Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32
युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पाचव्या भागाची लिंक:https:/
पाचव्या भागाची लिंक:
https://www.maayboli.com/node/56558?page=68
अरे मी पहिली..
अरे मी पहिली..
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच बनवून ठेवते. पण ते जरा जास्त घट्ट होत. सगळ्या सुगरणी ऐनवेळी च करतात. म्हणजे माझ काहीतरी चुकतय. एक दोन वेळा पुर्वी ऐन्वेळी केलं तेव्हा रस सुटला होता. तर पर्फेक्ट सारणासाठी ( ओला नारळ , गूळ) च्या अचुक वेळेच मार्ग्दर्शन करा प्लीज.
मी पण आधीच बनवते कारण हा उरक
मी पण आधीच बनवते कारण हा उरक एका दिवसात करण्याइतका पेशन्सच नाहीये मुळात. पाहुया इथल्या सुगृहिणी आणि सुजाण नागरीक काय सल्ले देताहेत.. शुभेच्छा
अरे स हा वा भाग आला?? वॉव.............. :टाळ्या:
<<<<<घाण्याचे खोबरेल तेल
<<<<<घाण्याचे खोबरेल तेल आणलयं केसांसाठी.
कोणत्या पदार्थात वापरू शकते काय?आधी कधी वापरलं नाहीए.>>>>>
घाण्याचे खोबरेल तेल सुक्या खोबऱ्याचे असते त्याला थोडा स्ट्रॉंग वासही असतो.
नारळाच्या दुधापासून काढलेल्या तेलाला इतका स्ट्रॉंग वास नसतो त्यामुळे ते वापरणं सोपं होतं.
तरी काही कल्पना म्हणजे
- चटणी पोळी/भाकरी खाताना चटणीवर चमचाभर टाकायचं
- पोळ्या करताना पीठ मळताना वापरायचं
- पालेभाजी करताना किंवा केल्यावर वरतून चमचाभर
- मासे किंवा केळ्याचे काप तळताना (खरपूस होतात)
- स्मूदी करताना चमचाभर
- कोकोनट कुकीज करताना
- व्हर्जिन पिना कोलाडा मध्ये
- इतर बेकिंग करताना
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच बनवून ठेवते. पण ते जरा जास्त घट्ट होत. सगळ्या सुगरणी ऐनवेळी च करतात. म्हणजे माझ काहीतरी चुकतय. एक दोन वेळा पुर्वी ऐन्वेळी केलं तेव्हा रस सुटला होता. तर पर्फेक्ट सारणासाठी ( ओला नारळ , गूळ) च्या अचुक वेळेच मार्ग्दर्शन करा प्लीज. >>>
एक सुचलंय, पाहा एखादवेळी प्रयोग करून.
सारण आदल्या दिवशी करून ठेवता तर अर्थात ते फ्रीझ मध्ये (फ्रीझर मध्ये नाही) ठेवता हे गृहीत धरलंय.
तर दुसर्या दिवशी पीठीची उकड काढण्याआधी मोदकपात्र पाणी घालून वाफ तयार व्हायला ठेवायचं आणि वाफ बर्यापैकी यायला लागली की ते सारण डायरेक्ट फ्रीजातून वाफेवर थॉ करायला ठेवायचं.
उकडीला वाफ येइस्तो सारणसुद्धा मस्त मॉईस्ट, मऊ अन मॅनेजेबल होईल असं वाटतंय. मोदकपात्रात सारण ठेवतांना मात्र बंद डब्यात ठेवायचं ध्यानात राहू देणे, नायतर वाफेचं पाणी जाऊन बिनादुधाची खीर व्हायची.
पाहा बरं बसतंय का मापात ते...
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच
मोद्काच सारण मी दरवेळी आधीच बनवून ठेवते. पण ते जरा जास्त घट्ट होत. सगळ्या सुगरणी ऐनवेळी च करतात. म्हणजे माझ काहीतरी चुकतय. एक दोन वेळा पुर्वी ऐन्वेळी केलं तेव्हा रस सुटला होता. तर पर्फेक्ट सारणासाठी ( ओला नारळ , गूळ) च्या अचुक वेळेच मार्ग्दर्शन करा प्लीज. >>> ते घट्ट सारण भरताना त्यात गुळाचा खडा(मक्याइतका) घाला. म्हणजे वाफवल्यावर तो आतल्या आत विरघळून कोरडेपणा जाईल.
धन्यवाद सावली.
धन्यवाद सावली.
घाण्याचे खोबरेल तेल सुक्या खोबऱ्याचे असते त्याला थोडा स्ट्रॉंग वासही असतो.
नारळाच्या दुधापासून काढलेल्या तेलाला इतका स्ट्रॉंग वास नसतो त्यामुळे ते वापरणं सोपं होतं.
घाण्याचे तेलाला खुप डोमिनेटींग वास आहे.
काल जवसाच्या चटणीवर टाकले होते. खाताना तेलाचा वासच जास्त वाटला.
नारळाच्या दुधाचे तेल पण मिळते ईथे.
मम्मीने कुंडीत हळद लावली
मम्मीने कुंडीत हळद लावली होती, आता त्याला भरपुर पाने आलीत, तर त्या पानांचे काय करता येईल सांगा प्लिज.
पातोळे. पानांवर मोदक ठेऊन
पातोळे करता येतील. पानांवर मोदक ठेऊन वाफवायचे.
पोह्यात ती पाने चुरडून पण खातात, पण मी नाही खाल्लं कधी. बाबा सांगायचे, कोकणात कच्या पोह्यात ती पाने चुरडून तेल तिखट मीठ घालून खायचे.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/62770
हळदीची पाने
भात करताना, टाकतात.
भात करताना, टाकतात.
हळदीच्या पानांचा स्वाद आवडत
हळदीच्या पानांचा स्वाद आवडत असेल तर-
चहात छोटासा तुकडा टाका.
खात असाल तर मासे, चिकनमध्ये एखादे छोटे पान.
नाहीतर इतर ग्रेव्हीवाल्या भाजीत पण टाकता येईल.
आम्ही इथे थोडी हळद लावलीय. आई वरीलप्रमाणे उपयोग करते.
पाने सुकवून ठेवा, नंतर वापरता येतात.
लोणी कढवून तूप करताना हळदीचं
लोणी कढवून तूप करताना हळदीचं पान घातलं तर तुपाला फार सुंंदर वास येतो.
VB, मीही हळद लावली आहे कुंडीत आणि तिलाही बरीच पानं आली आहेत
धन्स ऑल
धन्स ऑल
<<<पाने सुकवून ठेवा, नंतर वापरता येतात.>>> पाने कशी सुकवायची, झाडावर पिवळी पडतात तशी की कापून घेऊन सुकवायची?
ओली हिरवी पाने कापून कागदात
ओली हिरवी पाने कापून कागदात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा. वाळतात आपोआप.
झाडावर पिवळी पडलेली पाने कामाची नाहीत.
हो, मातोश्री तूप करताना पण टाकताहेत. त्यांना फेसबुकचे व्यसन लावून देण्यात आलेले आहेत. एकेक नुसखे वापरत असतात
अमूल चं क्रीम चुकून 1 लिटर
अमूल चं क्रीम चुकून 1 लिटर pack आणला गेला आहे.
छोटा 200 ग्रॅम चा टेट्रा पॅक हवा होता तर चुकून मोठा मागवला गेला.
पॅक फोडला की 2 दिवसात वापरा असे लिहिलंय. तर आता एवढ्या क्रीम चे काय करता येईल प्लीज सुचवा.
केक करून वर क्रीम फेटून लावा हा ऑप्शन बाद आहे.
अजून दुसरे काही सुचत असेल तर सांगा प्लीज.
फ्रुटक्रिम करा मस्त पैकी फळं
फ्रुटक्रिम करा मस्त पैकी फळं घालून.
काही भाज्यांमध्ये क्रिम वापरता येईल. मेथी मटर मलाई, कोफ्ते, पनीर माखनी वगैरे. दाल माखनीत वापरता येईल.
माबोवर काही गोड पदार्थ रेसिपीज् आहेत ज्यात क्रिम वापरता येईल.
आइस क्रीम.
आइस क्रीम.
माबोवरची natural ice cream रेसिपी
कुंडी मधे हळदिची लागवड कशी
कुंडी मधे हळदिची लागवड कशी केली आहे या बद्दल अजुन माहिती मिळेल का? खास करून ठंड हवेच्या ठिकाणी किंवा बर्फाळ प्रदेशात हळदीची लागवड करुन कशी तिकवता येईल याची महिती हवी आहे.
Dark compound chocolate मध्ये
Dark compound chocolate मध्ये equal portion क्रीम टाकून beater ने फेटून icecream छान होईल. थोड्या कमी प्रमाणात टाकून चॉकोलेटस बनवा.
स्मिता, साखर घालून वड्या करता
स्मिता, साखर घालून वड्या करता येतील.
क्रीम Ice tray ला घालून
क्रीम Ice tray ला घालून Freeze kela tar have tase cubes kadhun waprayache.
हळदीचा कंद कुंडीत पुरायचा.मग
हळदीचा कंद कुंडीत पुरायचा.मग आपोआप हळद रुजते. थंड हवेचे काय माहित नाही.पण रुजायला हरकत नसावी.
हळद हार्डी नसावी, त्यामुळे
हळद हार्डी नसावी, त्यामुळे फ्रीझिंग तापमान होण्यापूर्वी घरात आणून सूर्यप्रकाश मिळेल अशा खिडकीत ठेवली की थंडीत टिकाव धरेल. मग तापमान बरं झालं की बाहेर न्या. अर्थात हे जनरल नॉन हार्डी झाडांबाबत करतात तेच लिहिलं आहे. हळदीला 'पेर हळद आणि वाढ झटकन' हे त्या ह्याच्या प्रमाणे कदचित लागू पडत नसेल तर माहित नाही.
रात्री येताना 3 अननस आणले
रात्री येताना 3 अननस आणले
60 रु 1 बोलला
मग 90 रूत 2 बोलला
मग बोलला 120 त तिन्ही न्या
एक वाटले
एक खाल्ले
एक उरले आहे , सकाळी काय करू ? तिखट रेसिपी
आज षेतकरी उद्धार कायद्याचे काय झाले म्हणे ?
अननसाची एक रेसिपी आहे
अननसाची एक रेसिपी आहे मायबोलीवर.. पार्वती ह्यांची..
अननसाचे सासव करा.
अननसाचे सासव करा.
हळदीचे कंद रुजायला ८०-८५ डि
हळदीचे कंद रुजायला ८०-८५ डि फॅ तापमान लागतं आणि बर्यापैकी आर्द्रता असावी लागते . आमच्या इथे ( यू स हार्डिनेस झोन ६ / ६ब) मधे एप्रिल मे महिन्यात पेरले तर काही होत नाही. पण साधारण जूनच्या मध्यावर पेरले तर मस्त उगवतात. नागपंचमीपर्यंत पातोळे करायला पानं मिळतात. मी दोन तीन वेळा लावले आहेत . उत्तर गोलार्धात असाल तर पुढच्या वर्षी लावा. दक्षिण गोलार्धात असाल तर लगेच लावू शकता बहुतेक.
अगदी हौस असेल तर हीट मॅट, ग्रो लाईट, ह्युमिडिफायर असा जामनिमा करून थंडीच्या दिवसात सुद्धा प्रयत्न करू शकता.
आवडत असल्यास कोल्ड कॉफी विथ
आवडत असल्यास कोल्ड कॉफी विथ क्रीम करुन ठेवा, ३-४ जणात संपेल.
Pages