मायबोलीवर बरेच हौशी कलाकार आहेत. तसेच बऱ्याच मायबोलीकरांच्या पाल्यांना चित्रकलेची आवड असेल. या सर्वांसाठी आम्ही यावर्षी चित्रकला स्पर्धा घेऊन येत आहोत.या स्पर्धेत बाप्पाचे तुमच्या आवडीचे, कोणत्याही माध्यमातून चित्र काढायचे आहे.. उदा. जलरंग, acrylics, ऑइल, पेस्टल्स, क्रेयॉन्स, पेन्सिल अगदी नैसर्गिक बनवलेले रंग, खाण्याचा रंग काहीही चालेल. तुम्ही तुमची कल्पनाशक्ती लढवा.
नियम-
१) ही स्पर्धा दोन गटांसाठी आहे
अ गट) लहान मुलं. (१३ व त्याखालील वयांच्या मुलांसाठी)
ब गट) मोठ्यांसाठी.
२) स्पर्धकांनी प्रवेशिका देताना गटाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे.
३) लहान मुलांच्या गटात त्यांनी स्वतः काढलेले चित्रच अपेक्षित आहे. पालकांनी चित्र काढण्यासाठी, रंगवण्यासाठीरंगवण्यासाठी, मार्गदर्शन करायला हरकत नाही.
४) चित्र काढण्यासाठी माध्यमांची किंवा technique ची अट नाही. क्रेयोन्स, पेन्सिल, चारकोल, ऑइल, वॉटर कलर्स, इंक, खाण्याचे रंग इ. एक किंवा अनेक माध्यम एकत्रितपणे तुम्ही वापरू शकता. dotting, डूडल, स्केच इ कोणताही प्रकार चालेल. धान्य, पिस्ता शेल्स, मणी इ. साहित्य वापरून चिकटवून कोलाज केलेले चित्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. चित्र स्वतः रंगांचा वापर करून रंगवायचे आहे.
५) प्रवेशिका देताना तुम्ही कोणते माध्यम वापरले इ. ची माहिती थोडक्यात देणे आवश्यक आहे.
६) स्पर्धकांनी कृपया दुसऱ्यांचे चित्र स्वतःच्या नावावर खपवू नये. असे काही लक्षात आल्यास ती प्रवेशिका तात्काळ बाद करण्यात येईल.
७) अ आणि ब गटातील विजेते वेगवेगळे निवडण्यात येतील.
८) तुम्ही तुमच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट पासून पाठवू शकता. (IST)
९) एक id ब गटातून एकच प्रवेशिका सादर करू शकतो. अ गटासाठी एक id one per kid प्रवेशिका सादर करू शकतो.
१०) काढलेल्या चित्राची किमान २ प्रकाशचित्रे द्यावी.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
१०) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"चित्रकला स्पर्धा- - - - - {तुमचा आयडी}"
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.
तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.
!!! गणपती बाप्पा मोरया!!!
------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.
हा धागा गणेशोत्सवाच्या गृपमधे
हा धागा गणेशोत्सवाच्या गृपमधे असावा.
लहान मुलांसाठी वयोगट स्पष्ट लिहिला तर बरे होईल.
संयोजक , यू ट्यूबवर अनेकांची
संयोजक , यू ट्यूबवर अनेकांची व्हिडिओ ट्युटोरियल असतात. आमच्यासारखे हौशी कलाकार ते बघूनच शिकतात . तर संदर्भासाठी ती ट्युटोरियल चालतील का ? चित्र काढल्यावर त्या चॅनेलचा उल्लेख केला जाईलच
जाई चालतील.
जाई चालतील.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
डिजीटल स्केच चालेल का ?
डिजीटल स्केच चालेल का ?
मोठ्यांसाठी म्हणजे 13 वर्षे वयाच्या पुढे कितिही का ?
डिजीटल स्केच चालेल का ?>>>>>
डिजीटल स्केच चालेल का ?>>>>>
नाही. येथे स्वतः हाताने कागदावर कोणतेही रंग, टूल्स वापरून चित्र काढणे अपेक्षित आहे. पेंट वापरून केलेले चित्र, डिजिटल पेंटिंग इ. नाही चालणार
मोठ्यांसाठी म्हणजे 13 वर्षे वयाच्या पुढे कितिही का ? >>>> हो.
(No subject)
(No subject)
(No subject)
पेन्सिल स्केच व दोन
पेन्सिल स्केच व दोन पर्णपुष्पगणेश रचना टाकल्या आहेत
स्पर्धेसाठी घ्याव्या
vijya kelkar गणेशोत्सव ग्रुप
vijya kelkar गणेशोत्सव ग्रुप मध्ये नवीन धागा उघडून तुमची प्रवेशिका द्या. स्पर्धेचे नियम पहा. फुलांची रचना नाही चालणार. रंग किंवा पेंसिल्स वापरून काढलेले चित्र चालेल.
गणेशोत्सव ग्रुप मधे शामील कसे
गणेशोत्सव ग्रुप मधे शामील कसे होऊ?
मग नवीन धागा काढायचा ना
ठीक आहे.
इथे पहाhttps://www.maayboli
इथे पहा
https://www.maayboli.com/node/3581