तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चहा खारी
चहा बिस्कीट
चहा बटर
चहा कुकीज
चहा ब्रेड
चहा पोहे
पोह्यांवर चहा हवाच.
सकाळी उठल्यावर चहा हवाच. इ.

नवीन घरातली पहिलीच रात्र. पसारा शून्य आवरून झालाय, असे दोन-तीन तास पसारा आवरल्यानंतरही वाटतेय.
रात्रीचे तीन वाजलेत. पण पोरं झोपली आहेत. त्यामुळे हिच खरी कामाची वेळ हे समजतेय. पण घोटभर चहा घश्यात उतरल्याशिवाय ते जमणार नाही हे ही कळतेय. तरीही समोर पडलेल्या पसारयातून चहाची निर्मिती करण्यापेक्षा कोरोनाची लस बनवायला घेतली तर त्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत. पण वेळ अशी आहे की कोणी चहाचा कप आणि कोरोनाची लस एकाचवेळी ऑफर केली तर हात चहासाठीच पूढे जावा. म्हणून मग घेतली चहासामानाची शोधाशोध करायला.

दूध तेवढे एक फ्रिजमध्ये होते. चहापावडर आणि साखरेचे डबे शोधायचे थोडे व्यर्थ प्रयत्न केल्यावर आठवले की ड्रममध्ये एक्स्ट्रा स्टॉक पडलाय. मग नवीन पुडकेच फोडले. कप सापडले नाहीत तेव्हा मुलांच्या बड्डेचे रिटर्न गिफ्ट आठवले. साधी गाळणी सापडली नाही तर ज्यूसची गाळणी वापरली. चमच्या ऐवजी काटे सापडले त्यातच धन्यता मानली. सुदैवाने खाऊचा डब्बा लवकर हाताला लागला. त्यातून फरसाण आणि गुड्डेची सोय झाली. चहापावडर आणि साखरेची मापे डब्यासोबतच हरवलेली. मग तिथे आपलाच अनुभवी हात वापरला. सिलेंडर जोडला गेला नसल्याने गॅसच्या स्टोव्हचे उद्घाटन केले. आणि मी स्वहस्ते नव्या घरातील पहिल्या नाईटचा दोन कप जुगाडू चहा बनवला. बाकी तो कसाही बनू दे, अश्या चहाला तोड नसते Happy

लावला का पसारा?
(अभिषेक मनात : हिला कशाला पाहिजेत चौकशा?)
बी the way, तो तसा चहा मी कधीच पिऊ शकणार नाही अभिषेक. फरसाण आधी खाऊन वर चहा चालेल पण Happy

मुहुर्त गणपतीच्या एक दिवस आधी जुम्म्याचा होता. पण त्याचा ईस्टर संडे झाला Happy

पसारा आवरता आवरता मीच त्यात हरवून जाईल याची भिती आहे. नशीब मला तिसरे अपत्य नव्हते अन्यथा पसारा आणखी एका पटीने वाढला असता.

@ चहा फरसाण तर माझा खुराक आहे हा रोजचा. चहात आधी शेव-फरसाण टाकायचे. मग त्यातच खारी बटर बुडवून खायचे. काल गुडडे बिस्कीट खाल्ले. आणि मग चमच्याने फरसाण खाऊन तो चहा पिऊन मग एखादा फ्रेश आणि कडक चहाचा घोट पुन्हा घ्यायचा.

अवांतर - कोणी प्रतिसादात अभिषेक नावाने हाक मारली तर दचकून मी आजूबाजूला बघतो. आय मीन आजूबाजूचे प्रतिसाद चेकतो. बाकी काही हरकत नाही. मारा कुठलीही हाक

तुम्हाला मध्यंतरी पोटाचा काहितरी आजार झाला होता असे वाचले होते, जर ते खरे होते, तर असले तेलकट तेही चहात बुडवुन का खाता? किती छान आहेत पोरं तुमची त्यांनाही तुमची सवय लागायची अश्याने.

मी शक्यतो वैयक्तिक प्रतिसाद देत नाही पण काळजी वाटली म्हणून लिहिले.

तुम्हाला मध्यंतरी पोटाचा काहितरी आजार झाला होता असे वाचले होते, जर ते खरे होते, तर असले तेलकट तेही चहात बुडवुन का खाता? >>>
पालथ्या घड्यावर पाणी. याला तो तेलकट समजतही नसेल एवढे तेलकट खातो अजून तो.

अरे मानवी शरीर म्हणजे एक इंजिन आहे..इंजिनाला तेल पाणी हवेच... तेल पीत जा रे ऋन्मेष... जीवाला पी !

काळजीबद्दल धन्यवाद वीबी आणि मानवमामा

मला पोटाचा म्हणजे बहुतेक आतड्याचा आजार आहे. Cohn's Disease नावाचा.
मी त्यावर फारसा अभ्यास करणे टाळतो आणि डॉक्टर जे सांगेल तेच फॉलो करतो.
मलाही आधी वाटायचे की तिखट तेलकट मांसाहार वगैरे जे मी खातो त्यामुळे मला जास्तीचा त्रास होत असावा. आजाराचे निदान होण्याआधी बरेच भोगलेय मी. पण जेव्हा निदान झाले तेव्हापासून गोळ्यांचा व्यवस्थित कोर्स करून पुरेसे ठणठणीत आयुष्य जगतोय. डॉक्टरने काहीच पथ्य न सांगितल्याने मी देखील माझ्या आहाराच्या सवयी बदलल्या नाहीत. फक्त अतिरेक जिथे होतो, तिथे त्रास होतो, तिथे थांबतो. पण हे कॉमन आहे. सर्वांनाच लागू. त्यामुळे आजारासाठी म्हणून मी विशेष काळजी आहारात घेत नाही. न घेता व्यवस्थित चालू आहे तर का मन मारून जगावे असा विचार करतो.

अवांतर - पोरांनाही असे खाण्याची सवय लागेल यावरून माझाच एक धागा आठवला.
मुलांसमोर मद्यप्राशन करावे का?
तसेच मुलांसमोर चहाफरसाण खावे का असा धाग काढायला हवा Happy

चर्चा जरा योग्य मार्गावर आणूयात.

वरती एका प्रतिसादात "कोणास जपानी चहा प्राशन समारंभाचा अनुभव आहे का?" अशी मी पृच्छा केली होती त्यास मानव पृथ्वीकर यांनीच केवळ उत्तर दिले होते. हे एक वेळ समजण्यासारखे आहे की याचा कोणाला अनुभव नाही परंतु "कोणास धारोष्ण निरसे दूध पिण्याचा अनुभव आहे का?" या प्रश्नास देखील उत्तर आले नाही हे मात्र आश्चर्यजनक आहे.

इथे कोणीही 'माबो का लाल" नाही ज्याने धारोष्ण दूध प्यायले आहे?

येनीवेज
मी आपले नेहमीचे गाय म्हैस सोडून लहानपणी ऊंटीन, गाढवीन आणि बकरीचे दूध प्यायलो आहे. ईतरांचे काय अनुभव? भारताबाहेर राहणारयांनी तेथील कोणत्या कोणत्या जनावरांचे दूध चाखले आहे.

मी लहान असताना कोल्हापूर ला प्यायलो आहे
म्हणजे प्यायला लावण्यात आलेलं जबरदस्ती
घरोघरी म्हशी फिरायच्या आणि दारात त्यांचे दूध काढून दिले जायचे
कितील होते ते आठवत नाही पण मुबलक असे आणि त्याला किंचित कोमट दुधाला पेंडपाला गवताचा असा एक सुंदर फ्लेवर असे
पण ते दूध संपवणे हा मोठी टास्क होती
भलामोठा पेला असे आणि नंतर मात्र घशाशी येत असे

नंतर एकदा ट्रेक दरम्यान एका गावात गवळ्याने पहाटे पहाटे दिले होते प्यायला
ते मात्र चवीचवीने प्यायलो होतो
बिनसाखर, बिना काही घालता ते दूध खरंच जाम चविष्ट लागते

ॲकॉर्डिण्ग टू कोई मिल गया ओ कोई मिल गया, आईचे दूध पिणे ईझ मोअर दॅन ईनफ .. त्यानंतर मग बोर्नविटा पित असाल तर मग आयुष्यात बाकी काही प्यायची गरज नाही Happy

ॲकॉर्डिण्ग टू कोई मिल गया ओ कोई मिल गया, आईचे दूध पिणे ईझ मोअर दॅन ईनफ >> अरे अरे अरे! काय केलंत हो रुन्मेश राव हे!

आशूचॅम्प आपली लेटेस्ट पोस्ट मी वाघिणीचे दूध समजून् वाचली.
आणि चाट प्डलो>>>>

वाचत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलं त्याबद्दल धन्यवाद
तिसऱ्या ओळीत दुसरा शब्द वाचा पाहू

अमितव, वाघीण म्हणजे, वाघाची वाईफ? तो खरा खरा वाघ - जो सर्कसमंदे रहाते, कवा कवा जंगलमदे पण असते, तो? माझ्या डोळ्यासमोर एकदम,
हिमालयात एक टांग उप्पर करून तप करणारे गुरूदेव आणी एक टांग उप्पर करून तेला दूध देणारी वाघीण उभी राहिली Rofl

तिसऱ्या ओळीत दुसरा शब्द वाचा पाहू
>>
एवढे शब्दन शब्द कोण वाचते. व्यासांनाही हे जमले नसावे. वर वाघिणीची चर्चा चालू होती त्यामुळे म्हैस हा शब्द नजरेआड होत वाघीणच डोळ्यासमोर राहिली.
बाकी मी चांगला वाचक नाही हे केव्हाही मान्य. मला लिहायला आवडते आणि वाचायला बोअर होते. जे नक्कीच चुकीचे आहे. पण जे आहे ते आहे, मान्य करावे पुढे जावे Happy

Pages