घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि हिरव्या वनराईने नटलेला असेल तर मनाला आणि शरीराला नवचैतन्य लाभते.
शहरात राहायला जागा अपुरी पडत असताना घरामागे मनासारखी बाग फुलविणे खरंतर अशक्य गोष्ट आहे.
परंतु सुदैवाने आम्ही राहत असलेल्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने आम्हांला विविध प्रकारची झाडे लावता आली. आंबे, केळी, चिकू, फणस, जांभूळ, सीताफळ, लिंबू, डाळींब, चेरी, काजू, पेरू , पपई , नारळ अश्या अनेक प्रकारच्या फळझाडांची तसेच रातराणी, टगर, मोगरा, अबोली ह्या फुलझाडांची लागवड केली आहे. ह्या झाडांनी आम्हांला सढळहस्ते त्यांच्या फळांचे आणि फुलांचे दान केले आहे त्या झाडांप्रती आम्हांला खूप प्रेम आहे. घरामागील बाग फुलविण्यात आमच्यापेक्षा जास्त सासऱ्यांची खूप मेहनत आहे . ह्या झाडांना खत म्हणून शेणखत, सुकी मच्छी साफ केल्यावर राहणारा कचरा, खराब झालेले पीठ , लोणी काढल्यावर उरणारे पाणी तसेच देवघरातील निर्माल्य कुजवून केलेले खत वापरतो.
सकाळी स्वयंपाकघराच्या खिडकीतून मागील परसातील झाडांवर किलबिलाट करणारे पक्षी पाहिले की खरचं दिवसाची सुरुवात खूप छान होते.
अडळूसा
अळूचे रोप
आंबा ( केसर)
मनमोहक फुललेला बहावा
वांगी
हिरवी वांगी
चेरी
डाळींबाचे झाड
गवती चहा
कढीपत्ता
काजू
वेलची केळी
लिंबूचे झाड
मेथी, शेफूचे वाफे
पसरलेली नागवेल आणि हळदी रोप
पेरुच्या झाडाला लपटलेली नागवेल
पांढरे जांभूळ
औषधी पानफुटी
पपईचे झाड
हिरवागार पुदिना
बोरीच्या झाडाला लपटलेली शतावरी
सिताफळाचे झाड
टॉमेटोची रोपे
बटरफ्लाय ट्री
बटरफ्लाय ट्री
स्वयंपाक घराच्या खिडकीतून
खुपच सुंदर बाग रूपाली.
खुपच सुंदर बाग रूपाली.
भाग्यवान आहात. सुंदर बाग आहे
भाग्यवान आहात. सुंदर बाग आहे
मस्तच!
मस्तच!
मृणाली, जाई, अमितव ..
मृणाली, जाई, अमितव ..
बाग आवडल्याबद्दल धन्यवाद.
भाग्यवान आहात. सुंदर बाग आहे>
भाग्यवान आहात. सुंदर बाग आहे>>+१
निसर्गरम्य स्वच्छ सुंदर बाग
निसर्गरम्य स्वच्छ सुंदर बाग परिसर.
सुंदर , प्रसन्न वाटले फोटो
सुंदर , प्रसन्न वाटले फोटो बघून
खूप छान वाटले बाग बघून.
खूप छान वाटले बाग बघून.
आहाहा कित्ती छान, नजरसुख.
आहाहा कित्ती छान, नजरसुख.
नशीब आहे खरेच. मला सुद्धा
नशीब आहे खरेच. मला सुद्धा इतकी आवड आहे पण पुण्यासारख्या ठिकाणी कसले काय..
छान आहे तुमची बाग
छान आहे तुमची बाग
सुरेख हिरवीगार बाग आहे.
सुरेख हिरवीगार बाग आहे.
कित्ती सुंदर !तुम्ही नशीबवान
कित्ती सुंदर !तुम्ही नशीबवान आहात रुपालीताई . एवढी मोठी जागा आहे. नाहीतर नुसती आवड असूनही फारसे काही करता येत नाही. आम्ही दुधाची तहान ताकावर मानून टेरेस गार्डन फुलवतो. पण खूप limitations असतात. शेवटी जमिनीवरची झाडें ती जमिनीवरची !त्यांची सर नाही येऊ शकत टेरेस गार्डन ला.
खूपच सुंदर आहे बाग
खूपच सुंदर आहे बाग
खूप सुंदर बाग आहे रुपालीताई..
खूप सुंदर बाग आहे रुपालीताई.. आंबे पण खूप लागले आहेत.. पावसाळ्यात भाजीचा अळू, ब्राह्मी, अळंबी पण खुप येत असेल ना.. पण एवढ्या सगळ्या झाडांची काळजी घेणे म्हणजे खूप मेहनत आहे..बोईसर म्हणजे पालघर च्या जवळपास आहे ना..
मस्त!
मस्त!
पांढरे जांभूळ?? मी पहील्यांदा ऐकले.
सोनाली, किशोरजी, अस्मिता,
सोनाली, किशोरजी, अस्मिता, अन्जुजी, कवीन, मेघा, मनीम्याऊ, वर्णिता.. बाग आवडल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@ झंपी - हो .. शहरात इच्छा असूनही जागेअभावी बाग फुलविता येत नाही.
@ नादिशा - तुम्ही सुद्धा गच्चीवर खूप छान बाग फुलविली आहे.
@ श्रवू - हो.. गं. पालघरच्या एक स्टेशन पुढे आहे बोईसर. अळंबी, ब्रम्ही नाही लावली अजून पण कंटोली रानभाजी चा आपोआप लागलेला वेल आहे एक. आंब्याचा फोटो जून मधला आहे. खरतरं ह्या झाडांच्या देखभाली मध्ये सासऱ्यांची जास्त मेहनत आहे.
@ विनिताजी - मला वाटतं की पांढरे जांभूळ डहाणू ते वसई एवढ्याच पट्टयात जास्त उगवत असावे. कदाचित दुसऱ्या भागात त्याला वेगळे नाव असावे. आम्ही त्याला पांढरे जांभूळ म्हणतो. छान थंडावा मिळतो ह्या जांभळाने.
जाम का?मी खाल्ले आहे ते!
जाम का?मी खाल्ले आहे ते!
फोटो जवळून पाहीला, ह्याचे नाव जाम आहे. मस्त लागते.
हो बरोबर विनिताजी .. आम्ही
हो बरोबर विनिताजी .. आम्ही पांढरे जांभूळ बोलतो..
खूप छान बाग. खूप पेशन्सचे काम
खूप छान बाग. खूप पेशन्सचे काम आहे
वाह! फारच सुंदर बाग आहे!
वाह! फारच सुंदर बाग आहे!
आम्ही पण जांब बोलतो.. इथे
आम्ही पण जांब बोलतो.. इथे सोसायटीत झाड आहे..
रायआवळे, बिलिंब झाड पण असेल
रायआवळे, बिलिंब झाड पण असेल.. विरार साईडला मोगऱ्याचे विविध प्रकार पण बघितले आहेत..
अनंत तर हवाच हवा..
धन्यवाद कमला, जिज्ञासा.
धन्यवाद कमला, जिज्ञासा.
हो श्रवू ,पालघर डहाणू साइडला मोगर्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. घराच्या मागे अनंताचे झाड लावले होते पण ते जगले नाही. बेल, शेवगा, कोरफड, काळे जांभळाचे झाड पण आहे.
खूपच सुंदर आहे बाग>>>>+१.
खूपच सुंदर आहे बाग>>>>+१.
छान आहे बाग...आमच्या घरामागे
छान आहे बाग...आमच्या घरामागे अशीच अनेक प्रकारची झाडे आहेत... त्यामध्ये अन्नपूर्णाचे रोप आहे, भात शिजवताना त्यामध्ये पाने घालायची ...साध्या तांदळाचा वासही अगदी मस्त येतो....
खूपच सुंदर बाग आहे रुपाली...
खूपच सुंदर बाग आहे रुपाली... तुमच्या सासरेबुवांचे कौतुक की त्यांनी वेळेचा सदुपयोग करून बाग फुलवली.
लावण्या त्याला अन्नपूर्णा
लावण्या त्याला अन्नपूर्णा म्हणतात मला माहित नव्हते.. आमच्याकडे आहे ते.. भाताला मस्त बासमतीचा सुगंध येतो.. निशिगंधाच्या झाडासारखी पाने असतात त्याची..
श्रवु, अन्नपूर्णा च्या झाडाचा
श्रवु, अन्नपूर्णा च्या झाडाचा फोटो टाकू शकाल का?
धन्यवाद देवकी, लावण्या..
धन्यवाद देवकी जी, लावण्या..
हो साधनाताई , खरचं सासऱ्यांनी वेळ सार्थकी लावलायं.
श्रवु, लावण्या जमलं तर फोटो टाका अन्नपूर्णा झाडाचा.
Pages