मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्यावर्षी अगदी सोप्या भाषेत गणपती प्राणप्रतिष्ठा विधी सांगणारा धागा कुणीतरी काढला होता, आता शोधून पण सापडत नाही, कुणाकडे लिंक असेल तर द्या

मागे एकदा एकजण आपल्या ऑनलाईन ब्राझिलियन मैत्रिणीला भेटायला १ महिना (कदाचित जास्त ही असेल) ब्राझिल ला गेला होता.. त्यावर एक छान लेखमाला त्याने लिहिली होती..

त्याची लिंक आहे का?

वेमा अन अडमीन दोघांना करा विपु, कोणीतरी एक नक्की बघणार.

माबोवरचे बरेच लेख अन कथा दिसतायेत तिथे, लेखकाच्या नावासकट, म्हणून कॉपी पेस्ट प्रकारच वाटतोय

हा काहीतरी rss फीड सारखा प्रकार वाटतो आहे.म्हणजे नवे धागे इथे आले की तिथे दिसतील असे काही.पण तसं म्हणावं तर चुकीची ऐकू आलेली गाणी मध्ये एक इमेज ऍड केलीय.
म्हाळसा, किल्ली, अस्मिता आणि बऱ्याच जणांचे धागे तसेच्या तसे दिसतायत.
Rss फीड असेल तरी हे परवानगी ने केले आहे असं वाटत नाही. अडमीन ना सांगितल्यास ते पॉलिसी बघून काय करायचे ठरवू शकतील.तसेच तिथे आयडी असलेल्यानी प्रतिसाद देऊन हे नक्की सांगा की हे मूळ इथले लेख तिथे बिन नावाचे आले आहेत.
हा अतिशय भिकार प्रकार आहे.मूळ साईटवर येऊन का वाचू नये सरळ लेख?स्वतःच्या साईटवर कॉपी पेस्ट का?

केला विपू. अगदी अनु , मला हे माहिती नव्हते काल म्हाळसा ने विपू त सांगितले. मला कळेचना काय आहे हे !!

त्या साईटवर जाहिराती पण आहेत.बहुधा मायबोली, फेसबूक, अजून एक दोन ठिकाणचे लेख rss फीड ने उचलून साईट ट्रॅफिक वाढवून जाहिरात उत्पन्न असा काहीतरी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र असा प्रकार वाटतोय.
प्रसाद शिरगावकर यांचा फेसबुकवरचा डिजिटल पाकिटमारीलेख पण आहे.
In any case, he will have to mention original link.By permission from original author he can give small fraction of writing there and give original article hyperlink at "पूर्ण लेख वाचा"

ही पाकीटमारी कोण करतय , हे शोधायचे कसे ?
काही काही तर नवीन लेख आहेत , मनिमोहर यांचा, माझा, एक आठवड्यानंतरची तारीख दिसते आहे , सो लगोलग उचलेले दिसताहेत. शिवाय फोटो सुद्धा.
धन्यवाद म्हाळसा.

काही काही लेखात इथे नसलेले आणि बकवास फोटो ऍड केले आहेत.रुन्मेष च्या लेखात एक मास्क वाली बाई आहे(आता रुन्मेष इथे येऊन मीच बाई आणि लेख तिथे टाकला म्हणाले तर माझा पोपट होऊन उडून जाईल)
फेसबुक, मायबोली, लोकसत्ता आणि मनोगत वरचे नवे लेख असा काहीसा फीड दिसतोय.
पण इमेजेस टाकल्या असतील तर कॉपी पेस्टमध्ये कष्टही आहेत.इतके कोणा अनोळखी पामराने कोणासाठी का करावे?(गहिवरलेला स्वर)

काही इमेजेस add केल्यात काही कमी केल्यात. माझ्या चार पैकी एकच टाकली आहे. मी लिहीलेल्या लेखांपैकी एकच लेख त्यांंना उचलण्यायोग्य वाटला आहे त्याबद्दल समाधान मानू की वाईट वाटून घेऊ कळत नाहीये Lol
वेमांचे अर्जंनटली लक्ष वेधण्यासाठी धागा हवा होता. Attention Webmaster !!! असा काही , विपू टाकणे म्हणजे त्यांच्या लांबलचक लाईनमध्ये उभे राहिल्यासारखे वाटते.

एक कथा अंधुकशी आठवते आहे. एका लग्नात दोन ब्राम्हणांची खाण्यावरून पैज लागली असते त्याच्यावर. कोणाला आठवते आहे का?

काही महिन्यांपूर्वी इथे कोणीतरी पक्ष्यांबद्दलच्या एका लेखात एक सुंदर फोटो टाकला होता. त्यात खडकावर बसलेले बगळे होते आणि त्या मायबोलीकराने त्या फोटोला बदलून पेंटिंगचं स्वरूप दिलं होतं. आठवतोय का धागा कोणाला?

एक गोष्ट आहे. नाव आठवत नाही आणि कुठे वाचली ते पण आठवत नाही पण मिपा नाहीतर मिसळपाव या दोघांवरच वाचली आहे. चार मित्र असतात ते मित्राच्या गावी जातात तिथे त्यांना गावच्या जत्रेत बळी देणार असतात.त्यांना त्याचा सुगावा लागतो आणि ते पळून जायला बघतात पण मित्र त्यांचा गैरसमज झालाय असं पटवून देतो आणि परत गावी घेऊन येतो. बळी की असंच काहीतरी नाव होतं.

एक कथा अंधुकशी आठवते आहे. एका लग्नात दोन ब्राम्हणांची खाण्यावरून पैज लागली असते त्याच्यावर. कोणाला आठवते आहे का? >> अशी कथा किशोर मासिकामध्ये होती.

इथे एक हा धागा आहे
पैजेखातर आचरट खाणं : https://www.maayboli.com/node/40369

या वरच्या धाग्यावरच्या प्रतिसादात मिळाली ती कथा
पूर्णब्रह्म : https://www.maayboli.com/node/68013

ब्राम्हणांची खाण्यावरून पैज लागली असते त्याच्यावर. कोणाला आठवते आहे का? >> अशी कथा किशोर मासिकामध्ये होती. >>>> 'श्रीखंडाचे बोट' असं नाव होतं कथेचं.

'श्रीखंडाचे बोट' असं नाव होतं कथेचं. >> हो बरोबर. तो भरपूर जेवणारा ब्राह्मण जेऊन झाल्यावर शेतात बैलाला बाजूला काढून स्वतः शेत नांगरतो - कॅलरीज बर्न करायला. पूर्ण जेऊन झाल्यावर मोठा केळ्याचा घड खातो - त्यातली केळी सोलून ती तुपात बुडवून खातो - बाधू नयेत म्हणून.

मागे एकदा एकजण आपल्या ऑनलाईन ब्राझिलियन मैत्रिणीला भेटायला १ महिना (कदाचित जास्त ही असेल) ब्राझिल ला गेला होता.. त्यावर एक छान लेखमाला त्याने लिहिली होती..

त्याची लिंक आहे का? >>> शोधायचा प्रयत्न केला पण हे नाही मिळालं मला.

मागे एकदा एकजण आपल्या ऑनलाईन ब्राझिलियन मैत्रिणीला भेटायला १ महिना (कदाचित जास्त ही असेल) ब्राझिल ला गेला होता.. त्यावर एक छान लेखमाला त्याने लिहिली होती..>>
http://www.misalpav.com/node/13708
ही म्हणताय का? मायबोलीवर आहे का माहित नाही

Pages