श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - पल्लवी - किल्ली

Submitted by किल्ली on 23 August, 2020 - 13:36

|| गणपती बाप्पा मोरया ||

||श्री गणेश पंचरत्न स्तोत्र ||

ब गट

IMG-20200823-WA0010.jpg

स्तोत्र इथून छापले आहे
https://www.maayboli.com/node/13468?page=2#comment-544820

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सहन करा आता Lol
हे पूर्ण स्तोत्र, माझ्या हस्ताक्षरात लिहिलेले जो मनुष्य अचूक वाचून दाखवेल त्याला संयोजक party देतील Happy Biggrin

मस्त लिहीलंय Happy
पण वाचलं नाही.. (संस्कृत कळत नसल्यानं) Proud

अक्षर सुंदर आहे किल्ली.
आम्ही हे पूर्ण स्तोत्र लहानपणी चिन्मय मिशन च्या क्लास मध्ये म्हणायचो ते आठवलं.खूप सुंदर स्तोत्र आहे.आता परत पाठ करेन.

नीटनेटकेपणा वाखाणण्याजोगा आहे.
अलीकडे हाताने लिहिलेले असे काही पाहायला मिळत नाही. वरील अक्षर पाहून एक विचार मनात आला की आता मराठी अक्षर लेखनाचे वळण पुष्कळ बदलले आहे. विशेषत: क, त्न, त्र, श्व, क्त ही अक्षरे पूर्वीहून वेगळ्या पद्धतीने लिहिली जातात.
पण छान दिसतेय. सर्वत्र सारखेपणा राखला आहे. अक्षरांची लांबी रुंदी उंची vagairemadhye.

ती जुन्या स्टाईल ची अक्षरं हाताने लिहिताना जरा वेडंवाकडं झालं तर जोडाक्षर कळत नसेल म्हणून स्पष्ट लिहायची फॅशन आली असावी.
आता जी मुलं देवनागरी (हिंदी किंवा मराठी) लिहितात वाचतात त्यांना हीच काय, त्र आणि ञ मधला फरक, क्रूज मधला क्रू आणि कृपाण मधला कृ हे बारकावेही कळत नाहीत.
देवनागरी लिपी बहुधा हिराकाना काटाकाना प्रमाणे 'लिहायला अतिशय कठीण लिपी' वगैरे म्हणत असतील मुलं.

धन्यवाद हा आ, पाफा, मी अनु, मी अस्मिता, जाई, हिरा, आसा, बोकलात, विनिता Happy

तुम्ही जे कौतुक केले आहेत ते आईबाबांना दाखवते Happy

शिक्षण घेईपर्यंत अक्षर सुधार म्हणून शिक्षक ,घरच्यांची, मैत्रिणींची सुद्धा बोलणी खाल्ली आहेत.

मायबोली अशी जागा आहे की माझ्या अक्षराला चांगले म्हटले जात आहे Happy
धन्य जाहले!

पण छान दिसतेय. सर्वत्र सारखेपणा राखला आहे. अक्षरांची लांबी रुंदी उंची vagairemadhye.>>>>> सहमत.
एकूण अक्षर नीटस आहे हो.

छान आहे की अक्षर. आणि किती भरपूर लिहिलेय.

या निमित्ते खूप श्लोक एकत्र गोळा होताहेत. थोडे तरी पाठ करायला हवे असे वाटतेय आता Happy

+१
+१

Pages