साहित्य
पारीसाठी-
१) २ भांडी (अंदाजे पाव किलो) बासमती तांदूळ पिठी - घरी करणार असाल तर बासमती तांदूळ धुवून, खडखडीत वाळवून पीठ करावे. मी तयार पीठ वापरते.
२) पीठा इतकेच पाणी
३) १ चमचा लोणी किंवा तेल
४) चिमूटभर मीठ
सारणासाठी-
५) २ नाराळांचा चव ( अंदाजे ३ भांडी) ताजा खोवला असेल तर उत्तम - खोबरं खोवताना चॉकलेटी, पाठीचा भाग घ्यायचा नाही. पांढरं शुभ्र खोबरं घ्यावं.
६) गूळ - २ भांडी (गोडाच्या आवडीप्रमाणे वाढवा/ कमी करा) चिरून किंवा जरा बारीक करून घ्यावा.
७) वेलदोड्याची पूड
कृती:
१) गूळ, खोबरं एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. गूळ पातळ झाल्याने आधी सारण पातळ असेल. साधारण आठ ते दहा मिनिटात घट्ट होऊ लागले की झाले असे समजा. अधून मधून हलवत रहा. योग्य घट्ट झालं की त्यात वेलदोड्याची पूड घाला.
सारण आदल्या दिवशी करून फ्रीजमधे ठेवता येइल. मी सारणाचा फोटो काढायचा विसरले.
२) जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या. त्यात लोणी/ तेल आणि चवीपुरतं मीठ घाला. पाणी चांगले रटरट उकळले की पिठी घाला आणि भराभर हलवा. सगळं नीट मिक्स होऊ द्या. भरभर हलविण्यासाठी काविलथ्याची किंवा मोठ्या चमच्याची/ डावाची मागची बाजू जास्त बरी पडेल. आत्ता वर झाकण ठेऊन एक दणदणीत वाफ येऊ द्या आणि आच बंद करा. (अर्धा ते एक मिनिट.) जास्त वेळ राहिला तर उकड कोरडी होईल.
३) उकड गरम असतानाच तेल, पाणी लावून चांगली मळून घ्या. मी फूड प्रोसेसर वापरते. आता छोटा गोळा घेऊन तो परत छान मळून घ्या. उकड जितकी चांगली मळली असेल तितका मोदक वळायला सोप्पा. हाताला किंचित तेल लावून वाटी चा आकार द्यायला सुरुवात करा. सगळीकडून समान आणि पातळ पारी झाली की साधारण एक चमचा सारण भरा बोटांनी पारीच्या कडेवर निऱ्या घाला. जितक्या निऱ्या जवळ जवळ येतील तितका नंतर मोदक सुबक दिसेल. सगळ्या निऱ्या झाल्या की नाजूक हाताने त्यांना एकत्र करा. मोदक वळून पूर्ण करा.
४)पातेल्यात पाणी घेऊन वर चाळणीत मोदक ठेऊन वाफवून घ्या. भावाला बहिण हवी म्हणून करंजी पण करायची पद्धत आहे.
निर्या करताना...
असे सगळे मोदक करुन १५ मिनिटे वाफवून घ्या.
हे काही आकार केले त्याचे फोटो
गणपती, डबल मोदक आणि फोटो सेशन
मुरड घालून केलेला वाटीतला मोदक
२१ कळ्यांचा मोदक करताना आणि वाफवल्यावर
मोदक करंजी यांची अजुन एक मांडणी..
सगळे डिझायनर मोदक एकत्र
एक नंबर.
एक नंबर.
अफलातून. माझा साष्टांग दंडवत.
अफलातून. माझा साष्टांग दंडवत.>> +१
जियो। माझ्याकडून तुला पहिला नंबर Happy>> माझ्याकडूनही
अहाहा !! काय दिसतायत ग मोदक ,
अहाहा !! काय दिसतायत ग मोदक , सुबक हा शब्द हि फिक्का पडेल !!
उचलून तोंडात टाकावा असं नाही वाटत आहे उलट आणखी आणखी निरीक्षण करत बघत बसावं असं वाटत आहे !!
मुरड घातलेला मोदक मला सगळ्यात जास्त आवडलाय ! कसा केला सांग ना ?!
आधी नॉर्मल मोदक करून घेतला आणि मग त्याला बाजूने मुरड घातली असेच ना ?!
वरच्या सगळ्या कंमेंट्स शी सहमत
anjali_kool, थँक्यू कमेंट
anjali_kool, थँक्यू कमेंट साठी. आणि हो, मोदक करून घेतला आणि नंतर मुरड घातली. मुरड घालायची तो पारीचा भाग किंचित जाड ठेवायचा.
सगळ्यांना खूप धन्यवाद.
सगळ्यांना खूप धन्यवाद.
जबरदस्त ... मी तुझ्या
जबरदस्त ... मी तुझ्या मोदकांची फॅन आहेच.
सुंदर
सुंदर
भयंकर सुबक सुंदर काम.. शब्दच
भयंकर सुबक सुंदर काम.. शब्दच नाहीत..
तो वाटीतला मोदक कसा केलास?
तो वाटीतला मोदक कसा केलास? आणि गणपतीच्या आकाराचा? >>
वावे, वर लिहिलं बघ वटीतला मोदक आणि गणपती साठी..आधी साधा मोदक करुन घेतल. त्याचं नाक कमी केलं. नुसतं पीठ लागू नये म्हणून सारण भरलेला एक छोटा चेंडू चेहेर्यासाठी ठेवला आणि मर्ज केला. मग सोंड, कान हळुवार हाताने मर्ज केले. खूप नाजुक झाला होता पण फोटो काढेपर्यंत राहिला.
खुप सुंदर!!!
खुप सुंदर!!!
तुझे क्रोशाचे मोदक येऊ दे की इथे!
वत्सला, ती मी नव्हेच. ती
वत्सला, ती मी नव्हेच. ती साक्षी वेगळी.
ती क्रोशामधे बाप आहे._/|_
आधी साधा मोदक करुन घेतल.
आधी साधा मोदक करुन घेतल. त्याचं नाक कमी केलं. नुसतं पीठ लागू नये म्हणून सारण भरलेला एक छोटा चेंडू चेहेर्यासाठी ठेवला आणि मर्ज केला. मग सोंड, कान हळुवार हाताने मर्ज केले. खूप नाजुक झाला होता पण फोटो काढेपर्यंत राहिला. >> धन्य _/\_ माझं धाडसच होणार नाही गणपती वगैरे करण्याचं डबलडेकर मात्र मी एकदा करून बघणारे. मोठी पारी घेऊन मोठं नाक ठेवायचं ना? आणि त्याचा परत मोदक करायचा ना?
मोठी पारी घेऊन मोठं नाक
मोठी पारी घेऊन मोठं नाक ठेवायचं ना? आणि त्याचा परत मोदक करायचा ना?>> हो, खरं तर माझा डबल मोदक तितका सुबक नाही झाला.. पण वेळ संपली होती
वा वा!! किती पेशन्स आणि
वा वा!! किती पेशन्स आणि कलाकुसरीचं काम आहे!!
सुंदर!!
वत्सला, ती मी नव्हेच. ती
वत्सला, ती मी नव्हेच. ती साक्षी वेगळी.
ती क्रोशामधे बाप आहे-- आलं लक्षात तिचा बाफ बघुन
हे मोदक खरंच अप्रतिम दिसताहेत!
कसले भारी झालेत मोदक. मला खुप
कसले भारी झालेत मोदक. मला खुप हेवा वाटतो तुमचा. मला नाही जमत असे, कितीही प्रयत्न केले, तरी 11च्या वर पाकळ्या नाही पडत. तुमच्या चक्क 21झाल्यात !
मुरड घातलेले मोदक तर फूल च वाटतेय, खूप खूप कौतुक.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
व्वा! डिझायनर मोदक. सुंदर!
व्वा! डिझायनर मोदक. सुंदर! सुबक!
सुरेख मोदक, मुरडीचा मोदक
सुरेख मोदक, मुरडीचा मोदक प्रथमच बघितला. खरंच डिझायनर मोदक आहेत
अफलातुन काम --^--
अफलातुन काम --^--
मन तृप्त झाले
मन तृप्त झाले
शेवटचा फोटो तर... हात जोडले गेले _/\_
अभिनंदन साक्षी!
अभिनंदन साक्षी!
अभिनंदन साक्षी!......+1.
अभिनंदन साक्षी!......+1.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
मला मत दिल्याबदद्ल आभार आणि
मला मत दिल्याबदद्ल आभार आणि धन्यवाद सगळ्यांना
अभिनंदन साक्षी
अभिनंदन साक्षी
हार्दिक अभिनंदन साक्षी!
हार्दिक अभिनंदन साक्षी!
Pages