#art #painting #realism #oil #shilpasart #70x90cm
कुणाला कशी काय आवडेल हे काही सांगता येत नाही. माझ्या मुलाला प्राण्यांमध्ये भलताच interest आहे. पण एकतर मी घरात किंवा मग तो प्राणी असा एकदम पेचात सवाल टाकल्याने अगदीच ना-इलाजाने त्याला कुत्र्याऐवजी, सॉरी सॉरी डॉगीऐवजी, मलाच सिलेक्ट करावे लागले. पण अनायसे चालून आलेली ती संधी त्याने आईची असलेली नसलेली कुवत पणाला लावावीच लागेल अश्या प्रकारे वापरली. मला मनात नसताना, स्वतःवर विश्वास नसताना आणि मुख्य म्हणजे आवड नसताना त्याला हवे असलेले काम सुरु करावे लागले. मी हो म्हणेपर्यंत मी घरातलयांकडून कशी कामे करून घेते याचा मला जो अभिमान होता तो काही क्षणात नष्ट झाला. कधी कधी मुले असा आपला नको तो दोष बरोबर उचलतात ते असे. आणि आई अश्या कुठल्यातरी कामात व्यस्त झाली कि तिचे आपल्याकडचे लक्ष कमी होते हे त्याला स्वानुभावाने बरोबर कळले असावे.
आता त्याला चक्क वाघाचे पेंटिंग हवे होते त्याच्या रूममध्ये लावायला. आता वाघ काय कुणाच्या घरात असतो का? आजपर्यंत वाघाने मला फार जवळून पाहायची हिम्मतसुद्धा केली नाही तो काय माझ्या घरी आश्रयाला येणार. आणि आलाच तर मी त्याचे पोर्ट्रेट काढेपर्यंत पोझ देऊन बिचारा शांतपणे बसला असता का? पण हे सगळे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत मुलगा नव्हता. कुत्रा घरात आणण्यापेक्षा वाघाशी युती करणं माझ्यासाठीसुद्धा इम्पल्सिव्ह असलं तरीपण जास्त सोईस्कर होतं. मग हा नको तो नको करत त्यातल्या त्यात सोबर दिसणाऱ्या वाघाचा फोटो शोधला, जो आमच्या सज्जन कुटुंबात सामावून जाईल.
या वाघाला घरातच पाळायचे असल्यामुळे खूप जास्त विचार करायची गरज नव्हती पण मुख्य प्रश्न होता कि आपल्याला न आवडणारी गोष्ट आपण करू शकतो का ? पेंटिंग माझ्या छंदांचा भाग असल्यामुळे जर कोणी बाहेरच्यांनी वाघ पेंट करण्यासाठी विचारले असते तर ती माझी style नाही असे दिमाखात उत्तर देणे शक्य होते पण हे घरचे तर आपल्याला पुरते ओळखून असतात. त्यात आजकालची हि मुले तर तोंडावर बोलून पाणउतारा करूच शकतात. त्यांच्यासमोर अशी स्टाईल-वाईलच सोंगे घेता येत नाहीत. ती बरोबर पोल खोलतात. त्यामुळे ट्राय करने मी क्या जाता है, वाघ नाही तर त्याची मावशी तर बनेल असा उद्दात विचार करून भावनेच्या भरात आणि जरा जोशात , आपण फार मोठठे आर्टिस्ट आहोत असं भासवत आजपर्यंत कधीच इतका मोठा ना वापरलेला ७०*९० सेंमीचा कॅनवास तोही चांगला लिनन, बसमधून मिरवत मिरवत आणला.
हा जोश कॅनवास घरी आणेपर्यंत टिकून होता. घरी येईपर्यंत सगळे उसने अवसान गळाले होते. तरी कसेबसे- कधी आनंदाने, कधी कुणी धक्का दिला म्हणून, कधी रडत पडत शेवटावर येऊन पोहोचले. एक एक केस रंगवताना केसाळ ऐवजी जरा म्हातारा , याच बाबा, निवडला असता तर बरे झाले असते का असं वाटून गेलं. डोळे हा त्यातला सगळ्यात अवघड भाग होता, कितीही बदल केले तरी तो काही माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायला धजावत नव्हता. शेवटी जरा जोंजारून चुचकारून मी त्याला त्याला धीर दिला, आमच्या घरात तुला कायमस्वरूपी स्थान देऊ असे आश्वासन दिलं. त्याला माझ्याकडे बघायचे हे मानसिक बळ देण्यात खूप वेळ गेला मग कुठे तो सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाला.
आज तो वाघ माझ्या घरचा बनुन गुमान भिंतीवर पण नजर रोखून बसला आहे.
..................................................................................................................................................................................
What is needed, rather than running away or controlling or suppressing or any other resistance, is understanding fear; that means, watch it, learn about it, come directly into contact with it. We are to learn about fear, not how to escape from it.....Jiddu Krishnamurti
वाह! सुरेखच! मेहनत दिसते आहे.
वाह! सुरेखच! मेहनत दिसते आहे. डोळे तर मस्तच!
लिखान खुसखुशीत. दोन्ही आवडले.
मलाही लहर येते कधी कधी चित्रकलेची पण साधत नाही.
(वॉटरमार्क डिस्टर्ब करतायेत थोडे.)
सुंदर
सुंदर
खूपच छान. वाघोबा गुटगुटीत पण
खूपच छान. वाघोबा गुटगुटीत पण आहेत. (अतिचिकित्सा मोडः डोके जरा थो-डे-से मोठे चालले असते.)
मेहनत दिसून येत आहे. साधारण किती वेळ लागला?
सॉरी, खूप दिवसांनंतर आले इथे
सॉरी, खूप दिवसांनंतर आले इथे त्यामुळे रिप्लाय दिला गेला नाही असे दिसते आहे.
थँक्स.
@उपाशी बोका- डोके मोठे? हो का, आत्तापर्यंत असं वाटलं नाही पण परत एकदा बघते पेंटिंगकडे. तसे तर खूप मोजून मापून केलं आहे तरी.. थँक्स suggest केल्याबद्दल
@जाई-जुई थँक्स ग :))
@ शाली थँक्स, करून बघाच मग. वॉटरमार्क डिस्टर्ब करतात खरे, फोटोची quality पण कमी करतात, पुढच्या वेळेस जरा लाईट करेन. पण दुसरा काही option आहे का? सांगाल .
मस्त काढलय चित्र!
मस्त काढलय चित्र!
खतरनाक जमले आहे !! वाघ प्रेमळ
खतरनाक जमले आहे !! वाघ प्रेमळ वाटतो आहे, छान आहे पेन्टिन्ग
लेखन आणि चित्र दोन्ही आवडले.
लेखन आणि चित्र दोन्ही आवडले.
कसला सोबर आहे हो तुमचा वाघ
कसला सोबर आहे हो तुमचा वाघ पेंटींग आणि लिखाण, दोन्ही मस्तच.