कोरोना कधी जाईल असा तुमचा अंदाज आहे?

Submitted by केशव तुलसी on 6 August, 2020 - 08:34

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रोज लस कधी येणार याचे फक्त आडाखे येत आहेत .खात्रीशीर काही ठोस कुणीही सांगत नाही.फक्त अंदाज चालू आहेत.कधीकाळी आपण मुक्तपणे फिरायचो ,बाहेर जायचो ,बाहेर खायचो याचा विसर पडावा असं वातावरण झाले आहे.
माझा अंदाज असा आहे की कोरोना संक्रमण २०२० मध्येतर जात नाही. लस वर्षाअखेरीस येईल पण ती आपल्या दंडावर किंवा कु@@₹ बसायला सहा महीने तरी लागतील.काहींचे म्हणने आहे २०२२ उजाडेल.सेरो सर्व्हेनुसार दिल्ली मुंबैइत ऑक्टोबरापर्यंत हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल.एकंदर सगळेच अंदाज बांधत आहेत तर आपणही बांधूयात .तुम्ही वाचलेल्या बातम्या ,अपडेट्सनुसार कोरोना कधी जाईल असे तुम्हाला वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढील महिन्यात एनडीए, नीट,आयआयटी, एमपीएसी एवढ्या परीक्षा आहेत. लाखो मुले एकत्र येणार आणि नंतर आपापल्या घरी जाणार. कितीही काळजी घेतली तरी यातून करोनाचा धोका वाढणार नाही का?

नजिकच्या काळात कोरोना (COVID19) जाणार नाही... किंबहुना तो आता कायमच्या वास्तव्याला आलेला आहे हे स्विकारुनच पुढचे नियोजन करायचे.

थाळ्या बडवणे, दिवे लावणे आणि गो कोरोना गो असे गायल्याने कोरोना जाणार नाही. केवळ विज्ञानाच्या सहाय्याने आणि जनसामान्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्द करुन दिल्यास कोरोनाशी सामना करता येणे शक्य आहे.

लस येणार... १५ ऑगस्टला येणार... असे आधी जाहिर करुन , एक तारिख ठरवून लस तयार होत नाहीत. फ्लू ची लस आहेच ना तरी दर वर्षी २०००० लोक जातात...

आपल्या हातात जेव्हढी काळजी घेता येणे शक्य आहे तेव्हढी घ्यायची. साबणाने हात स्वच्छ करणे, नाका तोंडाला हात लागणारच नाही याची काळजी घेणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे.... मास्क वापरणार असालच तर सतरावेळा मास्कला हात लागणार नाही याची काळजी घ्यावी.
असे सहज करता येण्यासारखे उपाय योजल्यास कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होणार. यानंतरही झालाच तर सामना करायचा...

<< खरच कंटाळा आला आता, कधी पूर्ववत होणारे सगळं ? >>
------ सर्वांनाच कंटाळा आलेला आहे... आणि तसे होणे नैसर्गिक आहे.
आता परिस्थिती पुन्हा पुर्वीसारखी होणे शक्य नाही... जगण्याचे काही नियम बदलावे लागतील आणि नव्या बदलांचा स्विकार करावा लागेल. New normal...

<< कोरोनाच्या बातम्या बघणे तर कधीच बंद केलय. >>
------ बातम्या बघणे बंद करुन कोरोना थांबणार नाही... मधून मधून ट्रॅक ठेवायचा.

मी रोज वल्डोमिटर, CDC, WHO... यांच्या संकेत स्थळावर चक्कर टाकतो.

बातम्या बघणे बंद करुन कोरोना थांबणार नाही... मधून मधून ट्रॅक ठेवायचा.........

न्युज चैनल वर दाखवल्या जाणार्या अतिरजंक बातम्या बघणे बंद केलय.
आपल्या एरियात कोरोना ची काय परिस्थिती आहे आणि एकूणच देशभरात/जगभरात काय परिस्थिती आहे, हे पाहणे सुरूच आहे..वल्डोमिटर, CDC, WHO... यांच्या संकेत स्थळावर.

आता परिस्थिती पुन्हा पुर्वीसारखी होणे शक्य नाही... जगण्याचे काही नियम बदलावे लागतील आणि नव्या बदलांचा स्विकार करावा लागेल. New normal......।.

खरं आहे।

<< पण निदान गेले ३-४ दिवस तरी भारतात २-२.२५ लाख लोक इन्फेक्टेड झालेत आणि दिवसाला १००० च्या आसपास मरत आहेत Uhoh . >>

---- हे आकडे कितपत खरे आहेत ? अचूक आकडे मिळणे जवळजवळ अशक्यच आहे.

बातम्या न बघून कोरोना थांबणार नाही पण बातम्या बघूनही कोरोना थांबणार नाही. कशाला बघायचे ते डिप्रेसिंग आकडे? आम्ही खूप आधी बंद केले ते.

सगळा सावळा गोंधळ आहे .... कोणाला होतो, कोणाला नाही .... काही सुध्दा कार्यकारण भाव नाही.... शूटीम्ग इन द डार्क

लस ह्या वर्षी येत नाही असे एकंदर वाटत आहे.एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे कोरोना आता सोशली संपेल पण मेडिकली नाही म्हणजेच लोक त्याला एक भाग समजून पुर्ववत आयुष्य चालू ठेवतील.

असू ध्या हो corona ला.
कशाला घालवत आहात इतक्यात.
असू ध्या आता त्याच्या शिवाय करमत नाही.

सगळा सावळा गोंधळ आहे .... कोणाला होतो, कोणाला नाही .... काही सुध्दा कार्यकारण भाव नाही.... शूटीम्ग इन द डार्क

माझ्या जवळच्या मैत्रिणीचे ग्रुहप्रवेशाचा कार्यक्रम होता, अगदी आग्रहाचे आमंत्रण दिले होते,आम्ही नाही गेलो. कोरोना नम्बर ईतके वाढतायेत.आईने अगदी बजावून सांगितले की कुठल्याही फंक्शन ला नाही जायचे.

आईकडून कळले, माझ्या मामेबहिणीने मागच्या महिन्यात घराचे वास्तुशांती केली, बर्याच लोकांना बोलावले होते.
त्या कार्यक्रमात तिच्या मामाला कोरोनाची लागण झाली. दवाखान्यात एडमिट झाल्यावर दोन दिवसांनी न्यूमोनिया रिपोर्ट पॉजिटिव आला. आता काल आईने सांगितले त्यांना पैरेलिसिसचा ऐटेक आला आहे. वय बहुतेक 50-55.
नक्की होतय काय?

करोना मुळे रक्त वाहिन्या आतून खराब होतात , मग त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात , मेंदूतील रक्त वाहिन्यात गुठळ्या तयार झाल्या किंवा दुसरीकडून वहात येऊन मेंदूतील रक्तवाहिन्यांत जाऊन अडकल्या , की पेरेलिसिस होतो

अँटीप्लॅटेलेट ड्रग्जने हे टाळता येऊ शकते का? करोना झाल्यास, होऊन गेल्यावर दोन चार महिने हे घेता येईल का?

ज्योतिःशास्त्रानुसार कोरोनाचा उद्गम गुरुवार दिनांक २६-१२-२०१९ अमावस्येला मूळ नक्षत्र आणि मकर लग्न (सकाळी ७-५८ ते ९-४९) असताना झाला.

त्यावेळी रवि, चंद्र, बुध, गुरु, शनि आणि केतु हे सहा ग्रह धनुराशीत होते. धनु रास मकरेपासून दहाव्या (व्यय)स्थानी आहे.

मंगळ वृश्चिक राशीत, शुक्र मकरेत तर राहु मिथुन राशीत होता. एकंदरीत शुक्र सोडता अन्य आठही ग्रह कोरोनामहामारीच्या उदयाला थेट कारण ठरले.

*ग्रहांची अशी स्थिती साधारण शंभर वर्षें किंवा अधिक कालानंतर उद्भवते.*.

प्रत्येक प्रवासाला शेवट असतो या जीवनाच्या सिध्दांतानेच मला ही महामारी कधी अंताला पोचेल हे शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली.

*आठ ग्रह त्यांच्या त्यांच्या शुभ राशीत १४-९-२०२० आणि १५-९-२०२० ला येतील. ज्यांनी या महामारीला २६-१२-२०१९ ला जन्म दिला ते हेच आठ ग्रह या महामारीचा सोमवार १४-९-२०२० द्वादशीदिवशी आश्लेषा नक्षत्रात मेष लग्नी (सायं ७-४५ ते रात्री ९-२९) अंत करतील. याच काळात म्हणजे सायं ७-४५ ते रात्री ९-२९ *"फ"* या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचा एक शास्त्रज्ञ या महामारीवर लस शोधण्यात यशस्वी होईल.

त्यानंतर हा शास्त्रज्ञ मंगळवार १५-९-२०२० त्रयोदशी दिवशी मघा नक्षत्र, मेष लग्न असताना सायंकाळी ७-४१ ते रात्री ९-२५ यादरम्यान आपला यशस्वी शोध जाहीर करेल. (शुभस्थानी असणारे सात ग्रह + आठवा चंद्र तथा नवव्या गुरुची शुभ दृष्टी अशा स्थितीत).

अशा रीतीने कोरोनाचा प्रवास संपायला सुरुवात होईल

मला आज वरचे फॉरवर्ड आलाय. डायरेक्ट तारखा सांगितल्याने इंटरेस्टिंग वाटले.
माझा विश्वास आणि अविश्वास दोन्ही नाही.
एवढ्या छातीठोकपणे सांगणारे पहिल्यांदाच पाहिले मजा वाटली आणि कुतूहलही

खूप आहेत असे दावे, तारखे नुसार. त्यातल्या काही तारखा आता निघून गेल्या आहेत.

कोरोनाची अचूक जन्मवेळ समजली आणि त्यावरून त्याचीअ कुण्डली काढली तर हे शक्य आहे... पण जन्मवेळ अचूक हवी.. आणि त्तासाठी चीन हरामखोर सहकार्य करणार नाही.

खूप आहेत असे दावे, तारखे नुसार. त्यातल्या काही तारखा आता निघून गेल्या आहेत. >> hmm. Mala aleli pahilich bahutek.

Jiddu >> Lol bhariye.

खूप आहेत असे दावे, तारखे नुसार. त्यातल्या काही तारखा>> हो अगदीच..
पुण्यातल्या एका ज्योतिष्याने आधी सप्टेंबर 28 की 29 तारीख सांगितली पण परत त्यांनी ती डेट एक्सटेंड केलीय नोव्हेंबर एन्ड केलीय.

पुण्यातल्या एका ज्योतिष्याने आधी सप्टेंबर 28 की 29 तारीख सांगितली पण परत त्यांनी ती डेट एक्सटेंड केलीय नोव्हेंबर एन्ड केलीय >>> ऐसा चीटिंग नही करने का रे बाबा Wink

Pages

Back to top