दोन दिवस गोड मोदक खाऊन घसा खवखवला असेल तर हा घ्या..तिखट, झणझणीत, रसरशीत असा मोदक रस्सा.
सारणासाठी लागणारे साहित्य -
१ वाटी चिरलेला कांदा, १ वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे तीळ, १ चमचा खसखस, ५-६ पाकळ्या लसूण, मीठ, गरम मसाला पावडर १/२ चमचा, थोडीशी कोथिंबीर
पारीते साहित्य -
१ चणाडाळीचे पीठ, पाव वाटी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, हळद, लाल तिखट
रस्स्यासाठीचे (काही जणं हे ‘रस्त्यासाठीचे’ असेही वाचतील :)) साहित्य -
जीरे, अर्धा वाटी चिरलेला कांदा, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, २ चमचे डाळे, २ पळ्या तेल, २ मोठे चमचे लाल तिखट , १ मोठा चमचा मालवणी मसाला/काळा मसाला, कोथिंबीर
पटापट कृतीकडे पळूयात -
रेसिपी अगदी सोप्पीए ओ.. मोदक म्हंटलं की सासू आणि आई उगाचच बाऊ करतात असं वाटतं..
ही रेसिपी पूर्वी ह्या दोघींनाही शिकवून झाली आहे, त्यामुळे आता जगात कोणालाही शिकऊ शकेन इतका आत्मविश्वास वाढला आहे..
यापूर्वी जर तुमच्याकडे कोणीही असा ‘तिखट रस्सा मोदक’ खाल्ला नसेल तर बिंधास्त किचनच्या रणांगणात उतरा आणि मसाल्याचा धुराळा उडवायला सज्ज व्हा..
सर्वप्रथम पेटत्या शेगडीवर कढई ठेऊन चमचाभर तेलात चिरलेला कांदा, किसलेलं खोबर, तीळ, खसखस, लसूण हे सगळं एकत्र न भाजचा, एका वेळेस एक या पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचं. त्यानंतर भाजलेलं जिन्नस, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर पाणी न घालता मिक्सरला फिरवायचं. सारण तयार.
पारीसाठीचे साहित्य एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावं. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पारी लाटून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्यावा. हा मोदक बनवणं उकडीच्या मोदकापेक्षा २१ पटीने सोप्पा आहे यांत मुळीच शंका नाही पण तरीही आकार न जमल्यास चिंता नसावी.. पूर्वी अशा मोदकाला पूर्णपणे रस्स्यात बुडवून लपवण्याची कामगिरी फत्ते केलेली आहे.
आता रस्स्यासाठी थोड्या तेलात कांदा, खोबरं,डाळे खरपूस भाजून घ्या. मिक्सर मधे बारीकसर वाटून घ्या आणि कढईत तेल ओतून त्यात छान परतून घ्या.. लाल तिखट, मसाला पावडर घालून तेल सुटेपर्यंत हलवा ..गरम पाणी ओतून मीठ घालून एक उकळी काढा..त्यानंतर रस्स्यात मोदक सोडून झाकण ठेऊन १५ मि. शिजू द्या.. रस्स्यातले मोदक थुईथुई नाचू लागले की पेटलेली शेगडी बंद करा..शेवटी कोशिंबीर घालून सजवा.
महत्वाचा सल्ला - पूर्वी असाच अफलातून ‘रस्सा मोदक’ आई आणि सासूला खाऊ घातल्याची आठवण झाली.. माझ्या आईकडे कौतुकाची कायमच टंचाई म्हणून तिच्याकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष फेकत आपली नजर सासूकडे वळवली होती.. सासूने मस्त चपातीचा घास रस्स्यात मुरगळत, मोदकाचा लचका तोडत तोंडात गडप केला.. तीच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव तिखट मोदक आवडल्याची साक्ष देत होते.. तोंडातला घास संपताच आनंदाच्या भरात एखाद्या नवाबाप्रमाणे आपल्या गळ्यातील दोन पदरी सोन्याची माळ काढून माझ्याकडे भिरकावण्यासाठी वळलेले हात बघून माझ्या मनातले मोदक थुईथुई नाचू लागले.. पण तितक्यात “रस्स्यात मीठ थोडं कमी आहे” म्हणत माशी शिंकावी तशी आयशी शिंकली.. सासूनेही लगेचच गळ्याजवळचा हात मीठाच्या बरणीकडे वळवत कधी नव्हे ते आईच्या ‘हो’ ला ‘हो’ दिला.. म्हणून मीठाकडे खास लक्ष द्यावे.
सकाळी ॲलेक्सावर अरूण दाते यांच्या आवाजातलं “दिवस तुझे हे फुलायचे“ गाणं ऐकत ऐकत तिखट मोदकाचा घाट घातला.. मग तेव्हाच थोडंसं विडंबन सुचलं आणि दिवसभर तेच विडंबन ऐकवून नवरोबाला छळलं..आता थोडंसं माबोकरांनाही छळायची इच्छा झाली आहे
(चालीत म्हणा)
दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे
कांदा थोडा चिरून घेणे
खोबरं पण किसून ठेवणे
कढईत ह्याला परतायचे
पाट्यावर ठेऊन वाटायचे
बेसण घ्या घट्ट मळून
पारी पण घ्यावी जरा लाटून
अलगद सारण भरायचे
कळ्यांचे मोदक बनवाऽऽयचे
तिखट झणझणीत सार
सोसेना मोदकाचा भार
चमच्याने चाटून बघायचे
झाकण ठेऊन उकळायचे
माझ्या ह्या ताटाच्यापाशी
थांबते मी पण जराशी
फोटो जरा टिपून काढायचे
तिखट मोदक हादडायचे
दिवस आले हे खादाडीचे
तिखट मोदक हादडायचे
————————-
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मोदका सारख्या झणझणीत आणि रश्श्यासारख्या रसरशीत शुभेच्छा.
मस्त झणझणीत रेसिपी .
मस्त झणझणीत रेसिपी .
मधुराज रेसिपीमध्ये सिमीलर
मधुराज रेसिपीमध्ये सिमीलर रेसिपी मोदकांची आमटी म्हणून आहे पण तुमची बरीच वेगळी आहे त्यापेक्षा >> मोदकाच्या पारीची कृती मधुराज रेसिपीची आहे.. सारण आणि रस्सा माझ्या आज्जीच्या पद्धतीचं.. नेटवर मासवडी हा प्रकार शोधा.. सारण व रस्स्याची कृती तीथेही बघू शकाल.
ह्या पदार्थला मोदकांची आमटी अस म्हणतात का ?>> हो. मोदकाची आमटी, पिठाची वांगी असंही म्हणतात.
मधुराज रेसिपीमध्ये सिमीलर
मधुराज रेसिपीमध्ये सिमीलर रेसिपी मोदकांची आमटी म्हणून आहे पण तुमची बरीच वेगळी आहे >>>
लताज किचनच्या रेसिपीत मसाला हाच आहे पण पारीत कणिक नाहीये. कणिक घातलेली बरी कारण नुसते बेसन भिजवताना खूप चिकट होते व पारी बनवताना तेल वापरावे लागणार. कणिक वापरल्यामुळे पारी बनवणे सोपे जाईल.
एका पारंपरिक रेसिपी असल्याने कोणी परंपरा पाळेल तर कोणी फ्युजन करेल.
ह्याला गुपचूप वांगी म्हणतात असेही ऐकले, नेटवर उंबराची आमटी म्हणूनही आहे.
कणिक घातलेली बरी कारण नुसते
कणिक घातलेली बरी कारण नुसते बेसन भिजवताना खूप चिकट होते व पारी बनवताना तेल वापरावे लागणार >> मी तसंही थोडं तेल वापरलं आहे.. मधुराज रेसिपी मधे १ वाटी बेसण व १/२ वाटी कणिक घेतलंय.. मी १ वाटीसाठी १/४ वाटीच घेतलंय..चव जास्त चांगली लागतेय.
पारंपरीक पद्धतीत सारण सुकं खोबरं व शेंगदाण्याचं घालतात पण मला मासवडीचं सारण जे कांदा खोबऱयाचं असतं तेच जास्त आवडतं.
छान लिहिलंय.रेसिपी पण सोपी
छान लिहिलंय.रेसिपी पण सोपी आहे.
माझी पारी चिकट झाली पण कणीक
माझी पारी चिकट झाली पण कणीक तेल टाकून नीट जमवले. मला सारखे डबे काढा , डबे ठेवा , रेसिपी पहा , वेगवेगळे भाजा याने सव्वा तास लागला. खोबरे पण जास्त वाटू लागले पण बिघडले तर एक अमेरिकन शेजारीण रालेला मुव्ह होत आहे तिच्या सोबत तुला परत पाठवायचे ठरवले , खरं आहे. खोबरेच खोबरे चोहीकडे गेले मोदक कुणीकडे असं होण्याची भीती वाटली.
पण छान झाले. शेजारच्यांचा एक डबा होता त्यात घालून त्यांना पण दिले त्यांना पण खूप आवडले. लिंक दे म्हणाली तेलुगु शेजारीण , मी म्हणाले 'मराठी असे आमुची मायबोली' !
तेल जरा जास्तच सुटले. भरपेट सारण खाऊन आडवे झालेत !
पण खमंग झाले !! मुलाला तर खूपच आवडले.
Thanks म्हाळसा.
ओये ओये अस्मिता हे तर
ओये ओये अस्मिता हे तर तर्रीवाले मोदक आहेत
खरंच की ,
खरंच की ,
अस्मिता मस्तच, तों पा सु.
अस्मिता मस्तच, तों पा सु.
मला सारखे डबे काढा , डबे ठेवा
मला सारखे डबे काढा , डबे ठेवा , रेसिपी पहा , वेगवेगळे भाजा याने सव्वा तास लागला >> अरे वा.. तू रेसिपी ट्राय केलीस अगं पहिल्या वेळेस जरा रेसिपी बघून करण्यात वेळ जातो खरा.. पण पुढच्या वेळेस नक्कीच पाऊण एक तासात उरकेल बघ.
लिंक दे म्हणाली तेलुगु शेजारीण>> थोडफार तेलुगू येतं मला.. मी तेलुगूमधे रेसिपी लिहून देईन पण तीच्या कडून थोडंसं चिकन पिक्कल घेऊन त्या रालेला शिफ्ट होणाऱया अमेरीकन मैत्रिणीजवळ पाठवून दे तेवढं .. मला तेलुगू चिकन पिक्कल फार फार आवडतं
तेल जरा जास्तच सुटले. >> की फरक पेंदाए.. उद्या पोहे बनव आणि त्यात सरकव थोडंसं .. ऋ म्हणतो तसं ओए ओए करत खा
धन्यवाद अन्जुताई , म्हाळसा
धन्यवाद अन्जुताई , म्हाळसा एका तर्रीत दोन खादाडी ! अमेरिकन आज्जीला कुठे तापात पाडू पण चिकन पिक्कलच लक्षात ठेवीन. Clemson ला भाचा आहे आले तर नक्कीच. पोरी गोग्गोड
अस्मिता , मस्तच दिसतोय
अस्मिता , मस्तच दिसतोय मोदकरस्सा.
हे चिकन पीक्कल आमच्या कडे पण बनवतात. सासूबाई आणि जाऊबाई. आम्ही वर्षातून दोनदा जातो सासरी. येताना गुंटुर मिरची पिक्कल, चिकन पिक्कल आणतोच.
अ फ ला तू न दिसतेय आमटी.
अ फ ला तू न दिसतेय आमटी. मोदकांच्या आकाराबद्दल तर काय बोलावं! अतिशय सुबक झालेत.
अस्मिता.चिकन कढई रस्सा वाटतोय
अस्मिता.चिकन कढई रस्सा वाटतोय.
अ फ ला तू न दिसतेय आमटी.
अ फ ला तू न दिसतेय आमटी. मोदकांच्या आकाराबद्दल तर काय बोलावं! अतिशय सुबक झालेत >> धन्यवाद मामी
धन्यवाद कटप्पा आणि mrunali
धन्यवाद कटप्पा आणि mrunali
मस्त बनलेत रस्सा -मोदक.
मस्त बनलेत रस्सा -मोदक. कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. मला सर्वात कौतुक वाटले मोदकांचे. पाकळ्या किती छान पडल्यात. माझा रस्सा छान होतो, पण मोदक इतके सुंदर नाही होत. मग मी "जाऊदेत, नाहीतरी खाताना तोडले जाणारच आहेत ते रश्श्यात ", असा विचार करून स्वतः च स्वतः ला console करते.
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
शेवटचा फोटो पाहून तोंपासु.
मस्त
मस्त
अस्मिता, सही सही जमलीय .
अस्मिता, सही सही जमलीय .
फार टेम्प्टिंग दिसतायत
फार टेम्प्टिंग दिसतायत रश्श्यातले मोदक. अगदी प्रमाणासह कृती दिली आहे त्यामुळे नक्कीच करणार.
नादिशा,मंजूडी,साक्षी, वर्णिता
नादिशा,मंजूडी,साक्षी, वर्णिता, सिंडरेला - प्रतिसादांसाठी धन्यवाद.
अगदी प्रमाणासह कृती दिली आहे त्यामुळे नक्कीच करणार>> प्रमाण शक्य तितके ॲक्युरेट द्यायचा प्रयत्न केलाय.. नक्की करून पहा आणि फोटो टाका
अय्या हे खरे मोदक।आहेत !
अय्या
हे खरे मोदक।आहेत !
(No subject)
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन म्हाळसा
हार्दिक अभिनंदन म्हाळसा
तिखट मोदकांना तृतीय
तिखट मोदकांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नातेवाईक. गणपती बाप्पा मोरया
Congrats म्हाळसा
Congrats म्हाळसा
Pages