तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?
माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.
अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.
ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.
दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)
चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर
कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता
कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.
मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?
मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?
मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?
एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...
पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!
मला टमाटर फ्लेवर चहाही फार
मला टमाटर फ्लेवर चहाही फार आवडतो.
बहुधा मी मागेही एका धाग्यात हे लिहिलेले.
आम्ही कॉलेजला असताना.. सॉरी वीजेटीआयला असताना रोज संध्याकाळी कॉलेजातली सगळी चिमणी पाखरं उडून गेल्यावर आम्हा कावळ्यांचा कॅंटीनमध्ये कट्टा भरायचा. तेव्हा कटींग चहा, कॅंटीनमधील उरलेसुरले वडे समोसे (जे आम्हाला फ्री मिळायचे) आणि दोघातिघात एक वेज सॅंडवीच हा आमचा ठरलेला मेनू.
त्या सॅंडवीचमधील टमाटर स्लाईस घेऊन मी एकदाच चहातून डुबूक करून बाहेर काढायचो. एखादा नवीन फंटर असेल तर माझी ही कृती बघून डोळे विस्फारायचा. पण विश्वास ठेवा अन्यथा घरी हा प्रयोग करून बघा. मस्त हलकासा आंबटसा फ्लेवर येतो चहाला. झाल्यास त्या टमाटरला लागलेली हिरवी चटणीही चहात विरघळली तर सोबत एक तिखट ठसकाही येतो. लाजवाब!
यकक्क, सर्दी असणाऱ्याने वाफ
यकक्क, सर्दी असणाऱ्याने वाफ घेतलेला चहा फक्त त्यानेच प्यावा
>>>
हो नक्कीच. हे मी सुद्धा लिहिले आहे ना पोस्टमध्ये
आणि ते नसेल आवडत तर फेकूनही देऊ शकता. किंवा खत करू शकता.
हिंदीत चहा मुलगी आहे
हिंदीत चहा मुलगी आहे
मराठीत चहा मुलगा आहे.
तो चहा
>>>>
हो खरेय.
मला ती चहा बोलायचीच सवय आहे
मुळात ईथे म्हणून चहा असे लिहितो. अन्यथा चाय किंवा कटींग असेच शब्द मला बोलीभाषेत वापरायची सवय आहे. चहा बोलले की फार पुस्तकी वाटते मला
मी जॉब लागे पर्यंत चहा
मी जॉब लागे पर्यंत चहा प्यायची नाही रादर मला घरचे पिऊ नाही द्यायचे. पण मग ऑफिस मुळे चहा प्यायला सुरू केले, पण आवडायचा नाही. मग मम्मी मला घरी चहा करून देते तो प्यायला सुरवात केली, अन बस्स नंतर दुसरा चहा आवडलाच नाही. मम्मा फक्त दुधाचा, थोडीशी चहा पत्ती घालून बिनसाखरेचा चहा करते. भरपूर उकळून, ढवळून बनवते. छान लागतो.
वर कोणीतरी सोलापूरच्या चहा बद्दल लिहिलंय, माझा अनुभव सांगते. मला बिनसाखरेचा चहा प्यायची सवय तर तिकडचा चहा म्हणजे गुळवणी. मग मम्मीने त्या बाईला सांगितले दोन चहा फक्त दुधात बिनसाखरेचे दे, तर ती बाई कसली खुश झाली, म्हणे हे ही परवडेल आम्हाला, पण इकडचे लोक या चहात अजून साखर मागतात. ते नुसते ऐकूनच शिसारी आली होती मला. आधीच गुळवणी त्यात अजून साखर म्हणून काकवीच की. कसे पितात देव जाणे असे वाटले.
चहात केळी बूडवून पण खाल्ली
चहात केळी बूडवून पण खाल्ली आहेत का कुणी?
विजय सेतुपतीच्या एका तामिळ सिनेमात पाहिले होते.
चहात केळी बूडवून सिनेमात
चहात केळी बूडवून सिनेमात म्हणून दाखवले असेल.
पण प्रत्यक्षातही असू शकते.
जर लोकं शिकरण खाऊ शकतात दूधात केळी टाकून तर त्यालाच चहाचा फ्लेवर आला समजायचे.
मला मुळातच केळे आवडत नसल्याने नो कॉमेंटस.
पण केळा वेफर फार आवडतात. पण ते सुद्धा चहासोबत खायला मजा येत नाही. आधी चहा खारी खाऊन घेतो मग केळा वेफरचा समाचार घेतो.
दिवाळीचा फराळ म्हणजे शेव,
दिवाळीचा फराळ म्हणजे शेव, चकली, पोह्यांचा चिवडा, शंकरपाळ्या आणि खुसखुशीत करंज्या हे सर्वच चहासोबत एकनंबर लागते
मी हे पाचही आयटम उपलब्धतेनुसार एकत्र घेऊन बसतो आणि वन बाय वन, बाईट बाय बाईट, तोंडात कोंबत राहतो. आणि मध्येमध्ये चहाचा घोट घेत राहायचा. तोंडात सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये एकेक विविध कॉम्बिनेशन होत राहते की हा खाण्याचा पट्टा संपूच नये असे वाटते. मस्त दोम तीन कप चहा झाला की मगच समाधान मिळते
पूर्वी मी धूम्रपान करायचो.
पूर्वी मी धूम्रपान करायचो. तेव्हा चहा सोबत सिगरेट लागायचीच. कुणाकडे गेलो की तिथे सिगरेट कशी ओढणार, तेव्हा मी चहा प्यायचो नाही. तेव्हा चहा सोबत काही खाणे, चहात बुडवून काही खाणे हे प्रकार अर्थातच नव्हते.
आता सात वर्षे झाली धूम्रपान सोडून, पण चहा सोबत काही न खायची सवय कायम आहे.
गेले पाच सहा वर्षांपासून मी वेगवेगळ्या प्रकारचे चहा पीत असतो, बरेच महिने एखाद्या प्रकारचा चहा झाला की मग, दुसरा प्रकार. या आधी रामतुळस, वनतुळस आणि कृष्णतुळस यांचा चहा,लिंबाच्या रसाचे चार थेंब टाकून घेत होतो.
मुंबईत - चहा पिली सर्रास
मुंबईत - चहा पिली सर्रास बोलतात... चूक नसावे..
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात लोक, म्हणुन चूक नाहीच मानायचे का?
चहा पिली तर ठिके पण च्या
चहा पिली तर ठिके पण च्या पिल्ली म्हणतात बरेच जण
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात लोक, म्हणुन चूक नाहीच मानायचे का?
>>>
हो. पुस्तकी भाषेनुसार चूकच आहे हे
चहा हा पदार्थ बहुधा मूळचा
चहा हा पदार्थ बहुधा मूळचा महाराष्ट्रीय नसावा. त्यामुळे जेव्हा हा पदार्थ आला तेव्हा त्यासोबत त्याचे नाव आले. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हिशोबाने तो वापरायला सुरुवात केली.
माझ्या आजीने शाळा केलीच नव्हती. ती चहाला चा बोलायची. आम्हाला हसायला यायची. पण गोड वाटायचे
मी पण ऐकलंय .. चहा पिली असे.
मी पण ऐकलंय .. चहा पिली असे.. पण त्यांचे शब्द थोडेसे वेगळे असतात..म्हणजे ते कधी कधी चाय खाल्ली असे पण म्हणतात..
चार कप चहा बनव असे न म्हणता
चार कप चहा बनव असे न म्हणता काही जण चार कप चहा टाक असेही म्हणतात.
चहा ठेव हे जास्त योग्य नाही का?
मला ते सुद्धा फार गंमतीशीर वाटते. अरे कुठे टाकू
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात
सर्रास पणे अनेक गोष्टी बोलतात लोक, म्हणुन चूक नाहीच मानायचे का?
>>> चहा पिला चूक वाटते... चहा मेल हे कोणी ठरवले?
श्रवू, चाय खाल्ली काही पण.
श्रवू, चाय खाल्ली
काही पण.
चहा ठेव हे जास्त योग्य नाही का?
मी पण चाय रखा है, असंच म्हणते.
चाय डालू क्या. कसं वाटेल.
अवांतर-
.
चहा मेल हे कोणी ठरवले?>>>
चहा मेल हे कोणी ठरवले?>>>
ज्यांनी कांदा मेल, आणि वांग न्यूट्रल, पालक मेल, आणि कोथिंबीर फिमेल ठरवले त्यांनी.
चहा उकळण्याबाबत माझा एक फंडा
चहा उकळण्याबाबत माझा एक फंडा आहे. @@@@
हे अगदी खरे आहे. माझी नेहमी सगळ्या पाकृ बद्दल हीच तक्रार असते.
सगळे साहित्य (म्हणजे मराठीत इन्ग्रेडीएन्ट्स) सांगतात परंतु मुख्य म्हणजे उष्णता किती टाकायची ( म्हणजे किती किलो ज्यूल्स आणि काय रेट ने ) हे कधीच सांगत नाहीत.
चाय खाल्ली>>>
चाय खाल्ली>>>
ती व्यक्ती बंगाली असावी.
बंगाली सोमोसा रोसोगुल्ला ख्वाबे, आणि चाय, दारू पण ख्वाबेच.
मी अनु.. मस्त लागतो आले,
मी अनु.. मस्त लागतो आले, पुदिना,गवती चहा आणि तुळस घालून केलेला चहा , म्हणजे मी बनवलेला बरा लागत असावा. कारण आता संध्यकाळी कॉफी ऐवजी चहा घेतो नवरोबा..
सर्दी झाली तरी मी आल्याचा चहाची वाफ घायचा अघोरी प्रकार करणार नाही..
पुन्हा एकदा ऑफिसला जायला लागले कि मग चहा फक्त रविवारी..
आणि सिगारेट देखील ख्वाबे
आणि सिगारेट देखील ख्वाबे
मृणालिनी मी नाही म्हणत चाय
मृणालिनी मी नाही म्हणत चाय खाल्ली असे. आमचा शिपाई म्हणतो.. आणि काही पण नाही ग .. थोडेसे आगरी भाषेचा विचार करून बघ..कि त्यांचे शब्द कसे असतात..कोणाला दुखवायचे नाही आहे..
मानव अहो तो बंगाली नाही आहे.. कोकणातला ..हेदवी गावचा आहे..
आम्ही तर चहा ढोसा म्हणतो
आम्ही तर चहा ढोसा म्हणतो
माझ्या अंगात राखेचा मधली
माझ्या अंगात राखेचा मधली सरिता शिरली कि मग मी हि चहा ढोसा म्हणते..
मग खरगपूरमध्ये शिपायाचा
मग खरगपूरमध्ये शिपायाचा कोर्स केला असेल.
"आणि सिगारेट देखील ख्वाबे" -
"आणि सिगारेट देखील ख्वाबे" - एका क्रिकेट व्हिडीओ मधे अंशुमन गायकवाड, पतौडीविषयी बोलताना, 'वह अंदर गये, सिग्रेट खायी ....' असा उल्लेख आहे. त्यामुळे हे अगदीच अनकॉमन नसावं.
श्रवू , अगं कधी ऐकलं नव्हते
श्रवू , अगं कधी ऐकलं नव्हते ना म्हणून.
आगरी भाषा पण माहीत नाही.
तरी कुणी दुखवले गेले असल्यास क्षमस्व.
हा शब्द दारू साठी वापरतात.
हा शब्द दारू साठी वापरतात.
उदा. त्याने/तिने दारू ढोसली.
Pages