Submitted by Priya ruju on 3 April, 2020 - 04:01
मायबोलीचे बरेच सभासद परदेशात आहेत. कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे असे सगळीकडून वाचायला मिळत आहे. सभासदांपैकी कोणी हे अनुभवले किंवा जवळच्या कोणाचे पाहिले असेल तर कोरोनावर कशी मात केली हे वाचायला आवडेल. एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळ संध्याकाळ व्हीटॅमीन सी
सकाळ संध्याकाळ व्हीटॅमीन सी च्या गोळ्या, ताप आला तर पॅरॅसिटेमॉल आणि खोकला आला तर अजुन एक औषध,7>>>>>हीच treatment मला ही मिळाली फक्त 10 रू. चा खर्च करून
दुपारी मिस्टरांचा
दुपारी मिस्टरांचा रिपोर्टदेखील निगेटिव्ह आला ! आता सुटल्यासारखं वाटतंय!
आता कधीही कोणाला, आमचा कोरोना अनुभव एका वाक्यात आम्ही सांगू शकतो, "कोरोना आला अन् भो..! करून गेला!!"
खरंच, मिस्टरांचा रिपोर्ट पहिल्यांदा पाॅझिटिव्ह आला तेव्हा जो काय शाॅक बसला असेल तेव्हढाच. सुदैवाने नंतर मात्र त्या कोरोनाचा काहीच त्रास झाला नाही. तरी इथून पुढेही काळजी घ्यावीच लागणार. लहान मुले आहेत घरात.
इथे सर्वांचे अनुभव ऐकुन भीती
इथे सर्वांचे अनुभव ऐकुन भीती बर्याच अंशी कमी झाली... आणि मित्र-मैत्रीणींचे अनुभव ऐकल्यावर मला असंही दिसलं की गेल्या १०-१५ दिवसांपासुन जर कुणाला ताप, खोकला आला तरी ते टेस्ट करुन घेत नाहीत उलट त्यांच्या माहितीतल्या-ओळखीतल्या लोकांना ज्यांना कोरोना झाला होता त्यांच्या औषधांची चौकशी करुन डोसचे प्रमाण ठरवुन स्वतःच घेऊन ठीकठाक होत आहेत..
हे बरोबर नसले तरीही लाखो रुपये वाचवण्यासाठी ही आयडियाची कल्पना नामी शक्कल ठरु पाहते आहे..! कितपत योग्य आहे माहित नाही पण माझ्या ओळखीतल्या ४ जणांनी हा प्रयोग करुन आपली ताप-थंडी घालवली आहे (अर्थात त्यांना बीपी शुगरचात्रास नव्हता आणि वयही ३० पेक्षा कमी होते)... तरीच भारतातल्या बाधीत रुग्णांचं प्रमाण गेल्या १०-१२ दिवसांपासुन वाढत नाहीये
मला दोन आठवड्यापूर्वी घशात
मला दोन आठवड्यापूर्वी घशात खवखव, घसा दुखणे अधुन मधून थोडा खोकला, पडशा सारखे वाटणे (अधून मधून नाकातून पाणी गळणे), शिंका सुरू झाले. ताप नव्हता. डॉक्टरांनी सांगीतले आताच कोव्हीड चाचणी करू नकोस, तीन दिवसांनी कर. याचे कारण असे की संसर्ग झाला, सौम्य लक्षणे सुरू झाली की लगेच चाचणी केली तर ती नकारात्मक येण्याची शक्यता जास्त. तीन दिवसांनी केलेली इष्ट. मला त्यांनी फक्त कफ सिरप घ्यायला सांगितले आणि विलग व्हायला सांगितले. मी एका खोलीत स्वतःला विलग केले. रोज तीन वेळा ताप आहे का बघत होतो, नव्हता. थकवा थोडासा होता. तिसऱ्या दिवशी तर माझा थकवा पूर्ण गेला आणि चौथ्या दिवशी जेव्हा चाचणी करायची होती तेव्हा घसा दुखणेही थांबले होते, अधुन मधून थोडी खवखव जाणवे. डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले ते म्हणाले गरज नाही चाचणी करण्याची आता, तुला पूर्ण बरे वाटत असेल तर विलग रहाण्याची आवश्यकता नाही. आणि माझे विलगीकरणं चार दिवसांत संपले.
अभिनंदन मानवजी..! इडा पीडा
अभिनंदन मानवजी..! इडा पीडा टळली म्हणायची
सगळ्या बरे झालेल्या
सगळ्या बरे झालेल्या कोविडग्रस्तांनो एक टप्पा पार केलात त्याबद्दल शुभेच्छा आणि पूर्ण ताकद भरुन यायलाही शुभेच्छा!
अभिनंदन मानवकाका!!
अभिनंदन मानवकाका!!
अभिनंदन मानवकाका!!
अभिनंदन मानवकाका!!
अभिनंदन मानवकाका!!
अभिनंदन मानवकाका!!
अहो झालाच नाही त्याचं कसलं
अहो झालाच नाही त्याचं कसलं अभिनंदन!

तसं असेल तर सगळ्यांचंच करायला हवं.
(No subject)
मानव, विश्रांती घ्या.
मानव, विश्रांती घ्या.
अजूनही वीकनेस जात नाही तोवर थोडी लढाई बाकी आहे.
मानवकाकांना जबरदस्ती
मानवकाकांना जबरदस्ती विश्रांती घ्यायला लावणार आता माबोकर
(No subject)
मानवकाका, घ्याच तुम्ही
मानवकाका, घ्याच तुम्ही सक्तीची विश्रांती. नातवंडांना सांगायला, अजून एक कोरोनाची गमतीदार आठवण गाठीशी राहिल!
अहो झालाच नाही त्याचं कसलं
अहो झालाच नाही त्याचं कसलं अभिनंदन!

काळजीने पोस्ट वाचली मी , अभिनंदन तर घ्याच मानवदादा
प्रिया, क्यूटी, एंजल्स, मानव
प्रिया, आर्या, क्यूटी, एंजल्स, मानव (व इतर कुणी नजरचुकीने राहून गेले असल्यास) काळजी घ्या. खूप शुभेच्छा!
मानव सरांच्या गेल्या १५
मानव सरांच्या गेल्या १५ दिवसातल्या माबो (अती) ॲक्टिव्ह
असण्याचा रहस्यभेद झाला. 
काळजी घ्या.
वरील सर्व हितचिंतकांना
वरील सर्व हितचिंतकांना धन्यवाद!
.
पाफा
मला कोव्हीड झालाच नव्हता.(आता अगदीच माईल्ड होउन गेला असेल तर काही सांगता येत नाही, पण शक्यता कमी वाटते.) त्यामुळे चारच दिवसात स्वविलगीकरण आटोपले.
hey guys...successfully
hey guys...successfully completed 14 days of quarentine...now i confused between should i join the ofc or quartentine myself for more days to avoid public contact...
मानव, तुम्हाला करोना झाला
मानव, तुम्हाला करोना झाला नव्हता हे तुमच्या डॉक्टरने कसं ठरवलं? ताप न येणं हे करोना versus साधा सर्दी खोकला यातलं फरक करणारं लक्षण मानतात का?
डॉक्टरांना फोन केला आणि
डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले ते म्हणाले गरज नाही चाचणी करण्याची आता, तुला पूर्ण बरे वाटत असेल तर विलग रहाण्याची आवश्यकता नाही. आणि माझे विलगीकरणं चार दिवसांत संपले.
>>>
सॉरी टू से - हा डॉक्टरांचा निष्काळजीपणा आहे शुद्ध..
सनव, कारण मला करोनाची लक्षणे
सनव, कारण मला करोनाची लक्षणे येतात काय असे वाटले पण घसा दुखणे व्यतिरिक्त काहीच झाले नाही. सर्दी येईलसे पहील्या दिवशो वाटले पण सर्दी झाली नाही. किंचीत थकवा आणि घसा दुखणे, खवखवणे जे दोन्ही तीन दिवसात बरे झाले. मला GERD चा त्रास आहे, त्यात सुद्धा घसा दुखतो. डॉक्टर सोबत झालेले सगळे बोलणे वर लिहिले नाही. क्लिनिकली त्यांनी ठरवले की माझ्या केस मध्ये कोरोना चाचणी करण्यात अर्थ नाही, आधी पण त्यांनी हेच जज केले होते पण काळजी म्हणुन विलग रहायला सांगितले होते चार दिवस काय डेव्हलपमेंट होतात हे पाहुन पुढचा ऍक्शन प्लान. पण चार दिवसांत झालेल्या डेव्हलपमेंटधून कोरोना असेल असे त्यांना वाटले नाही, रोज अनेक पेशंट्स बघतात ते असे.
आणि त्यांचे जजमेंट बरोबर ठरलेही.
च्रप्स कसे बघतो यावर आहे. रिस्क नको म्हणुन त्यांनी लगोलग मला विलग व्हायला सांगितलं ही त्यांनी घेतलेली एक्स्ट्रा प्रिकॉशन, की विलगीकरण संपवणे हा निष्काळजीपणा ते.
hey guys...successfully
hey guys...successfully completed 14 days of quarentine...now i confused between should i join the ofc or quartentine myself for more days to avoid public contact... >> छान
मला वाटते, काही दिवस तुम्ही फार मिसळणे अगदीच गरज नसेल तर बाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा असेल तर आराम करावाच. कामे एकदम अंगावर घेवू नयेत.
angelsss , very good, if
angelsss , very good, if possible quarantine yourself for 6 to 7 days.
मानवकाका, बरोबरे, आमच्या ईकडे तर लोक सर्रास BAMS डॉक कडुन सर्दी तापाची औषधे घ्या आधी तरीही ठिक नाही झाला तर करा टेस्ट म्हणतायेत.
मानव करोना झाला वाटलं पण झाला
मानव करोना झाला वाटलं पण झाला नाही . चांगलंच झालं. काळजी घ्या.
Angeles >> नुकत्याच बऱ्या झालात, हळूहळू काम वाढवा.
thnk u विनिता वर्णिता vb
thnk u विनिता वर्णिता vb
ओके मानव.
ओके मानव.
इथे अमेरिकेत कोणी डॉक्टर कन्फर्म निगेटिव्ह रिपोर्ट हातात नसताना चार दिवसात आयसोलेशन संपवा असं सांगणार नाहीत. म्हणून प्रश्न पडला. भारतात डॉक्टर वेगळा अप्रोच वापरतात. तुम्हाला त्रास झाला नाही हे सर्वात महत्वाचं!
मला कालपासून सर्दी आणि
मला कालपासून सर्दी आणि अंगदुखीचा चांगलाच त्रास होतोय. बाकी काही नाही. क्लिनिक मध्ये गेल्यावर डॉक्टरांनी खोकला आहे का? ताप आला का, शिंका येतात का असं विचारलं आणि तीन दिवसांच्या गोळ्या लिहून दिल्या. टेस्ट करून घेण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. बरं वाटलं नाही तर परत बोलावलं आहे. मी तरी सध्या कोंडून घेतलं आहे. तरी पण टेस्टसाठी तीन दिवस थांबावं की नाही याचा निर्णय होत नाहीये.
नौटंकी, करोना असेल तरी तो
नौटंकी, करोना असेल तरी तो चाचणीत दिसायला वेळ लागतो तीन दिवस. म्हणुन सांगितले असेल.
तुम्ही लगेच चाचणी केली तर करोना असूनही ती निगेटिव्ह येऊ शकते.
Pages