सॉफ्ट्स्किल्स नक्की कसे शिकायचे? मान्य आहे की अनुभवांनी जरुर काही प्रमाणात शिकता येतात. पण बालपणी आपल्या पाल्यांना शिकवता येतात का? मूळात आडात (पालक) नसतील तर पोहर्यात (पाल्य) येउ शकतील का? तुम्हाला काय वाटते तुम्ही सॉफ्ट स्किल्स्मध्ये कितीसे पारंगत आहात? तुम्ही कसे शिकलात?
यावेळचा परफॉर्मन्स रिव्ह्यु बंडल गेला. मॅन्युअल टेस्टर असल्यामुळे, माझ्या प्रोफेशनमध्ये सॉफ्ट स्किल्स तसेच अॅप्लिकेशनची पुरेपूर माहीती असणं या दोन बाबी फार महत्वाची कौशल्ये मानली जातात. पैकी डिफेक्ट सापडल्यानंतर स्क्रममध्ये कौशल्याने , जबाबदारीने मांडणे, कोणी नाकारल्यास, त्याबद्दल अधिक माहीती देउन उदाहरणार्थ - रिक्वायरमेन्ट नंबर/स्टोरी नंबर आदिकडे अंगुलीनिर्देश करुन तो डिफेक्ट 'इन स्कोप' कसा आहे ते पटवणे, हे सर्रास करावे लागते. बरेचदा प्रॉडक्ट ओनर्स स्टोरीज नीट लिहीत नाहीत त्या पुरेश्या स्पष्ट नसतात, म्हणजे ambiguous असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मग स्टोरीज नीट अॅटॉमिक व स्पष्ट लिहीण्याची विनंती करणे आदि कामे करावी लागतात. यामध्ये सॉफ्ट स्किल्स नसतील तर त्रेधा तिरीपीट उडते किंवा मग परफॉर्मन्स रिव्युत दट्ट्या बसतो. फक्त तोंड बंद ठेउन इतरांच्या सोयीनी काम केलं की सगळं ऑल वेल असत. हे माहीत आहे पण जमत नाही.
कसे डेव्हलप करायचे हे स्किल्स? उदाहरणे देउन स्पष्ट करावे प्लीज. माझ्या टिममध्ये , क्लायंटशी ज्यांचा संबंध येतो त्या लोकांत ही कौशल्ये असतात असे आढळलेले आहे किंबहुना म्हणुनच ते त्या पदावर टिकू शकतात. यावेळेला पर्फॉर्मन्स रिव्युमुळे, मानसिक स्थिती बरीच विमनस्क झालेली आहे. स्वतःत दोषच दोष आढळत आहेत. ऑटोमेशन शिकायला सुरुवात केलेली आहे वगैरे अलाहिदा. हेही दिवस मागे पडतील पण कोणाशी तरी बोलावेसे वाटले, इतरांचे अनुभव जाणुन घ्यावेसे वाटले म्हणुन हा धागाप्रपंच.
काही उदाहरणे -
- उशीरा का होइना, एक शिकले की जर प्रोसेसमध्ये किंवा एखादी तृटी आढळली तर एकदम 'युरेका युरेका' करत तॄटी दाखवुन 'जितं मया' करायचे नाही. आधी त्यावरील सोल्युशन शोधुन , तॄटी व सोल्युशन दोन्ही सुचवायचे.
- अजुन एक शिकले ते म्हणजे प्रॉजेक्टचा भार आपल्याच शिरावर ठेवल्यागत, प्रॉजेक्टचा ठेका घेतल्यागत वागायचे नाही. थोडक्यात काही स्लॉपी गोष्टींकडे कानाडोळा करायचा. योग्य वेळेवर त्या सुधारणा होत असतात. आपण लक्षात आणून देउन उगाचच रोषास पात्र होतो. हे नको तिथे परफेक्शनिझम टाळायचं, परफेक्शनिझमचा रोख स्वतःवर वळवायचा. आपण सुधारायचं, प्रॉजेक्ट सुधारण्याकरता लोकं ठेवलेले असतात ज्यांना भरपूर मोबदला दिलेला असतो. लष्कराच्या भाकर्या आपण भाजायच्या नाहीत
आपण दुसर्याला जेन्युअनली मदत
आपण दुसर्याला जेन्युअनली मदत केली, त्याच्या गरजा समजुन घेतल्या तर दुसरा आपल्याला मदत करेल... रादर ती त्याच्याकडून जरूर वसुल करुन घ्यावी पण तोंडात साखर ठेवून. पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा मात्र फार करू नये. तो लगेच लक्षात येतो आणि डोक्यात जातो. फर्म/ स्पष्ट शब्दांत सांगावं पण 'मीट इन द मिडल' करायची तयारी ठेवावी. आणि तुम्ही मीट इन द मिडल करताय हे समोरच्याच्या लक्षात आलंय/ डोक्यात रजिस्टर झालंय याचीही खात्री करुन घ्यावी. विसरला असेल तर हसत हसत जोक करताना जाणिव करुन देण्यागत करावं.
काही क्युएवाले किती बग फाईल केले ही शेखी मिरवण्याची गोष्ट असल्यागत वागतात. काही कंपन्या ते इंसेटिव्ह असल्यागत क्युए टीमला टारगेट दिल्तागत करतात. ते असेल तर मात्र टॉक्सिक वातावरण तयार होत जातं.
>>>>पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा
>>>>पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा मात्र फार करू नये. तो लगेच लक्षात येतो आणि डोक्यात जातो. फर्म/ स्पष्ट शब्दांत सांगावं पण 'मीट इन द मिडल' करायची तयारी ठेवावी. आणि तुम्ही मीट इन द मिडल करताय हे समोरच्याच्या लक्षात आलंय/ डोक्यात रजिस्टर झालंय याचीही खात्री करुन घ्यावी. विसरला असेल तर हसत हसत जोक करताना जाणिव करुन देण्यागत करावं. Wink>>> उत्तम सल्ला आहे. मोलाचे बोल. हे सर्व नीट लक्षात घेउन, ते स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेन.
>>>>काही क्युएवाले किती बग फाईल केले ही शेखी मिरवण्याची गोष्ट असल्यागत वागतात. काही कंपन्या ते इंसेटिव्ह असल्यागत क्युए टीमला टारगेट दिल्तागत करतात. ते असेल तर मात्र टॉक्सिक वातावरण तयार होत जातं.>>>>>> हे अत्यंत खरे आहे, कंपन्या क्यु ए च्या काठीने साप मारतात. आमच्या कंपनीत सुदैवाने क्यु ए वरती तसे प्रेशर नाहीये.
>>>> तोंडात साखर ठेउन>>>>> किती खरे आहे हे. काही लोक या गुणाच्या आधारावरती खूप पुढे जाताना पहाते. याचा अर्थ अन्य गुण नाहीत असा नव्हे पण गोड बोलणं ही कला आहे.
लहानपणापासून एक दोष मात्र आहे
लहानपणापासून एक दोष मात्र आहे , अगदी हाडामासांत मुरलेला आहे. कोणी प्रश्न विचारला की कोलमडून पडायचं मग भले उत्तर माहीत असो किती का सोप्पा प्रश्न असो. पण उत्तर बरोबर आहे का चूक- बरोबर आहे की चूक - या द्वंद्वात त्या क्षणापुरते अडकायचे. स्वतःला असलेल्या माहीतीवर संपूर्ण विश्वास टाकायचा नाही, खरं तर स्वतःवरच विश्वास टाकायच नाही. थोडक्यात आत्मविश्वासाची कमी.
याबाबतीत ग्राऊंडवर्क, अभ्यास हाच एक पर्याय दिसतो.
शिवाय शॉर्ट टर्म मेमरी इज नॉट हेल्पिंग आयदर.
पण काही बलस्थाने मात्र आहेत. त्यांच्यावर भर दिला पाहीजे. किंबहुना त्यांच्या बळावरच गेली २०-२२ वर्षे या फील्डमध्ये टिकाव धरता आलाय.
हे ही दिवस जातील. प्रत्येकालाच असे जरा बंडल दिवस येत असतील.
>>>>>काही क्युएवाले किती बग
>>>>>काही क्युएवाले किती बग फाईल केले ही शेखी मिरवण्याची गोष्ट असल्यागत वागतात. >>>>> काही महाभाग असतात. द मोअर द इन्सेक्युरिटी द मोअर इज नीड टु बोस्ट. काहींना मुळातच टेस्टिंगच्या जॉबबद्दल न्यूनगंड असतो. विनाकारण.
सामो, तुमच्या या धाग्यावर जे
सामो, तुमच्या या धाग्यावर जे प्रतिसाद आहेत, ते खरोखरच अगदी चिंतनीय आहेत. मलाही यातून शिकण्यासाठी प्रेरणा मिळाली. अमितव, विक्रमसिंह तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद.
मी खरच एक लिस्ट करणार आहे -
मी खरच एक लिस्ट करणार आहे - वरील सल्ल्यांची. सल्ले तेही उदाहरणांसहीत, प्रचंड आवडले. काईंड ऑफ करीअर गायडन्स. वाया जाउ देणार नाही मी.
मला स्वतःत दिसत असलेल्या गुणावगुणांची.
निदान कळेल तरी कोणत्या बाबींवर काम करण्याची नितांत गरज आहे, कोणत्या बाबींवरती अत्यावश्यकतेने काम नाही केले तर बिघडणार नाही. कोणते गुण तसेच कायम ठेवणे आवश्यक आहे.
खूप माहितीपूर्ण धागा आहे.
खूप माहितीपूर्ण धागा आहे.
मला पण काही चांगले मुद्दे
मला पण काही चांगले मुद्दे शिकता आले यातून!
अमितव, विक्रमसिंह तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद.
मध्यंतरी मुलीने एक मस्त
मध्यंतरी मुलीने एक मस्त मानसशास्त्रावर आधारीत टेस्ट दाखवली -
https://www.eclecticenergies.com/enneagram/test
आम्ही तिघांनीही ती दिली, रिझल्टस पाहीले आणि रिझल्टस तीघांचेही खूप अचूक=अॅक्युरेट आले. या टेस्टमधून शिकण्यासारखे खूप कळले. आपली बलस्थाने व मर्यादा खूप क्लिअर झाल्या.
ज्यांना स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल, त्यांनी जरुर ट्राय करा. ९ प्रकारात लोक विभागलेले आहेत. कोणाला ज्योतिष या विषयाची आठवण येइल. पण मानसशास्त्रावर आधारीत असल्याने, ही टेस्ट अधिक रिलाएबल असण्याची मोठी शक्यता आहे.
ती test दिली पण result काहीच
ती test दिली पण result काहीच समजेना,
असा आहे:
Type 2
Wings 2w3
म्हणजे?
किल्ली अगं मग शोध ना गुगलवर
किल्ली अगं मग शोध ना गुगलवर - हे बघ -
https://www.eclecticenergies.com/enneagram/type2
द हेल्पर
मस्त टेस्ट आहे सामो.
मस्त टेस्ट आहे सामो.
किल्ली, त्यांनी हायलाईट करून दिलेय बघ type.. Wing.. Etc.
खूपसं बरोबर आलंय त्यांचं निरीक्षण. पण काही गोष्टी (उदाहरण - अवगुण) : अर्थात न पटेश.
प्राचीन तुझा नंबर काय आला?
प्राची तुझा नंबर काय आला? माझा ९.
६ आलाय सामो. Type 6 w5
६ आलाय सामो. Type 6 w5
ग्रेट!! वाचते.
ग्रेट!! वाचते.
ग्रेट!! वाचते.
ग्रेट!! वाचते.
विषय चांगला आणि प्रतिसाद
विषय चांगला आणि प्रतिसाद सुद्धा छान. त्यातून काही गाईडलाईन्स आपल्याला मिळाल्या असतीलच.
माझ्याकडून मला जितके माहित आहे याबाबत ते मांडण्याचा प्रयत्न:
सॉफ्टस्किल्स हि Umbrella term आहे. त्यामध्ये बऱ्याच बाबी येतात (e.g. Communication skill, Presentation skill, Leadership, How you deal with challenging situations, Decision making, Managing client relations/expectations, Being informed, How you react to others & to situation, Maturity level etc) सॉफ्टस्किल्स म्हणजे या सर्वांचा परिपाक. आपल्या आजवरच्या अनुभवातून आपण नेमके कुठे कमी पडतो याची यादी करून ठेवली आणि त्यानुसार आपल्यात बदल घडवत गेलो तर ते जास्त योग्य राहील असे वाटते. तुम्हाला SWOT Analysis हे ऐकून माहिती असेल. प्रोजेक्ट किंवा कंपनी पातळीवर करतात. पण स्वत:ला जाणून घेण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा करतात. गुगल केलेत तर त्याबाबत खूपशी माहिती मिळेल शिवाय ऑनलाईन SWOT Analysis करणाऱ्या साईट्स पण मिळतील. त्यातून तुम्हाला नक्की कुठे प्रयत्न करावे लागतील याची नीट कल्पना येईल.
एक मात्र खरेच आहे कि जसजसे आपण करियर मध्ये अनुभवाने मोठे होतो तसतसे सॉफ्टस्किल्सच जास्त उपयोगी पडतात. पण तरीही सॉफ्टवेअर क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास हार्डस्कील्सने सुद्धा प्रगती करता येते. धाग्यात तुम्ही Automation Testing चा उल्लेख केला आहे. यामध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. आता तर बरीच नवीन टूल्स आणि नवनवीन प्रोसेसेस आल्या आहेत (उदाहरणार्थ DevOps, CI/CD Jenkins, Katalon Studio etc) यामध्ये सुद्धा जॉब्स आहेत. पण हो Automation साठी थोडे programming skill पण जरुरी आहे. ते असेल तर तुम्ही नक्की यात सुद्धा करीयर करू शकता.
युट्युब चा उल्लेख पहिल्याच प्रतिसादात आहे. त्याबाबत अगदी सहमत.
धन्यवाद अतुल पाटील. SWOT
धन्यवाद अतुल पाटील. SWOT शोधुन पहाते. बाकी आत्मपरीक्षण अतिशय महत्वाचे असते.
आणि स्वतःला जाणुन घेणेही - याबद्दल दुमत नाही. पण आपल्याला आपल्या कमतरता माहीत झाल्या की त्यापुढे कंफर्ट झोनमधुन बाहेर पडुन त्यावर काम करणे अवघड असते. ते जमणे महत्वाचे.
सामो test was interesting.
सामो test was interesting.
मी हेल्पर आहे म्हणे....
बरेच चांगले आणि थोडे वाईट गुण आहेत
Enneagram Type 2 - The Helper
Helpers who need to be needed
2. The Helper
People of this personality type essentially feel that they are worthy insofar as they are helpful to others. Love is their highest ideal. Selflessness is their duty. Giving to others is their reason for being. Involved, socially aware, usually extroverted, Twos are the type of people who remember everyone's birthday and who go the extra mile to help out a co-worker, spouse or friend in need.
Twos are warm, emotional people who care a great deal about their personal relationships, devote an enormous amount of energy to them, and who expect to be appreciated for their efforts. They are practical people who thrive in the helping professions and who know how to make a home comfortable and inviting. Helping others makes Twos feel good about themselves; being needed makes them feel important; being selfless, makes Twos feel virtuous. Much of a Two's self-image revolves around these issues, and any threat to that self-image is scarcely tolerated. Twos are thoroughly convinced of their selflessness, and it is true that they are frequently genuinely helpful and concerned about others. It is equally true, however, that Twos require appreciation; they need to be needed. Their love is not entirely without ulterior motive.
अगं मी आत्ता इतर काही लेख
अगं मी आत्ता इतर काही लेख वाचत होते -
The Shadow Side of Enneagram Type 9: Sloth
ओह माय गॉड दॅट इज सो सो ट्रु. माझं सर्वात म्हणजे सर्वात आवडतं वाक्य आहे - EMBRACE YOUR INNER SLOTH
तो SLOTH नावाचा महाचेंगट प्राणी असतो. त्याच्या संदर्भात आहे ते वाक्य. त्याला इकडची काडी तिकडे करायला तास लागतात
.
छान आहे तुझं -हेल्पर चं वर्णन
छान आहे तुझं -हेल्पर चं वर्णन.
माझं टाइप ९, १००% जुळतं.
____________________________
इतकं खरं आहे -
The spiritual path for an Enneagram Type 9 lies in reclaiming your sense of self. Thus, you stop idealizing others. You learn to assert yourself and allow your voice to be heard. You find healthy ways to express your anger. Instead of projecting the qualities of others that you admire, you are able to appreciate and value who you are. In doing so, you are in a better position to rise to your fullest potential.
माझे अफर्मेशन्स-
Positive Affirmations for Enneagram Type 9
I am alert to the world around me.
I engage in life fully.
I embrace change.
I am at peace on the inside and outside.
I am safe.
The world is safe.
I am attentive to my problems.
I am present in the here and now.
I play a significant role in this world.
I work on my personal growth.
I take an active interest in life.
I take care of my needs.
I chunk down my problems to work through them.
सं - https://www.evelynlim.com/enneagram-type-9-positive-affirmations-for-pat...
अस्मिता, तुझे अॅफर्मेशन्स
अस्मिता, तुझे अॅफर्मेशन्स वाच -
Positive Affirmations for Enneagram Type 2
I love others and myself unconditionally.
I give sincerely from my heart.
I have healthy emotional needs.
I am present to my emotional needs.
I am loved for who I am.
I am lovable.
I am comfortable in my own skin.
I am confident of myself.
I establish healthy boundaries between others and myself.
I undertake self-care.
I am willing to acknowledge my negative emotions.
I feel accepted for who I am.
I am clear about my intentions.
I am able to express and ask for what I want.
सं - https://www.evelynlim.com/enneagram-type-2-positive-affirmations-for-pat...
धन्यवाद सामो , विसरलेच होते
धन्यवाद सामो , विसरलेच होते हे...
सल्ला देणे वगैरेच्या बाबतीत खरंच cousins and friends ची थेरपिस्ट आहे पण no one can help me असं काहीतरी विचित्र trait आहे.
मला सकारात्मक रहाण्यासाठी दुसऱ्याची गरज वाटत नाही आणि उपयोग सुद्धा होत नाही , मी माझीच गोळा करते. काय माहिती का !!!
>>>>सल्ला देणे वगैरेच्या
>>>>सल्ला देणे वगैरेच्या बाबतीत खरंच cousins and friends ची थेरपिस्ट आहे पण no one can help me असं काहीतरी विचित्र trait आहे.>>>>> बरं झालं उपयोग होइल तुला.
मी सध्या स्वतःत सुधारणा करायच्या मोडमध्ये नेक डीप बुडलेले आहे. मला या साईटचा खूप उपयोग होतोय.
वेगळा धागा काढावा का ?
वेगळा धागा काढावा का ?
>>>वेगळा धागा काढावा का ?>>>
>>>वेगळा धागा काढावा का ?>>> नको हा ठीक वाटतोय.
Okay , मला वाटलं अवांतर होतय
Okay , मला वाटलं अवांतर होतय की काय
नोप अज्जिबात अवांतर नाही.
नोप अज्जिबात अवांतर नाही.
मागे अशाच एका टेस्ट मध्ये मी
मागे अशाच एका टेस्ट मध्ये मी झाड आहे आले होते, green aura म्हणे... माझी सकारात्मक ऊर्जा मी वाटते म्हणे म्हणून दिवसातला काही वेळ एकांतात घालवल्याशिवाय , I can't rejuvenate myself , बाकी माहिती नाही पण हे मात्र अगदी खरं आहे. I need some isolated time everyday to keep myself happy.... Otherwise I feel exhausted....
I am emotionally very independent इतके की समोरच्याला अलिप्त वाटावे पण दुसऱ्यांंसाठी सतत emotionally available असते. तीन वर्षाच्या भाचीची गोड बडबडपणं एकाग्रतेने ऐकते. नाहीतर मला अनादर केल्यासारखा वाटतो तिचा नाही तर नात्याचाच ....
मला मात्र दु:खात एकटेपणा हवा असतो. मला माझ्या भावना मी माझ्या sort करायला आवडते तिथे ढवळाढवळ नको असते , अगदी आईची सुद्धा ... मी बरोबर बाहेर आणतेच स्वतःला , pattern झालायं आता... मुलांनाही तेच शिकवलयं , आपल्या सकारात्मकतेची सोय आपण करायची , आम्ही आहोतच पण this is very important for inner engineering... built in features will take you far, आम्ही असो नसो ते कधीच हार मानणार नाहीत आता.... हार जीत तर होणारच पण त्यातून बाहेर येता येणे हे जिंकण्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचे आहे. Train your brain in beating the odds... You can train your mind for everything यावर माझा विश्वास आहे. एकुणच जिद्द , आत्मविश्वास, आनंदी व्रुत्ती , नकारात्मकते मधून बाहेर येण्याची हातोटी हे स्किल्स स्वयंप्रेरणेवर आधारित असावेत असं आयुष्याच्या अनुभवांमुळे वाटतयं. बाहेरून दिलेला टेकू is not sturdy and long lasting.
We humans are complicated , दुसरे काय...
थेरपी सेशन सुरू केले की मी तर
>>>You can train your mind
>>>You can train your mind for everything यावर माझा विश्वास आहे.>>> सत्य आहे. वी कॅन प्रोग्रॅम माईंड.
मेडीटेशन काय व्यायाम काय एका पर्टिक्युलर वेळेला केला की त्या वेळेचा एक ट्रिगर निर्माण होतो. सर्किट असतं ते. ठराविक वेळी मेंदू ठराविक संप्रेरके निर्माण करतो - मेडीटेशनमध्ये व व्यायामातही. म्हणुन वेळेला महत्व आहे. औषधांच्याही वेळा फार फार महत्वाच्या. सांभाळाव्यातच.
Pages