श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अमित (अमितव)

Submitted by अमितव on 27 August, 2020 - 09:11

भारीच. पेशन्सचं काम आहे.
अक्षर छान आहे.+1
+७८६
शाळेत असताना आपण रोज ईतके कसे लिहायचो बाप्पा क्नोज

शाळेत असताना आपण रोज ईतके कसे लिहायचो बाप्पा क्नोज
-- मी दहावीत असताना एका बोर्ड हुकलेल्या मुलाचे नोट्स मिळाले होते-फक्त तीन दिवसासाठी. पाच वह्या. तीन दिवस सकाळ ते रात्र बसून लिहून काढल्या होत्या त्या वह्या ते आठवले.

अबब लिहिलंयस
संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कसोटींवर अबब

अक्षर छानच आहे , पण तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय Wink

10वी ला NGK क्लासवाले समासाच्या नंतर एक इंच सोडून लाईन मारायला लावायचे गाईड लाईन म्हणून, पॅराग्राफ ,नवीन मुद्दा त्या लाईन पासून सुरू करायचा. त्याची आठवण आली हे पाहून Happy

धन्यवाद!
>>तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय >> हो हो. मला पण! Happy रादर पानभर लिहू शकलो जे वाचता येतंय!
>>समास सोडून धावलास ना!>> यात मध्यम पदलोपी समास केलाय ना? (मनात)
हे समास आणि त्याच्या पुढे आणि थोडं अंतर सोडून लिहिलंय हे तुम्ही लोकांनी सांगितल्यावर लक्षात आलं माझ्या. असं केलं नसतं तर शेवटी नाना फडववीस गिचमिड झाली नसती! नै बोला तो सुन्ते नै!

संपूर्ण अथर्वशीर्ष न पाहता लिहिले असल्यास विशेष कौतुक. अक्षर सुंदर आहे. समास पकडून लिहिले असते तर आकर्षक वाटले असते.