तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?
माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.
अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.
ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.
दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)
चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर
कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता
कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.
मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?
मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?
मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?
एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...
पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!
चामुंडराय, शांघाय मध्ये
चामुंडराय, शांघाय मध्ये वेगवेगळ्या चहांची चव घेण्याचा प्रोग्रॅम केला होता एकदा. टूरिस्टन साठी असतो हा प्रोग्रॅम, चहा विकत घेण्यास. कुठला चहा कसा प्यायचा हे ही सांगतात नीट.
पण सगळी नावे, पिण्याची पद्धत विसरलो आता.
साईजनुसार नाही, उपलब्धता आणि
साईजनुसार नाही, उपलब्धता आणि उपयुक्तता यानुसार
उद्या जर काळवीट लाखोंच्या संख्येने वाढले तर ते मारून खायला परवानगी मिळेल
जसे ऑस्ट्रेलिया मध्ये इमूवर लष्कर घालण्यात आले होते पार मशिनगन वगैरे
काल अवांतर प्रतिसाद पटापट
काल अवांतर प्रतिसाद पटापट उडवले जात होते. त्यामानाने आज शांतता आहे.
उडतील उडतील तेव्हा रात्र होती
उडतील उडतील
तेव्हा रात्र होती
इस रात की अबी सुब नही
इस रात की अबी सुब नही
दूध~गरम किंवा गार कसेही आवडते
दूध~गरम किंवा गार कसेही आवडते.साखर न घालता. कपातून किंवा स्टीलच्या फुलपात्रातून. सकाळी किंवा रात्री झोपताना. सर्दी खोकला थाप असेल तर गरम दूध हळद घालून पिते.पण मला पिशवीतले दूध आवडत नाही. कोजागिरीला मसाला दूध आवडते.
चहा~आमच्याकडे 55%पाणी आणि 45% म्हशीचे दूध एकत्र उकळून असे प्रमाण आहे. सकाळी उठल्यावर कपातून पिते. चहाबरोबर Britannia मारी बिस्कीट,पोहे,खारी,चकली आवडते.
कॉफी~म्हशीच्या दुधाची.(अर्थात थोडे पाणी पण)मला जरा strong कडवट आवडते. Nescafe आवडते. Bru चालते. साखर कमी आणि कॉफीपूड जास्त.कपातून.हे गरम कॉफीचे झाले. मला Cold coffee पण आवडते.
इतर~ ताक आवडते.
प्रतिसाद वाढताहेत तशी दूध
प्रतिसाद वाढताहेत तशी दूध पाण्याच्या टक्केवारीची अचूकताही वाढते आहे.
काही प्रतिसादांनंतर दूध ५७.४५% पाणी ४२.५५% असे वाचायलाही मिळु शकते.
काही प्रतिसादांनंतर दूध ५७.४५
काही प्रतिसादांनंतर दूध ५७.४५% पाणी ४२.५५% असे वाचायलाही मिळु शकते. >>>>
मी अस एका पुस्तका मध्ये वाचले
मी अस एका पुस्तका मध्ये वाचले आहे की चहा आणि कॉफी बाबतीत जी मनसे परफेक्ट असतात ना तो सगळा बाबतीत पर्टिक्युलर असतात
कृपया यात राजकारण आणू नये
कृपया यात राजकारण आणू नये
मनसे वाले कधीपासून परफेक्ट म्हणवून घ्यायला लागले
तुम्ही हा धागा वर 100 वी
तुम्ही हा धागा वर 100 वी प्रतिक्रिया दिली आहे
मग जे लोक चहा कॉफी पीतच नाहीत
मग जे लोक चहा कॉफी पीतच नाहीत त्यांच्या बद्दल??
जे लोक चहा कॉफी पीतच नाहीत
जे लोक चहा कॉफी पीतच नाहीत त्यांच्या बद्दल??>> तो जास्त परफेक्ट असतात
(No subject)
मी अस एका पुस्तका मध्ये वाचले
मी अस एका पुस्तका मध्ये वाचले आहे की चहा आणि कॉफी बाबतीत जी मनसे परफेक्ट असतात ना तो सगळा बाबतीत पर्टिक्युलर असतात
>>>>>>
पर्रफेक्ट चहा म्हणजे काय? चहा साखर पाणी उष्णता यांचे प्रमाण का?
चहा उकळण्याबाबत माझा एक फंडा आहे. एका ठराविक अंतरावर जाऊन उभा राहतो. तिथवर वास येऊ लागला की चहा पुरेसा उकळला असे समजावे. अर्थात हे अंतर किती कप चहा ठेवला आहे त्यानुसार बदलतो.
एका ठराविक अंतरावर जाऊन उभा
एका ठराविक अंतरावर जाऊन उभा राहतो. तिथवर वास येऊ लागला >> आणि हवा विरुद्ध दिशेला जात असेल तर?
अर्थात हे अंतर किती कप चहा
अर्थात हे अंतर किती कप चहा ठेवला आहे त्यानुसार बदलतो>>>>>
म्हणजे घरी पाहुणे वगैरे आले की पार गॅलरीत जाऊन उभे रहावे लागत असेल. लोकांनाही कळत असेल गॅलरीत उभाय हा माणूस म्हणजे घरी चहाला जास्त लोक आलेत.
अजून जास्त आले तर सोसायटीच्या गेटबाहेरच थेट
म्हणजे घरी पाहुणे वगैरे आले
म्हणजे घरी पाहुणे वगैरे आले की पार गॅलरीत जाऊन उभे रहावे लागत असेल. लोकांनाही कळत असेल गॅलरीत उभाय हा माणूस म्हणजे घरी चहाला जास्त लोक आलेत.
अजून जास्त आले तर सोसायटीच्या गेटबाहेरच थेट >> बघा हा.. माबोकरांना नविन घरी चहाला बोलवतील आणि स्वत: गेट जवळ उभे राहतील
हवा विरुद्ध दिशेला जात असेल
हवा विरुद्ध दिशेला जात असेल तर >>> छान प्रश्न. घरात एसी आहे. दारे खिडक्या बंद. त्यामुळे हवेचा अनिश्चित फॅक्टर बादच होतो.
अजून जास्त आले तर सोसायटीच्या गेटबाहेरच थेट >>> माणसे आणि अंतर याचे प्रमाण सरळ गुणोत्तरात नाहीये. म्हणजे एक माणसाला चहा ठेवला तर तीन फूट लांब उभे राहावे लागते, म्हणून दोन माणसांना चहा ठेवल्यास सहा फूट आणि चार माणसांना चहा ठेवल्यास बारा फूट असे सोपे गणित नाहीये ते.
वर्ग, घनमूळ, लॉगॅरिथम साईन कॉस थिटा वापरून फॉर्म्युला बनवलाय. ज्यांना अशी शकुंतलादेवी झेपत नाहीत त्यांच्यासाठी सोपा फॉर्म्युला सुद्धा बनवला आहे जो ९८ टक्के अचूक उत्तर देतो.
उभे राहायचे अंतर = (वर्गमुळात च + ऋ)
ईथे च = किती कप चहा
ऋ = २.२ कॉन्स्टंट
त्यामुळे २५ माणसांना चहा ठेवला तरी साधारण वर्गमूळात २५ = ५,
अधिक २.२ म्हणजे ५ + २.२ = ७.२ फूट जेमतेम.
थोडक्यात, किचनचा ऊंबरठाही ओलांडावा लागत नाही.
बाकी शंभर माणसे आली तर थोडे अंतर वाढेल खरे. (१०.२ फूट होईल)
पण ईतक्या लोकांना एकत्र उकळवावे ईतका मोठा टोप आमच्याकडे नाही. त्यामुळे २५, २५, २५, २५ असा चार वेळा खटा टोप करावा लागेल
अजून जास्त आले तर सोसायटीच्या
अजून जास्त आले तर सोसायटीच्या गेटबाहेरच थेट >>
घरात एसी आहे. दारे खिडक्या बंद. त्यामुळे हवेचा अनिश्चित फॅक्टर बादच होतो.>>> वीज गेली असेल आणि खिडकी उघडी ठेवावी लागत असेल आणि कितीही अडचणी पार करून वारा/हवा विरूद्ध दिशेला जात असेल तर?
गॅस सुरु असताना तो दारं
गॅस सुरु असताना तो दारं खिडक्या उघडत नसेल.
ऋन्मेऽऽष@ पर्रफेक्ट चहा
ऋन्मेऽऽष@ पर्रफेक्ट चहा म्हणजे काय? चहा साखर पाणी उष्णता यांचे प्रमाण का?>> साखर, चहा पावडर, पाणी, दूध, तापमान, आणि उकळण्याबाबतचा फंडा.
एकदा घेऊनच टाक तो 100 लोकांचा
एकदा घेऊनच टाक तो 100 लोकांचा टोप
इतकी घरे आहेत, एक टोप कुठेही मावेल आरामात
कृपया येथे अवांतर प्रतिसाद
कृपया येथे अवांतर प्रतिसाद टाकु नये. उडविण्यात येतील.
वीज गेली असेल आणि खिडकी उघडी
वीज गेली असेल आणि खिडकी उघडी ठेवावी लागत असेल आणि कितीही अडचणी पार करून वारा/हवा विरूद्ध दिशेला जात असेल तर?
>>>>>>
वीज गेली की पॉवर बॅक अप असतो. इन्वर्टर.
बाकी महिन्याला २१ हजार वीज बिल येते. काय बिशाद मंडळाची की वीज कापतील आमची
गॅस सुरु असताना तो दारं खिडक्या उघडत नसेल.
>>>>
नाही उघडत. चहातून उत्पन्न होणारे गरम धुके बाहेर जायला आम्ही चिमणी कावळा वापरतो.
साखर, चहा पावडर, पाणी, दूध,
साखर, चहा पावडर, पाणी, दूध, तापमान, आणि उकळण्याबाबतचा फंडा.
>>>
@ पूर्वी येस, ते समजले, मी पण तेच लिहिलेय.
पण पर्रफेक्ट प्रमाण काय आहे. मला त्या वॅल्युस जाणून घेण्यात रस आहे.
एकदा घेऊनच टाक तो 100 लोकांचा टोप
इतकी घरे आहेत, एक टोप कुठेही मावेल आरामात
>>>>
@ आशूचॅम्प, आमच्याकडे १०० लोकं येत नाही कधी प्रश्न हा आहे म्हणून कधी घ्यायची वेळ आली नाही ईतका मोठ टोप. ठेवायला काय बाल्कनीत हजार माणसांचा टोप ठेऊ ईतकी जागा आहे.
पण शेवटची १०० माणसे एकत्र मी माझ्या लग्नाला पाहिली होती. ती सुद्धा हॉलमध्ये, घरी नाही.
एवढे 21000 विजेचे काय करतोस
एवढे 21000 विजेचे काय करतोस रे ?
की त्या रजनीकांत रोबोट सारखे विजेचे तार कानाला लावून स्वतलापण चार्जिंग करतोस ?
आमच्याकडे १०० लोकं येत नाही
आमच्याकडे १०० लोकं येत नाही कधी प्रश्न हा आहे म्हणून कधी घ्यायची वेळ आली नाही >>>>
कदाचित टोप नसल्याने येत नसतील, आता घेतल्यानंतर येतील बहुदा.
आणि हजार माणसांचा टोप ठेवण्याऐवढी बाल्कनी असेल तर तिथे पोहे आणि तर्री ची पातेली ठेऊ शकता.
आशूचॅम्प, हजार माणसांचा टोप
आशूचॅम्प, हजार माणसांचा टोप म्हणजे फार नाही.
एकाला २०० मिली चहा दिली तरी हजार माणसांना २०० लीटर चहा लागेल.
तर ८० सेंटीमीटर व्यासाचा आणि ४० सेमी ऊंचीचा टोप यासाठी पुरेसा ठरेल.
तर ८० सेंटीमीटर व्यासाचा आणि
तर ८० सेंटीमीटर व्यासाचा आणि ४० सेमी ऊंचीचा टोप यासाठी पुरेसा ठरेल.>>>>>
हा साधारण किती होईल याचा अंदाज असेलच ना?
आणि तो चढवायला उतरवयाला लागणारे मनुष्यबळ?
आणि पोह्याला आणि तर्रीला तर अजून कमी लागेल जागा, तर्री काय चहासारखी नाही पिणार लोकं
Pages