सॉफ्ट स्किल्स कसे शिकावेत?

Submitted by सामो on 29 August, 2020 - 11:25

सॉफ्ट्स्किल्स नक्की कसे शिकायचे? मान्य आहे की अनुभवांनी जरुर काही प्रमाणात शिकता येतात. पण बालपणी आपल्या पाल्यांना शिकवता येतात का? मूळात आडात (पालक) नसतील तर पोहर्‍यात (पाल्य) येउ शकतील का? तुम्हाला काय वाटते तुम्ही सॉफ्ट स्किल्स्मध्ये कितीसे पारंगत आहात? तुम्ही कसे शिकलात?

यावेळचा परफॉर्मन्स रिव्ह्यु बंडल गेला. मॅन्युअल टेस्टर असल्यामुळे, माझ्या प्रोफेशनमध्ये सॉफ्ट स्किल्स तसेच अ‍ॅप्लिकेशनची पुरेपूर माहीती असणं या दोन बाबी फार महत्वाची कौशल्ये मानली जातात. पैकी डिफेक्ट सापडल्यानंतर स्क्रममध्ये कौशल्याने , जबाबदारीने मांडणे, कोणी नाकारल्यास, त्याबद्दल अधिक माहीती देउन उदाहरणार्थ - रिक्वायरमेन्ट नंबर/स्टोरी नंबर आदिकडे अंगुलीनिर्देश करुन तो डिफेक्ट 'इन स्कोप' कसा आहे ते पटवणे, हे सर्रास करावे लागते. बरेचदा प्रॉडक्ट ओनर्स स्टोरीज नीट लिहीत नाहीत त्या पुरेश्या स्पष्ट नसतात, म्हणजे ambiguous असतात पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? मग स्टोरीज नीट अ‍ॅटॉमिक व स्पष्ट लिहीण्याची विनंती करणे आदि कामे करावी लागतात. यामध्ये सॉफ्ट स्किल्स नसतील तर त्रेधा तिरीपीट उडते किंवा मग परफॉर्मन्स रिव्युत दट्ट्या बसतो. फक्त तोंड बंद ठेउन इतरांच्या सोयीनी काम केलं की सगळं ऑल वेल असत. हे माहीत आहे पण जमत नाही.

कसे डेव्हलप करायचे हे स्किल्स? उदाहरणे देउन स्पष्ट करावे प्लीज. माझ्या टिममध्ये , क्लायंटशी ज्यांचा संबंध येतो त्या लोकांत ही कौशल्ये असतात असे आढळलेले आहे किंबहुना म्हणुनच ते त्या पदावर टिकू शकतात. यावेळेला पर्फॉर्मन्स रिव्युमुळे, मानसिक स्थिती बरीच विमनस्क झालेली आहे. स्वतःत दोषच दोष आढळत आहेत. ऑटोमेशन शिकायला सुरुवात केलेली आहे वगैरे अलाहिदा. हेही दिवस मागे पडतील पण कोणाशी तरी बोलावेसे वाटले, इतरांचे अनुभव जाणुन घ्यावेसे वाटले म्हणुन हा धागाप्रपंच.

काही उदाहरणे -
- उशीरा का होइना, एक शिकले की जर प्रोसेसमध्ये किंवा एखादी तृटी आढळली तर एकदम 'युरेका युरेका' करत तॄटी दाखवुन 'जितं मया' करायचे नाही. आधी त्यावरील सोल्युशन शोधुन , तॄटी व सोल्युशन दोन्ही सुचवायचे. Sad Sad
- अजुन एक शिकले ते म्हणजे प्रॉजेक्टचा भार आपल्याच शिरावर ठेवल्यागत, प्रॉजेक्टचा ठेका घेतल्यागत वागायचे नाही. थोडक्यात काही स्लॉपी गोष्टींकडे कानाडोळा करायचा. योग्य वेळेवर त्या सुधारणा होत असतात. आपण लक्षात आणून देउन उगाचच रोषास पात्र होतो. हे नको तिथे परफेक्शनिझम टाळायचं, परफेक्शनिझमचा रोख स्वतःवर वळवायचा. आपण सुधारायचं, प्रॉजेक्ट सुधारण्याकरता लोकं ठेवलेले असतात ज्यांना भरपूर मोबदला दिलेला असतो. लष्कराच्या भाकर्‍या आपण भाजायच्या नाहीत Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=cl-NSC9xnI4
खूपच फॅसिनेटिंग, इनसाईटफुल.
नवर्‍याचा आणि मुलीचा एनीग्रॅम कळल्याने फायदा झाला. स्वतःबद्दल तर इतकी व्यवस्थित माहीती मिळाली. धिस इज अमेझिंग. सो सो सो मच बेटर दॅन अ‍ॅस्ट्रॉलॉजी. वास्तवावर आधारीत, तर्कदॄष्ट्या भक्कम. मस्त सिस्टीम आहे, पॉवरफुल टूल आहे.

So each of us receive same information but we process it differently
https://www.youtube.com/watch?v=1lk7gv6Dk8s

https://www.youtube.com/playlist?list=PLGf29EUcSQxtRznDgS2N0LNyZy2EDGT_3

9, 9w8

9W8 = द रेफ्री
अजिंक्यराव वेलकम टु क्लब ९. - तुम्ही (9W8 - द रेफ्री) , मी(9W1 - द ड्रीमर)
अस्मिता, किल्ली - वेलकम टू क्लब २ Happy

माझी अतिशय चिडचीड होते/व्हायची नवरा (टाईप १ - पर्फेक्शनिस्ट) प्रत्येक गोष्टीत सुधारणा करु पहातो असे वाटे. फार क्रिटीकल आहे, फार टीका करतो, उगाच दोष दाखवतो - नाना तक्रारी होत्या माझ्या. हा सेडीस्ट आहे की काय अशीही शंका होती. परंतु द सेम टाईम, मला त्याच्या सिन्सिअ‍ॅरिटीचं कौतुक होतं. मिडास टच. प्रत्येक केलेली डिश त्याची परफेक्ट होते. हां माझ्याकडुन मात्र त्या अपेक्षा ठेउ नकोस, असे माझे होते.

मी टाइप ९ असल्याने कॉन्फ्लिक्ट जिवाच्या कराराने टाळले जाई कॉन्फ्लिक्ट टाळण्याचा एकच मार्ग होता कान बंद करणे, स्वतःला शट डाउन करुन टाकणे. नवर्याला मी बेजबाबदार वाटे. व्यायाम करत नाही कोणत्याही गोष्टीची शिस्त लावुन घेत नाही. जैसे थे आवडते. चलता है तब तक चलने दो अ‍ॅटिट्युड आहे. पण त्याच वेळेला माझे रडूबाई असणे, कधीही न भांडणे, शांती अ‍ॅट एनी कॉस्ट राखणे, त्याच्या पथ्यावर पडे.

ओह माय गॉड हे सर्व एनीग्रॅम वाचून क्रिस्टल क्लिअर झालं. आपल्या प्रत्येकाचे एक व्यक्तीमत्व आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत काही कंगोरे चमकदार आहेत तर काही तीक्ष्ण आहेत, काही डल आहेत. आपले दोष आपल्याला कमी करायचे आहेत. समोरच्याच्या दोषांकडे समजूतदारपणे पहायला शिकायचे आहे.

एक लाईट बल्ब लावायला किती टाइप १ लागतील?
- फक्त एक. खूप वेळ घेउन, नीट पद्धत शोधून, परफेक्ट काम करेल.

एक लाईट बल्ब लावायला किती टाइप ३ (माझी मुलगी) लागतील? ....................... टाईप ३ हे परफॉर्मर्स असतात, स्टार्स ऑफ एनीग्रॅम
- फक्त एक. ती लाईट बल्ब हातात धरेल आणि सारं जग तिच्याभोवती फिरेल गरागरा. न फिरवता, लागला लाईट बल्ब. Lol

एक लाईट बल्ब लावायला किती टाइप ९ लागतील?
- शून्य! वेल काय गरज आहे नव्या बल्बची? जुना आहे तो बरा आहे की Lol

इंग्रजी संभाषण शून्य असल्यामुळे, साधे साधे शब्दाला शब्द जोडून, वाक्य तयार करण्याचा कॉन्फिडन्स गेल्यासारखा झाले आहे.

होय शून्य. घरी मराठी. बाहेर कुठे कोणाशी बोलायची वेळ येते?
आज मुलगी म्हणाली - जरा प्रोफेशनल मीट अप्स शोध सरावासाठी.

लोल!!!! =)) सीsssss!!! अगं अगदीच काही दयनीय अवस्था नाहीये हां जरासा मुष्किल समय चल रहा है Wink
बाकी उंटाच्या पाठीवरती काड्यांचे इमले करायल खरच एका पायावर तयार Lol

कॅाफी विथ करन बघायला सुरू कर Happy
मला करन जोहरचं इंग्लिश ऐकायला फार आवडतं.. त्याची वाक्यं, शब्द रट्टा मारून रोजच्या बोलण्यात सुरूवातीला रिपिट करत रहायची.. आपोआप इंग्लिश सुधारेल

ओके अशी इंग्रजीत प्रतिक्रिया दिलीत, म्हणजे आता लवकरच इंग्रजी सुधारणार असं दिसतंय Wink
(ह घ्या - हे माझ्या प्रतिसादांना सांगणे नलगे)

भारतात या. बारमध्ये भरपूर दारू प्यायला लागलात की आपोआप फाडफाड कोकाटे-फेम इंग्रजी ऐकू आणि बोलू लागाल.

@पुंबा,
टोस्ट मास्टर्स फार उत्तम सूचना आहे.

मी Toastmaster ला जॉईन केले होते पण बिझिनेस कम्युनिकेशनसाठी मला तरी त्याचा उपयोग फारसा वाटला नाही. तिथे थोडा dramatic tone मध्ये बोलणं अपेक्षित असते. बिझनेस मीटिंगमध्ये आपण तसं बोलू शकत नाही.

चैत्रगंधा मी ही जॉइन केलेले पूर्वी. पण मला त्या हगल्या पादल्या टाळ्या खायचा कंटाळा आला. एकही स्तुती जेन्युइन नसे. उगाचच एन्करेज करायला टाळ्या. नको ते तसे प्रोत्साहन.

काही आपले सहकारी किती पुढे गेलेले दिसतत. लिंकडैन मुळे आता ट्रॅक ठेवणे सहज शक्य होते. किती समृद्ध झालेले दिसतात. खूप कौतुक वाटते. काहींचा वेग हळू असतो तर काहींचा भरधाव पण एक आहे पोस्टस वरुन लक्षात येते, की या लोकांनी प्रगती केलेली आहे. दे सीम टु बी हॅपी अँड एन्रिचड.
मला हे पहाणे आवडते. अजिबात जेलसी वाटत नाही. मेहनतीचे फळ मिळालेच पाहीजे.
हा धागा परत परत वाचेन. खूप जणांनी अनमोल मार्गदर्शन केलेले आहे.

हा धागा गेल्या आठवड्यात बघितलेला, सॉफ्ट स्किल्स ची गरज लेख आणि कंमेंट्स एकदम चांगल्या आहेत.

हि पोस्ट दोन वर्षांहून जुनी दिसत्ये तरी माझे दोन पैशाचे मत

डिफेक्ट सापडल्यानंतर स्क्रममध्ये कौशल्याने , जबाबदारीने मांडणे, कोणी नाकारल्यास, त्याबद्दल अधिक माहीती देउन उदाहरणार्थ - रिक्वायरमेन्ट नंबर/स्टोरी नंबर आदिकडे अंगुलीनिर्देश करुन तो डिफेक्ट 'इन स्कोप' कसा आहे ते पटवणे, हे सर्रास करावे लागते. >>>> डिफेक्ट analysis किंवा त्याला triaging म्हणतात ते काही वर्ष काम केल्यामुळे कित्येक वर्ष परत मागे गेले.
कोणाला त्यांची चूक पटविणे नेहेमीच tricky असते, पण व्यवस्थित पुरावे गोळा करून, त्यांची योग्य मांडणी करून, ह्याशिवाय दुसरा निष्कर्ष असूच शकत नाही असे गोष्टीसारखे पटवून द्यायला लागते.
Narrative , त्या वेळी आम्ही करत असू पण मला त्याच खर महत्व इकडे अमेरिकेत आल्यावर कळलं (असच CNN बघताना ) आपल्याकडे आपल्याला जास्त शिकवत नाहीत ते.

वरती मॅनिप्युलेशन किंवा पॉलिटिकली करेक्ट, विषयी बोललंय ते उत्तम सॉफ्ट स्किल पण ते काही जणांना जमत नाही, आणि स्वभावाविरुद्ध वागायचं म्हंटल उगाच गॉड वागायला लागलं तर चीड चीड होते.
एक मी शोधलेला माझा माझ्यापुरता उपाय
प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात करायची म्हणजे लोकांना आयत्यावेळी फिरत येत नाही, आवश्यक लोकांना cc करायचे, आपल्या कामात अजिबात चूक नाही ठेवायची, आणि इतरांपेक्षा थोडे जास्त काम करायचे.
हो जुने शाळा कॉलेजचे मित्र मैत्रिणी बरेच मोठ्या पदावर काम करताना दिसतात, तेव्हा छान वाटत. आणि कधी मजा वाटते, कसा होता / कशी होती आणि आता किती बदललाय / बदललीय.

काही चरित्रे वाचून स्फूर्ती घेता येते आणि त्यांनी एखादी गोष्ट साध्य करून सातत्य कसं टिकवलं ही उदाहरणे उपयुक्त ठरतात. कारण सर्व प्रकारचे आदर्श आपल्याच घरात मिळतील असं नसतं.

एन्ट्री लेव्हल बी ए जॉब मिळवण्या करता - Entry Certificate of BA (ECBA) चा काही उपयोग होतो का?

कोणी CBAP exam दिलेली आहे का? असल्यास रिक्वायर्ड ३५ तासाचे कोर्स वर्क कुठुन केले?

बी एज कोणते टुल्स वापरतात? कशाकरता वापरतात? उदा - फिग्मा प्रोटोटाईप्स व वायर फ्रेम बनविण्याकरता वगैरे माहीती देता येइल का?

>>>>>>>>>नमस्कार. कसे आहात सर्वजण?. बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर आलोय.

ओळख नाही काही नाही पण तरीही, विक्रमसिंह बरोब्बर काल आपली आठवण आलेली होती. त्याचे कारण माझ्या धाग्यावरती तुम्ही दिलेला प्रतिसाद. वन ऑफ माय फेव्हरेटस आहे. हा धागा कालच मी वर काढला.

Pages