आय सपोर्ट सुनिल गावस्कर !

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 September, 2020 - 16:13

आयपीएल कॉमेंटरी दरम्यान केलेल्या एका वक्तव्याने सर सुनिल गावस्कर वादाच्या भोवरयात सापडले आहेत.

झाले असे की कोहलीची बॅट काही चालत नाहीये. त्यावर टिप्पणी करताना गावस्कर म्हणाले, 'ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने.."

मला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा गावस्कर यांना असे कोहलीच्या पत्नीबद्दल भले ती सेलिब्रेटी का असेना असे वक्तव्य करणे मला पटले नाही. गावस्कर आवडीचे खेळाडू. त्यांची कॉमेण्टरी आणि क्रिकेटबाबतची मतेही फार आवडतात. एका सच्च्या मुंबईकरासारखे ते बोलतात. प्रत्यक्ष भेटीचा योग आला नाही पण ज्यांना आलाय त्यांनी सांगितलेय की किती डाऊन टू अर्थ माणूस आहे. चुकून का होईना अशी त्यांची जीभ घसरायला नको होते असे वाटले. अर्थात मी ते काय नक्की बोलले आणि कश्या टोनमध्ये बोलले ऐकले नव्हते.

आज मात्र कॉमेण्टरीला ते असताना त्यांच्या सहसमालोचकाने पुन्हा तो विषय काढला तेव्हा गावस्कर यांनी सांगितले की विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक क्रिकेट खेळतानाचा विडिओ व्हायरल झाला होता. बहुधा त्यांनी स्वत:च केला असावा. त्यासंदर्भाने ते म्हणाले की लॉकडाऊनमुळे त्याव्यतीरीक्त कोहलीने जास्त सराव केला नसावा जे त्याच्या खेळाकडे पाहून जाणवतेय.

यात कसलीही टिका वा टोमणा नव्हता. जरी अनुष्काचा उल्लेख टाळता आला असता तरी तो ओघात झालाय. त्यात त्यांना धारेवर धरावे असे काही नाही असे मला वैयक्तिकरीत्या वाटते. खुद्द कोहली आणि अनुष्काला हे रुचले नाही तर नापसंती दर्शवणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र ट्विटर फेसबूक या सोशलसाईटवर त्यांना ट्रोल करणे, त्यांच्या समालोचनावर टिका करणे, त्यांची क्रिकेटची अक्कल काढणे, ईतकेच नव्हे तर त्यांच्या कॉमेंटमधून डबल मिनिंग शोधणे वगैरे जे प्रकार चालू आहेत ते व्यथित करणारे आहेत.

बरे या अग्रेसिव्ह ट्रोलर्समध्ये बहुतांश लोकं तर ते असतात जे ईतरवेळी स्वत: अनुष्का विराट. दिपिका रणवीर, आलिया, सई, स्वप्निल. सचिन, शाहरूख, गेला बाजार अमिताभ अभिषेक बच्चन आदींना काहीतरी खुसपट काढून कसलासा अमंगळ आनंद मिळवायला ट्रोल करत असतात. जो अधिकार तेव्हाही यांना कोणी दिलेला नसतो. आणि आताही यांच्याकडे तो नाहीये.

आपले ट्रोल करणे जस्टीफाय करायला मग हे लोकं घडल्या घटनेला पदरची मीठ मिरची लावतात. गावस्कर यांनी आज स्पष्ट सांगितले की या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मी काय बोललो ते स्वत: ऐका आणि मग ठरवा, मला मी काही वावगे बोललो आहे असे वाटत नाही.

थोडक्यात गावस्कर यांनी ट्रोलर्सना घाबरून माफी मागायला नकार दिला आहे. हे मला ईथे फार गरजेचे वाटते. अन्यथा हि ट्रोलर गॅंग आपल्याला काहीतरी पॉवर मिळाल्याच्या थाटात वावरेल. यांना फाट्यावर मारणे गरजेचे आहे जे गावस्कर करत असतील तर आय सपोर्ट गावस्कर !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोटल बिनडोकपणा सुरू आहे सोशल नेटवर्क्स वर. ही क्लिप ओरिजिनल आहे हे धरले, तर काहीही वाईट्/चुकीचे बोलला नाही तो.
https://www.youtube.com/watch?v=M2lJ0cvF2GQ

त्याने स्पष्टीकरणही चांगले दिले आहे. मुळात गावसकर सारखा माणूस जाहीररीत्या असले काहीतरी बोलणे जवळजवळ अशक्य आहे. पब्लिक ने एक मोठी चिल पिल घेणे गरजेचे आहे. उगाच फालतू कारणावरून एकदम जन्ता पेटून उठत आहे. गेल्या काही महिन्यांत अशी बरीच उदाहरणे पाहिली.

हे होतेच.. विराट लेजेंड आहे.. गावस्कर ला कोण ओळखत नाही... त्यामुळे त्याच्या विरुद्ध बोलणारच पब्लिक...
कॉमन आहे असले प्रकार...

पर्सनली - मला नाही आवडली ती कमेंट... अनुष्का ला इथे घुसडण्याची गरज नव्हती गावस्कर ला...

गावस्करंचा बोलण्याचा अर्थ तसा द्विअर्थी वाटत नाहीये. जर बोलल्या नंतर हसले असते किंवा चावटपणा दाखवला असता तर चुक होतं. वरील क्लिप वरुन तर वाटत नाही असं.

>>विराट लेजेंड आहे.. गावस्कर ला कोण ओळखत नाही<<
हा हा. अज्ञानात सुख असतं ते हे. विराट हॅज टु ग्रो ए लॉट टु रीच गावस्कर लेवल. बघुया हि सिच्युएशन तो कशी हँडल करतो ते. नाहि तरी त्याच्यात मचुरिटी कमीच आहे...

आणि संदर्भ तो त्या क्लिपचा होता, ज्यात अनुष्का त्याला बोलिंग करताना स्पष्ट दिसत आहे. मग वेगळा अर्थ कोण काढतंय...

मराठी माणसाला संपवायचा प्लॅन आहे हा. आपल्या मराठी माणसांविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय.>>>>>>>
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज , १०५ हुतात्मे , मावळे , आमची मुंबई हे राहिले की Happy

ही सेलिब्रिटी मंडळी इंस्टा फेसबुक वर स्वतःचे फोटो व्हिडिओ टाकून कोट्यवधी कमवत असताना त्यावर त्यातीलच एखाद्या व्हिडिओ वर प्रतिक्रिया येणे साहजिकच आहे .
आणि गावसकर नी व्यक्त केलेल्या शब्दात कुठेही अन्वयार्थ दिसत नाही .
पण एकंदरीत अनुष्काने उत्तर देण्याची जी घाई केली त्यावरून तरी बॉलीवुड तारकांचा आय क्यू कमी होत चाललाय का शंका वाढली आहे ...

कंगना , रिया , जया , दीपिका ,स्वरा ,तापसी , पायल घोष यांनी नक्की चालवलं य काय ? असा प्रश्न पडतो !

काल गावस्करचे विधान वाचनात आले तेव्हा मलाही खूप संताप आलेला. त्याचबरोबर आश्चर्यही वाटले होते कारण गावस्कर पोलिटिकली करेक्ट वागण्याबोलण्याच्या कटेगरीतील आहे. असल्या चुका तो जाहीरपणे करणार नाही. आजवरच्या त्याच्या आयुष्यात त्याने असले काहीही केल्याचे वाचले नाही.

त्याने जो खुलासा दिलाय तो खरा असेल तर त्याने घेतलेला स्टँड योग्य आहे. गैरसमज होऊ शकतात, ते दूर केल्यावर लोकांनी स्पष्टीकरण स्वीकारायला हवे.

अनुष्का चे नाव घेण्याची गरज च नव्हती.
जे ground वर दिसत आहे तेवढेच सांगायचे कॉमेन्ट्री करणाऱ्याचे काम आहे.
किंवा त्या खेळाडू ची माहिती देवू शकतात.
पण हल्ली सर्वांनी च स्वतःची पातळी सोडली आहे.
न्यायाधीश पण उगाचच काही पण कमेंट करत असतात.
न्यूज चॅनेल वाले स्वतःची फालतू मत news सांगताना व्यक्त करत च असतात.
हे क्रिकेट ची कॉमेन्ट्री सांगणारे पण आता बिघडले आहेत.

दिपीका घरातुन निघाली ते ती घरात नव्हे तर हॉटेल मध्ये राहिली होती इथ पर्यंत बातम्या लाईव्ह आहेत, यावर ताजे अप डेट्स देण्यासाठी धागा काढायला पाहीजे.

फारेण्ड यांनी लिंक दिलेला व्हिडियो कॉपीराइटमुळे उडाल्याने ही लिंक देत आहे
https://twitter.com/Joydas/status/1309444285893230593

तसंच लोक लिंक पाहायचे कष्ट घेणार नाहीत किंवा तिथलाही व्हिडियो गायब होईल म्हणुन गावसकर काय म्हणाले ते लिहीत आहे

और वो बडे .... चाहते है कि जितनी वो प्रॅक्टिस करे... उसीसे तो वो बेहतर बन सकते हैं, वो जानते हैं.
अब जो लॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का की बोलिंग की प्रॅक्टिस की उन्होंने . वो दिखाइ दी... व्हिडियो देखिए... उससे तो कुछ नहीं बनना है.

बोलिंगच्या जागी खोडसाळपणे " गेंदें" हा शब्द बदलला. तसंच विराटच्या अपयशाचं खापर गावसकर यांनी अनुष्का वर फोडलं (तोवर विराट बॅटिंग करत होता तरीही ) असाही निकाल दिला गेला .

सोबतचा समालोचक बहुधा आकाश चोप्रा आहे. त्याने विराट त्याच्या अपार्टमेम्टमध्ये प्रॅक्टिस करत असतानाचा व्हिडि यो कुण्या शेजार्‍याने काढला असावा. तो व्हायरल झाला. त्यांना एवढीही प्रायव्हसी नाही, असे म्हटले.

न्यायाधीश पण उगाचच काही पण कमेंट करत असतात.>>>>>>>>
न्याय पालिका क्षेत्र आज पर्यंत आदर सन्मान बाळगून होते !
काही पण कॉमेंट्स करण्याची सुर वात त्या अती ज्ञानी पाच न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेवून केली !!!

अनुष्काला विनाकारण मध्ये आणलं गावस्करने. कोहलीवर खार खाऊन असावा गावस्कर. गावस्करची अपेक्षा की जेव्हा कोहली बॅट हातात पकडेल तेव्हा समोर बुमरा, रबाडासारखे गोलंदाज असावेत. एव्हडी हाय लेव्हलची अपेक्षा प्रायव्हेट कंपनीचे बॉस पण नाही ठेवत त्यांच्या एम्प्लॉयीकडून.

जरी अनुष्काचा उल्लेख टाळता आला असता तरी तो ओघात झालाय. >> अशाच प्रकारे मागे कुणीतरी विराटवर टीका केली होती. अर्थात टीका सभ्य शब्दांत होती. कोणीतरी चांगले जुने प्लेयर होते. त्यातही अनुष्काचा उल्लेख ओघात आला होता. बहुतेक उदाहरण म्हणून. तेव्हा ते प्रकरण फारसे चिघळले नाही. नीट आठवत नाही. मात्र अनुष्काने तेव्हाही अक्कल पाजळली होती. देजावू?

हे.ह. - धन्यवाद.

अ‍ॅक्च्युअली अनुष्काने गावसकरला जे विचारले आहे ते बहुधा मीडियाने खोडसाळपणे बदललेल्या वाक्यांवरून असू शकते आणि गावसकर स्वतःच्या मतावर ठाम राहिला आहे - व त्याने जे स्पष्टीकरण दिले आहे ते ही बरोबर आहे. पब्लिकली उपलब्ध असलेल्या व क्रिकेटशीच संबंधित असलेल्या क्लिपवरून त्याने ती कॉमेण्ट केली होती. यात कसलाही सेक्सिझम, अनुष्कावर खापर वगैरे काहीही नाही. आणि गावसकरला अनेक वर्षे जे समालोचक म्हणून ऐकत आहेत त्यांना त्याची कॉमेण्ट ऐकताना लगेच कळेल की त्यात काहीही गैर हेतू नव्हता. आणि तो दुसरा समालोचक जर आकाश चोप्रा असेल तर तो ही अत्यंत सभ्य आहे. त्याचीही त्यावेळची प्रतिक्रिया ही क्लिप पब्लिक करण्याबद्दल आहे.

टीव्ही व सोशल मीडियाला उगाचच कशात काही नसताना बाउ करायची सवय आहे.

तरी अनुष्का चा उल्लेख अनावश्यक वाटला.
>>>
गावस्करलाही आता हेच वाटत असेल. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि उल्लेख केला Happy

पण अनुष्काच्या दृष्टीने विचार करता तिला खटकणे स्वाभाविक आहे.
स्पेशली तिला नाहक बरेचदा विरटची पत्नी म्हणून क्रिकेटशी जोडलेल्या कमेंट ऐकाव्या लागतात. आणि कमेंट करणारयाच्या दर्ज्यानुसार त्या खालच्या पातळीच्याही असू शकतात. त्यामुळे क्रिकेटच्या संदर्भाने तिचे नाव कोणी घेतले की तिला लगेच चीड येत असावी. किंबहुना ती याआधीही बरेचदा चीडली आहे पत्रकारांवर सुद्धा ज्यांनी विराट आणि क्रिकेटसंदर्भात तिला वैयक्तिक प्रश्न विचारलेत.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने गावसकर यांना तुम्ही दिलेला संदेश अनादर करणारा असल्याचं म्हटलं आहे. पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटलं आहे की, "खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?".

पुढे तिने म्हटलं आहे की, "मला खात्री आहे की माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करताना तुमच्याकडे इतर पर्यायी शब्द किंवा वाक्य उपलब्ध असतील. की त्यात माझं नाव जोडताना ते मर्यादित राहतात".

"हे २०२० असून गोष्टी अद्यापही बदललेल्या नाहीत. क्रिकेटमध्ये माझं नाव ओढलं जाणं कधी बंद होईल?," अशी खंत अनुष्काने व्यक्त केली आहे. शेवटी तिने लिहिलं आहे की, "आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही एक महान खेळाडू असून जेंटलमनच्या या खेळात तुमचं नाव नेहमी उंचावर असेल. पण तुम्ही काय बोललात हे कळल्यानंतर मला काय वाटतं ते सांगण्याची इच्छा होती".

----

एकाने व्हॉटसप कॉमेण्टमध्ये ही अनुष्काची प्रतिक्रिया कॉपी पेस्ट केलेली. त्यामुळे मूळ न्यूजची लिंक नाही.

व्हिडीओ पाहिल्यावर गावसकर ची कॉमेंट खोडसाळ नव्हती असं जरी कळलं, तरी अनुष्का चा उल्लेख अनावश्यक वाटला. >> आता तो ऊल्लेख आऊट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप झाल्यामुळे हाईंडसाईटमध्ये अनावश्यक वाटतो आहे. एकंदर आयपीएल सेटींग आणि काँमेंट्री एखाद्या बायलॅटरल सिरीज किंवा वर्ल्ड ईवेंट पेक्शा खूपच ईन्फॉर्मल प्रकारे घडवली जाते असा माझा अनुभव आहे जे खरोखर चांगले आहे. ऑसी कॉमेंटेटर्स अनेक गंमतीशीर किस्से आठवणी सांगतात ज्यात बरेचदा त्यांच्या किंवा त्यांच्या सहकार्‍यांच्या फॅमिलीचे रेफरंसेस येतात. विराट अनुष्काच्या विडिओच्या रेफरंसने केलेले विधान टेक्निकली अनावश्यक वाटले तरी ईन्फॉर्मल सेटिंग बघता वावगे नव्हते.

अनुष्काने आक्षेप घेतला नसता तर गावस्कर जे बोलले ते असे आक्षेपार्ह कॅटेगरीमध्ये येते असे कोणाच्याही ध्यानात आले नसते. म्हणजे तिच्या भावना महत्वाच्या नाहीत असे मला म्हणायचे नाही. अनुष्काने विराट त्या सामन्यात परफॉर्म करू न शकल्याचा आफ्टर द फॅक्ट रेफरंस तिच्या आक्षेपातून व्यक्त केलेल्या भावनेला जोडला की काय असेही वाटायला जागा आहे.
मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते तिने तिचा आक्षेप नोंदवायला निवडलेले माध्यम. मला खात्री आहे गावस्करांपर्यंत आपल्या भावना थेट पोहोचवण्यासाठी तिला अनेक पर्याय ऊपलब्ध होते...बीईंग एलिट अँड ऑल.... पण कदाचित तिला आपल्या भावना गावस्करांपर्यंत थेट पोहिचवण्यापेक्षा त्यांच्या माध्यमातून आपल्या नावाला नवर्‍याच्या परफॉर्मन्सच्या दावणीला बांधल्याच्या जुन्या घटनांच्या अनुषंगाने आजवर व्यक्त न केलेल्या भावना सामाजिक करणे जास्त महत्वाचे वाटले असावे.
ह्यात गावस्करांची (आणि काही प्रमाणात विराटचीही) नाहक कोंडी झाली ह्याचे वाईट वाटले.

कदाचित अनुष्काची 'मी खाजगीमध्ये विराटची बायको आहे पण क्रिकेटर आणि कॅप्टन विराटशी त्याच्या खेळाशी आणि त्याच्या यशापयशाशी माझा संबंध जोडू नका . मी एक स्वतंत्र अभिव्यक्ती असणाअरी व्यक्ती आहे' ही भावना खूप स्ट्राँग असावी.. जे तिच्या दृष्टीकोनातून योग्यच आहे पण जनरल पब्लिकला एवढा सोफिस्टिकेटेड विचार कळणे केवळ अशक्य आहे. हा त्रास तिला पुढेही होत राहणार आहे. ह्यासाठी विराटने पब्लिकमध्ये अनुष्काबद्दल फार न बोलणे (तो बर्‍याच ईंटर्व्यूमध्ये अनुष्काबद्दल खुलेपणाने आणि आभिमानाने बोलतो), तिने विराट बरोबर सामाजिक कार्यक्रमांना हजेरी न लावणे हा ऊपाय आहे. पण आजच्या सोशल मिडिया आणि पापाराझीच्या जमान्यात हे जमवणे अवघड आहे.
त्यात अनुष्काही पब्लिक फिगर, सेलिब्रिटी असल्याने सचिन, द्रविड, कुंबळेंच्या स्पाऊजना जी प्रायवसी मिळाली तशी आपल्यालाही मिळावी अशी तिची ईच्छा असली तरी ती प्रत्यक्षात येणे केवळ अशक्य आहे.

पण ते रिअ‍ॅक्ट केलेलं ट्विट मूळात अनुष्काने केलंय का? इंए च्या बातमीत जे दखवलंय त्यात चेक मार्क नाहि. हल्ली फेक अकाउंट्स इंपर्स्नेट करुन विनाकारण राळ उडवुन देण्यात सक्रिय असतात...

तिने विराट बरोबर सामाजिक कार्यक्रमांना हजेरी न लावणे हा ऊपाय आहे.
>>> सिरियसली??? म्हणजे बाहेर पोरं छेड काढतात मुली तू घरीच बस मेंटलिटी झाली...

स्वतः चे आयुष्य कसे सुंदर बनवता येईल हे सोडून दुसऱ्या च्या आयुष्यात डोकावण्या साठी लोकांकडे खूप वेळ असतो.
आणि त्या वर गॉसिप करण्यात तर भारी दांडगा उत्साह असतो.
भारतीय लोकांची ही खास ओळख आहे.

Pages