच्या प्रकारांविषयी चर्चा चालू होती. हे कॅमेरे कसे आणि कुठे लावायचे, त्यानं कसं कसं चित्रीकरण होतं हे सारं मलाही तेव्हा बघायला मिळालं होतं.
माझी खाली पडलेली लेखणी उचलताना मला पुष्पाच्या ड्रेसवर विशिष्ट ठिकाणी लावलेला तो कॅमेरा अचानक दिसला होता.
या चांडाळ चौकडीनं माझं हे असं स्टिंग operation करायचं का ठरवलं होतं, हे माझ्यासाठी कोडंच होतं. कदाचित याचा खुलासा कधीच होणार नव्हता.
नको त्या मोहात अडकल्याने माझ्यावर येऊ घातलेल्या अतिशय मोठ्या संकटातून माझ्या लाडक्या लेखणीनं आज मला वाचवलं होतं, एवढं मात्र खरं...
*
Men will be always Men
Men will be always Men
कथा आवडली
Men will be always Men
ड्पो
मस्तच..ट्वीस्ट आवडला.
मस्तच..ट्वीस्ट आवडला.
भारीच,खूप आवडली
भारीच,खूप आवडली
कुठेतरी वाचलीये छान आहे
कुठेतरी वाचलीये
छान आहे
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
@ किल्ली:- नम्र खुलासा. आपल्याला ही कथा कुठेतरी वाचल्यासारखी वाटतेय. परंतु मला आजच सुचलेली ही कथा असून यापूर्वी मी वाचलेल्या कुठल्याही गोष्टीवर ही आधारलेली नाही. त्यामुळे तसे वाटल्यास कृपया निव्वळ योगायोग समजावा!!!
छान. आवडली.
छान. आवडली.
मस्त ! आवडली
मस्त ! आवडली
असेल
असेल
कदाचित कथेची धाटणी same असू शकते
त्याला आधीच समजलं होतं बायको पाळत ठेवून आहे ही theme वाचलीये, exact कथा नाही. बहुतेक फेबु वर
असो.
हल्ली होतं असं देजा वू
तुम्ही हलके घ्या
छान. आवडली !
छान. आवडली !
सगळेच पुरुष संधीविना
सगळेच पुरुष संधीविना चारित्र्यवान असतात..
मस्त कथा...
मस्तच ,,आवडली...
मस्तच ,,आवडली...
अभिप्रायांसाठी सर्वांना मन
अभिप्रायांसाठी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
मस्त आहे कथा.
मस्त आहे कथा.
छान आहे कथा
छान आहे कथा
आवडली.
आवडली.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
मस्त आहे
मस्त आहे
मस्त कथा
मस्त कथा
मस्त आहे
मस्त आहे
mi_anu, कविन, प्राचीन,
mi_anu, कविन, प्राचीन, सुमुक्ता, आनन्दा, म्हाळसा, जाई - मनापासून आभार!
छान आहे कथा, ट्विस्ट आवडला!
छान आहे कथा, ट्विस्ट आवडला!