तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणालिनी मी नाही दुखावले .. पण कोणी दुखावले जाऊ नये म्हणून शब्द फार जपून वापरते..

अहो मानव बहुतेक त्याने खरगपूर च्या IIT मध्ये शिपायांची नोकरी केली असेल आधी ..

चहा - ढोसा, चहाबरोबर डोसा - हा विनोद शांतेचं कार्टं मधे पण आहे >> बरोबर.. कोणी आम्हाला चहा ढोसा म्हटलं की आम्हीही असच म्हणतो..”अय्या, आज चहा बरोबर डोसा पण वाटतं“ Happy

चहा - ढोसा, चहाबरोबर डोसा - हा विनोद शांतेचं कार्टं मधे पण आहे.
>>>
ढोसा हे हिडिसफिडीसदर्शक क्रियापद आहे. जे दारूसोबतच सूट करते.
जर कोणी आपल्याला चहा ढोसा असे म्हणत असेल तर तो आपला अपमान करतोय असे फिल आपल्याला येते आणि मग आपल्याला प्रत्युत्तरादाखल चहासोबत डोसा असे विनोद करावे लागतात.

त्याने खरगपूर च्या IIT मध्ये शिपायांची नोकरी केली असेल आधी >>
त्यालाच खरगपूरमध्ये शिपायाचा कोर्स करणे म्हणतात.

जर कोणी आपल्याला चहा ढोसा असे म्हणत असेल तर तो आपला अपमान करतोय असे फिल आपल्याला येते >> “चहा ढोसा” बोलण्याची हिम्मत फक्त घरच्यांचीच असते..मग त्यात काय आलाय अपमान Happy

घरच्यांपेक्षा मित्रांची हिंमत खूप उच्च असते हो.
घरचे नाही म्हटलं तरी फॉर्मलिटीज पाळतात बऱ्यापैकी.>> मग थोडं बदलून लिहीते.. “चहा ढोसा” बोलण्याची हिम्मत फक्त आपल्याच माणसांची असते..मग त्यात काय आलाय अपमान Happy

ढोसा म्हणलं की अपमान होतो?

याचे बेसिक्स फारच गंडलेले आहेत राव
आणि मराठी सुद्धा
तरी मराठी शाळेत शिकलाय का शाळेवरून जातो म्हणे

चहा ढोसा प्रेम आहे.
माझा एक मित्र त्याच्याशी बोलायला गेले की ओक म्हणतो.
ए मित्रा ऐक ना.
ओक.
हा अपमान आहे.

बाई दवे शाहरुख गौरी भाभीना डेट करायचा तेंव्हा प्रेमाने डोसा खायला घेऊन जायचा असे त्याच्या ऑटोबायोग्राफी मध्ये वाचलय.

ढोसा म्हणलं की अपमान होतो?
ऑफिसमध्ये कॉन्फरन्स सुरू आहे. तुमची बोलायची वेळ आहे. तुम्ही म्हणता "excuse me , I will just fill my cup with tea". आणि बॉस म्हणतो, "हं, तू ढोस आधी!"
वाटणार नाही किंचितसातरी अपमान?

किती चांगला बॉस आहे. विंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाचे माय मराठीत उत्तर देतोय. एक तर मीटिंग मध्ये तुम्ही बोलायच्या ऐवजी चहा मागताय. तो नकार देत नाहीय. चहा घे म्हणतोय. अपमान कसला. अभिमान वाटला पाहिजे असल्या बॉस चा तुम्हाला.

कॉफी हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
मला कॉफी हे फक्त दुधाचीच लागते. जराही पाणी नको. इंस्टंट असो किंवा फ़िल्टर पण पाणी नकोच.
इंस्टंट असेल तर एक कप दुधाला एक छोटा चमचा साखर. कपात आधीच कॉफी ठेवलेली असते त्यात दुध ओततो. व्यवस्थित मिसळून आनंद घेतो.
शक्यतो नेसकॅफे क्लासिक. चिकोरी ब्लेंड अजिबात नाही त्यामुळे ब्रू नापास. काही इतर ब्रांड वापरले पण आवडले नाही आणि सध्या एकूणच इंस्टंट कॉफी कमी केलेली असल्याने जास्त लिहिण्यासारखे नाही.
खरी मजा फिल्टर कॉफी मध्ये आहे.
आतापर्यंत मोकापॉट, फ्रेंच प्रेस, पेपर फिल्टर वापरून झाले. पण समाधान कशाने झाले नाही. शेवटी गाडी साउथ इंडिअन फिल्टर वर येऊन थांबली आहे. याला तोड नाही. ब्लॅक कॉफी असेल तर डिकॉशन मध्ये गरम पाणी टाकून डायल्युट करून बिना साखरेची पितो.
सर्वात महत्वाची दुध घातलेली फिल्टर कॉफी.
साउथ इंडिअन फिल्टर मधील डिकॉशन मध्ये वरून दुध ओतले तरी त्याचा मनाजोगा ब्लेंड होत नाही. पाणी, साखर आणि कॉफीच्या वेगळ्या चवी जाणवतात.
म्हणून उकळलेल्या दुधात कॉफी टाकतो आणि थोडी साखर टाकतो. मंद अग्नी वर उकळतो. गाळून गरमा गरम पितो. अरेबिका कॉफी बिन्स विथ लाईट टू मिडीयम रोस्ट वापरतो. रोबस्टा नाही चिकोरी ब्लेंड तर नाहीच नाही.
सायन्स म्हणते की कॉफी चा उत्तम स्वाद उतरण्यासाठी ९३ डिग्री सेल्सियस तापमान असावे. पण ते पाण्यात उकळलेल्या कॉफीसाठी ठीक आहे दुधात उकळताना जी भट्टी जमते ती वरून दुध टाकण्यात नाही. पण उकळताना तारतम्य हवे.
पश्चिमेकडे दुध सुद्धा उकळले तर त्याचा स्वाद जातो म्हणतात; पण आपल्याला खरपूस उकळलेले दुध आवडते, आटीव दुध आवडते यातच सर्व आले.

एक तर मीटिंग मध्ये तुम्ही बोलायच्या ऐवजी चहा मागताय. तो नकार देत नाहीय. चहा घे म्हणतोय. अपमान कसला. अभिमान वाटला पाहिजे असल्या बॉस चा तुम्हाला.>> मी पण तेच म्हणणार होते.. एक तर बाॅसला तुमची किती काळजी.. तुम्ही चहा ओतणार, मग तो थंड होणार म्हणून ढोस म्हणाला तो.. एवढी काळजी जवळच्यालाच ओ Happy

पाऊस ढोसायला मुद्दामहून जुलैमध्ये ( २०१९) महाबळेश्वरला गेलो आणि दोन दिवस राहणार होतो. पण काही च दिसत नव्हते. गारठा. चहा हवाच पण एक टपरीवाला होता जवळच. म्हणाला बासुंदी फ्लेवर. एक कप तीस रुपये. आवडला नाही.

मानव अहो तो बंगाली नाही आहे.. कोकणातला ..हेदवी गावचा आहे. >>>> हो, हे मला पण माहीत आहे. मी कोकणात आदिवासी शाळेच्या प्रकल्पात ( 100 दिवसांची शाळा) काम करायचे, तेव्हा तिथली कातकरी मुलं रोज सकाळी विचारायची ' ताय, चाय खाल्ली का?' त्यांच्या टोनमध्ये ऎकायला खूप गोड वाटायचं.

अभिमान वाटला पाहिजे असल्या बॉस चा तुम्हाला >>> मला काही फरक पडत नाही हो.
प्रश्न दुसऱ्याला विचारला होता.
आमच्याकडे मिटिंग मध्ये कुणीही केव्हाही जाऊन चहा कॉफीचा कप भरू शकतो. मी बॉसला म्हणतो, "मग, मला ढोसून घेतल्या शिवाय ठोसून बोलता येत नाही, माहीत आहे ना."

बॉसपण उठून येतो, म्हणतो ठिकाय मी पण थोडी कॉफी ढोसतो.

आणि ज्यांनी ढोसा म्हणजे अपमानकारक अशा अर्थाची पोस्ट टाकली, त्यांना सपोर्ट करायला गेलो, तर तेच उलट बोलू लागले.

खऱ्याची दुनिया राहिली नाही हेच खरं. Wink

शाहरुख गौरी भाभीना डेट करायचा >>>>
शाखा मायबोली वर नसताना त्याच्या बायकोबद्दल बोलू नका हो
चाहतु ना राग येतो
चिडून मायबोली सोडुन जातील काय Happy
मग सगळा भार तुमच्यावर येऊन पडेल

मला आयरीश कॉफी सुद्धा आवडते.
दुनिया ती कॉफी त्याच्यावरील क्रीम मधून पिते.
मी मात्र ते क्रीम चमच्याने बाजूला काढुन प्यायचो.

जमाना झाला आयरीश कॉफी पिऊन.

शाहरुख गौरी भाभीना डेट करायचा >>>>
शाखा मायबोली वर नसताना त्याच्या बायकोबद्दल बोलू नका हो
चाहतु ना राग येतो
चिडून मायबोली सोडुन जातील काय Happy
मग सगळा भार तुमच्यावर येऊन पडेल

Submitted by आशुचँप ~~मला कटप्पा=ॠन्मेष असणार असा संशय आहे

“चहा ढोसा” बोलण्याची हिम्मत फक्त आपल्याच माणसांची असते..मग त्यात काय आलाय अपमान Happy
>>>>>>

हेच वाक्य दर्शवते की ढोसा हा अपमानकारक शब्द आहे
म्हणून ती सो कॉलड हिंमत आपली माणसेच दाखवतात
आणि आपली माणसे नसलेल्यांनी ढोसा म्हटले की वाद होतात

बॉस तुमचा लाडका असला आणि बॉसचे तुम्ही चमचे असाल तर बिनधास्त एकमेकांना ढोसाढोसी करू शकता

पण तेच बाहेरचा क्लायंट आलाय ऑफिसमध्ये आणि पिऊनने चहा देत म्हटले घ्या ढोसा तर क्लायंट गेलाच म्हणून समजा

Submitted by आशुचँप ~~मला कटप्पा=ॠन्मेष असणार असा संशय आहे
नवीन Submitted by कमला on 18 August, 2020 - 22:53

>>>

यावर आता एक वेगळाच धागा काढूया. जब मिल बैठेंगे तीन यार... म्हाळसा, ऋन्मेष और कटप्पा
मग तुम्ही लोकं एकेक करून या आणि आपण डु आयडी शंका समाधान पैचान कौन बनेगा करोडपती दस का दम वगैरे खेळूया तिथे... पण सगळीकडे नको हे, वीट आलाय Sad

मराठी असेल तरच...
>>>>

हिंदी असेल तर, चल ढोस ले
ईंग्लिश असेल तर... ईग्लिशमध्ये काय बोलतात ढोसा ला? कोणी फादर अ‍ॅग्नेल, सेंट मेरी,, डॉन बॉस्को वगैरे आहे का ईथे?

Pages