वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रिंज म्हणजे ती ऑलिव्हिआ डनेम आणि पिटर/ वॉल्टर बिशप वाली ना? ती भारतात असताना एपिसोड डाऊनलोड करुकरू बघायचो. १० वर्षांपूर्वी आवडलेली. मग अआणिअ प्रकार (म्हणजे सिरिअल फ्रिंज सायन्सवरच आहे, सो अतर्क्य असणार हे गृहित आहे. सो पॅरलल युनिवर्स वगैरे ठीक होतं, पण त्यातुन एसटी पकडल्यासारखी येजा ... जन्माचं रहस्य .. असलं सुरू झालं आणि) फारच वाढले.
मग सुटली कधीतरी.
पण सुरुवातीच्या काळात (तरुणपणात) बघितलेली असल्याने जिव्हाळा आहे इतकंच! Biggrin
हिच्या आधी हिरोज बघायचो. ती पण सुपर पॉवर इ. होती. त्याचं ही भरीत झालं नंतर.

मीरा द फॉल चा 3 रा सीझन आलेला नाही बहुतेक >>> सिझन 3 आहे, पण हो भारतातील नेटफ्लिक्सवर नाही. मी नेटवर वाचलं की 1 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार, पण अजूनही दिसत नाही. अशा सीरिज अर्धवट पाहिल्या की हुरहूर वाटत राहते.

मीरेने रेकमेंड केल्यामुळे virgin river बघितली नेटफ्लिक्स वर (इथे पान नं १३ वर आहे) छान आहे सिरीयल. पण एकच सिझन आहे का, शेवटच्या एपिसोड नंतर सेकंड सिझन कमिंग सून असं लिहीलेलं. कधी येइल >>>> येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता, पण सध्याची परिस्थिती पहता चित्रिकरण झालं असेल का आणि रिलीज होऊ शकेल का शंका आहे. टिपिकल M&B कॅटेगरी आहे. ज्यांना रोमान्स जॉनरं आवडतं त्यांना आवडेल.

नेटफ्लिक्सवर कोणी 'मसाबा मसाबा' पहात आहे का? हाय सोसायटी / सेलिब्रिटीजच्या आयुष्यात डोकवायचं असेल तर पहा. नीना गुप्ता आणि मसाबाच्या गॉसिप मॅगेझिन मधल्या बातम्यांचं संकलन आणि त्याचं चित्रीकरण वाटतं. थोडं सत्य, थोडं काल्पनिक मिळून मसालेदार बनवलं आहे. मसाबा कधी कधी खूप गोड दिसते आणि कधी कधी सामान्य (a girl next door type).

मी 3-4 एपीसोड्स पाहिले कारण her profession is topic of my highest interest. मला वाटलं ती डिझायनर आणि तिची सीरिज म्हणजे ती ऑसम ड्रेसेस घालेल, पण काहीच अपवाद सोडता मला तिचे ड्रेसेस फार काही आवडले नाहीत. नीना गुप्ताच्या साड्या आणि ड्रेसेस त्यामानाने चांगले आहेत.
बाकी कथा वगैरे कमेंट करण्यासारखी ग्रेट नाही, पण अभिनय, सगळेच मस्त. मासाबाची मैत्रीण जिया इराणी आवडली.

'आश्रम' वेब सिरीज मला तर वैयक्तिक खूप आवडली.
पहिल्या भागाची,पहिली 20 min कळत नाही नक्की काय चाललंय, मग मात्र अगदी हरवून जायला होतं..
बॉबी देओल सोडला तर फारशे नावाजलेले कलाकार नाहीत पण प्रत्येक जण आपापल्या जागी मजा आणतो
बॉबी देओल चा खूप शांतपणे, हळुवार आवाजात बोलणारा, आश्वासक बाबाजी मस्त जमून आलाय.

पण पहिला सिझन ऑलमोस्ट सस्पेन्स क्रियेट करण्यासाठी बनवला आहे, आश्रम ह्या नावाखाली किती,कसे,कुठल्या थराचे धंदे चालतात, राजकारण ते ड्रग्स कुठलाही प्रांत निषिद्ध नसल्याने,सगळीकडे घट्ट विळखा घालून बसलेल्या अजगरा प्रमाणे- बाबाजी आणि त्याचे आदमी... ( प्रत्येक गोष्टीचे जरा जास्त डीटेलिंग केल्याने प्रत्येक एपिसोड जवळ जवळ 45min चे झाले आहेत)
आणि अगदी मोजून 4 जणं ह्याच्या मुळाशी जायचं ठरवतात, जे अशक्य आहे असेच वाटावं इथे पहिला सिझन सम्पतो..

पुढच्या सिझन च्या ट्रेलर वरून ते सगळेच भाग पूर्ण चित्रित करून झालेत हे कळतं, आणि त्या चौघांसाठी शोधकार्य किती अवघड जातंय ह्याची चुणूक पाहून उत्सुकता फारफार ताणली जाते.

निराशा होणार नाही एवढं नक्की..
पिक्चरायझेशन मस्त क्लीन आहे, संवाद व्यवस्थित ऐकू येतात, रात्रीचं शूटिंग पण खूप छान आहे, आश्रम सिन मध्ये बॅकग्राउंड ला एक गाणं खूप श्रवणीय आहे
(शिव्या आणि बेड सिन अगदी 2-3 प्रसंगातच आहेत)

'आश्रम' मला पण आवडली. प्रकाश झा नावामुळे बघायला सुरुवात केली.
खूप अंगावर येणारी आहे.
कथानक, पात्रं, आश्रम सेट-अप, अ‍ॅक्टिंग सगळंच छान आहे.

दलित आणि दलितेतर संघर्ष दाखवताना जातपातीची झळ सोसणारे आणि आरक्षणाची झळ बसलेले - अशा दोन्ही बाजूंना कथानकात स्थान दिलंय ते चांगलं वाटलं मला.

आत्ता ९ एपिसोड्स आहेत, ते सीझन १ भाग १ आहेत,
सीझन १ भाग २ कमिंग सून असं शेवटी पाहिलं.

एक हनी-ट्रॅप सेक्स सीन, एक लव्ह सीन आणि एक गुंगीचं औषध देऊन झालेल्या रेपचा सीन - तिन्हींचं फिल्मिंग साधारण एकाच पद्धतीने केलंय :कपाळावर हात:
हा एक अपवाद, बाकी छान.

हो , अमित तीच ती फ्रिन्ज Lol

मीरा , तेच म्हणायचे होते की फॉल चा तिसरा सीझन भारतातील नेटफ्लिक्सवर नाहीये उपलब्ध

आर्याची स्टोरी आता नको मला. मी मागे लिहीलं होतं, मी बघणार नाहीये पण मी नको म्हणत असतानाही नवऱ्याने भरले पैसे त्यामुळे आता hotstar vip बघता येईल. त्यामुळे बघेन आर्या जेव्हा जमेल तेव्हा.

The social dilemma @Netflix बघत आहे अत्यंत आवडली आहे आतापर्यंत. How social media plays with your psychology and make you vulnerable, spread misinformation, steal data, sell , haunt ..... त्यांच्या भाषेत They make a voodoo doll with this and manipulate your every move.
ज्यांना documentary आवडतात त्यांच्यासाठी छान आहे. सगळे Facebook, Twitter , Instagram , Google चे Ex employees समजवतात. Interesting !

बघितली ईकडे थोडी चर्चापण केली . ३१-३२ पानापासून आहे .

>> पान नं सांगितल्या बद्दल विषेश धन्यवाद स्वस्ति.
मलाही चर्चा झालेली आठवत होते पण मायबोलीवर शोध सुविधा वापरुनही पान नं. सोडाच.. पण रिझल्ट्स मध्ये हा धागाही आले नाही.
त्यामुळे गोंधळले.

हॉस्टेजेस चा २ रा सिझन आला आहे. (हॉटस्टार)
>> यस्स.. नक्की बघणार आहे.

Person of interest बघितलीये का कोणी ? बॅटमनफेम नोलनच्या भावाची आहे. मानवी आयुष्यला कंट्रोल करणारे AI ही थीम आहे. मस्त आहे

Person of interest>> नवीन आली तेव्हाच दोन एक सीजन पाहून सोडून दिली. लीड कॅरेक्टर मख्ख आहे हे लख्ख आठवते अजून. Lol

जेन द व्हर्जिन बघून पूर्ण केली.
जेन चं, तिच्या आई आजीचं पात्र खूप छान रंगवलं आहे.
त्यातले दोन्ही हिरो वेगवेगळ्या प्रकारे सुंदर आहेत. एक तर देवदूत वगैरे वाटावा इतका सुंदर आहे. (एंगेज्ड पण आहे Happy ) दुसरा साधारणपणे अमेरिकेचा जॉन अब्राहम म्हणता येईल.
पण शेवट आवडला नाही.

फिल्मी , मला तरी मख्ख वगैरे वाटलं नाही .
उलट आज ज्या पद्धतीने फेसबुक वगैरे वर बातम्या दिल्या जातात त्याची बीज आहे त्या मालिकेत.
असो . आपआपला चॉईस. आणि मायकल इमर्सन खूप चांगला अभिनेता आहे .

>>Person of interest>> नवीन आली तेव्हाच दोन एक सीजन पाहून सोडून दिली. लीड कॅरेक्टर मख्ख आहे हे लख्ख आठवते अजून.

लिड हिरो मक्ख + १००० पण माझ्या नजरेत Harold हिरो आहे Happy पहिले ३-४ सिजन चांगले आहेत. नंतर बोर मारतं

आर्या तीन भाग बघितले. चंद्रचुड सिंग मरतो त्याचं वाईट वाटलं, निदान नवरा बायको भेट व्हायला हवी होती आणि तो ऑक्सिजन मास्क का काढतो, मुलंहि सांगत नाहीत मोठी दोघं, त्यांना एवढंही समजत नाही का. तो तिचा जेलमधला भाऊ तो गेल्यावर सर्वच त्याच्यावर ढकलतो.

ती आर्याची मुलगी भसाभसा सिगरेट ओढत असते, आईचं लक्ष नसतं. ती सिगरेट पण drugs ची असेल ना. नसली तरी ती मुलगी तशी लहान वाटते. तरी smoking करते. अर्थात लहान थोर कोणीच करू नये म्हणा पण तिला ओढताना बघून त्रास झाला. वेब सिरीजमधे प्रतीकात्मक काही दाखवत नाही, सिगरेट हातात घेतली की बासकी.

आत्ताच आर्या बघून संपली. शेवटी वाईट रडू आलं.
ती गाणी काळजाला घरं करून जातात.. आणि ते घर सुद्धा.. त्या लहान मुलासाठी जीव कळवळतो.

खूप शॉक्ड आहे मी. ज्या कोणाला शेवट आधी प्रेडिक्ट करता आला ते धन्य आहेत. (किंवा मी मठ्ठ आहे).

आर्यासाठी वाईट वाटतं..
बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले की :'(

यापुढे 'बडे अच्छे लगते हैं' ऐकल्यावर तेज सरीन आठवू नये इतकीच इच्छा आहे माझी Sad

आर्यासाठी वाईट वाटतं..
बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले की :'( >> ती लढेल Happy
शेवटी ती पण तिच्या बापाची मुलगी आहे. दुसरा सीझन येईलच लव्कर!!

आश्रम सिझन १ बघितला. एकदम मस्त सिरीज वाटली. कधी नव्हे ते बॉबी देओलचे काम आवडले. हा माणूस चेहर्‍यावरून कायम confused वाटायचा की action hero बनू की romantic hero बनू. त्याने दोन्ही प्रकार करून पाहिले. त्यातल्या त्यात गुप्त, हमराज, अजनबी अश्या मोजक्या चित्रपटातच ह्याचे काम आवडले. पण इथे ह्या आश्रम मध्ये शोभेल असा रोल मिळाला आहे. एकाच वेळी बाबा रूपात राहून चेहर्‍यावर प्रेमळ भाव व लोकांना influence करणारे बोलणे आणि त्यामागचे धुर्त भाव दाखवणे बॉबीला चांगलेच जमले आहेत. अगदी पहिल्या एपिसोड पासून सिरीज एकदम पकड घेते. प्रकाश झा चे दिग्दर्शन आणि इतर सहकलाकारांचा दमदार अभिनय ही जमेची बाजू. आश्रमात बाबा चे बॅकग्राऊंडला चालणारे गाणे ही मस्त.

एकरूप महास्वरूप...!! जपनाम..!! पुढच्या सिझनला जास्त मजा येईल असे वाटत आहे.

आर्या पहिला सिझन बघू की नको प्रश्न पडलाय. स्टोरी संपवलेली दिसत नाहीये असं वाटतं इथे वाचून, असल्या गोष्टींना अर्धवट ठेवता कामा नये.

खूप शॉक्ड आहे मी. ज्या कोणाला शेवट आधी प्रेडिक्ट करता आला ते धन्य आहेत. (किंवा मी मठ्ठ आहे). >>> मलाही predict करता येत नाहीये, तीन भाग बघितले फक्त. फार त्रासदायक दिसतेय हि आर्या.

>>Person of interest>> नवीन आली तेव्हाच दोन एक सीजन पाहून सोडून दिली. लीड कॅरेक्टर मख्ख आहे हे लख्ख आठवते अजून.

लीड कॅरेक्टर बहुतेकवेळा 'पुढचा जेम्स बॉण्ड मूव्ही मलाच मिळणार आहे' या आवेशात दिसतो Happy
बाकी मेन लीड तर द मशिन आहे सेरिजची. एकदा बघणेबल वाटली.

जस्ट 'गुल्लक' बघितली. ५वा भाग संपल्यावर संपल्याचं वाईट वाटलं इतकी आवडली.
साधी-सरळ, हलकीफुलकी, पंचायत ज्यांना मनापासून आवडली त्यांना नक्की आवडेल.
प्रत्येक भाग १५-२० मिनिटाचा आहे. छोटा आणि पटकन मजा आणणारा.
सगळ्यांचीच कामं छान. अगदी २ सेकंद दिसलेली अन्नु ची आत्या पण लक्षात राहाते.

मला कोणीतरी थांबवा, मला कोरियन ड्रामा चं वेड लागलंय. आधी crash landing on you मग marriage contract, मग she was pretty मग एक वेगळी सिरीयल vergin river बघितली मग परत k drama.
Was it love
Fight for your way
What is wrong with secretary Kim
आणि आता सद्ध्या oh my venus बघतेय

Pages