मायबोलीवर रोज येणाऱ्या मोदकांच्या नवनवीन पाककृतींंपासून प्रेरणा घेऊन केलेले हे कुकी मोदक
साहित्य -
पारीसाठी
कणीक - एक कप
लोणी (घरचं किंवा विकतचं अनसॉल्टेड) - अर्धा कप
बारीक चिरलेला खजूर - अर्धा कप
साखर - चार टेबलस्पून
बेकिंग पावडर चिमूटभर
सारणासाठी
सुके अंजीर, काजू वगैरे सुकामेवा बारीक तुकडे करून.
कृती
बारीक चिरलेला खजूर अर्धा कप पाण्यात नॉनस्टिक पॅनमध्ये शिजवून घेतला. पूर्ण मॅश करून घेतला. गार करत ठेवला.
लोणी, साखर आणि कणीक एकत्र करून बोटांनी नीट मिसळली. गार झालेला खजूर त्यात घातला.
बेकिंग पावडर घालून सगळं नीट एकत्र करून गोळा तयार केला. हा गोळा दहा पंधरा मिनिटं फ्रिजमधे ठेवला.
दहा पंधरा मिनिटांनी गोळा बाहेर काढून त्याचे लहान लहान गोळे केले. एकेक गोळा मुदाळ्यात घालून दाबून त्याची खोलगट वाटी तयार केली. ( ही आयडिया कुठल्यातरी धाग्यावर जिने कुणी लिहिली आहे तिचे आभार कारण त्याशिवाय कळ्यांची नक्षी नसती जमली )
मग त्यात सुकामेवा भरून मोदकाचं तोंड बंद केलं आणि मोदक बाहेर काढला. वरच्या बाजूला काट्याने कळ्यांची नक्षी पूर्ण केली.
असे सगळे मोदक तयार करून बेकिंग ट्रे ला तुपाचा हात लावून त्यात मांडून ठेवले. तत्पूर्वी ओव्हन १८० अंश सेल्सिअस ला प्रीहीट केला. साधारण पंचवीस मिनिटं मोदक बेक केले. झालं! कुकी मोदक तयार!
तळटीप - खजूर कुकीजची मूळ रेसिपी तरला दलाल यांची आहे
अरे वा! भारी आयडीया
अरे वा! भारी आयडीया
ही आयडिया कुठल्यातरी धाग्यावर जिने कुणी लिहिली आहे तिचे आभार Happy कारण त्याशिवाय कळ्यांची नक्षी नसती जमली ) >>>>>>>>>>>>>> ममोंच्या मोदक धाग्यावरची म्हणत असाल तर मीच ती कुठेतरी एका विडीओ मधे पाहिलेली युक्ती होती.
ओह अच्छा! धन्यवाद अंजली
ओह अच्छा! धन्यवाद अंजली बरोबर, ममोंचा मोदकांचाच धागा!!
अरे वा! मस्तच झालेत मोदक.
अरे वा! मस्तच झालेत मोदक.
मस्तच दिसतायत
मस्तच दिसतायत
मोदक एकदम शाही आणि देखणे
मोदक एकदम शाही आणि देखणे जमलेत!
मुदाळ्याची युक्ती मी Yogita’s Kichen च्या एका भागात (नं २६२) पाहिली होती. तिचा मोदक निरनिराळ्या आकारात वळण्याचा video पण छान आहे.
मस्तं!
मस्तं!
मस्त दिसत आहेत.
मस्त दिसत आहेत.
नक्षीदार मोदक सुरेख दिसत आहे.
नक्षीदार मोदक सुरेख दिसत आहे. रंग तर भारीच जमलाय. आतील सारण सुद्धा सात्विक पौष्टिक.
नक्षीदार मोदक सुरेख दिसत आहे.
नक्षीदार मोदक सुरेख दिसत आहे. रंग तर भारीच जमलाय. आतील सारण सुद्धा सात्विक पौष्टिक. +1
मोदक एकदम शाही आणि देखणे
मोदक एकदम शाही आणि देखणे जमलेत >>> अगदी अगदी.
सुंदरच
सुंदरच
अरे वा... मस्तच रेसिपी...लगेच
अरे वा... मस्तच रेसिपी...लगेच करण्यात येणार..
वा. बेकिंग जमत असते तर जरूर
वा. बेकिंग जमत असते तर जरूर केले असते. पण खायला तर नक्कीच आवडतील.
मोदक एकदम शाही आणि देखणे
मोदक एकदम शाही आणि देखणे जमलेत >>>> +111111
मस्त दिसतायत
मस्त दिसतायत
अंजीर शीर्षक आणि साहित्यात आलेत, रेसिपीत नुसतेच खजूर आहेत, तेवढा एक बदल करशील का?
(मला अंजीर आवडतात.त्यामुळे 'तयारी करेपर्यंत काढून ठेवलेले अंजीर पोटात गेले' अशी पण शक्यता आहे )
आयडियाची कल्पना छान आहे.
आयडियाची कल्पना छान आहे. मोदक छान दिसताहेत.
अप्रतिम आयडिया.
अप्रतिम आयडिया.
बेक्ड मोदक ची आयडिया भारी आहे
बेक्ड मोदक ची आयडिया भारी आहे. मस्त दिसताहेत.
अरे वा! छान आहेत.
अरे वा! छान आहेत.
सगळ्यांंना धन्यवाद _/\_
सगळ्यांंना धन्यवाद _/\_
अनु, त्यात सुकामेवा भरून मोदकाचं तोंड बंद केलं यात सुकामेवा म्हणजे अंजीर आणि काजूचे बारीक तुकडे.
प्राचीन, या बंगलोरला
ओहो तो सदरा त्या सदरात पडला
ओहो तो सदरा त्या सदरात पडला होय
शाही मोदक! टेम्टिंग
शाही मोदक! Tempting
मस्त.बाकी मीअनुशी सहमत.
मस्त.बाकी मीअनुशी सहमत.
वॉव वावे! झकास कल्पना आहे.
वॉव वावे! झकास कल्पना आहे. तयार मोदकही सुबक सुंदर दिसत आहेत.
भारीच की. मस्त आयडीया.
भारीच की. मस्त आयडीया.
भारीच दिसताएत मोदक. पण ओव्हन
भारीच दिसताएत मोदक. पण ओव्हन नाही माझ्या कडे त्यामुळे माझा पास. तळून करता येतील का हे?
मस्त लागतील तळून
मस्त लागतील तळून
किंवा डबल जॅकेट भांडे करून किंवा कुकरला वाफवता
पण येतील.
वाफवून चिकचिकीत होतील गं.
वाफवून चिकचिकीत होतील गं. कारण ती कणीक आहे. त्यात खजूर आणि साखरही आहे.
तळून कदाचित चांगले लागतील. करून पहा धनुडी. पण मोदकांचं तोंड घट्ट बंद झालं पाहिजे
नवीन प्रतिसादकांना धन्यवाद _/\_
नक्षीदार कुकी मोदक अफलातून
नक्षीदार कुकी मोदक अफलातून दिसतायत.
धन्यवाद वर्णिता.
धन्यवाद वर्णिता.
काल परत हे मोदक केले आणि जरा बरे फोटो काढून चिकटवले आहेत