घराच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आणि हिरव्या वनराईने नटलेला असेल तर मनाला आणि शरीराला नवचैतन्य लाभते.
शहरात राहायला जागा अपुरी पडत असताना घरामागे मनासारखी बाग फुलविणे खरंतर अशक्य गोष्ट आहे.
परंतु सुदैवाने आम्ही राहत असलेल्या ठिकाणी जागा मोकळी असल्याने आम्हांला विविध प्रकारची झाडे लावता आली. आंबे, केळी, चिकू, फणस, जांभूळ, सीताफळ, लिंबू, डाळींब, चेरी, काजू, पेरू , पपई , नारळ अश्या अनेक प्रकारच्या फळझाडांची तसेच रातराणी, टगर, मोगरा, अबोली ह्या फुलझाडांची लागवड केली आहे. ह्या झाडांनी आम्हांला सढळहस्ते त्यांच्या फळांचे आणि फुलांचे दान केले आहे त्या झाडांप्रती आम्हांला खूप प्रेम आहे. घरामागील बाग फुलविण्यात आमच्यापेक्षा जास्त सासऱ्यांची खूप मेहनत आहे . ह्या झाडांना खत म्हणून शेणखत, सुकी मच्छी साफ केल्यावर राहणारा कचरा, खराब झालेले पीठ , लोणी काढल्यावर उरणारे पाणी तसेच देवघरातील निर्माल्य कुजवून केलेले खत वापरतो.
सकाळी स्वयंपाकघराच्या खिडकीतून मागील परसातील झाडांवर किलबिलाट करणारे पक्षी पाहिले की खरचं दिवसाची सुरुवात खूप छान होते.
अडळूसा
अळूचे रोप
आंबा ( केसर)
मनमोहक फुललेला बहावा
वांगी
हिरवी वांगी
चेरी
डाळींबाचे झाड
गवती चहा
कढीपत्ता
काजू
वेलची केळी
लिंबूचे झाड
मेथी, शेफूचे वाफे
पसरलेली नागवेल आणि हळदी रोप
पेरुच्या झाडाला लपटलेली नागवेल
पांढरे जांभूळ
औषधी पानफुटी
पपईचे झाड
हिरवागार पुदिना
बोरीच्या झाडाला लपटलेली शतावरी
सिताफळाचे झाड
टॉमेटोची रोपे
बटरफ्लाय ट्री
बटरफ्लाय ट्री
स्वयंपाक घराच्या खिडकीतून
धन्यवाद अमृताक्षर..
धन्यवाद अमृताक्षर..
बोईसरला राहते मी.. आमच्या एरियामध्ये काजू चांगले होतात. चेरी चे झाड पण चांगलेच वाढले आहे पण चव थोडी आंबट आहे चेरीची. रंगाने खूप लाल झाली की चेरीला चांगली चव लागते. माती खरचं खूप चांगली आहे इथली. डहाणू पालघर वसई एरिया बागायतीसाठी प्रसिद्ध आहे.
मृणाली, छान बाग फुलविली आहे भावाने गच्चीवर.
खरच भाग्यवान आहात तुम्ही.
खरच भाग्यवान आहात तुम्ही..इतक्या हिरवाईने नटलेल्या बागेत राहता.
मृणाली कोथिंबीर मस्त बहरलीय..
मृणाली कोथिंबीर मस्त बहरलीय.. आणि त्यामध्ये कृष्णतुळस पण आहे..
फार आवडली बाग आणि झाडांची
फार आवडली बाग आणि झाडांची विविधता आहे. ,
विरारपासून वेगळी हवा जाणवू लागते. खूप मोकळे वाटते.
मृणाली, छान आलीत झाडं,
मृणाली, छान आलीत झाडं, कोथिंबीर मस्तच हिरवीगार .
धन्यवाद शरदजी..
धन्यवाद शरदजी..
विरारपासून वेगळी हवा जाणवू लागते. खूप मोकळे वाटते.>+१
Pages