नवीन अभ्यासक्रम धोरणामुळे कंटेम्पररी गाणी अभ्यासक्रमात घेतली गेली. सातवीच्या अभ्यासक्रमात "इसमे तेरा घाटा मेरा कुछ नही जाता" हे गाणं शिकवण्याची जबाबदारी अर्थातच बोकलवाडीच्या सुप्रसिद्ध दाबे मास्तरांवर आली.
दोन-चार पोट्ट्यांना सुरळी पाव धम्मकलाडू देऊन वर्ग ठार शांत झाल्यावर मास्तर बोलले,
- तर मूर्ख मुलांनो आणि तितक्याच मूर्ख मुलींनो आज आपण शिकणार आहोत सुप्रसिद्ध गाणे ..
यावर पोरांनी मास्तरांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच जयघोष करावा तसे " इस्मे तेरा घाटा मेरा कुछ नही जाता.." असे म्हटल्यावर मास्तरांची कळी खुलली.
-तर मुलांनो तुम्ही या गाण्याचा युट्यूब व्हिडीओ बघितला असेलच?
सगळे पोर एक जात "हो" म्हटले.
-शाब्बास!
आधीच अभ्यास करून आलेली पोरं कुठल्या मास्तर ला आवडणार नाहीत?
-तर मुलांनो प्रत्यक्ष कवितेला हात घालण्या आधी तुम्हाला काही प्रश्न?
मास्तरांचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच बारक्या साहेबरावने हात वर केला.
-बोल फोकलीच्या आन थोडक्यात वीच्चार नाही तर माझ्याशी गाठ आहे.
- नाही राहू दे मास्तर आता नाही विचारत.
बारक्याने माघार घेतली
- आरे विचार ना
मास्तरांनी डरकाळी फोडली.
- नको तुम्ही मारताल
- हे पाहा तू दोन्हीकडून मार खाणारच आहे तेव्हा विचारून टाक.
- खरंच विचारू का?
आता मास्तरने रागात एवढे मोठे डोळे केले की अजून थोडे मोठे झाले तर डोळ्याच्या गारगोट्या खाली पडतात असंच पोरांना वाटू लागलं.
-मास्तर मला शंका अशी आहे की..
-काय शंका आहे??
-माझी शंका अशी की सर..
-अबे बोल ना लवकर का घालू बुक्की??
- सर माझी शंका अशी की हे गाणं बाई भिताडा ला गुदगुल्या करत का बरं म्हणती?
- आ?? भिताडाला गुदगुल्या???
सगळी पोरं व्हिडिओ आठवून खदाखदा हसू लागले. मास्तर मात्र रागाने मूळ रंगाच्या अडचणी ने लाल न होता निळसर करपट झाले.
- आयला u mean भिंतीला गुदगुल्या??? गुदगुल्या टू द भिंत?? बाय द कवियत्री?? हर सेल्फ?
-होच मास्तर
- अरे फोडणीच्या, u द donkey ऑफ द बोकल वाडी, तुझ्या खानदानात कोणी केल्या होता भिंतीला गुदगुल्या?
- आईची शप्पथ सर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा. गाणं सुरू झाल्यापासून बाई कशी भिंतीशी लगट करती
- लगट??? भिंतीशी?? चा मारि या शिक्षण क्षेत्राच्या.. साला हा नवीन अभ्यासक्रम पोट्ट्याचे डोके खराब करायला. अजून कोणा कोणाला असं वाटतं की बाई भिंतीला गुदगुल्या करत आहे सगळे हात वर करा.. मास्तर दरडावून बोलले.
संपूर्ण वर्गात भीषण शांतता. सर्वांच्या लक्षात आलं की आता ज्यांनी ज्यांनी हात वर केला त्याच्या पाठीत मास्तर मुठीचा बोक्या घालणार.
पण एखाद्या फालतू सिनेमाने अचानक आश्चर्यकारक वळण घ्यावे आणि सिनेमा मध्ये इंटरेस्ट यावा तदवत हळूहळू सगळ्या वर्गाने हात वर केला पोरींनी सुद्धा. मास्तर दचकले. हायला नवीन अभ्यासक्रमा मधून अचानक सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी एकी निर्माण झाली? लोकशाही येती की काय या देशात?
आता एवढ्या सगळ्या पोरांना मारायचं म्हणजे त्यात तास जाणार आणि वर नंतर आपले हात दुखणार. दोन दिवसापासून बायको खसखस करायला लागल्यामुळे स्वयंपाक आणि भांडी धुणे आपल्यालाच करायचे आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. अर्थात आपले दाबे मास्तर सुद्धा नंबरी ते अपमान गिळून म्हणाले:
- ठीके ठीके हात खाली करा. मी आता उद्या परत व्हिडिओ बघतो आणि मग आपण ही कविता शिकू. आज आपण दुसरे एक अर्थपूर्ण गीत घेऊ. मास्तरांनी शांतपणे पानं उलटली आणि खिडकीजवळ जाऊन तंबाखूची पिंक मारून साईडने ओठ टिपत म्हणाले मूर्ख मुलांनो आणि तितक्याच मूर्ख मुलींनो पान नंबर 32 काढा. इस नई कविता का नाम है "चोली के पीछे क्या है?"
यंदा मात्र बारक्याने ताबडतोब प्रश्न विचारण्यासाठी वर केलेल्या हाता कडे मास्तरांनी सर्रास दुर्लक्ष केले आणि ते पुढे शिकवू लागले..
#बोकलवाडी_च्या_गोष्टी
भयानक
भयानक

जाऊन तो नेहा ककर चा व्हीडिओ पहिला
अक्षरशः भिंतीला गुदगुल्या करत आहे असंच वाटलं
(No subject)
https://youtu.be/CB46Eked4O4
भितीला गुदगुल्या
भितीला गुदगुल्या
(No subject)
जबरदस्त.. ह्याच रंगाच्या
भारीये लेख.. त्यापेक्षा
भारीये लेख.. त्यापेक्षा लेखाचा विषय आवडला
आणि या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा नेहा कक्करचा विडिओ पाहिला... हायला काय आहे हे.. बनवलाच का तो विडिओ हेच कळत नाहीये.. आणि गाणेही नुसते घाटा जाता पुन्हा एकदा जाता घाटा एवढेच आहे.. सिरीअसली बस कर आता. अशी गाणी सिलॅबसला ठेवली तर काय शिकणार मुले? पेपर सेट करणारा तरी काय प्रश्न विचारणार.. आधुनिकतेच्या नावाखाली वाट लावलीय शिक्षणपद्धतीची
मस्त लिहीलय.
मस्त लिहीलय.
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो असच
धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो असच हसत रहा आणि हसवीत राहा...
https://youtu.be/lRzBa8j24bM
https://youtu.be/lRzBa8j24bM हेही पहा
छान लिहीलयं !
मला वाटलं आता सोडेल , मगं सोडेल पण भिंतीची "पाठ"
भिंतीला गुदगुल्या
भिंतीला गुदगुल्या
तुमच्या लेखामुळे एका महान गाण्याचे दर्शन झाले - आमचे अहोभाग्य
मला वाटलं आता सोडेल , मगं
मला वाटलं आता सोडेल , मगं सोडेल पण भिंतीची "पाठ" Wink काही सोडत नाही बया !! >>> प्रेक्षकांना ब्लाउज पॅटर्न परत परत दाखवते आहे. गाणं बघताना बायका प्रेक्षकांनी डिझायनर पॅटर्न विसरायला नको.
शिवाय तिला कोणी सांगितलं असेल की पिछेसे बहोत सेक्सी लग रही हो, मग दर 30 सेकंदानी दाखवा एकदा पाठ. 
(No subject)
मीरा
मीरा
हा क्लायंट साठी केलेला " पाठपुरावा" ! We follow up ! 
ही एक भिंतीच्या रंगाची उत्तम जाहिरात होऊ शकते. एकदा रंग लाऊन झाला की आम्ही पुन्हा पुन्हा गुदगुल्या करकरून चेक करतो if the wall paint " cracks up"
शिवाय तिला कोणी सांगितलं असेल
शिवाय तिला कोणी सांगितलं असेल की पिछेसे बहोत सेक्सी लग रही हो, मग दर 30 सेकंदानी दाखवा एकदा पाठ. Wink
<<<<
हे शक्य आहे
कारण ती ॲक्चुअली छान दिसत होती
मी य आधी तिला फक्त रडायचे मीम्स मध्ये पाहिले होते. चेहरयाचा रडका क्लोज अप.. पण छान दिसते मुलगी
धन्यवाद
धन्यवाद
मस्त खुसखुशीत लेख...
मस्त खुसखुशीत लेख...
नेहा कककर नाव ऐकले होते पण ह्या नावाची बाई गाणीही गाते हे आज कळले. बाकी मला ब्लाउज पुढून आवडला. मागून कापड शिल्लक राहिले नसावे. आणि ते साडीसदृश्य जे काही आहे तेही आवडले. कोलकाता साड्यामध्ये असे प्रकार दिसतात.
छान लिहीलयं !
आधुनिकतेच्या नावाखाली वाट लावलीय शिक्षणपद्धतीची +१
आधी अल्फा बीटा ने डोक्याची मंडई केली होती. आता त्यात भर म्हणून हे नसते उद्योग चालू केले की काय?
हे गाणं मला आमच्या एका
हे गाणं मला आमच्या एका शेजाराच्या कृपेने वारंवार ऐकायला लागतं. त्यामुळे ते कानात अडकून बसलंय.
पण तिथे मेल व्हर्शन वाजतं.
वर वर्णन केलेलं गाणं अजिबात पाहणार नाही.
मेल वर्जन बोअर वाटले
मेल वर्जन बोअर वाटले मला
नेहा कक्करच्या आवाजात जान आहे,. एक्स फॅक्टरही आहे. ते ऐकल्यावर हे एकदम फिके वाटले
नेहा कक्करच्या आवाजात जान आहे
नेहा कक्करच्या आवाजात जान आहे,. एक्स फॅक्टरही आहे.>> सहमत
नेहाजींच्या नादामध्ये आदरणीय
नेहाजींच्या नादामध्ये आदरणीय दाबे सरांना विसरू नये ही नम्र विनंती.
मस्त आहे लेख.
मस्त आहे लेख.
तुमच्या लेखामुळे हे 'महान' गाणे माहित झाले. नाही तर काही कळाले नसते!
नेहा कक्करचा हसली की चांगली दिसते असा समज असावा. नको तिथेही हसते!
कसले भारी लिहलय. मी स्वता
कसले भारी लिहलय. मी स्वता वर्गात आहे आणि समोर मास्तर हे गाण शिकवत आहेत असे वाटले.
आभार!
आभार!
मुलगी? सिरीयसली?
मुलगी? सिरीयसली?
मला तर ती चाळिशी उलटून गेलेली, प्रचंड थकलेली दिसते - चेहर्याकडे पाहून आणि आवाज ऐकूनही तोच फील येतो. इतक्या वयाच्या बाईला मुलगी म्हणण्याइतपत तुम्ही वृद्ध आहात? पण तुमचे धागे आणि प्रतिसाद वाचून तसं कधी वाटलंच नव्हतं. आपकी लिखाईसे आपकी उम्रका पताही नही चलता| संतूर कीबोर्डसे टाईप करते हो क्या?
एखाद्याच्या दिसण्यवरून लोक
एखाद्याच्या दिसण्यावरून लोक चेष्टा मस्करी का करतात, नसेल आवडत तर बघू नका.
मुलगी? सिरीयसली?
मुलगी? सिरीयसली?
मला तर ती चाळिशी उलटून गेलेली, प्रचंड थकलेली दिसते - चेहर्याकडे पाहून आणि आवाज ऐकूनही तोच फील येतो. इतक्या वयाच्या बाईला मुलगी म्हणण्याइतपत तुम्ही वृद्ध आहात?
>>>>
हे मला उद्देशून होते का?
मी सुद्धा वर तिला छान आहे मुलगी म्हटलेय.
असो,
आपली पोस्ट वाचून सहज तिचे वय चेक केले. Born: 6 June 1988 (age 32 years)
बाकी दिसण्यावरून लोकं का अश्या कॉमेंट करतात मलाही खरेच समजले नाही. पण मला त्या वादात पडायचे नाहीये. ईथे मी लोकांना सई, स्वप्निल, खुद्द शाहरूखच्याही दिसण्यावरून कॉमेंट करताना पाहिले आहे.. त्यामुळे हे तितकेसे धक्कादायक नाही.
पण आवाज...?
आवाजावर तर ती कमावतेय ना..
तिचा आवाज खरेच थकेला असता तर कोणी का त्यासाठी पैसे मोजले असते?
आला का शाहरूख अभिषेक दादा,
आला का शाहरूख
अभिषेक दादा, please तुम्ही तुमचे शाहरूख प्रेम स्वतःपुरते मर्यादित ठेवा ना. प्रत्येक प्रतिसादात शाहरूखला का आणता आहात?
इथे दिसण्यावरून नाही तर वयावरून comment केली असावी.
विनोदी धाग्यावर वाद का केला जातोय पण?
विनोदी धाग्यावर वाद का केला
विनोदी धाग्यावर वाद का केला जातोय पण?>>1+
Pages