इस्मे तेरा घाटा

Submitted by सखा on 18 August, 2020 - 01:47

नवीन अभ्यासक्रम धोरणामुळे कंटेम्पररी गाणी अभ्यासक्रमात घेतली गेली. सातवीच्या अभ्यासक्रमात "इसमे तेरा घाटा मेरा कुछ नही जाता" हे गाणं शिकवण्याची जबाबदारी अर्थातच बोकलवाडीच्या सुप्रसिद्ध दाबे मास्तरांवर आली.
दोन-चार पोट्ट्यांना सुरळी पाव धम्मकलाडू देऊन वर्ग ठार शांत झाल्यावर मास्तर बोलले,
- तर मूर्ख मुलांनो आणि तितक्याच मूर्ख मुलींनो आज आपण शिकणार आहोत सुप्रसिद्ध गाणे ..

यावर पोरांनी मास्तरांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच जयघोष करावा तसे " इस्मे तेरा घाटा मेरा कुछ नही जाता.." असे म्हटल्यावर मास्तरांची कळी खुलली.
-तर मुलांनो तुम्ही या गाण्याचा युट्यूब व्हिडीओ बघितला असेलच?
सगळे पोर एक जात "हो" म्हटले.
-शाब्बास!
आधीच अभ्यास करून आलेली पोरं कुठल्या मास्तर ला आवडणार नाहीत?
-तर मुलांनो प्रत्यक्ष कवितेला हात घालण्या आधी तुम्हाला काही प्रश्न?
मास्तरांचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच बारक्या साहेबरावने हात वर केला.
-बोल फोकलीच्या आन थोडक्यात वीच्चार नाही तर माझ्याशी गाठ आहे.
- नाही राहू दे मास्तर आता नाही विचारत.
बारक्याने माघार घेतली
- आरे विचार ना
मास्तरांनी डरकाळी फोडली.
- नको तुम्ही मारताल
- हे पाहा तू दोन्हीकडून मार खाणारच आहे तेव्हा विचारून टाक.
- खरंच विचारू का?
आता मास्तरने रागात एवढे मोठे डोळे केले की अजून थोडे मोठे झाले तर डोळ्याच्या गारगोट्या खाली पडतात असंच पोरांना वाटू लागलं.
-मास्तर मला शंका अशी आहे की..
-काय शंका आहे??
-माझी शंका अशी की सर..
-अबे बोल ना लवकर का घालू बुक्की??
- सर माझी शंका अशी की हे गाणं बाई भिताडा ला गुदगुल्या करत का बरं म्हणती?
- आ?? भिताडाला गुदगुल्या???
सगळी पोरं व्हिडिओ आठवून खदाखदा हसू लागले. मास्तर मात्र रागाने मूळ रंगाच्या अडचणी ने लाल न होता निळसर करपट झाले.
- आयला u mean भिंतीला गुदगुल्या??? गुदगुल्या टू द भिंत?? बाय द कवियत्री?? हर सेल्फ?
-होच मास्तर
- अरे फोडणीच्या, u द donkey ऑफ द बोकल वाडी, तुझ्या खानदानात कोणी केल्या होता भिंतीला गुदगुल्या?
- आईची शप्पथ सर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा. गाणं सुरू झाल्यापासून बाई कशी भिंतीशी लगट करती
- लगट??? भिंतीशी?? चा मारि या शिक्षण क्षेत्राच्या.. साला हा नवीन अभ्यासक्रम पोट्ट्याचे डोके खराब करायला. अजून कोणा कोणाला असं वाटतं की बाई भिंतीला गुदगुल्या करत आहे सगळे हात वर करा.. मास्तर दरडावून बोलले.
संपूर्ण वर्गात भीषण शांतता. सर्वांच्या लक्षात आलं की आता ज्यांनी ज्यांनी हात वर केला त्याच्या पाठीत मास्तर मुठीचा बोक्या घालणार.
पण एखाद्या फालतू सिनेमाने अचानक आश्चर्यकारक वळण घ्यावे आणि सिनेमा मध्ये इंटरेस्ट यावा तदवत हळूहळू सगळ्या वर्गाने हात वर केला पोरींनी सुद्धा. मास्तर दचकले. हायला नवीन अभ्यासक्रमा मधून अचानक सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी एकी निर्माण झाली? लोकशाही येती की काय या देशात?
आता एवढ्या सगळ्या पोरांना मारायचं म्हणजे त्यात तास जाणार आणि वर नंतर आपले हात दुखणार. दोन दिवसापासून बायको खसखस करायला लागल्यामुळे स्वयंपाक आणि भांडी धुणे आपल्यालाच करायचे आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. अर्थात आपले दाबे मास्तर सुद्धा नंबरी ते अपमान गिळून म्हणाले:
- ठीके ठीके हात खाली करा. मी आता उद्या परत व्हिडिओ बघतो आणि मग आपण ही कविता शिकू. आज आपण दुसरे एक अर्थपूर्ण गीत घेऊ. मास्तरांनी शांतपणे पानं उलटली आणि खिडकीजवळ जाऊन तंबाखूची पिंक मारून साईडने ओठ टिपत म्हणाले मूर्ख मुलांनो आणि तितक्याच मूर्ख मुलींनो पान नंबर 32 काढा. इस नई कविता का नाम है "चोली के पीछे क्या है?"
यंदा मात्र बारक्याने ताबडतोब प्रश्न विचारण्यासाठी वर केलेल्या हाता कडे मास्तरांनी सर्रास दुर्लक्ष केले आणि ते पुढे शिकवू लागले..
Screenshot_20200818-105545_YouTube.jpg
#बोकलवाडी_च्या_गोष्टी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साडी कोणती आहे?
टसर सिल्क का मंगलगिरी कॉटन का लिनन?
आता माझ्या डोक्यात राहील ही साडी रात्रभर. छाने.

+७८६ साडी सुद्धा छान आहे
हळूहळू या विडिओतून बरेच छान गोष्टी बाहेर पडत आहेत.
नेहा कक्करचे सुंदर दिसणे
नेहा कक्करचा गोड आवाज
नेहा कक्करची छान साडी

साडी नसावी. ओढणीच साडी सारखी लपेटली असेल. गरीबाघरची आहे ग बिचारी... नाहीतर कोण कशाला पोळ्याचे बैलाचे गोंडे ब्लाऊजला लावेल... गुंडीला पण पैसे नाही बघ बिचारीकडे. Wink

हो बरोबर.
आणि तो बैल सुद्धा स्पेनिश बुल फाइट मधील असणार म्हणून ते भिंतींच्या लाल रंगाचं एवढं आकर्षण !

Happy
व्हिडीओ चे निरीक्षण करता असे वाटते की ओढणीच आहे.शिवाय पन्हा अरुंद.खोचायला पण मार्जिन नाहीये.पुढे निऱ्या करायला जागा नाहीये ते अंग भर मोठा पदर घेऊन लपवावे लागले आहे बिचारीला.

हे गाणं उत्तम आहे. गायले देखील चांगलेच आहे.
उगाच नाही याला करोड views मिळाले. मी खूपदा हे गाणे ऐकले आहे.
Absurdity वर बोट ठेवणे हे माझ्या बहुतेक विनोदी लेखना मधून तुम्हाला दिसेल. हे कंटेम्पररी गाणं सिल्याबस मध्ये आलेले पाहून एका मुलाच्या मनात काय विचार येऊ शकतो यावर ही विनोदी कथा आहे.

मजेशीर लिरिक्स आहेत.
हेअरकट पण मस्त आहे.
गाणं पब्लिकला आवडलंच असेल.
पण तरीहि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट साडी Happy चर्चनीय(असा शब्द नाहीये माहीत आहे) आहे.

Pages