तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख गौरी भाभीना डेट करायचा >>>>
शाखा मायबोली वर नसताना त्याच्या बायकोबद्दल बोलू नका हो
चाहतु ना राग येतो

>>>>

नीयत मॅटर्स
कटप्पा यांनी शाहरूखचा आणि गौरीचा उल्लेख कौतुकाने केला
तुम्ही त्याच्या मुलांचा उल्लेख त्याला चिडवायला केला होता.
बाकी मला राग नव्हता आला, वाईट वाटलेले. माणसं चुकीची वागतात तेव्हा वाईट वाटते. रागावणारा मी कोण?

हो ना वीट आलाय आता.
दर धाग्यात काय ती ड्यू आय चर्चा. अवांतर चर्चेला हरकत घेणारा मी कोण, पण तेच तेच वाचायला बोअर होते. या जगात एकच व्यक्ती अशी आहे जिने तेच तेच केले तरी चाहते बोअर होणार नाहीत. आणि ती व्यक्ती म्हणजे - _________

बाई दवे तुम्ही मी आणि म्हाळसा मायबोली लाईव्ह करूयात.

घे की भावड्या असं आपण मित्राला म्हणू शकतो
मग क्लाएंट ला म्हणणार का?
मग भावड्या पण अपमान होतो का?
अशाने मग बाबू, सोना वगैरे पण अपमानास्पद शब्द होतील
कसली फालतू स्पष्टीकरणे देतो रे

नीयत मॅटर्स
>>>>
हा तर पार नियत बियत काढू लागलाय
तोही एक फालतू नटासाठी
कसला सुमार दर्जाचा भक्त आहेस रे, इतकी लोचट आणि मानसिक गुलामगिरी भरली आहे तुझ्या मनात
शिसारी येते आता तुझी
भयानक Sad

अशाने मग बाबू, सोना वगैरे पण अपमानास्पद शब्द होतील
>>>>

नाही हे लाडाचे शब्द झाले
क्लायंटशी आपण लाडाचे शब्दही नाही वापरू शकत

चहामध्ये बाकरवडी बुडवून खायची, अप्रतिम लागते.
मी पहिल्यांदा ऐकलं, तेंव्हा काईतरीच काय हे, अशी रिअँक्शन होती. पण एकदा ट्राय केलं आणि त्यानंतर आवडायला लागलं -

बाकरवडीत फोर्क टाकायचा आणि तो गरमागरम चहात बुडवायचा. ५-६ बुडबुडे आले की हळूवारपणे ती चहात बुडवलेली बाकरवडी खायची...अहाहा...काय मस्त लागते.

आजचं जातो आणि अर्धा किलो घेऊन येतो.
(अर्थातच एकच्या आधी किंवा चारच्या नंतर)

चितळ्यांनी त्यांच्या १ ते ४ ह्या USP चा त्याग करायचा ठरवलं आहे अशी मागे एकदा बातमी होती...
त्याचे काय झाले?

चितळे स्टाईल बाकरवडी का चहात टाकायची? करून बघतो एकदा. मॅगीत टाकतो मी ती बरेचदा. छान लागते.

मला ती लांबोकडी कडक बाकरवडी जास्त आवडते. पण हल्ली ती चांगली मिळत नाही कुठे. लहानपणी आई जॉबला असताना व्हीटीवरून आणायची ती चव मिस करतो आजही.

नाही, कसा असतो?>> हायला..खरच नाही प्यायला? अहो एकदा पिऊन बघा.. पण तो चहा एका विशिष्ट पद्धतीतच म्हणजे सुभाष घाईचा “ड्रॅकुला की मोहाॅब्बत“ पिक्चर बघतच प्यावा लागतो.. Happy

ऋन्मेऽऽष@ पर्रफेक्ट असणे म्हणजे चहा कोणी बनवते means लहान मुले ही पण कारण तो सोपा असते. सोपा गोष्टी जे कोणी नीट किंवा पर्रफेक्ट करत असतात ना ती लोके सगळीच कामे नीट, मनापासून आणि पर्रफेक्ट करतात म्हणून चहा पर्रफेक्ट लागणारी लोक पर्रफेक्ट असतात अस माझे मात आहे.

म्हाळसा मी पिला आहे वाहवा प्रोडक्शन चा चहा जॉनी च्या हाताने, पोर्टफोलिओ बनवायला गेलो होतो तेंव्हा.
अमिताभ बच्चन बापाचा रोल करतो म्हणाला.
बाई दवे - याच्यावर धागा यायला हवा.

म्हाळसा, ड्रॅक्युला नाही, ड्रायकुला की मुहब्बत (उच्चारी) Happy
दो दोस्तोने मिलके एक कप में वह चाय पी थी ... दोस्ती बढ गयीं Happy

म्हाळसा, ड्रॅक्युला नाही, ड्रायकुला की मुहब्बत >> Lol
कटप्पा.. चला नव्या धाग्याची कामगिरी पार पाडा.. नाही तर सगळा चहाचा मसाला इकडेच वाटला जाईल Happy

हो ना ,माझ्या ही ज्ञानात थोडी भर पडेल.>> मृणाली.. तुम्हाला जरासा होमवर्क करावा लागेल.. आत्ताच एका धाग्यात वाचलंय होमवर्क करून आलेली मुलं शिक्षकांना आवडतात.. गुगलवर वाहवा प्रोडक्शन शोधा Happy

इथे धारोष्ण, निरसे दूध प्यालेला/ली कोणी नरपुंगव / नारीपुंगव (आपली भाषा लिंग निरपेक्ष - म्हणजे जेंडर न्यूट्रल केव्हा होणार कोण जाणे!) आहे का?

आपल्या कल्लापुरात गवळी थेट म्हस दारात घेऊन येतो म्हणे. आता मोठाल्या बिल्डिंगीच्या पायऱ्या कशी चढणार किंवा लिफ्ट मध्ये कशी मावणार हा प्रश्न आहेच.

दिवाळीच्या दिवसात मला चकली चहात बुडवून खायला व नंतर तो तिखट झालेला चहा प्यायला आवडतो.

संक्रांतीच्या दिवसात एक कडक तीळ लाडू तोंडात ठेऊन घोट घोट चहा प्यायला आवडते. मध्ये मध्ये लाडू चावून अजून मजा आणायची. पण लाडू मात्र मी केलेला, कटकन आवाज करत तुकडा होईल असा हवा, मऊसर लाडवात ती मजा नाही.

बंगलोर अयंगार मधून आणलेला कापसासारखा मऊ प्लॅन मिल्क केक एक घास व त्यावर एक घोट चहा हेही आवडते.

लहानपणी पोहे म्हणजे कोकणातील जाडसर लाल पोहे हेच माहीत होते. त्यातली तुसे काढून मग मूठभर पोहे चहात घालायचे आणि ते मुरल्यावर चमच्याने खायचे आवडायचे. आता असे पोहे मुद्दाम शोधून आणावे लागतात, पण त्याला ती नॉस्टॅल्जिक चव नसतेच. तरी कधीतरी करते हा उद्योग.

कुरमुरेही असे चहात घालून खायला आवडतात.

चहा पोहे
चहा कुरमुरे
चहा लाह्या
चहा थालीपीठ
चहा प्लेन ओटस
चहा म्युसली
सगळं चांगलं लागतं

Pages