"मॅडम, हा नवीन ट्रेनी घोस्ट ." तो मिस् सटवी भूतानीला म्हणाला.
" हो, मला माहिती आहे, मी त्याचं बॅकग्राऊंड चेक केलंय. होतकरू प्रेत आहे." ती बोलली, " चांगलं काम केलस तर प्रमोशन लवकर मिळेल तुला." मला तिची फक्त कवटी दिसत होती. कवटी वरचे केस मात्र जमिनीला टेकले होते.
"आता तुम्ही अकाउंट्स मध्ये जाऊन बँक खातं उघडा. पगार तिथे जमा होईल. हे तुझं अपॉइंटमेंट ऑर्डर." तिने कागद माझ्यासमोर धरला. तिचा हात दिसत नव्हता. लालभडक रंगाचा तो कागद मी हातात घेतला तेंव्हा तो ओला लागला. आम्ही तिच्या केबिन बाहेर आलो.
"कुठली बँक आहे आपली?" मी विचारलं
"पी एन बी. पिशाच्च नॅशनल बँक."
"ओके. छान. बर, ही एच आर कुठे होती अगोदर?"
"अरे मोठ्या कंपनीत होती. एचआर म्हणून आपल्या कारकीर्दीत एम्प्लॉइजना भयंकर त्रास आणि वाईट परिणामांची धमकी द्यायची. उगीचच डझनभर एम्प्लॉइजना डिस्मिस केलंय तिनी. कार्यक्षम नाही अशी चूक काढून प्रोबेशन कालावधी वाढव, मालमत्तेचे नुकसान करण्याच्या चुकीच्या कारणास्तव पीएफ आणि ग्रेच्युटी रोखून ठेव, स्पाउजच्या बदल्यांचे अर्ज, विनंत्या महिनो महिने फायलींमध्ये गुंडाळ, सीटीसी कॅल्क्युलेट करताना फसवणूक कर, ज्यांनी कंपनी सोडली त्यांना एक्स्पेरिअन्स सर्टिफिकेट देण्यास उशीर कर अशी तिची देदीप्यमान कामगिरी आहे . तिचं खरं नाव सविता आहे म्हणजे Savita पण एक मुलगी नोकरी सोडताना तिच्या केबिन मध्ये जाऊन तिला म्हणाली की मॅडम तुमच्या नावाचं स्पेलिंग जरा इकडे तिकडे केलं की ते सटवी होतं आणि तेच आहात तुम्हीं. असं म्हणून ती मुलगी तरातरा निघून गेली. त्यानंतर सगळेजण तिला सटवीच म्हणायला लागले. अशा स्वभावामुळे लवकर ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, थायरॉईड, व्हेरिकोज व्हेन्स, अर्धशिशी असे रोग लागले. नंतर दारू आणि सिगारेटची सवय लागली. मग अशीच गाडी चालवताना इलेक्ट्रिक खांबाला धडकली. आम्ही तिला लगेच अमानव संसाधन अधिकारी अशी पोस्ट देऊन टाकली. तिच्या टेबलाच्या मागच्या बोर्डवर काय लिहिलं होतं वाचलास ना?"
" लिव्ह अँड लेट डाय…छान रेजुमे आहे की हिचा.. बोर्ड ऑफ 'डाय'रेक्टर्स वर घेतलय की नाही?
"चर्चा चालू आहे. बरं चल मी तुझी सगळ्या स्टाफशी ओळख करून देतो. चल."
" हे मिस्टर गिऱ्हा." मी हात पुढे केला. अगदी बर्फासारखा थंड होता. " हे कोकण आणि घाट दोन्हीकडे जॉब करतात. पाणवठ्यावर राहतात आणि माणसाला पाण्यात ओढून नेऊन त्याची नाना प्रकारची गम्मत करतात आणि मग बुडवतात. ‘काय गिऱ्हा लागलाय मागे?’ हा वाक्प्रचार यांनीच शोधलाय."
आम्ही पुढच्या टेबलाकडे वळलो.
" मिस्टर खवीस. हबशी आहेत. माणूस कचाट्यात सापडला की सोडायचे नाही हा जॉब प्रोफाइल. चौदाव्या शतकापासून कोकणात आहेत. मोस्ट सिनियर भूत. वेरी डेडीकेटेड.
"हे श्री छेडा. वेशीवर राहतात. खूप दयाळू आहेत. वर्षातून एकदा नारळ, केळी, साखर, फ्रेश कोंबड्यांचा किंवा बोकडाचा बळी दिल्यावर त्रास देत नाहीत. कधी कधी होळीवर, डोंगरात किंवा जंगलात वावरायला जातात.
" ओ हो…झोटिंग साहेब, कैसे हो ? " त्याने चौकशी केली. मग माझ्याकडे वळून म्हणाला, " यांची बाधा दूर करणे भल्याभल्याना जमत नाही. है ना झोटींगजी?" तो विकट हसला आणि म्हणाला, " सई बोला आपने, भोत बार बे-जबरन की बात करते वो भूत छुड़ानेवाले और इत्ता ग्यान पेल देते है कि जिसको मैंने पकड़ा वो नी मरे तो भी मर जाये.. हा हा हा."
आम्ही पुढच्या टेबलावर सरकलो.
" श्री दाव : एकटेच फिरतीवर असतात. लोन वुल्फ. एकट्यालाच गाठतात आणि काम तमाम करतात.
" हे डिअर मुंजा : मुंज झाल्यानंतर सोडमुंज होण्याअगोदर जे इथे येतात ते हे मुंज्या. हे पिंपळावर किंवा विहिरीत विहार करतात.
" हे श्री समंध : यांची उत्तरक्रिया न केल्यामुळे ते इथे आलेत. यांच्या नात्यातल्यांनी यांची इच्छा पूर्ण केल्यावर शांत होतात. हो ना समंधसाहेब?"
" येस, नियमित श्राद्ध कर्म केले तर मी आप्तांना मदत ही करतो."
"अरे व्वा, भुतं मदत पण करतात?" मी म्हणालो.
" ऑफ कोर्स! बायंगी आहे ना आमच्याकडे. बायंगिला नारळात कैद करतात आणि कैद करतांना त्याला आश्वासन दिलं जातं की तुला इतक्या कालावधीनंतर मुक्त करण्यात येईल. पण त्याचसोबत त्याला त्याचं काम सांगण्यात येत जे की साहजिकच मालकाला धन आणून देणं असतं. तो मालकाची भरभराट करतो. पण त्याला घरात स्थापन करतांना विशेष काळजी घ्यावी लागते . त्याला त्याचा मान द्यावा लागतो. त्याला स्थापन केलेली जागा स्वच्छ आणि साफ ठेवली पाहिजे. त्याची पण मागणी असते ती पुरी करावी लागते. ती नाही केली तर नाश ठरलेला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेजारच्या लोकांना त्याची जराही कुणकुण लागता कामा नये. बायंगी तुम्हाला ज्या प्रकारे फायदा करून देतो त्यामुळे माणूस लोभी बनतो आणि कबुल केलेल्या वेळेत त्याला सोडण्यास माणूस तयार होत नाही. बहुतेक वेळा त्याला सोडण्याच्या कालावधी बद्दल विसर पडलेला असतो. अश्या वेळी जर त्याला सोडला नाही तर तो त्या माणसासाठी जीवघेणा ठरू शकतो." समंध बोलला
आम्ही भुतालयात नजर फिरवली. सगळ्यांची ओळख झाली होती.
" फिमेल स्टाफ दिसत नाही." मी विचारलं.
" अरे त्यांना फर्स्ट शिफ्ट असते. ते दोन वाजता निघून जातात. पुढच्या वेळी आपण लवकर येऊ त्यावेळी लेडी भुतांना भेटू. अजून बरीच मुंडकी आहेत भेटायची. फील्ड वर आहेत म्हणून इथे नाहीत. चल आता बँकेत तुझे खाते उघडू या. मग परत ट्रेनिंग सुरू."
आम्ही बॅंकेला जायला निघालो.
......
मिस सटवी भूतानी चे वर्णन
मिस सटवी भूतानी चे वर्णन वाचून कोको आठवला.
मजा आली.
धमाल आहे
धमाल आहे
होतकरू प्रेत जाम आवडलं.
एकदम टॅलेंटेड स्टाफ आहे सगळा.
मस्तच मज्जा येतेय वाचायला....
मस्तच मज्जा येतेय वाचायला.... पुलेशु...
लै भारी हो!
लै भारी हो!
mrunali.samad. थँकयू. कोको
mrunali.samad. थँकयू. कोको काय आहे.? प्लीज कळवा.
mi_anu, :-D:-D:-D, थँक्यू!
mi_anu, :-D:-D:-D, थँक्यू!
chasmish, आभारी आहे.
chasmish, आभारी आहे.
मानव पृथ्वीकर,. एन्जॉय!
मानव पृथ्वीकर,. एन्जॉय!
उच्च कल्पना आहेत!
उच्च कल्पना आहेत!
कोको ही एक animation film आहे. मस्त आहे. Best animation film चं ऑस्कर आहे या फिल्मला.
भुतावळीची चांगली ओळख झाली...
भुतावळीची चांगली ओळख झाली...
काय हे बिथोवन...! हाहाहा!
काय हे बिथोवन...! हाहाहा! माझी मावस नणंद सविता आहे...! अर्थात् ती तिचं स्पेलिंग Savitha करते. मजा आली वाचताना! Btw, आशाळभूत नावाचं भूत असतं काय?
थँक्यू एविटा, हाहाहा! बरं
थँक्यू एविटा, हाहाहा! बरं झालं तिच्या नावात एच आहे ते! असो. आशाळभूत असं भूत असतं कीनाही ठाऊक नाही पण गुजराती लोकांत भूत असं आडनाव असतं ते मला माहिती आहे. મિસ્ટર ભૂત બહુ સારો માણસ છે असं वाक्य पण मी ऐकलं आहे. Mr. Bhoot is a very good man is the meaning of this sentence. Well thank you so much. My greetings to Ms. Savitha!
आशाळभूत म्हणजे अपेक्षा करणे
आशाळभूत म्हणजे अपेक्षा करणे ना?
क्रुपया माहीत असणाऱ्यानी सांगावे.
बिथोवन, मस्त चालू आहे सिरीज.
बिथोवन, मस्त चालू आहे सिरीज.
ओळखपरेड आवडली.
ए श्रद्धा. थॅन्क्स. भुताला
ए श्रद्धा. थॅन्क्स. भुताला वाचक संख्या कमी आहे. वाचक घाबरत असावेत बहुतेक वर्णन वाचून. ज्यांनी वाचून प्रतिसाद दिला ते धैर्यवान म्हणायला पाहिजेत!
मस्त चालू आहे सिरीज. बरीचशी
मस्त चालू आहे सिरीज. बरीचशी नावं नवीनच ऐकली...
(No subject)
छानच आहे ही सिरिज . मजा येतेय
छानच आहे ही सिरिज . मजा येतेय वाचायला .
हि कथा सुद्धा...
हि कथा सुद्धा...